डॉ.ललित अधाने| श्री.समाधान इगळे| शब्द सह्याद्री साहित्य प्रतिष्ठाण लासूर स्टे.| काव्य संमेलन 2022|

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
  • #लासुर_स्टेशन येथे #काव्य_संमेलन_2022 उत्साहात.
    विविध कवितांनी प्रेक्षक मंत्रमुग्ध.
    येथील #शब्द_सहयाद्री_साहित्य_प्रतिष्ठान च्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी नववर्षाचे निमित्याने काव्य संमेलन आयोजित करण्यात आले होते.
    संमेलनाचे हे पाचवं वर्ष होते, कार्यक्रमाच्या सुरुवातीस भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे,छत्रपती शिवराय यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून, दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
    #छत्रपती_शिवाजी_महाराज_स्मारक_मैदानात आयोजित कार्यक्रमात कवी #डॉ_समाधान_इंगळे यांनी दूध डेअरीला जातंय या कवितेतून ग्रामीण व शहरी सामाजिक अंतर विशद केले तर वर्षानुवर्षे माझ्या बा च्या गळ्यात फाटकाच रुमाल आहे या कवितेतून #धम्मपाल_जाधव यांनी शेतकरी बापाची व्यथा मांडली, #कु_गुंजन_पाटील यांनी खरं सांगते या मुलींना सारं कळतं या कवितेतून मुलींचे भावविश्व उलगडत प्रेक्षक मंत्रमुग्ध केले, तर #डॉ_शिवप्रसाद_घोडके यांनी इथं बागळ्यांचा देश अन कोकिळेचे गायन या कवितेतून सध्याचे वास्तव मांडले, #डॉ_ज्ञानेश्वर_खिल्लारी यांनी माणसे पराकोटीचे होताय स्वार्थी,कपटी अन अप्पलपोटे या काव्यातून मानवी भावना व्यक्त केल्या तर #डॉ_ललित_आधाने यांनी दुष्काळात भाकड गाई तुम्ही पाळून बघा,चारापाण्यासाठी पोट जाळून बघा या कवितेतून दुष्काळाची तीव्रता विशद केली.
    या प्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तीचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला, #सुनील_भवर, #मयूर्वी_संगेकर, #विनोद_बागुल, #ज्ञानेश्वर_गिरी, #प्रज्ञा_त्रिभुवन, #बाबुराव_उदावंत, #कोमल_कुऱ्हाडे, #स्वराज_सूर्यवंशी यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला, या वर्षी प्रथमच घेण्यात आलेल्या ऑनलाईन काव्य स्पर्धेत सहभागी विजेते उत्तेजनार्थ #चांगदेव_गीते, #त्रितीय #साक्षी_औटे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात पार पडला.

ความคิดเห็น • 18