#अमृतवेल
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
- #ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि.स.खांडेकर लिखित अमृतवेल (AMRUTVEL)-एक जीवनप्रवास
प्रेमाचा खरा अर्थ उलगडणारी अप्रतिम कादंबरी.best marathi book by v s khandekar,top ten marathi books,top book review in Marathi,best book in Marathi,v s khandekar book
#वाचन #साखळी
खरंच पुस्तक आपले जीवन समृद्ध करतात .
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक वि.स.खांडेकर यांची अमृतवेल कादंबरी लाँकडाऊनमुळे मिळालेल्या वेळात वाचण्यात आली. सुंदर रितीने केलेली पात्रांची गुंफण आणि सकस दर्जेदार कथा यामुळे दोन दिवसात वाचून संपवली. दहा ते बारा वर्षांपूर्वी नवीनच शिक्षण सेवक म्हणून रुजू झालो तेव्हा एकदा वाचली होती. परंतु अमृतवेल समजण्याचे वय आणि पात्रता त्यावेळेला नव्हती. नोकरीचे बारा वर्ष व जीवनातले विविध कडू-गोड अनुभव घेतल्यावर आज जेव्हा अमृतवेल वाचली तेव्हा त्यातील खोली समजली .
कादंबरीतील अनेक पात्र आपल्या अवतीभोवती जगत आहेत याचा साक्षात्कार आपल्याला वाचताना होतो. मानवी स्वभावाचे वेगवेगळे पैलू आणि त्यानुसार माणसामाणसांतील बदलत जाणारे नाते आणि त्या नात्यातील वाढत जाणारा रुक्षपणा अथवा स्नेहभाव अचूक दर्शवलाय लेखकाने.सुरुवातीला अल्लड असणारी नंदा क्रमाक्रमाने विविध कडू-गोड जीवनानुभव घेतल्यावर तटस्थपणे जीवनाकडे बघायला शिकते .दादा आणि माई नंदाचे जीवन प्रवासातील आधारस्तंभ आणि मार्गदर्शकही ,आयुष्यातील सुखदुःखात, नाजूक क्षणातही दादा दीपस्तंभाप्रमाणे नंदा चे मार्गदर्शक भासतात.दासबाबू पोक्त अनुभवी प्रसंगी नंदाला वास्तवाची जाणीव करून देणारे तिचे गुरु.
, "जीवन समुद्र विशाल आहे चित्रविचित्र आहे जितका सुंदर तितकाच भयंकर आहे ,पण त्याला ना ऐलतीर ते पैलतीर समुद्रात माणसाचं भक्ष असणारी मासोळी भरपूर आहे मात्र माणूस ज्याचं भक्षण बनू शकतो असे शार्क मासेही काही त्यात थोडे थोडके नाहीत ."लेखकाचे हे तत्वज्ञान आजच्या कोरोना सारख्या संकटातही किती प्रासंगिक वाटते.
दुःख माणसाला अंतर्मुख करते हे खरे ते दुसऱ्या माणसाशी असलेले आपले नाते अधिक स्पष्ट करते दृढ करते. नंदाला दुःखातून बाहेर काढण्यासाठी लेखक आपल्याला दादांच्या मुखातून मानवी मनाचा धर्म समजावतात.
"भग्न स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही ,मानवाचं मन केवळ भूतकाळाच्या साखळदंडांनी करकचुन बांधून ठेवता येत नाही, त्याला भविष्याच्या गरूड पंखांचे वरदानही लाभलेलं आहे. एखादं स्वप्न पाहणं ते फुलवणं ते सत्यसृष्टीत उतरावं म्हणून धडपडणं त्या धडपडीतला आनंद लुटनं आणि दुर्दैवानं ते स्वप्न भंग पावलं तरी त्याच्या तू कड्यांवरून रक्ताळलेल्या पायांनी दुसऱ्या स्वप्नांमागे धावणं हा मानवी मनाचा धर्म आहे मनुष्याच्या जीवनाला अर्थ येतो तो यामुळं."
"प्रीती म्हणजे केवळ यौवनाच्या प्रेरणेतून उद्भवणारी वासना नव्हे या वासनेला जेव्हा खोल भावनेची जोड मिळते तेव्हाच प्रीती ही अमृतवेल ठरते. पण हीच प्रीती नुसती आत्मकेंद्रित झाली आत्म पूजेशिवाय तिला दुसरं काही सुचेनासं झालं म्हणजे मनुष्य केवळ इतरांचा शत्रु होत नाही तर तो स्वतःचाही वैरी बनतो."या दास बाबूंच्या मार्गदर्शनातून नंदा बाहेरचे जग बघण्यासाठी बाहेर पडते.
देवदत्त आणि वसुंधरा हे दांपत्य आत्मकेंद्रित झालेले स्वतःच्या दुःखाच्या डोहात एवढं बुडले की संसारात एकमेकांना जपायचं असतं फुलायचं असतं हे साफ विसरून गेले.
"कुणी मनुष्य असो जेव्हा त्याला मृत्यू आणि व्यसन मित्र वाटू लागतात तेव्हा त्याच्या जवळ असणाऱ्या दुसऱ्या माणसाने आपल्या मायेने त्याला मागे ओढले पाहिजे माणसाचे माणसाचे असलेले हे सर्वात निकटचे नाते आहे." नंदाच्या मुखातून लेखक आपल्याला जीवनातील महत्वाचे सत्य सर्वांना सांगतोय
बापूच्या रूपात लेखकाने एक सज्जन गृहस्थाचे पात्र रेखाटले बापूंच्या मुखातून लेखक या व्यवहारवादी जगाचे वास्तव सांगतात."ज्या जगात सॉक्रेटिस ला विषाचा प्याला प्यावा लागतो गांधीजींना बंदुकीच्या गोळ्या खाव्या लागतात तिथे इतरांची कथा काय?"
नंदाच्या स्वगतातून लेखक आपल्याला जीवनाचा सोपा अर्थ समजवतात जीवन चक्राच्या या अखंड भ्रमंतीत माणसाला एकच गोष्ट करता येण्यासारखी आहे दुसऱ्या माणसाशी जडलेले आपले नाते न विसरणे त्याचे जीवन फुलावे म्हणून त्याच्यासाठी जे जे करता येईल ते ते करणे.
देवदत्त च्या मुखातून लेखक आपल्याला जगातील माणसांचे दोन प्रकार समजावतात मुर्दाड मनाची माणसं जी अष्टौप्रहार जगण्याची केविलवाणी धडपड करीत राहतात, ती कुणाच्याही लाथा खातील, सोम्यागोम्या पुढं लोटांगण घालतील ,उकिरड्यावरल्या उष्ट्या अन्नान पोट भरतील. तथापि मनस्वी माणसं धुंदीत जगतील मस्तीत जगतील पण ती दुसऱ्याला शरण जाणार नाहीत, ईश्वराशी सुद्धा तडजोड करणार नाहीत.
देवदत्त बालवयापासून चुकीच्या माणसांच्या संगतीत वाढले.आई-वडिलांच्या चुकीच्या वागण्याचा मनस्वी देवदत्ता वर परिणाम होतो तो व्यसनी बनतो आत्मकेंद्रित झालेली वसुंधरा त्याची सहचारिणी बनते परंतु दुःख व व्यसनांच्या गर्तेत अडकलेल्या देवदत्तला ती बाहेर काढू शकली नाही.पतीच्या सुखदुःखाशी ती एकरूप होऊ शकली नाही उत्कटतेने त्याला व्यसनापासून दुरावू शकली नाही .सावित्रीने सत्यवान वर प्रेम केलं ते स्वतःला पूर्णपणे विसरून आत्म प्रेमाच्या शृंखला तोडून हॅम्लेटच्या आईला ते जमले नाही. वि.स. खांडेकर पुस्तके
ययाति
खूप छानSir
पुस्तकांची गोडी लावण्याची ताकद आपल्या व्हिडीओ मध्ये आहे, परत परत पहावा आणि ऐकत रहावा असा व्हिडीओ आहे! अगदी अप्रतिम!!
खुपच छान कादंबरी
Outstanding describing...
Thanks