भक्कमपणे उभा असणारा भुईकोट देवगिरी-दौलताबाद किल्ला !

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
  • पुरातन देवगिरी. महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यात औरंगाबाद शहराच्या वायव्येस सु. १३ किमी. अंतरावर वेरूळ रस्त्यावर हे स्थळ आहे. इतर डोंगररांगेपासून अलग असलेल्या सु. २०० मी. उंच टेकडीवर बांधलेला किल्ला, हे या स्थळाचे वैशिष्ट्य. तसेच येथे जैन, हिंदू व मुस्लीम धर्मियांच्या वावराचेही पुरातत्त्वीय अवशेष मिळतात.दौलताबादच्या समृद्ध आणि वैभवशाली इतिहासाचा प्रारंभ इ. स. ११९१ मध्ये झाला. त्या वर्षी पाचवा भिल्लम या यादव राजाने देवगिरी ही त्याची राजधानी केली. तेव्हापासून ते बहमनी कालखंडापर्यंत देवगिरी उर्फ दौलताबाद हे महत्त्वाचे लष्करी ठाणे होते. दौलताबादला टेकडीच्या माथ्यावर एक वाडा, मंदिर आणि मशिदीसारखी छोटी इमारत आहे. टेकडीच्या पूर्वेस सपाटीवर महाकोट म्हणून ओळखला जाणारा एक मोठा किल्ला आहे. त्याच्या आतमध्ये भारतमाता मंदिर किंवा जामी मशीद, चांद मिनार, अनेक मशिदी आणि उद्ध्वस्त घरांचे अवशेष आहेत. महाकोटामध्येच परंतु टेकडीच्या पायथ्यापाशी आणखी एक कोट असून त्याला कालाकोट असे म्हणतात. या छोट्या किल्ल्यात काही वाड्यांचे आणि दालनांच्या इमारतींचे अवशेष आहेत. महाकोटच्या दक्षिणेला व पूर्वेला पसरलेले अंबरकोट हे गाव आहे. अंबरकोटच्या उत्तर भागात, संपूर्ण महाकोट आणि कालाकोटमध्ये पाणीपुरवठ्याची सुनियोजित व्यवस्था होती. टेकडीच्या ईशान्येला दरीत बंधारा घालून अडवलेले पाणी उघड्या तसेच भूमिगत नाल्यांद्वारे आणले जाई आणि सार्वजनिक कुंड तसेच ते विविध इमारतींना पुरवले जात असे. अंबरकोटच्या पश्चिमेकडील भागात नगरतळे या नावाने ओळखले जाणारे तळे असून त्यात पावसाच्या पाण्याचा साठा केला जाई.
    पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधील प्रा. म. श्री. माटे यांनी १९८१ ते १९८९ या दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व पुणे येथील भारत इतिहास संशोधक मंडळ यांच्या सहकार्याने दौलताबाद येथे उत्खनन केले. दौलताबादला अद्याप टिकून असलेल्या इमारती व त्यांचे अवशेष आणि उत्खननातून मिळालेल्या विविध वस्तू यांच्या अभ्यासातून तेथे आठ पुरातत्त्वीय कालखंड नोंदवण्यात आले आहेत.
    पहिला कालखंड हा यादवपूर्व असून (दहावे-अकरावे शतक) देवगिरी हे धार्मिक महत्त्वाचे स्थळ होते. तेथे सध्याच्या महाकोटाच्या जागी किमान बारा मंदिरे व पवित्र कुंडे होती. या ठिकाणी धार्मिक स्थळाप्रमाणेच व्यापारी केंद्र निर्माण झाले असावे. सिडनी टॉय (Sideny Toy) व स्टुअर्ट पिगट (Stuart Piggot) या इतिहासकारांनी महाकोटाच्या टेकडीवर बौद्ध वा राष्ट्रकूट शैलीचे अवशेष असावेत, असे प्रतिपादन केले असले तरी, तसे कोणतेही पुरावे आढळले नाहीत.
    दुसरा कालखंड यादव काळाचा असून सन ११५० ते १३०० या दीडशे वर्षांमध्ये महाकोट भागात वसाहतीची वाढ झाली. याच काळात महाकोटाची भिंत बांधण्यात आली. भूमिज शैलीची अनेक हिंदू मंदिरे या काळात बांधण्यात आली. त्यांचे अवशेष महाकोट परिसरात विखुरलेले आहेत. या काळात टेकडीवर अनेक गुंफा कोरल्या गेल्या. त्या प्रामुख्याने शैवपंथीयांच्या असून एक जैन गुंफा आहे.
    तिसरा कालखंड (इ. स. १३००-१३५०) हा यादव राजवटीच्या अंताचा व खिलजी-तुघलक या मुस्लीम आक्रमक राजवटींचा आहे. अल्लाउद्दिन खिलजीचा सेनापती मलिक काफूर याच्या आक्रमणाने (१३०८-१३१३) देवगिरीच्या इतिहासाला कलाटणी मिळाली. या काळात बहुतेक मंदिरांचा नाश करण्यात आला. पाडलेल्या मंदिरांचे खांब वगैरे वापरून कुतुबुद्दिन मुबारक खिलजीने जामी मशीद उभारली.
    चौथा कालखंड हा मुहम्मद बिन तुघलकाने देवगिरीला आपली राजधानी बनवण्याचे ठरवल्यानंतरचा आहे. दिल्लीहून लोकांना हलवल्यानंतर जुन्या तटबंदीच्या जागी चुना व दगडांनी नवीन तटबंदी उभारण्यात आली. या तटबंदीला गोल बुरूज होते. दिल्लीहून आणलेल्या लोकांसाठी अंबरकोट भागात नवीन वसाहत स्थापण्यात आली. तसेच या वसाहतीभोवती बळकट कोट बांधण्यात आला. टेकडीवरून खाली आलेल्या नाल्याचा पूर्व व दक्षिण बाजूचा खंदक म्हणून उपयोग केला गेला. वायव्य बाजूला खंदक नव्याने खणण्यात आला. हे काम बहुधा या काळात सुरू झाले आणि पुढील बहमनी काळात पुरे झाले असावे
    पाचव्या म्हणजे बहमनी कालखंडात (इ. स. १३५०-१४५०) दौलताबादचे खऱ्या अर्थाने महत्त्वाच्या बळकट लष्करी ठाण्यात रूपांतर झाले. टेकडीवर बालेकिल्ला तयार केला आणि पायथ्याशी खडक खोदून खंदक (१० मी. रुंद व १६ मी. खोल) बनवण्यात आला. अहमदशहा या बहमनी सुलतानाने इ. स. १४३५ मध्ये चांद मिनार उभारला. तसेच रंगमहाल या काळातला आहे.
    सहाव्या कालखंडात (इ. स. १४५०-१६५०) निझामशाहीच्या काळात कालाकोटाचे आणि आत अनेक विलासी महालांचे बांधकाम झाले. याच काळात ईशान्येकडील दरीत बंधारे घालण्यात आले आणि पाणीपुरवठ्याची व्यवस्था पूर्ण करण्यात आली. तसेच महाकोटाच्या तटबंदीची उंची वाढवण्यात आली.
    सातव्या कालखंडात (इ. स १६५० -१७५०) दौलताबादवर मोगलांचा ताबा असतानाचे अवशेष दिसतात. त्यात उत्तम स्थितीतील बारादारी आणि महाकोटातील भग्न अवशेष स्वरूपात असलेला राजवाडा यांचा समावेश आहे.
    दौलताबाद येथील शेवटच्या आठव्या कालखंडात (इ. स १७५०-१८००) मराठ्यांचा ताबा होता. या काळातील एक शिवमंदीर उद्ध्वस्त स्वरूपात महाकोटात आहे.
    दौलताबाद येथे सन २००३-२००४ मध्ये पुन्हा एकदा पुरातत्त्वीय उत्खनन करण्यात आले. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाने भारतमाता मंदिरापासून १०० मी. अंतरावर १०×१० मी.चे पंधरा खड्डे उत्खनित केले. या ठिकाणी पाच मी. जाडीच्या निक्षेपात प्रारंभिक मध्ययुगीन आणि मध्ययुगीन काळाचे अवशेष मिळाले. यांत प्रामुख्याने घरांचे, देवळांचे दगड आणि विविध पुरावस्तूंचा समावेश होता. पुरावस्तूंमध्ये लोखंडाचे खिळे, भाल्याची अग्रे, सुया वगैरेंचे प्रमाण मोठे होते. अल्लाउद्दिन खिलजी, मुहम्मद बिन तुघलक, बहमनी सुलतान, मोगल बादशहा शाहजहान व शाह आलम आणि गुजरातमधील सुलतानांची तांब्याची नाणी मिळाली. तसेच शाहजहानने काढलेले एक चांदीचे नाणे उत्खननात प्राप्त झाले. हे नाणे सुरत येथील टांकसाळीमध्ये पाडण्यात आले होते. या खेरीज आदिनाथ व इतर जैन देवदेवतांच्या मूर्ती मिळाल्या
    -विकिपीडियावरून साभार .
  • บันเทิง

ความคิดเห็น • 4

  • @gavshivarmarthikatha
    @gavshivarmarthikatha ปีที่แล้ว

    खूप छान

    • @sunitasodhani9135
      @sunitasodhani9135 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद मी सांगली ला राहते

  • @sunitasodhani9135
    @sunitasodhani9135 ปีที่แล้ว

    दौलता बाद संभाजी नगर व घृशनेश्वर हे जवळ जवळ आहे काय बघन्या साठी जावे तर कसे प्लानिंग करावे

    • @-durgshiledar-bhudargad9467
      @-durgshiledar-bhudargad9467  ปีที่แล้ว

      होय, जवळ जवळ आहे .आम्ही खालीलप्रमाणे प्लॅन केला होता :
      Day_1: सकाळी अजंठा लेण्यांना भेट व सायंकाळी वेरूळ लेणी व घृष्णेश्वरला (अगदीच जवळ आहे)भेट देउन खुलताबाद येथे भद्रा मारोती दर्शन व तेथेच संस्थानाच्या निवासात वस्ती.
      Day -2: सकाळी 6.30 वाजता दौलताबाद किल्ल्यावर गेलो.तेथुन जवळच बीवी का मकबरा येथे भेट दिली. नंतर पैठण, तुळजापूर, पंढरपूर कडे प्रस्थान केले.
      या भागात भरपूर भेट देता येतील अशी ठिकाणे आहेत. गुगल म्याप सोयीचा आहे.