कृषी सिंचन योजना : या व्हिडिओ नंतर ठिबक सिंचन व तुषार सिंचन योजनेबद्दल कोणालाही विचारायची गरज नाही .

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
  • ‪@krushisavardhanmaharashtra‬ शेती हा व्यवसाय अधिक फायदेशीर व्हावा, शेतकऱ्यांची जोखीम कमी व्हावी तसेच आधुनिक कृषी तंत्राला प्रोत्साहन मिळण्यासाठी खात्रीपूर्वक व संरक्षित सिंचन व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे. केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेमध्ये सन 2015-16 पासून ‘प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना’ या समाविष्ट केली आहे. प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतास पाण्याची उपलब्धता करणे आणि पाण्याची कार्यक्षमता वाढवून पाण्याच्या प्रत्येक थेंबातून जास्तीत जास्त पीक उत्पादन मिळविणे (more crop per drop) हा या योजनेचा उद्देश आहे.
    सन 2014-15 पर्यंत केंद्र पुरस्कृत सूक्ष्म सिंचन योजना 80:20 (केंद्र 80 टक्के व राज्य 20 टक्के) या प्रमाणात राबविण्यात येत होती. केंद्र शासनाने केंद्र पुरस्कृत सूक्ष्म सिंचन योजनेची अंमलबजावणी करताना केंद्र व राज्य हिश्श्याच्या अर्थसहाय्याचे प्रमाण 60:40 निश्चित केलेले आहे.
    योजनेची व्याप्ती
    राज्यातील सर्व 34 जिल्ह्यांमध्ये पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत सूक्ष्म सिंचन योजना राबविण्यात येत आहे.
    योजनेची उद्दिष्ट्ये
    आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन सुक्ष्म सिंचनाखालील क्षेत्रात वाढ करणे.
    जलवापर कार्यक्षमतेत वाढ करणे.
    कृषी उत्पादन आणि पर्यायाने शेतकऱ्यांच्या एकूण उत्पन्नात वृद्धी करणे.
    समन्वयित पद्धतीने विविध योजनांची अंमलबजावणी करणे.
    आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कृषि व फलोद्यानाचा विकास करण्यासाठी सूक्ष्म सिंचन पद्धती विकसित करणे, त्याची वृद्धी व प्रसार करणे.
    कुशल व अर्धकुशल बेरोजगारांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे.
    योजनेत अंतर्भूत घटक
    ठिबक सिंचन: इन लाईन, ऑन लाईन, सबसरफेस, मायक्रोजेट, फॅनजेटस.
    तुषार सिंचन: मायक्रो स्प्रिंकलर, मिनी स्प्रिंकलर, पोर्टेबल स्प्रिंकलर व रेनगन.
    अनुदान मर्यादा
    अवर्षणप्रवण क्षेत्रातील अल्प व अत्यल्प भूधारक- 60 टक्के
    अवर्षणप्रवण क्षेत्रातील सर्वसाधारण भूधारक- 45 टक्के
    अवर्षणप्रवण क्षेत्राबाहेरील अल्प व अत्यल्प भूधारक-45 टक्के
    अवर्षणप्रवण क्षेत्राबाहेरील सर्वसाधारण भूधारक-35 टक्के
    प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना (इं:Pradhan Mantri Krishi Sinchai Yojana, लघुरुप: (PMKSY))हे एक राष्ट्रीय ध्येय आहे. याचा उद्देश शेतकी उत्पादन वाढविणे व देशातील विविध स्रोतांचा वापर होतो आहे याची खात्री करणे असा आहे.येत्या ५ वर्षात याची अंदाजपत्रकीय तरतूद रु. ५०,००० करोड इतकी आहे.[१] राष्ट्रीय लोकशाही आघाडी शासनाने २०१४-१५ च्या साधारण अर्थसंकल्पात निश्चित सिंचन करण्याच्या उद्देशाने १००० कोटी रु खर्चून प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना सुरू करण्याची घोषणा केली ,परंतु त्या आर्थिक वर्षात ही योजना सुरू होऊ शकली नाही , २०१५-१६ च्या अर्थसंकल्पात सूक्ष्मसिंचन ,पाणलोट क्षेत्रविकास आणि प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना यासाठी ५,३०० कोटी रु. तरतूद करण्यात आली १ जुलै २०१५ला केंद्रीय मंत्रिमंडळाने या मसुद्यास मंजुरी दिली .याचे प्रमुख नरेंद्र मोदी होते.
    ध्येय -: प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेचे प्रमुख ध्येय हे 'प्रत्येक शेतापर्यंत पाणी 'पोहचविणे हे आहे , ज्या पद्धतीने प्रधानमंत्री ग्रामसडक योजन प्रत्येक खेड्यापर्यंत रस्ते पोहचविण्याचे उद्दिष्ट ठेवते ,त्याचपद्धतीने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना प्रत्येक शेतापर्यंत सिंचन पोहचविण्याचे उद्दिष्ट ठेवते या योजनेचे ध्येय शेत ते शेत सिंचनपुरवठा साखळी निर्माण करणे आहे.
    कार्यपद्धत - प्रत्येक शेतापर्यंत पाणी पोहचविण्याचे ध्येय गाठण्यासाठी सलग एकच तत्त्व स्वीकारण्यापेक्षा तीन विविध तत्त्वे स्विकारण्यात आली आहेत , ती म्हणजे जलस्रोतांचा विकास ,जलवितरण आणि जलनियोजन ,या तीन तत्त्वांशी संबधीत सध्याच्या योजना या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेच्या सहयोजना असतील या योजनेचा प्राथमिक उद्देश हा,
    क्षेत्रिय स्तरावर पाटबंधारे प्रणालीत गुंतवणूक आकर्षित करणे, विकास करणे व देशात उपजाऊ जमिनीचे क्षेत्र वाढविणे असा आहे.पाण्याचा वापर योग्य तऱ्हेने करणे जेणेकरून त्याचा अपव्यय होणार नाही.पाणी बचतीचे विविध मार्ग अवलंबून व नेमके पाटबंधारीकरण वापरून 'एका थेंबाद्वारे पिक वाढवा' असा याचा उद्देश आहे.पाण्याशी संबंधित सर्व विभाग व पाण्याची पुनर्चक्रीकरण पद्धत वापरणे व जलचक्राचेयोग्य नियोजन करणे याची तरतूद केल्या गेली आहे.
    Contents hide
    Beginning
    उद्देश,
    सौर कृषी पंप योजना २०२० मध्ये कसा अर्ज करावा?,
    सौर कृषी पंप योजना २०२०ची स्थिती कशी तपासायची?,
    सौर कृषी पंप योजनेची कागदपत्रे ,
    संदर्भ,
    subsidy schemes for farmers in maharashtra ,
    subsidy schemes for farmers in maharashtra in marathi,
    maharashtra agriculture department,
    farm compound scheme in maharashtra,
    agriculture in maharashtra ,
    maharashtra government subsidy schemes for agriculture business,
    dbt agriculture maharashtra,
    bank of maharashtra agricultural loan interest rates,

ความคิดเห็น • 1