पावसाचा हाहाकार | पुराच्या पाण्यात चारचाकी कार वाहून गेली

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.ย. 2024
  • पावसाचा हाहाकार | पुराच्या पाण्यात चारचाकी कार वाहून गेली
    अपुऱ्या आणि अनियमित पावसाची नोंद झालेल्या बुलढाणा जिल्ह्यातील लाखो शेतकरी राहिवासीयांची आर्त हाक वरुण राजाने अखेर ऐकली! काल रविवारी रात्री दहा वाजेनंतर सुरू झालेला पाऊस रात्रभर कमी अधिक प्रमाणात कोसळत राहिला. खामगाव आणि मोताळा तालुक्यात जास्त जोर असल्याने या दोन्ही तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद झाली. खामगाव तालुक्यात तब्बल ९२.८ तर मोताळा तालुक्यात ९०.४ मिलीमीटर इतक्या कोसळधार पावसाने तालुक्यातील अनेक गावांना झोडपले. खामगाव तालुक्यातील पिंप्री गवळी, पेडका पातोंडा, आवार, नागापूर या गावात कोसळधार पावसाने काल रात्रभर हजेरी लावली. खामगाव नांदुरा मार्गावरील सुटाळा गावानजीक नदीला आलेल्या पुरात एक कारगाडी वाहून गेली. सुदैवाने या कारमध्ये कुणीच नसल्याने संभाव्य अनर्थ टळला! ही कार नदीच्या काठावर उभी करण्यात आली होती, असे गावकऱ्यांनी सांगितले. याचबरोबर काठावर असलेली पान टपरीसुद्धा वाहून गेली.
    दरम्यान खामगाव तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने खामगाव ते नांदुरा, खामगाव ते बुलढाणा आणि खामगाव ते जालना या राज्य मार्गावरील वाहतूक किमान तीन तास बंद होती. खामगाव ते अकोला मार्गावरील कोलोरीनजीक आज सोमवारी सकाळी पुराचे पाणी पुलावरून वाहत होते. मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी नदी नाले एक झाले. जळगाव, मोताळा तालुक्यातही वाहतुकीवर परिणाम झाला. इतर तालुक्यांतही वाहतूक प्रभावित झाल्याने नोकरदार, शालेय महाविद्यालयीन विध्यार्थ्यांची गैरसोय झाली.
    #ppr_news #pandharpur_news #solapur_news #marathi_news
    Website- pprnews.in/
    Facebook Page: / ppr-news-104094362133

ความคิดเห็น •