विवेक, गेल्या वर्षी वारीच्या अभंगानंतर मनाला अतिशय भिडणारं आणि वारंवार ऐकावं असं वाटणारं हे गीत झालंय. सुरुवातीच्या दाटून आलेल्या मेघांच्या दर्शनानंतर संजीवजींनी घेतलेली तान ऐकल्यावरच हे गाणं काय दर्जाचं असेल याची कल्पना आली आणि अगदी शेवटपर्यंत या गाण्याचा आलेख चढताच ठेवण्यात तू कमालीचा यशस्वी झालायस. "घन भरून येताना, मन भरून आले" ही डबीर सरांची साधी व सोपी अशी रचना, त्याला तू दिलेली सुंदर चाल आणि सतार, बासरी, पखवाज, ढोलक व तबला अशी प्रामुख्याने मनाला भावणारी वाद्यांची साथ यांचा अतिशय सुंदर संगम होऊन एक छान कलाकृती तयार झालीय. हितेश प्रसाद यांचं विशेष कौतुक. या गीतातील अखंड भिजणाऱ्या सुंदर अशा लावण्यवतीला विविध भावांसह पावसात भिजताना, कधी छत्रीमध्ये, तर कधी छत्रीशिवाय घेतलेले चित्रण अतिशय मोहक झाले आहे. या गाण्याला पं. संजीव अभ्यंकर यांची तू अतिशय योग्य निवड केली आहेस. या गाण्यासाठी दुसरं कोणी इतक्या छान गाऊच शकलं नसतं. त्यांचं गाणं संपल्यावर शेवटी जी सुरावट घेतली आहेस ती तर अगदी लाजवाब झालीय. आषाढाच्या पहिल्या दिवशी हे गाणं प्रकाशित केलंस खरं, पण त्या दिवशी पावसाचा एक टिपुसही पडला नाही. तरीही या गाण्याने तू सर्वांनाच स्वरांच्या आणि सुरांच्या वर्षावात चिंब भिजवलंस हेच सत्य आहे. बाहेर पाऊस पडत असताना कप किंवा ग्लास कोणतेही पेय घेत किंवा पावसात लाँग ड्राईव्ह वर जाताना हे गाणं ऐकायला खूप मजा येईल. तुझ्या अल्बममधल्या आतापर्यंतच्या गाण्यांमध्ये सर्वोत्तम. अशाच किंवा याहूनही उत्तमोत्तम कलाकृती तुझ्या हातून घडाव्यात हीच शुभेच्छा. ❤️
केवळ अप्रतिम. सदानंद डबीरांचे काव्य, पं.संजीव अभ्यंकरांचा आवाज आणि काजरेकरांचे संगीत, सगळ्या टीमचे कष्टाच या गीताच्या रुपाने एक कलाकृती मध्ये साकार झाले आहे. सगळ्यांचेच मन: पूर्वक अभिनंदन आणि धन्यवादही.
आज सकाळी सकाळी बाहेर पाऊस कोसळत असताना हे गाणं ऐकताना इतकं छान वाटलं म्हणून सांगू! गाण्याचे शब्द, संगीत रचना, चित्रीकरण आणि संजीव अभ्यंकराना ते गाताना ऐकणं आणि पाहणं (त्यांच्या चेहऱ्या वरचे हास्य आणि निरागसता) हा एक अमृततुल्य अनुभव होता. गाण्याच्या संपूर्ण टीमला खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा!!🎉🎉
सदानंद डबिरजी यांचे मंत्रमुग्ध करणारे गीत, संजीवजींचे उत्कृष्ट सादरीकरण आणि विवेकजींचे अप्रतिम संगीत. संपूर्ण टीमची मेहनत खरोखरच दिसून येते. मधुर संगीतासाठी मनःपूर्वक अभिनंदन आणि अशा आणखी रचना ऐकाव्यात अशी मनापासून इच्छा.👏🏻👏🏻सुरेख
डबीर सरांचे शब्द, संजीवजींचे गायन, विवेकजींचे संगीत, vediography सर्वच जबरदस्त. राग मेघ निवड सुंदर. एक सर्वांगसुंदर कलाकृती निर्माण केल्याबद्दल विवेकजी तुमचे अभिनंदन!
गीत, पं.संजीवजींचा अप्रतिम स्वर, विवेक, तुझे संगीत संयोजन सर्वच अत्युत्तम. मन प्रफुल्लित झालं. अप्रतिम कलाकृती सादर केल्याबद्दल सर्व टीमचे अभिनंदन व पुढील वाटचालीस भरघोस शुभेच्छा
सकाळी गीत ऑडिओ ऐकले, त्याचवेळी आभाळ ढगाळलेले होते आणि पावसास सुरुवात झाली होती. त्यामुळे सुंदर सुरवाट आणखी बहारदार झाली. आणि आता विडिओ बघताना आणिक बहार आली. ❤ विवेक, तू वर्षापूर्वी या गाण्यावर काम करण्यास सुरुवात केलीस. वर्षभरात वेगवेगळ्या लोकेशनवर केलेली छायाचित्रण छान आहेत. गीत व संगीत यांची भट्टी मस्त जमून आली आहे. सुंदर.
ओढ लागलेल्या पावसाळी दिवसात..असे संगीतातून आणि स्वरातून घन बरसताना अनुभवल्यावर..त्या सुंदर स्वरात चिंब ..सचैल.. भिजण्याचा आनंद घेतला..संजीव अभ्यंकर याचे कसदार..आणि लयदार तानांनी नटलेले गाणे. त्या मोहक सुरावटीनी अधिक मोहक केले आहे..
अहाहा.... काय सुंदर झालंय गाणं.... खूप खूप खूऽऽऽऽपच आवडेश 😊❤️ शब्द, संगीत, सूर आणि संगीत संयोजन ह्यांचा अप्रतिम मेळ.... !! पाऊस कसाही आवडतोच.... ह्या शब्द सुरांच्या पावसात पुन्हा पुन्हा भिजायला आवडेल 😊
खूप दिवसानंतर छान गाण ऐकलं. नाही तर आम्हाला नवीन गाण्यात गोडवा वाटतच नाही. पण हे गाणं शास्रीय संगीतावर आधारीत आहे. मल्हार राग आहे असं वाटतं. आणि शब्द सूर आणि पंडित संजीव अभ्यंकर यांचा आवाज सगळ्याचा एकत्रीत परिणाम गाणं छान होण्यात झाला आहे. संगीतकार विवेक काजरेकर यांच अभिनंदन! त्यांनी अजून अशी छान छान गाण्यांची मेजवानी द्यावी.
अनेक आभार. माझ्या चॅनलवरच्या इतर रचना जरुर ऐका, म्हणजे नवीन गाण्यातही जुन्या पद्धतीचा गोडवा टिकवता येतो याची अनुभूती तुम्हांला निश्चित मिळेल. आपल्यासारख्या रसिकांचा पाठिंबा असेल तरच उत्तम संगीत टिकणार आहे. धन्यवाद 🙏🏼
सुरेख गीत! पंडितजींचा आवाज खूप हळुवार छान लागलाय, अतिशय मनापासून गातानाचं दृश्यही परिणाम वाढवणारा! रसिकांच्या कल्पनाशक्तीवर उरलेला भाग सोडला असता तरी चाललं असतं!
मेघदूताचा काळ असो नाहीतर मर्सिडीज चा काळ असो, प्रेम भावना आणि पर्जन्यकाळ ह्यांची सांगड अशीच स्वर्ग सुखाची अनुभूती देते. सर्व दृष्टीने अप्रतिम कलाकृती. ग्रेट जॉब, सर्वांचे अभिनंदन आणि अर्थातच शुभेच्छा सुद्धा. पुढच्या कलाकृती साठी.
काव्य, चाल आणि गायन...छान रसायन जमून आलंय. वाद्यवृंदाबद्दल संमिश्र भावना आहेत. दृष्यफितीमधील स्त्री कलाकार भारतीय असायला हवी होती. इंद्रधनू, धबधबा इत्यादि दृष्य गायनाच्या अनुषंगाने अतिशय समर्पक वाटली.
पंडित संजीव अभ्यंकर यानी गायलेले सुश्राव्य गाणे विवेक काजरेकर जी यांचे क्लासिक संगीत तसेच संगीत संयोजन आणि संपूर्ण टीम मिळून एक परिपूर्ण कलाकृती साकार झाली आहे. सुंदर शब्द रचना कवी सदानंद डबीर साहेब यांनी लिहीली आहे. सर्व टीम करीता माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. अभिनंदन ⚘️
You and your team deserves a standing ovation for this fabulous video. What a thrilling feel of Monsoon and its beauty. Absolutely energetic. The beautiful blend of classical with romantic light music is very innovative. Singer wins our heart with his outstanding rendition and the background music makes you feel you are just there enjoying the rain.👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
Pt. Sanjeev Abhyankar’s voice for this song so apt. So 100 marks for this. All the music players Sitar - Umashankar Shukla, the Flute at the climax - Sandeep Kulkarni and others have done such an amazing song. One of the best creation by you my friend - Vivek Kajarekar Kuddos to the entire team !!!
वाहःवा, क्या बात है. विवेक, आतापर्यंत ची सर्वात सुंदर व अत्यंत मधुर संगीतरचना. येवढ्या ताकदीच्या गायकाने ते स्वरबद्ध करावे , दूर्मिळ योग आहे. यामागे असलेल्या सर्व टीमचे खूप खूप अभिनंदन आणि आणखी छान संगीत तुम्ही ऐकवावे यासाठी अनेक शुभेच्छा.👍👍🙏
The video graphy is exceedingly good.The pictures and accompanying photography is perfectly matched with the lilting music . Awesome music Vivekji.The singing of the singer Sanjeev Abhyankar is incomparable.His performance in the video is a joy to watch. The female in the video is perfectly chosen with all attributes of a rain sequence.The last part of the video is simply superb piece.
Wow, Lovely . It is a complete package . Everything at its place. Keep rocking. All the best Vivekji and congratulations to everyone who contributed to make this beautiful audio vedio.
खूपच सुरेख शब्द, संगीत अणि मधुर आवाज. छान भट्टी जमलीय. पण एक गोष्ट खटकली. हे प्रणय गीत निसर्गाचे रुपक आहे पाऊस अणि धरती यांचे नाते आहे. हिरवागार धरित्री दाखवून ते साध्य ही होतय पण ती modern कपड्यातली मुलगी छत्री घेतल्याने पावसात अणि तिच्यात (अर्थात धरती मध्ये) barrier निर्माण करते आहे. जे गीताच्या बोला शी संपूर्ण विसंगत आहे. गीतात ते मला तरी खूपच disconnect करत होते
विवेक, गेल्या वर्षी वारीच्या अभंगानंतर मनाला अतिशय भिडणारं आणि वारंवार ऐकावं असं वाटणारं हे गीत झालंय. सुरुवातीच्या दाटून आलेल्या मेघांच्या दर्शनानंतर संजीवजींनी घेतलेली तान ऐकल्यावरच हे गाणं काय दर्जाचं असेल याची कल्पना आली आणि अगदी शेवटपर्यंत या गाण्याचा आलेख चढताच ठेवण्यात तू कमालीचा यशस्वी झालायस. "घन भरून येताना, मन भरून आले" ही डबीर सरांची साधी व सोपी अशी रचना, त्याला तू दिलेली सुंदर चाल आणि सतार, बासरी, पखवाज, ढोलक व तबला अशी प्रामुख्याने मनाला भावणारी वाद्यांची साथ यांचा अतिशय सुंदर संगम होऊन एक छान कलाकृती तयार झालीय. हितेश प्रसाद यांचं विशेष कौतुक. या गीतातील अखंड भिजणाऱ्या सुंदर अशा लावण्यवतीला विविध भावांसह पावसात भिजताना, कधी छत्रीमध्ये, तर कधी छत्रीशिवाय घेतलेले चित्रण अतिशय मोहक झाले आहे. या गाण्याला पं. संजीव अभ्यंकर यांची तू अतिशय योग्य निवड केली आहेस. या गाण्यासाठी दुसरं कोणी इतक्या छान गाऊच शकलं नसतं. त्यांचं गाणं संपल्यावर शेवटी जी सुरावट घेतली आहेस ती तर अगदी लाजवाब झालीय. आषाढाच्या पहिल्या दिवशी हे गाणं प्रकाशित केलंस खरं, पण त्या दिवशी पावसाचा एक टिपुसही पडला नाही. तरीही या गाण्याने तू सर्वांनाच स्वरांच्या आणि सुरांच्या वर्षावात चिंब भिजवलंस हेच सत्य आहे. बाहेर पाऊस पडत असताना कप किंवा ग्लास कोणतेही पेय घेत किंवा पावसात लाँग ड्राईव्ह वर जाताना हे गाणं ऐकायला खूप मजा येईल. तुझ्या अल्बममधल्या आतापर्यंतच्या गाण्यांमध्ये सर्वोत्तम. अशाच किंवा याहूनही उत्तमोत्तम कलाकृती तुझ्या हातून घडाव्यात हीच शुभेच्छा. ❤️
धन्यवाद, अशोक
पण लावण्यवती चे नांव काय..?
Very refreshing song and music. 👌👌
Thanks, Aditi
अप्रतिम .....खूप सुंदर गीत, संगीत....मस्त जुळून आल आहे र्सव 👌
धन्यवाद, हर्षदा
छान!!
धन्यवाद, मिलिंद
अप्रतिम! पं. संजीव अभ्यंकर यांचा मधाळ आवाज, प्रसन्न चाल, उत्कृष्ट वाद्यमेळ!! आणि सुंदर संगीत दिग्दर्शन ... व्वा!!!
आभारी आहे, प्रसन्न
अप्रतिम.. संजीव अभ्यंकर सारख्या गायकाला तुमच्या सारखा गीतकार..आणि तुमच्या गीताला न्याय देणारा गायक, संगीतकार... रुचकर,डीश तयार झाली आहे...वाह वाह, मेजवानीच🌹🌹
धन्यवाद
गीताला साजेसे सुरेख चित्रण!
सदानंद डबीर आणि टीमचे मन:पूर्वक अभिनंदन!
धन्यवाद, दत्तात्रयजी
व्वा खूप छान 🌹👌👌🎉
धन्यवाद 🙏🏼
अप्रतिम, अतिशय सुंदर शब्द सुरांचा संगम👏👏
अंजलीजी, धन्यवाद
Absolutely beautiful 👌👌👌👍👍👍
Thank you so much
खूप छान संजीवजी गीत, संगीत, संजीव अभ्यंकर यांचा आवाज, चित्रीकरण सगळंच उत्तम श्रवणीय👌👌
आभारी आहे, सुरेशजी
Very beautiful song its very melodious too. Bahut sundar 👌👌👌👏👏👏
Laxmiji, Glad you liked it
अप्रतिम गीत सूर आणि संगीत 🌹🍫
हेमंतजी, धन्यवाद
गीत, संगीत आणि गायकीचा सुमधुर संगम!अप्रतिम सादरीकरण!!
धन्यवाद, सुजित
खूप सुंदर रचना,चाल creative..अभिनंदन 🎉🎊👏👏👏👏👏
आभारी आहे, भक्ती
छान निर्मिती !
शब्दांना उचित न्याय...
टीमचे अभिनंदन !
विश्वासजी, धन्यवाद
झक्कास 👌👌
धन्यवाद, अभिजित
केवळ अप्रतिम. सदानंद डबीरांचे काव्य, पं.संजीव अभ्यंकरांचा आवाज आणि काजरेकरांचे संगीत, सगळ्या टीमचे कष्टाच या गीताच्या रुपाने एक कलाकृती मध्ये साकार झाले आहे. सगळ्यांचेच मन: पूर्वक अभिनंदन आणि धन्यवादही.
धन्यवाद
वाह...क्लासिक.
गीत,स्वर,संगीत...अप्रतिम...!👌
@@shyammhatre8375 धन्यवाद
सुरेख 👌👌
धन्यवाद, पल्लवीजी
वाह अप्रतिम,संजीवजींचे गायन, विवेकजींचे संगीत अचूक वाद्यांचा वापर सुंदर श्रवणीय 🎉
आभारी आहे, मुकुंदराव
आज सकाळी सकाळी बाहेर पाऊस कोसळत असताना हे गाणं ऐकताना इतकं छान वाटलं म्हणून सांगू!
गाण्याचे शब्द, संगीत रचना, चित्रीकरण आणि संजीव अभ्यंकराना
ते गाताना ऐकणं आणि पाहणं
(त्यांच्या चेहऱ्या वरचे हास्य आणि निरागसता)
हा एक अमृततुल्य अनुभव होता.
गाण्याच्या संपूर्ण टीमला खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा!!🎉🎉
आभारी आहे, उमाजी
उत्कृष्ट झालं आहे गाणं.चित्री करण सुंदर,सोबत सतार आणि इतर तालवाद्य ह्या मुळे गाणं मस्तच झालं आहे ❤
आभारी आहे, स्मिता
अतिशय सुंदर झालय गाणं. पंडित संजीवजींचा सुस्वर कसलेला आवाज चालीला अजूनच खुलवतो. कोरस ही गाण्याला साजेसा झालाय. मस्तच आहे आवडलं आपल्याला.❤❤❤
धन्यवाद, अभिजित
सर्वांगसुंदर गाणं, श्रवणीय व प्रेक्षणीय ❤
धन्यवाद, नरसिंगजी
वाह वाह ❤.. फार फार सुंदर..
धन्यवाद, हर्षल
अप्रतिम आवाज.. छान गायले आहे.. 👌👌👍
🙏🏼🙏🏼🙏🏼
अप्रतिम म्युझिक! गाणं सुपर! Picturisation मोहक!
धन्यवाद, विनय
सुंदर अप्रतिम
गीत संगीत गायन चित्रीकरण सर्वसंपन्न
अभिनंदन
Thanks, Urmila
Khup chan zalai Vivekji. Great singing by Sanjeev ji and amazing orchestration.
Thank you so much, Sanjay
Khupch chan thodasa vehala anubhav
आभारी आहे
अप्रतिम झाले आहे...... सुंदर शब्द, सुंदर आवाज सारेच सुंदर ❤
निशाजी, धन्यवाद
❤❤
अतिशय उत्तम झालंय गाणं, सर्वच अंगांनी 👌👌
धन्यवाद, दिन्या
Beautifu Songl 🎵 , Enjoyed 🎉
Many thanks
वाह क्या बात!!
खुप छान जमलंय...
गायन, संगीत, चित्रिकरण, कलाकार. ❤❤
धन्यवाद, सीमा
सदानंद डबिरजी यांचे मंत्रमुग्ध करणारे गीत, संजीवजींचे उत्कृष्ट सादरीकरण आणि विवेकजींचे अप्रतिम संगीत. संपूर्ण टीमची मेहनत खरोखरच दिसून येते. मधुर संगीतासाठी मनःपूर्वक अभिनंदन आणि अशा आणखी रचना ऐकाव्यात अशी मनापासून इच्छा.👏🏻👏🏻सुरेख
धन्यवाद, योगेश
डबीर सरांचे शब्द, संजीवजींचे गायन, विवेकजींचे संगीत, vediography सर्वच जबरदस्त. राग मेघ निवड सुंदर. एक सर्वांगसुंदर कलाकृती निर्माण केल्याबद्दल विवेकजी तुमचे अभिनंदन!
जोशी साहेब, धन्यवाद
गीत, पं.संजीवजींचा अप्रतिम स्वर, विवेक, तुझे संगीत संयोजन सर्वच अत्युत्तम. मन प्रफुल्लित झालं. अप्रतिम कलाकृती सादर केल्याबद्दल सर्व टीमचे अभिनंदन व पुढील वाटचालीस भरघोस शुभेच्छा
अनेक आभार, सुधा
Simply "जबरदस्त " ❤👍👍🌷🌷
शिरिष, धन्यवाद रे
सकाळी गीत ऑडिओ ऐकले, त्याचवेळी आभाळ ढगाळलेले होते आणि पावसास सुरुवात झाली होती. त्यामुळे सुंदर सुरवाट आणखी बहारदार झाली. आणि आता विडिओ बघताना आणिक बहार आली. ❤
विवेक, तू वर्षापूर्वी या गाण्यावर काम करण्यास सुरुवात केलीस. वर्षभरात वेगवेगळ्या लोकेशनवर केलेली छायाचित्रण छान आहेत. गीत व संगीत यांची भट्टी मस्त जमून आली आहे. सुंदर.
धन्यवाद, मित्रा
Very nicely composed and sung❤️
Thanks, buddy
Atishay sunder! Geet , sangeet aani arthatach gaayaki. Nayikecha abhinayahi. Hya sagalya mule sarvanga sunder asa jamun aalay gaana. Samanya vyaktichya angavar romanch aananara aani mantramughdha karanara asa . Panditani aani vivek jini motyan maddhe pran funkalet.
अनेक आभार
Simply Marvelous. My favourite singer. ❤
Thanks, Aruna
अप्रतिम! व्वा... आवाज,शब्द,संगीत सर्व छान जमून आलं आहे. अभिनंदन विवेक..👌🏻👌🏻👍🏻👍🏻💐
अभय, अनेक आभार
खूप सुंदर... संगीत आणि गायन 🎉 मनःपुर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा 💐
चंदनाजी, खूप खूप धन्यवाद
छानच! भरपूर विचार करून गिताचे सौदर्य द्विगुणित केले.तरूणी सचैल भिजताना दिसली असती तर अधीक सौंदर्यात भर पडली असती चित्रण सुरेखच.
ओढ लागलेल्या पावसाळी दिवसात..असे संगीतातून आणि स्वरातून घन बरसताना अनुभवल्यावर..त्या सुंदर स्वरात चिंब ..सचैल.. भिजण्याचा आनंद घेतला..संजीव अभ्यंकर याचे कसदार..आणि लयदार तानांनी नटलेले गाणे. त्या मोहक सुरावटीनी अधिक मोहक केले आहे..
धन्यवाद
🎉Really great ❤😊
श्रीकांतजी, आभार 🙏🏼
अहाहा.... काय सुंदर झालंय गाणं.... खूप खूप खूऽऽऽऽपच आवडेश 😊❤️
शब्द, संगीत, सूर आणि संगीत संयोजन ह्यांचा अप्रतिम मेळ.... !!
पाऊस कसाही आवडतोच.... ह्या शब्द सुरांच्या पावसात पुन्हा पुन्हा भिजायला आवडेल 😊
खूप आभारी आहे, जयश्री. पावसावरचं माझंही प्रेम तुला ठाऊक आहेच 🤣
Wah... Apratim!
Paus pann aala ki gane aikala tumche... 👏👍
धन्यवाद, प्रतिभा 😂
खूप छान चाल आहे.गाण खूपच सुंदर झालं आहे.टीम वर्क मस्तच.
धन्यवाद, मृदुला
मस्त झालंय रे गाणं , झकास
धन्यवाद, विनोद
वाह बहोत खूब अतिशय सुंदर संजीवजींचे गायन आणि विवेकजींचे संगीत अप्रतिम अशीच श्रवणीय गाणी देत रहा
मंगेशजी, धन्यवाद
खुपच छान 👌👌
धन्यवाद, प्रथमेशजी
अप्रतिम जमलय ..
धन्यवाद
सुरेख. संगीत अप्रतिम.
निशिकांत, धन्यवाद
अप्रतिम..👌👏 अभिनंदन Vivek Sir n team💐
Thanks, Pooja
विवेक,अतिशय सुंदर
छान जमुन आले आहे सगळं🎉
शेखर, धन्यवाद
खूप दिवसानंतर छान गाण ऐकलं. नाही तर आम्हाला नवीन गाण्यात गोडवा वाटतच नाही. पण हे गाणं शास्रीय संगीतावर आधारीत आहे. मल्हार राग आहे असं वाटतं. आणि शब्द सूर आणि पंडित संजीव अभ्यंकर यांचा आवाज सगळ्याचा एकत्रीत परिणाम गाणं छान होण्यात झाला आहे. संगीतकार विवेक काजरेकर यांच अभिनंदन! त्यांनी अजून अशी छान छान गाण्यांची मेजवानी द्यावी.
अनेक आभार. माझ्या चॅनलवरच्या इतर रचना जरुर ऐका, म्हणजे नवीन गाण्यातही जुन्या पद्धतीचा गोडवा टिकवता येतो याची अनुभूती तुम्हांला निश्चित मिळेल. आपल्यासारख्या रसिकांचा पाठिंबा असेल तरच उत्तम संगीत टिकणार आहे. धन्यवाद 🙏🏼
अतिशय सुंदर 👌
अनेक आभार, अमिता
सुरेख गीत! पंडितजींचा आवाज खूप हळुवार छान लागलाय, अतिशय मनापासून गातानाचं दृश्यही परिणाम वाढवणारा! रसिकांच्या कल्पनाशक्तीवर उरलेला भाग सोडला असता तरी चाललं असतं!
Thanks
विवेक,या गाण्यावर लिहावे तेवढे कमीच आहे.सर्व टिमने खूप मेहनत घेतली आहे.एकदम छान झालालय गाणं Master piece
अनेक आभार, अंजली
अप्रतिम....
धन्यवाद, स्मिता
🙏👌👌👏👏💐🌨️🌧️👌👍Ati Sundar Aawaj Mugdh Jhalo Wha Wha❤ 👌🙏💐
धन्यवाद
मेघदूताचा काळ असो नाहीतर मर्सिडीज चा काळ असो, प्रेम भावना आणि पर्जन्यकाळ ह्यांची सांगड अशीच स्वर्ग सुखाची अनुभूती देते. सर्व दृष्टीने अप्रतिम कलाकृती. ग्रेट जॉब, सर्वांचे अभिनंदन आणि अर्थातच शुभेच्छा सुद्धा. पुढच्या कलाकृती साठी.
धन्यवाद, मोहन
खूपच छान!
आभार, दिपक
सुंदर झालेय....👌
सुधाकरजी, धन्यवाद. आपली कौतुकाची थाप विशेष आनंद देऊन जाते
Khup chan 👌
धन्यवाद, भारती
Atishay Sumadhur composition aani tyala samaprpak ashi arrangement aani Sanjeev ji chi gayaki.kamaal ....superb and hats off to entire team
Thanks, Raja
Too good and melodious ❤.
जंगले साहेब, आभारी आहे
काव्य, चाल आणि गायन...छान रसायन जमून आलंय. वाद्यवृंदाबद्दल संमिश्र भावना आहेत.
दृष्यफितीमधील स्त्री कलाकार भारतीय असायला हवी होती. इंद्रधनू, धबधबा इत्यादि दृष्य गायनाच्या अनुषंगाने अतिशय समर्पक वाटली.
धन्यवाद, बुवा
पंडित संजीव अभ्यंकर यानी गायलेले सुश्राव्य गाणे विवेक काजरेकर जी यांचे क्लासिक संगीत तसेच संगीत संयोजन आणि संपूर्ण टीम मिळून एक परिपूर्ण कलाकृती साकार झाली आहे.
सुंदर शब्द रचना कवी सदानंद डबीर साहेब यांनी लिहीली आहे.
सर्व टीम करीता माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. अभिनंदन ⚘️
अनेक आभार, लहु. या गीतातील तुझा वाटाही मोलाचा आहे 🙏🏼
❤
Sunder gane sunder video chhan gayile ❤️❤️❤️❤️
धन्यवाद, मॅडम
अप्रतिम👌👌गाणे,अभ्यंकरांची गायकी,म्युझिक आणि सर्वांवर मात म्हणजे व्हिडिओग्राफि.मस्त मेळ जमलाय.👍👍
धन्यवाद, रवी
अप्रतिम.. क्या बात है. पंडित संजीवजी गाताना मन भरून आले . व्हिडिओ खूप खूप छान. अभिनंदन. विवेकजी मनमोहक कलाकृती.. All the best🎉🎉
मामा, अनेक आभार
पावसाचा आनंद घेत गाण फुलवल. स्मित हास्य प्रणय रंगविला
धन्यवाद
Wah! Bahot khub!
Ek successful prayog. Sunder shabdh, sumadhur gayaki aani creative composition.
Highlight was final orchestration.
Thank you so much, Dayanandji
सुरेख खूपच छान
धन्यवाद, शेंबेकरजी
You and your team deserves a standing ovation for this fabulous video. What a thrilling feel of Monsoon and its beauty. Absolutely energetic. The beautiful blend of classical with romantic light music is very innovative. Singer wins our heart with his outstanding rendition and the background music makes you feel you are just there enjoying the rain.👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
Thank you very much!
अप्रतिम!
ऊत्तम लेखन, ऊत्तम गायन, खूप सुंदर विडीओग्राफी !
Enjoyed fully.
🙏🏼🙏🏼🙏🏼
व्वाह...
धन्यवाद
Pt. Sanjeev Abhyankar’s voice for this song so apt. So 100 marks for this. All the music players Sitar - Umashankar Shukla, the Flute at the climax - Sandeep Kulkarni and others have done such an amazing song. One of the best creation by you my friend - Vivek Kajarekar
Kuddos to the entire team !!!
Thank you. Glad you liked it
Sundarach
Mesmerising voice
Thanks, Madhav
छान झालं आहे
धन्यवाद 🙏🏼
वाहःवा, क्या बात है. विवेक, आतापर्यंत ची सर्वात सुंदर व अत्यंत मधुर संगीतरचना. येवढ्या ताकदीच्या गायकाने ते स्वरबद्ध करावे , दूर्मिळ योग आहे. यामागे असलेल्या सर्व टीमचे खूप खूप अभिनंदन आणि आणखी छान संगीत तुम्ही ऐकवावे यासाठी अनेक शुभेच्छा.👍👍🙏
आभारी आहे, जुवेकर साहेब
गाणं इतकं सुंदर झालंय की लिहायला शब्द कमी पडतील. संजीव अभ्यंकर ह्यांच्या आवजात ऐकणं म्हणजे मेजवानी. माधव आजगावकरांचे इंटेरियर डिझाईन तर अप्रतिम.
आभारी आहे, राजीव
❤❤❤
Raju ❤️
Chhan! Sundar gayale Sanjeevji.
Konta raag aahe ha?
धन्यवाद, संकेत. मेघ रागावर आधारित आहे मुख्यत्वे.
@@vkajarekar Thanks
मन प्रसन्न झाले.
धन्यवाद, मित्रा
❤
The video graphy is exceedingly good.The pictures and accompanying photography is perfectly matched with the lilting music . Awesome music Vivekji.The singing of the singer Sanjeev Abhyankar is incomparable.His performance in the video is a joy to watch. The female in the video is perfectly chosen with all attributes of a rain sequence.The last part of the video is simply superb piece.
Thanks, Charuu for the elaborate appreciation
गाणं फार म्हणजे फार सुंदर झालंय.. फक्त ती विदेशी मोॅडल न घेता भारतीय वेषातील स्त्री अधिक खुलून दिसेल...
🙏🏼
Wow, Lovely . It is a complete package . Everything at its place. Keep rocking. All the best Vivekji and congratulations to everyone who contributed to make this beautiful audio vedio.
Thanks, Sirji
🎉🎉🎉🎉chan
Best wishes...an honour to be part of this amazing team. 🙏
वर्ल्ड कप भारतीय संघाने जिंकला तरी रोहितचाच जयजयकार होत होता. तू आपल्या टीमचा कॅप्टन आहेस. म्हणूनच ‘माधवचा विजय असो’ 😂
खूपच सुरेख शब्द, संगीत अणि मधुर आवाज. छान भट्टी जमलीय. पण एक गोष्ट खटकली.
हे प्रणय गीत निसर्गाचे रुपक आहे पाऊस अणि धरती यांचे नाते आहे. हिरवागार धरित्री दाखवून ते साध्य ही होतय पण ती modern कपड्यातली मुलगी छत्री घेतल्याने पावसात अणि तिच्यात (अर्थात धरती मध्ये) barrier निर्माण करते आहे. जे गीताच्या बोला शी संपूर्ण विसंगत आहे. गीतात ते मला तरी खूपच disconnect करत होते
धन्यवाद, माधवीजी. आपल्या सूचनेची नोंद घेतली 🙏🏼
@@vkajarekar 🙏