ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

Hazara Rama Temple | Shriram | World Heritage Hampi |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ธ.ค. 2023
  • हजारा राम मंदिर (Hazara Rama Temple) हे हम्पीमधील (Hampi) एक महत्त्वाचे प्रसिद्ध हिंदू मंदिर आहे.
    मंदिराला पूर्वाभिमुख प्रवेशद्वार असून त्याच्या सभोवती हिरवीगार हिरवळ आहे.
    प्रवेशद्वारांच्या भिंतीवर सिंह हत्ती घोडे, हत्ती, नृत्य करणाऱ्या महिलांच्या इत्यादी सुंदर नक्षीकाम पाहत आपण आज निघालो.आतमध्ये प्रवेश करतात सर्वप्रथम पाहायला मिळतो सुंदर कोरीव खांबांवरती उभा महामंडप. या महामंडपाला भिंती नाही. पंधराव्या शतकाच्या सुरुवातीला देवराया - दोन याने बांधलेले हे विजयनगरच्या राजघराण्याचे खाजगी मंदिर national architectural heritage आहे. ग्रॅनाईट पासून बनवलेले संपूर्ण मंदिराला सपाट छत आहे. विजयनगरच्या शिल्पकारांच्या उत्कृष्ट कारागिरीचे उदाहरण मंदिराच्या भिंतीं आणि खांबांवर भगवान श्रीरामाची चित्रे कोरलेली आहेत. रामायणातील (Ramayana) विविध प्रसंग कोरल्यामुळे या मंदिराला हजारारामा मंदिर (Hazara Rama Temple) असे नाव आहे. मुख्य मंडपापासून आत अर्धमंडपामध्ये प्रवेश करतो. अर्धमंडप एक बंद सभामंडप आहे ज्याच्या तीनही बाजूंना प्रकाशासाठी, हवेशी राहण्यासाठी दरवाजे पाहायला मिळतात. आणि मागील बाजूस गर्भगृह आहे.मंडपाच्या मध्यभागी होयसाळ शैलीचे बनलेले चार उंच ग्रॅनाइट खांब आहेत. या खांबांवर देवी-देवतांच्या अतिशय सुंदर कोरीव मूर्ती पाहायला मिळतात.
    समोर बंद असलेल्या गाभाऱ्याचेही दर्शन होते
    भव्य आतील भागाबरोबरच मंदिराचा बाह्य भागही आकर्षक आहे.
    मंदिरांच्या भिंतीवर रामायणातील अनेक व्यक्तिरेखा आपल्याला भेट देतात. त्यामध्ये शिवधनुष्याचा वेध,राम रावणाचे युद्ध, हनुमान, बालीचा वध अशा कित्येक प्रसंग आपल्या डोळ्यासमोरून जातात
    मंदिराच्या बाह्य भिंती आडव्या पटलाने सुशोभित केल्या आहेत आणि घोडे, हत्ती, दसरा सारखे सांस्कृतिक कार्यक्रम, रामायणातील प्रसिद्ध कथा इत्यादींनी शिल्पे कोरलेली आहेत.
    हजारा राम मंदिर (Hazara Rama Temple) हे हम्पीमधील एकमेव मंदिर आहे ज्याच्या कंपाउंड च्या भिंतीवर ती सुंदर शिल्पकाम पाहायला मिळते. हत्ती घोडे युद्ध ला निघालेले सैनिक या शिल्पांनी संपूर्ण भिंत भरलेली आहे.
    तर मग मंडळी सुंदर भित्तिचित्रे आणि कोरीव नक्षीकाम असणाऱ्या भारताच्या या वास्तुशिल्पीय वारसाला कधी भेट देत आहात?
    hazara rama temple hampi information in Marathi ಹಜಾರ ರಾಮ ದೇವಾಲಯ ಹಂಪಿ world heritage hampi♥ #hampi #unesco #temple #ramayan

ความคิดเห็น • 2