BRAMHANAL LAZIM....

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
  • ब्रम्हनाल (ता.- पलूस, जि.- सांगली) च लेझीम म्हणजे १९९०-२००८ पर्यंतच आख्या सांगली जिल्ह्यात एक प्रसिद्ध असं लेझीम होत. या लेझीम च वैशिष्ट्य म्हणजे हलगीपटू यशवंत आण्णा यांच्या हलगीचे ठोके (बिट्स)... एक वेगळीच लकब होती त्या बिट्स मध्ये. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या लेझीम च्या डावातील मर्दानी स्टेप्स. अजूनही ती हलगी वाजली तरी गावातले ५०-५५ ओलांडलेले आणि पूर्वी खेळलेले लेझीमपटूनचे हात पाय नाही सळसळणात तर नवल. अशीi या लेझीम आणि हलगीची ताकद. २००८ नंतर बऱ्याच मुलांनी शिक्षणामुळे आणि या मोबाईल व टीव्ही मुळे या मर्दानी खेळाकडे पाठ फिरवली... परवा असाच गावाकडे गेलो होतो आणि एक गोष्ट माझ्या निदर्शनास आली आणि मला आतून भरून आलं कि यशवंत आण्णा आजही ती कला ते मर्दानी लेझीम जोपासण्याचा प्रयत्न करताहेत... मला आमचे ते जुने लेझीम खेळलेले दिवस आठवले. आणि अण्णांच्या त्या निरागस प्रयत्नाला तसा रिस्पॉन्स हि वाखाणण्या जोगा होता. महत्वाची गोष्ट अशी कि अण्णांच्या आत्ताच्या तालमीत लहान छोट्या मुली हा मर्दानी खेळ अगदी जिगरीने आणि उत्तम पद्धतीने खेळात होत्या. त्या मुलींच आणि अण्णांचं मला कौतुक वाटलं. हा प्रसंग आणि तो हलगीचा ठेका बघून आपोआप आंग सळसळू लागलं. त्याच वेळी माझ्यासोबत माझे वसंत मामा हि होते त्यांनीही ह्या संधीचा फायदा घेतला आणि बऱ्याच वर्ष्यानंतर त्या आताच लेझीम शिकलेल्या लहान मुलींसोबत त्यांनी हलगीचा ठेका पकडला आणि हा प्रसंग मी माझ्या कॅमेऱ्यात टिपला.... खूपच छान वाटलं त्या लहान मुलींना एवढं मोठं होऊन लेझीम खेळताना बघून..

ความคิดเห็น • 26