सोयाबीनवरील पिवळा मोझॅक चे नियंत्रण, लक्षणे काय ? प्रादुर्भावाची कारणे, प्रसार, लागण कधी होते

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
  • सोयाबीनवरील पिवळा मोझॅक चे नियंत्रण,
    सोयाबीन पिकावर घातक रोगाचा प्रादुर्भाव, पिवळ्या मोझेक रोगावर उपाय काय?,
    रोगाची लक्षणे काय आहेत?,प्रादुर्भावाची कारणे ,आणि प्रसार ,विषाणूची लागण कधी होते?,
    yellow mosaic virus in soybean,: सोयाबीन वायरस चे संपूर्ण नियंत्रण,
    सध्या सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. या रोगाचा प्रादुर्भाव पिकाच्या फुलोरा अवस्थेत झाल्यास उत्पादनात ९० टक्क्यांपर्यंत उत्पादनात घट येऊ शकते. या रोगाचा प्रादुर्भाव पेरणीनंतर ७५ दिवसांपर्यंत झाल्यास नुकसानीत वाढ होते. रोगाची कारणे
    हा रोग मूगबीन यलो मोझॅक विषाणू आणि मूगबीन यलो मोझॅक इंडिया या विषाणूच्या प्रजातीमुळे होतो.
    या विषाणूजन्य रोगाचा प्रसार व वहन पांढरी माशी या किडीमुळे होते.
    अनुकूल वातावरण, उबदार तापमान, दाट पेरणी, नत्रयुक्त खताचा अतिवापर.
    लक्षणे
    मोझॅक प्रादुर्भावग्रस्त झाडाची पानांचा काही भाग हिरवा, तर काही भाग पिवळसर होतो. पानामधील हरितद्रव्य कमी झाल्यामुळे अन्ननिर्मिती प्रक्रियेमध्ये बाधा येते.
    शेंड्यावरील पाने पिवळी पडून आकार लहान होतो.
    रोगग्रस्त झाडाला दाणे भरत नाहीत.
    अर्धे हिरवी पिवळी पाने असलेले झाड दुरून ओळखता येते.
    व्यवस्थापन
    रोगप्रतिकारक आणि सहनशील जातींची (जेएस-२०-२९, जेएस-२०-३४, जेएस-२०-६९, जेएस-९५६०) लागवड करावी.
    रोगग्रस्त झाडे सुरवातीलाच काढून टाकावीत. रोगाचा प्रसार वाढणार नाही याची दक्षता घ्यावी.
    पांढरी माशी व अन्य रसशोषक किडींच्या देखरेखीकरता २५ बाय १५ सें.मी. आकाराचे पिवळे चिकट सापळे एकरी ३० ते ४० लावावेत.
    सुरवातीच्या काळात ५ टक्के निंबोळी अर्क या वनस्पतीजन्य कीटकनाशकाची फवारणी करावी. पांढऱ्या माशीचे नियंत्रण ः क्विनॉलफॉस (२५ टक्के इसी) २ मि.लि. प्रति लिटर पाणी (तामिळनाडू कृषी विद्यापिठाची शिफारस)
    शिफारशीनुसार संतुलित खताची मात्रा द्यावी. नत्रयुक्त खतांचा वापर अधिक केल्यास रसशोषक किडींचा प्रादुर्भाव वाढतो. त्यांच्याद्वारे या रोगाचा प्रसारही वाढतो.
    शेती परिसरातील तणे व अन्य पूरक वनस्पतींचा नाश करावा. विषाणूजन्य रोगाचे वाहक किडीच्या आयुष्यक्रमात अडथळा निर्माण होतो.
    रसशोषक किडीच्या नियंत्रणाकडे काटेकोरपणे लक्ष द्यावे.
    यंदा मुसळधार पाऊस (Rain) आणि त्यानंतर दीड महिन्यात पाऊस रखडल्याने आधीच शेती संकटात आली आहे. त्यातच आता सोयाबीन पिकावर (Soyabean Crop) पिवळ्या मोझेक रोगाचं आक्रमण दिसून येत आहे. यामुळे कृषी विभागाने (Agriculture) शेतकऱ्यांना वेळीच काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यात नगदी पिकावर घातक रोगाचं संकट निर्माण झालं आहे. आधीच शेतकरी अवकाळी आणि अतिवृष्टी अशा दुहेरी संकटात सापडला असताना, आता या घातक रोगामुळे बळीराजाची चिंता वाढली आहे.
    पिवळ्या मोझेक रोगावर उपाय काय?
    पिवळ्या मोझेक रोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी रोगग्रस्त झाडे मुळातून उखडून जमिनीखाली पुरणे अथवा निळे आणि पिवळे सापळे लावणे हा उपाय करण्याचे आवाहन कृषी विभागानं केलं आहे. या रोगामुळे उत्पादन क्षमता 30 ते 90 टक्क्यांपर्यंत घटतं. यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच काळजी घेण्याचं आवाहन कृषी विभागानं केलं आहे.
    नगदी पिकावर घातक रोगाचा प्रादुर्भाव
    सोयाबीन पिवळा मोजेक वायरस लक्षणे -
    1. सुरुवातीला रोगग्रस्त झाडावरील पानांच्या शिरांमधील भागावर फिकट निस्तेज, पिवळे ठिपके दिसतात.
    2. कालांतराने ठिपक्यांच्या आकारमानात वाढ होऊन संपूर्ण पान पिवळे पडून त्यातील हरितद्रव्याचा -हास होतो. अशा पिवळ्या पानांवर तांबूस-करपट रंगाचे ठिपके दिसतात.
    3. रोगग्रस्त soybean yellow mosaic virus झाडांवरील पाने अरुंद व वेर्डीवाकर्डी होऊन त्यांचा आकार लहान होतो.
    4. रोगग्रस्त झाडांवरील शेंगाची संख्या कमी होऊन त्यात लहान आकाराचे दाने भरतात किंवा संपूर्ण शेंगा दानेविरहीत व पोचट होतात आणि पर्यायाने उत्पादनात लक्षणीय घट येते.
    सोयाबीन पिवळा मोजेक वायरस प्रादुर्भावाची कारणे आणि प्रसार -
    1. yellow mosaic virus in soybean हा रोग मुंगबीन यलो मोझॅक या विषाणुंमुळे उद्भवतो.
    2. सोयाबीनच्या उभ्या पिकातील विषाणूग्रस्त झाडांपासून पांढरी माशी या किंडीद्वारे या रोगाचा प्रसार होतो.
    3. या रोगाचा विषाणू केवळ कडधान्य पिकांवर येत असल्याने बिगर मोसमी हंगामात मूग, उडीद, वाल, चवळी, घेवडा इत्यादी पर्यायी पिकांवर जिवंत राहून सोयाबीन पिकावर संक्रमित होतो.
    4. या रोगास बळी पडणा-या वाण/जातीची लागवड केल्याने या रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. जेएस 335 हा वाण या रोगास बळी पडतो.
    एकात्मिक व्यवस्थापन yellow mosaic virus in soybean control सोयाबीन पिवळी पडणे उपाय -
    1. पेरणीसाठी निरोगी बियाण्याचा वापर करावा.
    2. सोयाबीन पिकाबरोबर मका किंवा तूर ही आंतरपिके घ्यावीत.
    3. शेत तणमुक्त ठेवावे.
    4. शेतात या रोगाची लागण दिसताच रोगग्रस्त झाडे समूळ उपटून नष्ट करावीत.
    5. पिवळा मोझॅक या रोगाचा प्रसार पांढरी माशीद्वारे होत असल्याने या किंडीच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने खालीलप्रमाणे उपाययोजना कराव्यात.
    6. एकरी 10 पिवळे चिकट सापळे लावावेत.
    7. बीजप्रक्रिया - थायोमिथोक्साम 30 टक्के एफ.एस या किंटकनाशकाची 10 मिली + पाणी 10 ते 20 मिली प्रति किलो बियाणे या प्रमाण बीजप्रक्रया करावी.
    8. पीक पेरणीनंतर 20 दिवसांनी जैपैक (थियामेथोक्सम + लैम्ब्डा साइहलोथ्रिन) 10 मिली + IFC स्टिकर 5 मिली प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
    9. दुसरी फवारणी 35 दिवसांनी कॉन्फिडोर (इमिडाक्लोप्रिड 17.8% एसएल) 10 मिली + आईएफसी नीम (10000 पीपीएम) 25 मिली + IFC स्टिकर 5 मिली प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. अळीचा प्रधुरभाव असल्यास धानुका ईएम 1 (एमेमेक्टिन बेंजोएट 5% एसजी) 10 ग्राम प्रति पंप मिसळावे.
    10. सोयाबीन पिकात 60 दिसानंतर चक्री भुंगा आढळतो ,हा भुंगा खोडाच्या आत घुसून मुळापर्यंत खोड पोखरतो, वरील दोन फवारणी जर वेळेवर केल्या तर चक्री भुंग्यावरही नियंत्रण मिळवता येते.

ความคิดเห็น • 3