पंढरपूर ची हि पर्यटनस्थळे पाहिलीत का? | Pandharpur Tourist Places To Visit in 2024 | Pandharpur Trip

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
  • पंढरपूर ची हि पर्यटनस्थळे पाहिलीत का? | Pandharpur Tourist Places To Visit in 2024 | Pandharpur Trip | Pandharpur Tour | Pandharpur Tourist Places #pandharpur #vitthaldarshan #पंढरपूरदर्शन #vitthal #pandharpur #vitthaldarshan
    पंढरपूर ची इतर पर्यटनस्थळे पाहिली आहेत का? Pandharpur tourist places vlog
    1. विष्णू पद:
    पंढरपूरपासून जवळच असलेल्या गोपाळपूरजवळ चंद्रभागेच्या पात्रात एक पुरातन मंदिर आहे. या मंदिरास विष्णू पद म्हणून ओळखले जाते. जेव्हा रूक्मिणी देवी देवावर रूसून दिंडीर वनात आली, तेव्हा देवीच्या शोधात विठ्ठल ज्या ठिकाणी पंढरपुरात प्रथम आले, ते ठिकाण म्हणजे चंद्रभागेच्या पात्रातील मोठा खडक विष्णूपद.
    या ठिकाणी विठूरायाने आपले संवगडी आणि गाईसह क्रीडा केल्या. येथेच त्या सर्वांनी भोजन केल्याचंही बोललं जातं. तेव्हा या ठिकाणी देवाची आणि गाईची पाऊले उमटल्याची अख्यायिका आहे. विठ्ठल हे विष्णूचे अवतार असल्याने इथे उमटलेल्या पावलांमुळे या चंद्रभागेच्या पाण्यातील खडकावरील ठिकाणास विष्णूपद असं नाव मिळालं.
    2. गोपाळपूर संत जनाबाई मठ :
    या नंतर आपण भेट देणार आहोत पंढरपूर मधील गोपाळपूर येथील संत जनाबाई यांच्या मठाला. आपला संसार करता करता जनाबाई यांनी विठ्ठलाची खूप भक्ती केली आणि खूप सारे अभंग लिहिले. विठ्ठल साक्षात त्यांच्या भेटीला आला आणि त्यांच्या संसारात त्यांना मदत करू लागला. हे सर्व ऐतिहासिक प्रसंग आणि संत जनाबाईंच्या संसारातील अनेक पुरावे इथे तुम्हाला पाहायला मिळतील. गोपाळपुरातील या वास्तूचे बांधकाम खूप पुरातन असून हे १० व्या शतकातील असल्याचे सांगितले जाते.
    3. संत गजानन महाराज संस्थान, पंढरपूर :
    मित्रांनो यानंतर आपण भेट देणार आहोत पंढरपूर येथील श्री गजानन महाराज संस्थानाला. या संस्थानातील मंदिरांचे संगमरवरी दगडांमध्ये केलेलं बांधकाम अगदी बघण्यासारखे आहे. मंदिराचा परिसर अतिशय स्वच्छ आणि प्रसन्न आहे. येथे शेगावच्या संत गजानन महाराजांचे मंदिर आहे. तसेच आवारात राम मंदिर देखील तुम्हला बघायला मिळेल. या संत गजानन महाराज ट्रस्ट मध्ये देखील राहण्याची आणि जेवणाची उत्तम सोया आहे आणि हे विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या अगदी जवळ असल्यामुळे तुम्ही येथे देखील मुक्काम करू शकता.
    4. कैकाडी महाराज मठ :
    या मठामध्ये इतिहासातील आपल्या हिंदू देवी देवतांचे तसेच प्राचीन गुरु शिष्य परंपरेतील अनेक प्रसंग मूर्तिरूपात हुबेहूब साकारलेले दिसतात. इथले अनेक प्रसंग पाहताना देवी देवतांचा पौराणिक इतिहास आणि स्वातंत्र्य समरातील अनेक गोष्टी आपल्या डोळ्यांसमोर उभ्या राहतात.
    5. इस्कॉन हरे कृष्ण धाम :
    स्वामी श्रील प्रभुपद स्थापित इस्कॉन समितीचे भव्य असे राधाकृष्ण मंदिर तुम्ही पंढरपुरात पाहू शकता. हे मंदिर चंद्रभागेच्या तीरावर पुंडलिक समाधी मंदिराच्या अगदी समोर काठापलीकडे तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्ही पुंडलिक मंदिराकडून बोटीने सुद्धा इथे येऊ शकता. या मंदिरातील राधे कृष्णाची आणि स्वामी श्रील प्रभुपद यांची मूर्ती पाहून मन प्रसन्न होते. याच मंदिराजवळ चंद्रभागेच्या काठाला लागून स्वामी प्रभुपद घाट देखील आहे. इथून देखील तुम्ही नौकाविहाराचा आनंद घेऊ शकता.
    ============================================
    महत्वाच्या लिंक्स ( Mentioned Links ) ✍🏻
    1) पंढरपूर दर्शन ऑनलाईन पास ( Pandharpur Online Darshan Pass )
    Link : vitthalrukmini...
    2) पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास वेबसाईट :
    Link : yatradham.org/...
    3) विजयराज पवार ( Vijayraj Pawar Auto Rikshaw )
    Contact : +919975614002 (Whatsapp)
    या व्हिडिओ मधील महत्वाचे भाग बघा :
    =============================================
    अश्याच नवनवीन व्हिडीओ साठी SUBSCRIBE करा आपल्या ‪@ChalaJauu‬ या चॅनेल ला
    Cinematography & Editing : Suyog Khandalekar
    Voiceover By : Suyog khandalekar
    Our Instagram Page :
    Suyog K Vlogs : www.instagram....
    The music in this video is from Epidemic Sound
    =============================================
    #पंढरपूरदर्शन #विठ्ठलदर्शन #पाऊलवाटा #paulwata #paulvata #pandharpur #vitthaldarshan #pandharpurdarshan #पंढरपुर #श्रीविठ्ठलरुक्मिणीमंदिरपंढरपुर #pandharpuryatra2024 #kartikiyatra #pandharpur2024 #pandharpurdarshan2024 #vitthalrukminibhaktniwas #pandharpuronlinedarshanpass #pandharpur #vitthal #pandharpurdarshan #vitthaldarshan #maharashtra #marathi #mumbai #india #pune #vitthal #pandharpur #pandharpurkar #pandharpurwari #pandharpuryatra #kshetrapandharpur #pandharpurtemple #pandharpur_wari #maharashtramaza #maharashtra_majha #marathas #swarajya #baramati
    =============================================
    पंढरपूर मध्ये पाहण्याची ठिकाणे :
    1. विठ्ठल रुक्मिणी मंदिर
    2. चंद्रभागा नदी
    3. भक्त पुंडलिक मंदिर
    3. संत कान्होपात्रा मंदिर
    4. दिंडीरवन
    5. श्रीकृष्ण मंदिर गोपाळपूर
    6. संत कैकाडी महाराज मठ
    7. इस्कॉन मंदिर पंढरपूर
    8. संत गजानन महाराज मठ
    =============================================
    व्हिडिओ कसा वाटला याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया comment ✍🏻 मध्ये कळवायला नक्की विसरू नका.🙏🏼
    Pandharpur Related Searches :
    Garud khamb pandharpur | chandrabhaga river | chandrabhaga nadi | bhakt pundalik mandir | lohdand tirth pandharpur | sant chokamela samadhi | sant namdev maharaj payri | namdev payri | vishnupad mandir pandharpur | sant janabai mandir | birds of vishupad | sulache pani katha | gopalura pandharpur | gopalpur pandharpur

ความคิดเห็น •