रंगपंढरी Face-to-Face: Arun Nalawade

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ส.ค. 2024
  • 'बहुरूपी'!
    अचंबित करणारं वैविध्य आणि थक्क करणारी ऊर्जा घेऊन गेली ४५ वर्षं जगभरच्या मराठी रसिकांचं उदंड मनोरंजन करणाऱ्या अरुण नलावडे ह्या हरहुन्नरी कलाकाराला 'बहुरूपी' हे एकच विशेषण समपर्क ठरतं.
    'अथ मनुस जगनं हं', 'अग्निपंख', 'रातराणी', 'चार दिवस प्रेमाचे', 'पाहुणा', 'व्यक्ती आणि वल्ली', 'वाऱ्यावरची वरात', 'शू कुठे बोलायचं नाही' अशी ३५ हून अधिक लोकप्रिय नाटकं, 'श्वास' सारखे गाजलेले अनेक चित्रपट आणि असंख्य टीव्ही मालिका ह्यातून अरुण सर अभिनयाचे नवरसयुक्त प्रयोग करत राहिले आहेत. 'गंमत जंमत' ह्या नाटकात तर त्यांनी एकट्याने १२ निरनिराळ्या भूमिका लीलया सादर केल्या होत्या. नाट्यदिग्दर्शनातली दीर्घ कारकीर्द आणि अभिनयक्षेत्रातील योगदानाबद्दल अनेक पुरस्कार त्यांना लाभलेले आहेत.
    जे आभासी आहे ते प्रेक्षकांना खरं कसं वाटायला लावायचं? नटाने आपलं संपूर्ण भान एकवटून मेंदूला सूचना कशा द्याव्यात? विशिष्ट आवाज, देहबोली ह्यांच्यात जाणीवपूर्वक बदल करून निरनिराळ्या व्यक्तीरेखा कशा निर्माण करता येतात? आपल्या अभिनयप्रवासातली अनेक उदाहरणं देऊन ह्या सर्वांविषयी अरुण सर बोलताहेत, आजच्या भागात.

ความคิดเห็น • 77

  • @omalane3826
    @omalane3826 3 ปีที่แล้ว +1

    मस्त आहे.

  • @_om.shewale_
    @_om.shewale_ 3 ปีที่แล้ว

    👏🏻👏🏻

  • @shraddha_more
    @shraddha_more 4 ปีที่แล้ว +1

    उत्तम मुलाखत - घेणारी आणि देणारा, दोघांनी अगदी चोख प्रश्न उत्तरं पार पाडली आहेत. 👍
    रंगपंढरी टीमचे धन्यवाद.

  • @surajsatav1016
    @surajsatav1016 4 ปีที่แล้ว +1

    खूप समृद्ध झालो असे वाटायला लागलं असा हा कार्यक्रम आहे. खूपच समाधान मिळते हा कार्यक्रम पाहताना. Thanks .

    • @RangPandhari
      @RangPandhari  4 ปีที่แล้ว

      Thanks for your encouraging words, सूरज जी. 🙏

  • @sunitagarud6507
    @sunitagarud6507 4 ปีที่แล้ว +1

    उत्तम analysis करण्याची पद्धत आवडली

  • @prasadguruji
    @prasadguruji 4 ปีที่แล้ว

    वा मस्तच धन्यवाद

  • @cadiwan
    @cadiwan 4 ปีที่แล้ว +1

    सुंदर मुलाखत !

  • @mamatapai480
    @mamatapai480 4 ปีที่แล้ว +1

    जे काही अरुण नलावडे बदल बहुरूपी मध्ये लिहिलं आहे.. सलाम त्यांना. Versatile kasse असावे त्यांच्या कडून खूप शिकण्यासरखे आहे. शेवट छान.

  • @JDPA3
    @JDPA3 4 ปีที่แล้ว +2

    रंगपंढरी/ Rang Pandhari
    कृपया श्री जयंत सावरकर यांची मुलाखत घ्यावी अगदी दोन तास घ्यावी
    भरपूर अनुभवी आहेत जुना नवीन काळ त्यांनी रंगमंचावर अनुभवलाय बोलणं छान स्पष्ट स्वच्छ सुलभ आणि मराठीचाच आग्रह असतो त्यांच्या बोलण्यात...मजा येईल ऐकायला

    • @RangPandhari
      @RangPandhari  4 ปีที่แล้ว +1

      Thanks for your suggestion.

  • @surajsatav1016
    @surajsatav1016 4 ปีที่แล้ว

    खूप सुंदर मुलाखत .

  • @shekharpade3453
    @shekharpade3453 2 ปีที่แล้ว

    आत्तापर्यंत एकलेली सर्वोत्कृष्ट मुलाखत 👌🏾👌🏾👌🏾👌🏾👌🏾 अरुण सर शब्दच नाही सुचत. तुमच्या सर्व भूमिका अगदी डोळ्यासमोर उभ्या राहिल्या 🙏🏼🌹🙏🏼🌹🙏🏼🌹🙏🏼🌹🙏🏼🌹🙏🏼

  • @pradnyadarbhe-y3b
    @pradnyadarbhe-y3b 3 ปีที่แล้ว

    खूप छान झाली मुलाखत.....
    मधुराणीच्या बोलण्यात आणि हास्यात मधु आहेच....
    अरूण नलावडे सराकडे पण खूप खजीना आहे .....नावाप्रमाणेच स्वयंप्रकाशी तारा,
    तो ही माणुसपण जपणारा.......

  • @a.r.4941
    @a.r.4941 4 ปีที่แล้ว

    नेहमीप्रमाणेच उत्तम !

  • @drpriyanjalidhumal2438
    @drpriyanjalidhumal2438 4 ปีที่แล้ว +5

    Desperately waiting for Prashant Damle Sir's interview...😊

  • @drpriyanjalidhumal2438
    @drpriyanjalidhumal2438 4 ปีที่แล้ว +1

    अभिनयात निरीक्षण शक्तीच्या जोरावर करण्यात किमया सरान्नी खुप छान पद्धतीत सांगितली..आपल्या आजु बाजुलाच असंख्य पात्र दडलेली असतात ..नजरेत ते साठवुन अभिनय करताना त्याची अंमलबजावणी करायची..अरुण सर खुप छान मुलाखत..👌☺️

  • @danceforever5940
    @danceforever5940 3 ปีที่แล้ว

    Amazing Actor

  • @mrs.varshaathavale6841
    @mrs.varshaathavale6841 4 ปีที่แล้ว

    Khup Chhan. Tyanchya prayigik natakanbaddal ajun aikayala avadala asta. Khup chhan.

  • @shubhadaketkar
    @shubhadaketkar 4 ปีที่แล้ว

    मुलाखत छान झाली

  • @raneusha
    @raneusha 4 ปีที่แล้ว

    फारच उत्तम काम करणारा कलावंत!!

  • @swaradaranade8713
    @swaradaranade8713 4 ปีที่แล้ว

    "संवादापेक्षा कंस आसावेत " हे वाक्य फार आवडले! मुलाखत नेहमीप्रमाणे अप्रतिम! "अरूण नलावडे " एक गुणी कलाकार 👌👌👌👏👏

  • @shilpakulkarni3186
    @shilpakulkarni3186 4 ปีที่แล้ว +2

    Very nice actor.
    Today Madhuranin you r looking beautiful.

  • @kanchanskitchen7961
    @kanchanskitchen7961 4 ปีที่แล้ว

    Informative. Thank U Sir😊🙏🙏

  • @akshaylandge5055
    @akshaylandge5055 3 ปีที่แล้ว +1

    Thank u to rangpandhari team for such lovely interview...... I hv seen all interview they were also amazing....this all interview will definitely help to budding actor's

  • @rahulmhaskar3803
    @rahulmhaskar3803 4 ปีที่แล้ว +1

    new pattern of program is good

  • @amolpitkar1652
    @amolpitkar1652 4 ปีที่แล้ว +1

    अरुण नलावडे हे एखाद्या Marathon runner सारखे आहेत...इतकी वर्ष झाली तरी त्यांचा अभिनय प्रवास अविरत चालू आहे. त्यांची जी जीवन मूल्य आहेत तिचं ह्या मागची खरी ताकद आहे आणि आता अश्या विचारसरणी चे अभिनेते लोप पावत चालले आहेत. छान मुलाखत झाली. आणि हो मधुराणी सुंदर दिसली आहे ह्या भागात

  • @ketakiapte8387
    @ketakiapte8387 4 ปีที่แล้ว

    Brilliant

  • @sampadajoshi1651
    @sampadajoshi1651 4 ปีที่แล้ว

    खूप छान

    • @sunitagarud6507
      @sunitagarud6507 4 ปีที่แล้ว

      उत्तम मुलाखत

  • @krupakulkarni4908
    @krupakulkarni4908 4 ปีที่แล้ว +2

    तडवळकरसाहेब, ही मुलाखत खूप compact झाली. Quick to make or fast to prepare, instant प्रकारातली.
    हे ठरवून केले का?
    मराठीवर उत्तम प्रभुत्व! नलावडेसाहेबांनी कुठेही इंग्रजीचा वापर / आधार (शेवटी शेवटी addition/क्वालिटया या एक-दोन शब्दांचा अपवाद सोडता ) न घेता आख्खी मुलाखत दिली, हे निश्चित जाणवते. छान, छान!

    • @RangPandhari
      @RangPandhari  4 ปีที่แล้ว +2

      ठरवून असं नाही. पण अरुण सर थोडक्यात आणि नेटकं बोलले. पण आणखी बोलायला हवं होतं असं तुम्हाला जे वाटतंय आम्हालाही वाटलं!

  • @celestinedsouza6245
    @celestinedsouza6245 3 ปีที่แล้ว

    Actually it's like lesson to all their own experience good interview

  • @nikhilgaikwad61
    @nikhilgaikwad61 4 ปีที่แล้ว

    रंग पंढरी च्या उपक्रमामुळे उदयाचे कलाकार महाराष्ट्रात घडतील . Thank you (rangpandhari & team) .

    • @RangPandhari
      @RangPandhari  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद! अशा प्रतिक्रियेने खूप हुरूप येतो.
      - योगेश तडवळकर
      निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी

  • @jayshreeprabhu6828
    @jayshreeprabhu6828 4 ปีที่แล้ว

    अरुण.नलावडे याची मुलाखत फारछान आ'हे

  • @abhijitsupekar249
    @abhijitsupekar249 3 ปีที่แล้ว

    मधुराणी मॅडम जेव्हा शेवटी म्हणतात ,
    " thank you " तेव्हा त्या जेवढ्या समाधानी मनाने म्हणतात , अगदी त्याच वेळी आमच्या ही मनातुन आपसुकच
    " thank you " येत असत...

  • @dhananjaygangal
    @dhananjaygangal 4 ปีที่แล้ว

    छान

  • @2010Melodies
    @2010Melodies 4 ปีที่แล้ว

    Farach chaan..Waat pahat hote hyanchya mulakhatichi.Pan 2 bhaag aste tar jasta anand jhala asta.Pan aso..He is simply the best

  • @pranayakulkarni2628
    @pranayakulkarni2628 4 ปีที่แล้ว +1

    Amazing Interview
    Would like to watch the interview with Nana Patekar!!!

  • @kedarmahajan9098
    @kedarmahajan9098 4 ปีที่แล้ว +1

    Every great actor discusses the same thing in his own unique different way which is......hit the basics!!!! 😎

  • @raniandre
    @raniandre 3 ปีที่แล้ว

    This show seems underrated

  • @poonambisht3656
    @poonambisht3656 3 ปีที่แล้ว

    Please Continue this series in Hindi Also. Would love to see Nasir sir, Shabana A

  • @sunitirangnekar7486
    @sunitirangnekar7486 4 ปีที่แล้ว

    Thank you producers.. for helping me connect to so many different and versatile and capable people who have almost always emphasised on the important awesome quality we as humans should possess!
    Being Human!
    Hats off to another captivating and beautiful talk with Arun Nalawade!👍

  • @kavitadjoshi
    @kavitadjoshi 4 ปีที่แล้ว

    अरूण नलावडे खूप सोपे, सुगम बोलले. ...परी अंतरी नाना कळा असे त्यांचे व्यक्तिमत्व वाटले.

  • @moonwalk3rr
    @moonwalk3rr 4 ปีที่แล้ว +2

    Part 2 nahi ka?

    • @shobhanapatil5727
      @shobhanapatil5727 3 ปีที่แล้ว

      Y

    • @RangPandhari
      @RangPandhari  2 ปีที่แล้ว

      ही मुलाखत एकाच भागात आहे.

  • @shilpakulkarni3186
    @shilpakulkarni3186 4 ปีที่แล้ว +1

    Damlena kadhi aantaty?

  • @purushottammisal4853
    @purushottammisal4853 3 ปีที่แล้ว

    मी रंगपंढरीच्या खूप मुलाखती पहिल्या आहेत. जवळपास सर्वच episodes मला खुपच आवडल्या. सर्व मुलाखती मध्ये एकाच प्रकारचे प्रश्न आहेत. प्रश्नांमध्ये वैविध्यता आणता येईल का?

    • @RangPandhari
      @RangPandhari  3 ปีที่แล้ว +1

      नमस्कार पुरुषोत्तम जी, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!
      Actually free and easy प्रश्न न विचारता प्रश्नावली मुद्दामहूनच नाटकाच्या पूर्ण life cycle वर आधारित ठेवली आहे. भूमिका निवड ते प्रयोग. नाटकाची ही संपूर्ण प्रक्रिया आणि प्रत्येकाची त्याला approach करायची निरनिराळी पद्धत डॉक्युमेंट करणं हा रंगपंढरीचा मूळ उद्देश आहे.
      Please keep sharing your views frankly like this. We really appreciate it.
      - योगेश तडवळकर.
      निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी

  • @snehalphadke8452
    @snehalphadke8452 4 ปีที่แล้ว

    अरुण नलावडे यांची मुलाखत नेहमीप्रमाणेच फार सुंदर. यावेळेचे मधुराणी mam चे प्रश्न पण थोडेसे वेगळे होते. हा बदल आवडला. पण एक प्रांजळपणे सांगावेसे वाटते की नलावडे सर खूप कमी बोलत आहेत असं वाटलं. तसेच त्यांच्या स्वतःच्या नाटकांबद्दल पण जास्त बोलणे झालें नाही...

    • @RangPandhari
      @RangPandhari  4 ปีที่แล้ว

      स्नेहल जी! Thanks for your frank feedback.
      खरं आहे. आम्हाला सुद्धा वाटलं की अरूण सरांनी अजून बोलायला हवं होतं!
      - योगेश तडवळकर
      निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी

  • @bhalchandraphadtare5008
    @bhalchandraphadtare5008 4 ปีที่แล้ว

    मस्त! नेहमी प्रमाणेच!
    नवीन पॅटर्न छान! Mam, तुमचा नवीन गेटअप अतिशय तरुण,प्रसन्न आणि उत्साहित करणारं!
    एक सजेशन....बहुतेक सगळ्यांचे मनोगत समजण्यासाठी प्रश्न तेच असतात आणि ते unavoidable आहे पण आलेला माणूस अजून समजून घेण्यासाठी त्यांनाही विचारावे की तुम्हाला स्वतः ला काय सांगायचे आहे? प्रेक्षकांना,आणि इतर रंगकर्मी ना! तसेच समाजातल्या सध्याच्या ज्वलंत प्रश्नांवर त्यांचे view, मतं दृष्टिकोन काय आहेत ते ही समजून घेता येईल कारण ही व्यक्ती फक्त कलाकार नाही तर संवेदनशील व्यक्ती। आणि जगात वावरणारी असते. त्यामुळे नवीन नजर समजू शकते तसेच रॅपिड फायर मध्ये काही प्रश्न ठेऊन थोडा रंग ही भरता येईल
    मोनोटोनी,एकसुरी पणा आणि थोडी रंगत आणि गंमतजममत आणता येईल!

    • @Radhika_70
      @Radhika_70 4 ปีที่แล้ว

      आहे हे सुंदर आहे. रॅपिड फायरसारखे सवंग प्रकार मुळीच घेऊ नका. आणि सध्याच्या प्रश्नांवर त्यांची मतं घेणं आवश्यक नाही.आम्हांला त्यांच्या कलेविषयी ऐकायलाच जास्त आवडेल.

    • @RangPandhari
      @RangPandhari  4 ปีที่แล้ว

      रंगपंढरी उपक्रमाचा भर हा प्रत्येक रंगकर्मीची नाट्यप्रक्रिया उलगडण्यावर आहे. भूमिका निवड ते प्रयोग हा एकच प्रवास प्रत्येक कलाकार निरनिराळ्या पद्धतीने कसा करतो हे आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करतो. ह्याचबरोबर घेतली जाणारी मुलाखत हे भविष्यासाठी त्या त्या नटाचे स्वतंत्र डॉक्युमेंटेशन आहे. ह्या कारणांनी विचारलेले प्रश्न सर्वसाधारणपणे एका पद्धतीचे असतात. काही उपप्रश्न मात्र अर्थातच त्या त्या माणसाप्रमाणे आणि संदर्भाप्रमाणे बदलायचा आम्ही प्रयत्न करतो.
      धन्यवाद.
      - योगेश तडवळकर
      निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी

  • @ameyabhogate2783
    @ameyabhogate2783 2 ปีที่แล้ว

    (Swaami samartha ,sai baba , gajanan mahara) he teen mahapurush hote .pan hyani kuthlya navin english shalet ase kulthle shikshan gethle ki jagatil dr engineer tya maansa chya samadhi var dok thev tat ...tyancha jivan pravas manje artath (saicharitra)(guru datta charitra)( swami chritra)(gajanan maharaj)hya mahapurache vichar vachtat .pan tari dekhekil tya ghosti dokyat jaat hi nahi .aani tyani je karya kele tyache virudha anukaran karatat.

  • @arunbarve
    @arunbarve 4 ปีที่แล้ว

    मी त्यांक्या पेक्शा वयाने मोठा तरीही मी त्याच्या वादळवाट मधील आबा या व्यक्तीरेखेला नमस्कार करावा म्हणून त्यांच्या पाया पडलो ! ते पहातच राहिले !

  • @sangeetathakur4999
    @sangeetathakur4999 4 ปีที่แล้ว +3

    अरूण नलावडे हे कलाकार म्हणून उत्तम आहेतच पण माणूस म्हणून अतिशय चांगले आहेत.
    त्यांच्या कडून शिकण्यासारखे खूप आहे.
    मुलाखतीचा अजून एक भाग हवाच.

  • @pramodadke9824
    @pramodadke9824 4 ปีที่แล้ว

    उदाहरणे देताना , नाटकाचा व भुमिकेचा उल्लेख करावा .

    • @pramodadke9824
      @pramodadke9824 4 ปีที่แล้ว

      त्या अनुशंगाने analysis केल तर आम्हाला आनंद मिळेल .

  • @madhuriprabhu9131
    @madhuriprabhu9131 4 ปีที่แล้ว

    अरुण नलावडे गोखले शाळेत बोरिवलीच्या होता. तो कलाकार उत्तम आहे. तो उत्तम गातो. दुसरा भाग आला तर फिरत्या चाका वरती हे बाबुजींच गाणे त्यांने म्हणाले तर आवडेल.

    • @yogitatikle1154
      @yogitatikle1154 4 ปีที่แล้ว +1

      Kalakar ghetlet khupch creative ideas aahet very much thank full for this but directors chi pan mulakhat ghya very informative asel te please

  • @JDPA3
    @JDPA3 4 ปีที่แล้ว

    रंगपंढरी/ Rang Pandhari
    मधुराणी जी तुम्ही त्यांना एक नट म्हणून नाटक स्क्रिप्ट हाती आल्यावर वगैरे काय प्रोसेस असते ती विचारली पण तुम्ही त्यांना दिग्दर्शक म्हणून पण आणखी काही विचारायला हवं होतं जसं बाकीच्या दिग्दर्शकाबद्दल त्यांची पद्धत जाणून घेतली तशी यांची पण जाणून घेतली असती तर प्रेक्षकांना आणखी मजा आली असती....

    • @RangPandhari
      @RangPandhari  4 ปีที่แล้ว +1

      You are absolutely right. पण ह्या season आणि मुलाखतीमध्ये अभिनय हाच फोकस असल्याने दिग्दर्शनावर बोललो नाही.

  • @seemabhende
    @seemabhende 3 ปีที่แล้ว +1

    Excellent interview!
    Arun great to see you!
    Always admired your acting and performance!
    I and my husband always watch and and enjoy your different roles!
    Recently l found out that we were together in Gokhale high school.
    Never knew that time that one day you would be such a great artist
    Hope to meet you in person one day.
    All the very Best!!👍

  • @tejasbaviskar2983
    @tejasbaviskar2983 4 ปีที่แล้ว

    Next Nana patekarachi mulakhat ghya....

    • @RangPandhari
      @RangPandhari  4 ปีที่แล้ว

      Thanks for the suggestion.

  • @shoonnya
    @shoonnya 4 ปีที่แล้ว +1

    व्याव्सायिक नाही हो मध्राणीजी! व्यावसायिक. तो 'व' पूर्ण म्हणा! (जसं चेतना, चेत्ना नाही. भावना, भाव्ना नाही!). तुम्ही शब्दांच्या संसारात काम करता. उच्चार नीट करा पलीज् :-)

    • @RangPandhari
      @RangPandhari  4 ปีที่แล้ว

      Noted with thanks!
      - योगेश तडवळकर
      निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी

    • @jayshreeprabhu6828
      @jayshreeprabhu6828 4 ปีที่แล้ว

      अरुण

  • @rrkelkar2556
    @rrkelkar2556 4 ปีที่แล้ว

    अतिशय प्रामाणिक आणि मौलिक विचार... सुंदर समारोप...

  • @manoharpednekar8351
    @manoharpednekar8351 3 ปีที่แล้ว

    मधु राणी
    खरं सांगू
    ?
    कलावंत mood मध्ये आला तर बोलू द्या त्याला
    अडवू नका
    नंतर हवं तर Editing करता येईल
    🙏तुमचे ठरलेले प्रश्न पण कुठे पळताहेत
    लागूं चं अरुण Details सांगतोय
    (ते पुन्हा नाय मिळणार)
    तुम्ही मधेच *तुमचा* पुढचा प्रश्न
    टाकलात
    Very wrong 🙏

  • @santoshkelkar2076
    @santoshkelkar2076 4 ปีที่แล้ว

    मुलाखत छान. अरुण नलावडे सर उत्तम अभिनेता आहेतच, पण उत्तम माणूस आहेत. गणपतीपुळे येथे एका नाटकानिमित्त आले असता मला त्यांचा सहवास लाभला आहे. अतिशय निगर्वी, साधा माणूस. बडेजाव, सेलिब्रिटी स्टेटस ई ई काही नाही.