अहमदाबाद च्या सायन्स सिटीच्या धर्तीवर पाटणादेवी येथे भास्कराचार्य इनोव्हेशन सेंटर | आ. मंगेश चव्हाण

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
  • अहमदाबाद च्या सायन्स सिटीच्या धर्तीवर पाटणादेवी येथे भास्कराचार्य इनोव्हेशन सेंटर...
    चाळीसगाव परिसराला मोठी पौराणिक, ऐतिहासिक व धार्मिक पार्श्वभूमी आहे. गणितीतज्ञ भास्कराचार्य यांच्या रुपाने हा वारसा जागतिक पातळीपर्यंत पोहचला आहे. भास्कराचार्य यांच्याविषयी अभ्यासकांना नेहमीच कुतुहल वाटते. त्यांच्याविषयी जाणून घेण्याची ओढ असते. पाटणादेवी येथे भास्कराचार्य इनोव्हेशन सेंटर याचं उद्दात्त भावनेतून साकारत आहोत. इनोव्हेटिव सेंटर उभारण्याचा प्रस्ताव मी राज्य शासनाकडे सादर केला होता. अहमदाबादच्या सायन्स सेंटरमधील गणितासह विकसित केलेले काही अत्याधुनिक माॕडेल, मनोरंजनात्मक खेळ आणि भास्कराचार्य यांचे जीवनदर्शन इनोव्हेटिव केंद्रात साकारले जाणार आहे.
    गणितीतज्ञ भास्कराचार्य इनोव्हेटिव सेंटरच्या उभारणीमुळे पाटणादेवी परिसर जागतिक पातळीवर आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. अभ्यासकांना येथे भास्कराचार्य यांचे जीवनदर्शन घडेल. यासाठी माझ्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून राज्य शासनाने २० कोटी रुपयांचा निधीही मंजूर केला आहे. भास्कराचार्य यांच्या जन्मापासून ते त्यांचे गणितातील अतुलनीय योगदान, खगोल क्षेत्रातील त्यांची अभ्यासपूर्ण संशोधने यांचा आढावा मॉडेलच्या रुपात साकारण्यात येईल. यामुळे यापरिसरातील पर्यटनाला मोठी चालनाही मिळेल.
    यामुळे मोठा ऐतिहासिक पट उलगडला जाणार आहे. वैदिक ते आधुनिक गणित असे दोन टोक येथे जोडले जातील. मनोरंजनात्मक खेळही असतील. याचा थेट फायदा पर्यटन वाढीला होईल. यासाठीचं या क्षेत्रातील तज्ञांसह अहमदाबाद सायन्स सेंटरला अभ्यासभेट दिली. भेटीमुळे प्रेरणा मिळाली. इनोव्हेशन सेंटर उभारणीची दिशाही स्पष्ट झाली.
    सदर अभ्यास दौऱ्यात छत्रपती संभाजी नगर येथील खगोल शास्त्रज्ञ व एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोलअंतराळ विज्ञान केंद्राचे प्रमुख श्रीनिवास औंधकर, जळगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे, सर जे.जे. स्कूल आॕफ आर्टच्या ड्राईंग व पेटींग विभागातील प्रा. डॉ. विजय सकपाल, मुंबई येथील संशोधक, लेखिका व इतिहासकार स्नेहल तांबुलवाडीकर - खेडकर, मुंबईस्थित वास्तूरचनाकार धवल मलेशा, नाशिक येथील संरचनात्मक अभियंता अतुल अडावदकर, चाळीसगाव येथील सामाजिक व सांस्कृतिक विषयाचे लेखक जिजाबराव वाघ आदिंचा समावेश होता.
    इनोव्हेटिव सेंटरमुळे स्थानिक रोजगार निर्माण होऊन बचत गटातील महिलांनाही व्यवसायाच्या संधी उपलब्ध होतील. या अभ्यास गटाच्या अजून काही बैठका घेण्यात येतील.
    आमदार मंगेश रमेश चव्हाण
    #mlamangeshchavan #चाळीसगाव #chalisgaon #Maharashtra #sciencecityahmedabad
    #Chalisgaon #चाळीसगांव #mlamangeshchavan #chalisgaon
    Follow us to stay updated :
    ► Like us on Facebook:
    / mangeshchavanofficial
    ► Follow us on Twitter:
    / mlamangeshbjp
    ► Follow us on Instagram:
    / mangeshchavanofficial

ความคิดเห็น • 6

  • @vikassomwanshi4878
    @vikassomwanshi4878 16 วันที่ผ่านมา +2

    अध्यात्म व विज्ञानाची योग्य सांगड घालून एक आदर्श निर्माण करणारे दमदार, आमदार श्री मंगेश दादा चव्हाण

  • @udaypatil6320
    @udaypatil6320 16 วันที่ผ่านมา +1

    Thanks Dada...🎉🙏

  • @rohidasmahajan4734
    @rohidasmahajan4734 16 วันที่ผ่านมา +1

    Dhanyavaad dada

  • @premachandmore6890
    @premachandmore6890 16 วันที่ผ่านมา +1

    दमदार आमदार मंगेश दादा

  • @Lokeshgame-z4n
    @Lokeshgame-z4n 10 วันที่ผ่านมา

    किती वर्ष लागतिल या प्रोजेक्ट ला

  • @Lokeshgame-z4n
    @Lokeshgame-z4n 10 วันที่ผ่านมา

    bhaskaracharya innovation centre 3d animation video banav