कलावंतीण दुर्गचा थरारक अनुभव कायम लक्षात राहील 😍 | Kalavantin Durg - Panvel (Trekking)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ต.ค. 2024
  • कलावंतीण दुर्गचा थरारक अनुभव कायम लक्षात राहील 😍 | Kalavantin Durg - Panvel (Trekking) कलावंतीण दुर्ग ट्रेक माझ्या सगळ्या ट्रेक मधला सगळ्यात आवडता ट्रेक आहे. हा कलावंतीण दुर्ग ट्रेक करण्यापूर्वी एवढी उत्सुकता होती ना की विचारू नका. मी पनवेलमध्ये राहतो. आमच्या इमारवतीवरून मी नेहमी हा कलावंतीण दुर्ग पाहायचो. प्रत्येक ट्रेकरला आकर्षीत करणारा असा हा ट्रेक आहे. कोणी असा ट्रेकर नसेल ज्याने कलावंतीण दुर्ग सर केला नसेल. पहिल्या खेपेस आलेल्या ट्रेकरला अतिशय थराराक वाटणारा कलावंतीण दुर्ग आहेच तसा थराराक. अगदी सरळ उभ्या डोंगराच्या दगडांमध्ये कोरीव काम करून पायऱ्या बनवल्या आहेत. चढताना खाली पाहिलं तर जीव घाबरून जाईल अशी अवस्था असते काही मंडळींची. कलावंतीण दुर्ग बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचलेला आहे. पनवेलपासून अगदी जवळ असल्यामुळे येथे बरेच जण ट्रेक करण्यासाठी येतात. पावसाळ्यात येथे ट्रेकिंग बंद असते. प्रबळगड, प्रबळमाची येथे बरेच पर्यटक, ट्रेकर रात्रीच्या वेळेस कॅम्पिंग करायला येतात. येथे स्थानिक लोकांच्या सहभागातून संयुक्त व्यवस्थापन समिती स्थापन केली आहे ते अतिशय छान काम करत आहेत. कलावंतीण दुर्गचा थरारक अनुभव घेण्यासाठी बरेच जण येथे येत असतात. #KalavantinDurg #KalavantinDurgTrek #KalavantinDurgPanvel #sforsatish
    असे म्हटले जाते की कोण्या एका राज्याने आपल्या प्रिय राणीसाठी येथे कोणी येऊ नये म्हणून उंचावर महल बांधला होता. आता येथे पाहण्यासाठी काही जरी नसले तरी इथून आजूबाजूला दुदूरपर्यंत बरेच किल्ले, गड, परिसर आपल्याला नजरेस पडतात. कलावंतीण दुर्गाच्या सुळक्यावरून 360° मध्ये आपल्याला आसपासचा परिसर दिसतो. गडावर चढून हे सगळं डोळ्यात साठवण, त्या आठवण आपल्या सोबत घेऊन येणं यासारख्या परमोच्च आनंद तो कसला, जावं कधी कलावंतीण दुर्ग सर करायला, वेग वेगळाच आनंद यातून मिळतो. हा ट्रेक करताना माझ्या सोबत माझे मित्र प्रथमेश आणि त्याचा भाऊ अजिंक्य हे दोघे सोबत होते. या व्हिडिओमध्ये आम्ही कलावंतीण दुर्ग कसा सर केला तिथे आलेले अनुभव दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.
    जय शिवराय ! जय शंभूराजे !
    तुमचे प्रेम असेच कायम असुद्या !
    मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar

ความคิดเห็น • 277