स्मरणातील कविता - ४ केवढे हे क्रौर्य ! श्री. नारायण वामन टिळक | Kevdhe he kraurya | क्षणो क्षणी पडे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ก.ย. 2024
  • स्मरणातील कविता - ४
    केवढे हे क्रौर्य ! - By Nikhil Pramod Vaidya
    क्षणोक्षणी पडे, Kshano Kshani pade.
    माहिती - शेवटचा श्लोक
    कवी - श्री. नारायण वामन टिळक
    वृत्त - वसंततिलक
    क्षणोक्षणी पडे, उठे परि बळें, उडे बापडी,
    चुके पथहि येउनी स्तिमित दृष्टीला झांपडी ;
    किती घळघळा गळे रुधिर कोमलांगांतुनी,
    तशीच निजकोटरा परत पातली पक्षिणी.
    म्हणे निजशिशूंप्रती अधिक बोलवेना मला,
    तुम्हांस अजि अंतिचा कवळ एक मी आणिला ;
    करा मधुर हा ! चला ! भरवितें तुम्हां एकदा
    करो जतन यापुढें प्रभू पिता अनाथा सदा !
    अहा ! मधुर गाउनी रमविलें सकाळीं जना,
    कृतघ्न मज मारितील नच ही मनीं कल्पना !
    तुम्हांस्तव मुखीं सुखें धरूनि घांस झाडावरी
    क्षणैक बसलें न तों, शिरत बाण माझ्या उरीं !
    निघून नरजातिला रमविण्यात गेलें वय,
    म्हणून वधिलें मला ! किति दया ! कसा हा नय !
    उदार बहू शूर हा नर खरोखरी जाहला
    वधून मज पांखरा निरपराध कीं दुर्बला !
    म्हणाल भुलली जगा, विसरली प्रियां लेंकरा,
    म्हणून अतिसंकटें उडत पातलें मी घरा ;
    नसे लवही उष्णता, नच कुशींत माझ्या शिरा,
    स्मरा मजबरोबरी परि दयाघना ईश्वरा !
    असो; रुधिर वाहुनी नच भिजो सुशय्या तरी
    म्हणून तरुच्या तळी निजलि ती द्विजा भूवरी;
    जिवंत बहु बोलकें किती सुरम्य तें उत्पल
    नरें धरूनि नाशिले, खचित थोर बुद्धी, बल.
    मातींत ते पसरले अतिरम्य पंख,
    केले वरी उदर पांडुर निष्कलंक !
    चंचू तशीच उघडी, पद लांबवीले,
    निष्प्राण देह पडला ! श्रमही निमाले !

ความคิดเห็น • 33

  • @realisticcoments283
    @realisticcoments283 ปีที่แล้ว +4

    ५ व्या इयत्तेता होती ही माझी आवडती कविता.

  • @anuyakulkarni3479
    @anuyakulkarni3479 ปีที่แล้ว +2

    दरवेळी ही कविता ऐकताना डोळे भरून येतात... तुम्ही खरच खुप सुंदर सादर केलीत

  • @mohanshinde6143
    @mohanshinde6143 หลายเดือนก่อน +2

    खूप हृदय स्पर्शी कविता आमच्या बालपणी 4/5 ला ही कविता होती पण अजूनही बरीच कडवी पाठ आहेत. माझे वय 68 वर्षे आहे. सादरकारण छान आहे.

    • @musiclearner788
      @musiclearner788  หลายเดือนก่อน

      धन्यवाद! प्रत्येकाच्या स्मरणातील कविता 🙏

  • @kiransabanis2172
    @kiransabanis2172 6 หลายเดือนก่อน +1

    आज या सादरीकरणामुळे कवितेतली आर्तता मनाला भिडली.

    • @musiclearner788
      @musiclearner788  5 หลายเดือนก่อน

      खूप धन्यवाद!!!

  • @ankitajoshi7904
    @ankitajoshi7904 ปีที่แล้ว

    🙏🙏

  • @rajashrijoshi3947
    @rajashrijoshi3947 2 ปีที่แล้ว +2

    सुंदर आवाज, बालपणी ची कविता. जुन्या आठवणी ताज्या झाल्या.

  • @AnuradhaGhadge-vz9yf
    @AnuradhaGhadge-vz9yf ปีที่แล้ว

    आमच्या वेळेस ची कविता आहे त्यामुळे जुन्या आठवणी जाग्या झाल्या धन्यवाद

  • @avimango46
    @avimango46 3 ปีที่แล้ว +2

    निखिल ! अगदी भरुन आले !

  • @achalatendulkar6449
    @achalatendulkar6449 ปีที่แล้ว

    Most beautiful 😂❤❤

  • @swatikarkhanis9966
    @swatikarkhanis9966 3 ปีที่แล้ว +1

    निखिल,अतिशय मधुर गायन!कवितेला अनुकुल असे,कोमल,हळुवार पण स्पष्ट उच्चार!!फारच सुंदर!

  • @tanmaishintre4978
    @tanmaishintre4978 3 ปีที่แล้ว +1

    हळुवार शब्द....डोळे भरुन आले

  • @sureshvaidya2258
    @sureshvaidya2258 3 ปีที่แล้ว +1

    निखिल खूपच छान आवाजात तू गायली आहेस त्या बद्दल आपले अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा

  • @atulaswaleatulaswale3480
    @atulaswaleatulaswale3480 หลายเดือนก่อน

    खुप सुंदर 👍👌👏

    • @musiclearner788
      @musiclearner788  หลายเดือนก่อน

      धन्यवाद! 🙏

  • @AnuradhaGhadge-vz9yf
    @AnuradhaGhadge-vz9yf ปีที่แล้ว

    खूप सुंदर गायकी धन्यवाद

  • @achalatendulkar6449
    @achalatendulkar6449 ปีที่แล้ว

    Sunder aavaj ❤❤

  • @dhanashreenalavade505
    @dhanashreenalavade505 2 ปีที่แล้ว +2

    My dad used to sing this for me and my sister while sleeping. Miss him evevrytime I listen to this poem. Khup sundar aahe hi Kavita.
    Thank you he record Kenya badal. Khup khup aabhar tumche.

  • @prabhakarmuley2673
    @prabhakarmuley2673 7 หลายเดือนก่อน

    Sunder , touching

  • @vandanapagar7180
    @vandanapagar7180 3 ปีที่แล้ว +1

    निखिल खुप च सुंदर

  • @ratangosavi5400
    @ratangosavi5400 ปีที่แล้ว

    अत्यंत भावस्पर्शी अशी ही टिळक साहेबांची कविता मला इयत्ता सहावीच्या अभ्यास क्रमात होती अणि शिक्षक सुधा याच चालीवर ही कविता आम्हाला शिकवायचे, त्यावेळी सर्व वर्ग कविता ऐकताना गहिवरून जायचा अणि आज सुधा मन हेलावून गेले आहे, सर, आपण समाज माध्यमातून हि सुंदर कविता सादर केल्या बद्दल धन्यवाद, कविता शार्दूलविक्रीडित या वृत्तामध्ये लिहीलेली आहे असे मला वाटते कारण प्रत्येक ओळीतील अक्षरे ही एकापाठोपाठ र्‍हस्व, दीर्घ अशी शार्दूलविक्रीडित वृत्तामध्ये च येतात असे मला वाटते,!

  • @suhasbhide5773
    @suhasbhide5773 2 ปีที่แล้ว

    👌👌

  • @anitmore7333
    @anitmore7333 2 ปีที่แล้ว

    ❤️😭

  • @rajeshjhana
    @rajeshjhana 2 ปีที่แล้ว

    Takes me back in time….

  • @ashokhkulkarni
    @ashokhkulkarni 2 ปีที่แล้ว +1

    कृपया गायकाचा परिचय द्यावा. छान गायिली ही कविता!

  • @sayaliprabhulkar1970
    @sayaliprabhulkar1970 2 ปีที่แล้ว

    Khup sunder

  • @kamalakarpatil5088
    @kamalakarpatil5088 2 ปีที่แล้ว +1

    मला ही कविता ५ व्या इयत्तेत होती, अक्षरश: रडविलं होतं