Athvanitale Vasudeoshastri 02

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
  • संस्कृत ग्रंथांची निर्दोष प्रत अभ्यासकांना उपलब्ध व्हावी म्हणुन निर्णयसागर प्रकाशनसंस्था व संस्थेचे प्रधान संपादक यांचे काम कसे चालत असे ?
    आज सर्वतऱ्हेच्या तंत्रसुविधा उपलब्ध असतानाही नामवंत वृत्तपत्रांपासून मोठ्या ग्रंथांपर्यंत सर्रास मुद्रणदोष आढळतात. मुद्राराक्षसाचे विनोद म्हणुन आपणही ते खपवून घेतो.
    पण आपण हाती घेतलेले ग्रंथसंपादनाचे काम हेच व्रताचरण अशा निष्ठेने काम करणाऱ्या पं.वासुदेवशास्त्री व त्यांच्या सहकारी विद्वद्वर्यांना हे मान्य नव्हते. छोट्यात छोट्या चुकीलाही माफ़ी नाही , स्वत:च्या सुद्धा !
    शुद्धता हा संस्कृतभाषेचा आत्मा आहे . शुद्धतेच्या बाबतीत असलेला शास्त्रीबुवांचा कमालीचा आग्रह व निर्णयसागरचे मालक तुकाराम जावजी यांनी त्यांना दिलेली यथोचित साथ, यामुळेच अनेक ग्रंथांच्या प्रमाणित प्रतीं आज आपल्याला उपलब्ध झाल्या आहेत.
    १४ पिढ्यांपासून वैदिक व शास्त्राची परंपरा असलेल्या वेदशास्त्र संपन्न पणशीकर घराण्यात गोमांतकातील पेडणे या छोट्या गावात वासुदेवशास्त्र्यांचा जन्म झाला.
    लहानवयातच त्यांची तीव्र बुद्धिमत्ता व अध्ययनाची आवड हेरून गावातील मान्यवर देशप्रभु कुटुंबियांनी त्यांना कोलहापूर येथे विद्वान कांताचार्यांकडे शिकण्यासाठी पाठवले .
    तिथे याज्ञिकी व संस्कृत व्याकरणाचे सांगोपांग अध्ययन झाले .
    २५ व्या वर्षीच ६ शास्त्रांमधे पारंगत झाले सुप्रसिद्ध साहित्यिक भाउसाहेब माडखोलकर त्यांना मुंबईला घेउन आले.
    मुंबईतील निर्णयसागर या छापखान्यात ते प्रधान शास्त्री या पदावर नियुक्त झाले. मुद्रणकलेचा विकास होत असतानाच वासुदेवशास्त्रींच्या दूरदृष्टीमुळे भारतभर हस्तलिखितांच्या स्वरूपात विखुरलेले अनेक संस्कृतग्रंथ शुद्ध व मुद्रित स्वरूपात अभ्यासकांना उपलब्ध झाले .
    निर्णयसागरच्या माध्यमातून सतत ५१ वर्षे ग्रंथसंपादनाचे व्रत त्यांनी अव्याहतपणे चालू ठेवले . ह्या कालावधीत २०० हून अधिक ग्रंथांचे संपादन त्यांनी केले .
    कोणत्याही मानसन्मानाची वा प्रसिद्धीची कामना न करता सरस्वतीची उपासना समजून त्यांनी ग्रंथ संस्करण करत राहिले अलिकडच्या काळातील एक थोर विद्वान या नात्याने त्यांनी गोमांतकातील विद्वत्परंपरा राखली यात शंका नाही!
    Video credits: Shri. Narendra Bedekar
    #sanskrit #sanskritpandit #prabhakarapanshikar #dajishastripanshikar #vasudeoshastripanshikar #nirnaysagar #sanskritscholar

ความคิดเห็น •