स्मरणातील कविता - ३ राधे रंग तुझा गोरा - संदीप खरे ...Radhe Rang Tujha Gora - Sandeep Khare

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ก.ย. 2024
  • स्मरणातील कविता - ३
    राधे रंग तुझा गोरा - By Nikhil Pramod Vaidya
    गीत - संदीप खरे
    राधे रंग तुझा गोरा,
    सांग कशाने रापला.
    मिठीतुन सावळ्याच्या,
    रंग सावळा लागला.
    राधे रंग तुझा गोरा,
    सांग कशाने रापला.
    राधे दृष्टीतुन का ग,
    घन सावळा थिजला.
    इथे तुझ्या डोळ्या पाणी,
    तिथे मुरारी भिजला…
    राधे रंग तुझा गोरा,
    सांग कशाने रापला.
    डोळा पाणी जिणे उन्ह,
    इंद्रधनू चा सोहळा…
    पुसटले साती रंग,
    एक श्रीरंग उरला.
    राधे रंग तुझा गोरा,
    सांग कशाने रापला.
    मिठीतुन सावळ्याच्या,
    रंग सावळा लागला.
    राधे रंग तुझा गोरा,
    सांग कशाने रापला.

ความคิดเห็น • 37