त्या दोघी घाट चढत गेल्या तशा अडचणी वाढत गेल्या, बाणाईने केले घाटातील प्रवासाचे वर्णन | shingroba 2

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 มิ.ย. 2023
  • धनगरवाडा निघाला वीर शिंग्रोबा घाटातून, खंडाळा घाटाचे मेंढपाळ स्त्रीकडून प्रवासवर्णन | shingroba
    घाटातील, लोकांना माहीत नसलेली ठिकाणे दाखवली आहेत. मुख्य मार्गाव्यतिरिक्त धनगरांचे घाट चढण्याचे विविध मार्ग असतात ते दाखवण्याचा या व्हिडीओ मध्येप्रयत्न केला आहे. shingroba
    • धनगरवाडा निघाला वीर शि...
    #dhangar
    #shingroba
    #dhangarvlog
    #siduhakevlog
    #khandalaghat
    #dhangarijivan
    #siduhake
    #balumama

ความคิดเห็น • 464

  • @rahuljadhav6267
    @rahuljadhav6267 ปีที่แล้ว +323

    बाणाई जिंकली सिद्धू भाऊ ,एवढे कष्ट घेऊन तिने video पण बनवला, तुम्ही दिसल्यावर आनंदाने तो बघा धनगर आला असा आनंदाने बोलली,खूप भारी video होता हा,शेळी ने दमवल तरी तिला हळूहळू घेऊन आल्या दोघी जणी, कुत्रा हरवल्यावर बेचैन झाल्या,माकडाला बोलली आज आमची खायची दैना आहे तुला द्यायला भाकरी नाही ,कळत नकळत खूप काही अनुभव मोकळ्या स्वभावाने बोलून गेली .बघणार्या लोकांना खूप काही शिकण्यासारखं आहे

  • @balasahebsalunke3879
    @balasahebsalunke3879 ปีที่แล้ว +205

    फालतू लोकांचे व्हिडिओ पाहण्या पेक्षा धनगरी जीवन चे व्हिडिओ एकच नंबर.
    वास्तव जीवन धनगर कसे जगतो दाखवतात ❤❤❤

  • @harshavardhinijadhav6211
    @harshavardhinijadhav6211 ปีที่แล้ว +71

    बानाई खूप हुशार आहे तिने किती छान व्हिडिओ बनवला. न थांबता बोलत राहिली.रस्त्याने प्रत्येक गोष्ट टिपली.मायाळू,दयाळू,कष्टाळू, बाणाई तुला सुदृढ दीर्घायुष्य लाभो.असेच हसत रहा,ईश्वर तुमचा सांभाळ करेल

  • @B-xe7cj
    @B-xe7cj ปีที่แล้ว +45

    बाणाई साठी एक लाईक तर बनतेच खूप छान व्हिडीओ केला।

  • @sambhajikalunge9528
    @sambhajikalunge9528 ปีที่แล้ว +33

    मी लय व्हिडीओ बघतोय,पण तुमच्या सारखं चांगलं ,निर्मळ मनान ,आपल्या बोलीभाषेतील पहिल्यांदाच बघतोय,लय आवडतात तुमचं व्हिडीओ,वर्णन करू शकत नाय इतकं!
    तुमच्या बोलण्यातील गोडवा,आपुलकी,देवावरचा निर्मळ भाव कुठं नाय भेटायचा👍👌👌👌

  • @yogita7546
    @yogita7546 ปีที่แล้ว +47

    कितीही मोठ्या बंगल्यात राहणाऱ्या माणसाला असा आनंद कधीच मिळत नाही तुमचे एवढे कष्टाचे जीवन असूनही तुम्ही चांगले किती सुखी समाधानी आहेत दादा तुमच्या दोघांचा जोडा अगदी लक्ष्मीनारायण सारखा आहे ♥️♥️👌👌

  • @vaishalishelar7759
    @vaishalishelar7759 ปีที่แล้ว +29

    बाणाई खरंच फॅशन च्या दुनियेला तुझ्या बोलण्याची, वागण्याची, जेवनाची, कष्टाची ओढ लागली, मनापासून जगतेस, तु ना की मला हे नाही तै नाही, या मुखवटा धारी दुनियेच तुला काहीच घेणं देणं नाही, संसार कसा करा हे आज च्या मुलींनी तुझ्या कडून शिकावं ❤

  • @indumatiraskar455
    @indumatiraskar455 ปีที่แล้ว +37

    बानाई खरोखरच तु खंडोबाची बानाई शोभते आजचा व्हिडिओ खुप सुंदर 👌👌👌👌👍👍👍👍

  • @poojaprasade5258
    @poojaprasade5258 ปีที่แล้ว +93

    आम्ही मुम्बईत राहतो पण अजून मोबाईल चा पूर्ण ऊपयोग करता येत नाही😅 आणि आपली बाणाई मात्र कॅमेरा चा किती छान वापर करते. बाळुमामा नेहमीच तुमच्या बरोबर असतात 🙏🙏

    • @sunildhaygude6505
      @sunildhaygude6505 ปีที่แล้ว +2

      बानु ताई खुप छान माहिती दिली आहे

    • @sindhuanarse3257
      @sindhuanarse3257 ปีที่แล้ว +2

      छान आहे ❤❤

  • @vikaspatil8054
    @vikaspatil8054 ปีที่แล้ว +25

    अहिल्यादेवी होळकरांचे रक्त आहे आमच्या बाणाईमधे...,❤

  • @varshathorve9830
    @varshathorve9830 ปีที่แล้ว +53

    बानाई तू great आहेस...किती धीट आहेस ...छान व्हिडिओ केलास एवढ्या प्रवासात ...

  • @suvarnakhandagale9145
    @suvarnakhandagale9145 ปีที่แล้ว +73

    बाणा ई तुझ्या धाडसाला आणि जिद्दीला सलाम..सुखरूप प्रवास करा,खूप शुभेच्छा प्रवासाला....🎉🎉💐💐💐

    • @maliniwani207
      @maliniwani207 ปีที่แล้ว

      बानाई तु कीती धाडशी आहे, एवढं कष्टमय जीवन तरी तु कीती हसतमुख चेहरा आहे,घोड्याच्या तोंडाला शिवल ते लय भारी दीसते,

    • @sumanthakur6800
      @sumanthakur6800 ปีที่แล้ว +4

      तुमच्यामुळे निसर्ग बघायला भेटतो घरात बसून फालतू व्हिडिओ बघण्यापेक्षा बानाई खरी लक्ष्मी आहे

  • @maliniwani207
    @maliniwani207 ปีที่แล้ว +13

    मस्तपैकी जेवा आता चालुन चालुन खुप दमले असाल सलाम तुम्हाला मेंढपाळ बंधु आणि भगिनींना

  • @lalitgksingh8489
    @lalitgksingh8489 ปีที่แล้ว +12

    प्रभु राम-सीताजी ,हरी -नारायण व गोड राधाजी भगवान श्रीकृष्ण समान आपली जोडी .शिंग्रोबा व वाघजाई देवी दर्शन,.लंगडी शेळी चावणिरा घोडा आणी टेंम्पोच्या मागे धावलेला कुत्र्यांचे चित्रण बानाई ने सिद्ध च्या तोडीस तोड सिद्धू खरच तुला लक्ष्मी भेटली .मी खरच खुष आजचा विडीयो पाहून. धन्यवाद !🙏

  • @Music_mood_05
    @Music_mood_05 ปีที่แล้ว +18

    खरोखरच बानाई तू खूप नशीबवान आहेस धनगरी समाजात जन्माला आलीस आणि त्याचं सोनं केलं धन्य तुझे ते माऊली तुला जन्म देणारे

  • @ratna685
    @ratna685 ปีที่แล้ว +62

    होय होय बाणाई जिंकली ❤

  • @trishikagonate1368
    @trishikagonate1368 ปีที่แล้ว +54

    तुमच्यामुळे खरा निसर्ग लोकांना घरात बसून बघायला मिळतो, खूप खूप धन्यवाद तुम्हाला

  • @VishalBavdhaneVlog
    @VishalBavdhaneVlog ปีที่แล้ว +82

    आपली सत्य परिस्थिती दाखवताय त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे. ❤

  • @meeramhaske6900
    @meeramhaske6900 ปีที่แล้ว +13

    वहीनी येवढ थकल्या तरी कीर्ती छान बोलता सलाम तुमच्या कष्टला लवकरच तीन लाख होतील ही परमेश्वर चरणी प्रार्थना

  • @abasahebauti6216
    @abasahebauti6216 ปีที่แล้ว +14

    सिद्धू मामा मला आळाण हा शब्द लई वर्षातून ऐकायला मिळाला. सगळे मिळून जेवण करतात हे पाहून मला पण भुख लागली 👌🙏👍🚩

  • @arunapingle330
    @arunapingle330 ปีที่แล้ว +31

    बाणाई बाई रीळ छानच बनविला 🎉पण घाट चढताना केवढी धाप लागली पण आपण न थांबता चालत राहिलात ❤केवळ आमच्या आनंदासाठी 🌲🌺🌹🙏 शब्दात व्यक्त करता येत नाहीत 🙏🌹

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 9 หลายเดือนก่อน +9

    ग्रेट बाणाईताई... तुझ्यासोबत चाललं राहिले तर शुगर ,बी.पी. बिन औषधांची बरी होईल..🌹🌹🙏🙏👍💯💯💯💯💯

  • @sayalikhaire7651
    @sayalikhaire7651 ปีที่แล้ว +65

    You tube ची भांडण, फालतुगिरी बघण्या पेक्षा ह्यांचे विडिओ खरंच मस्त असतात खूप काही शिकण्यासारखे असत. बाणाई ताई नेहमी च हसत मुख असतात मन जिंकतात. 🙏🏻🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻👍🏻

    • @beautyqueen2833
      @beautyqueen2833 ปีที่แล้ว +3

      होना मी तर बाकीचे वीडीओ बघणेच सोडले ह्यांचेच वीडीओ बघते आणी वाटते की हे लोक एवढे कष्ट करुन सुखाची भाकरी खातात आणी आपण सगळी सुख आसुन जे नाही त्याच्या साठी दुख करत बसतो

  • @ravikiranbhuse624
    @ravikiranbhuse624 ปีที่แล้ว +41

    अनुभवाचे शिक्षण कधीच वायाला जात नाही ...😊इथे नियोजनाचे क्लासेस लावावे लागतात .बानाई कडून इकडून सगळं काही शिकायला मिळालं ...❤

  • @tushargaikwad7491
    @tushargaikwad7491 ปีที่แล้ว +16

    तुमचे व्हिडिओ बघून सगळ्याच धनगर समजा बद्दल आदर निर्माण झालाय 🙏
    जेजुरीचा खंडोबा आणि बनाई जर बोलले अस्त्ते तर ते तुमच्या सारखेच दिसले असते 🙏
    खूप आदर वाटतो तुमचा 🙏तुम्हाला एकदा तरी भेटण्याची इच्छा आहे🙏

  • @ashakhachane2734
    @ashakhachane2734 ปีที่แล้ว +10

    खरोखरच बाणाई च जिंकली. रत्याने त्यांना खुपच कष्ट पडले तरीही तोंडात वेगळा शब्द नाही किंवा त्रास ली पण नाही. व्हिडिओ खुपच छान बनविला दादा आपल्या बाणाईस सल्युट. पुढील प्रवास सुखाचा होवो. 🙏🙏👍👍

  • @ganeshhulmukhe4566
    @ganeshhulmukhe4566 ปีที่แล้ว +7

    सिद्धू भाऊ खरंच सांगतो खरं जगणं तुम्ही दाखवता आम्ही शहरात फक्त जगणं ढकलतो जगात नाहीच आम्ही मी रोज तुमच्या व्हिडिओ ची आतुरतेने वाट बघतो ❤❤❤❤

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 ปีที่แล้ว +24

    कुत्र्याच्या बद्दलचा संवाद, माकडा बद्दलची करुणा, सगळं बोलणं किती वास्तवदर्शी आहे, गोड वाटतं ऐकायला.
    संपुर्ण जीवन अगदी जसं आहे तसं.
    🙏

  • @prakashbakal4649
    @prakashbakal4649 ปีที่แล้ว +9

    शिंग्रोबा मंदिर म्हणजेच हे धनगराच पूर्वीच वशज ज्या रस्त्यावर आपण चालत आहे त्यानि या रस्त्याचा शोध लावला घाटाचा खूप मोठा इतिहास आहे.

  • @birahake2919
    @birahake2919 ปีที่แล้ว +6

    दादा मी पन धनगर आहे.मला खूप अभिमान आहे धनगर असलेला आणि माझ आडनाव पण हाके आहे. मला खुप भारी वाटत तुमचे विडिओ बघून. तुम्ही आपला धनगर जीवन समाजाला धाकवून खूप चांगले काम करत आहात .ha p
    हा प्रवास बघून विडिओ पहाणार्‍या लोकांना खूप मोटिव्हेशन मिळत.खुप खुप आभारी आहे दादा धनगरी जीवन धाकवनता त्यासाठी,🙏🙏

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 ปีที่แล้ว +16

    दादा बाणाई पण तुझ्यासारखी चांगला व्हीडिओ बनवते --लै भारी व्हीडिओ दाखवला 😂🎉

  • @piyusalve5800
    @piyusalve5800 ปีที่แล้ว +12

    बाणाई खुप हुशार आहे वीडीओ सुंदर काढला प्रवास वर्णन अप्रतिम थोडं थांबून मग पुन्हा पुढे जात जा कारण खुप दम भरला आहे बाणाईला खुप कष्टाळू जीवन आहे

  • @Chhaganrupnawar-oi4cw
    @Chhaganrupnawar-oi4cw 9 หลายเดือนก่อน +4

    तुमच्या कष्टाला मानाचा मुजरा अस जीवन जगावं स्वच्छ निरोगी निखळ मी ही धनगर आहे अभिमान आहे

  • @anjalinaik6075
    @anjalinaik6075 7 หลายเดือนก่อน +7

    जीवानी जीव जाणायचा! किती सुंदर तत्वज्ञान किती साधेपणानं सांगून गेली!

  • @sulbhawagh9049
    @sulbhawagh9049 ปีที่แล้ว +5

    खूप सुंदर व्हिडिओ बनवला बानाई तुम्ही. इतके कष्टाचे जीवनही किती सहज आणि आनंदाने जगता खरच प्रेरणादायी आहे.

  • @ravindrajagtap2373
    @ravindrajagtap2373 ปีที่แล้ว +10

    🌹👌 असं वाटतं की हा व्हिडिओ संपूच नाही फक्त पहात राहावे असा लक्षणीय आहे अगदी एकशे एक टक्का 👍👍🙏🙏🙏🙏

  • @vijayadhamdhere7944
    @vijayadhamdhere7944 ปีที่แล้ว +6

    दादा,बाणाई वहिनीच खुप कौतुक करते.. एवढ्या अवघड घाटाच्या प्रवासातही अतिशय सुंदर व्हिडिओ बनवलाय.कुत्रा,शेळी सगळ्यांनीच जमवलं पण व्हिडिओ काढणे काही बंद केलं नाही... तुम्ही किती लोकप्रिय झालाय हे प्रवासात भेटलेल्या माणसांमुळे समजत आहेच...वहिनीला मंदिराजवळ भेटलेल्या दादांनी तर किती कौतुक केल सगळ्यांच... सोबतच्या व्यक्तीला सुद्धा किती आनंदाने ओळख करून दिली तुमच्या चॅनलची...
    सगळे थकलेभागले जीव अंगतपंगत करत जेवताना पाहून समाधान वाटल..बिचारी माझी अर्चनावहिनी मेंढरा मागे पळुन पळून दमली.... काळजी घ्या 🙏

  • @rajaramgaikwad6387
    @rajaramgaikwad6387 8 หลายเดือนก่อน +2

    अतिशय छान video, घाटाचे सुंदर दर्शन घडवले.

  • @thakresir3488
    @thakresir3488 ปีที่แล้ว +8

    खरच रूचकर व स्वादिष्ट झुणका भाकर जेवण. अति उत्तम.

  • @mahadevsalavane1616
    @mahadevsalavane1616 ปีที่แล้ว +5

    माझ्या कडे तर शब्द च नाहीत बाणांई ताई किती हुशार आहेत मला वाटतं की ताईंनी आज पहिल्यांदाच हिडीव बनवलाय कारण मी खुप दिवसा पासून तुमचे हिडीव पाहातो मनाला खूप आनंद होतो

  • @haridasgarande2011
    @haridasgarande2011 ปีที่แล้ว +16

    माझ्या भावाला आणी वहिनी ला मानाचा मुजरा बाळु मामा च्या नावानं चांगभलं यळकोट येळकोट जय मल्हार

  • @shekharwaghmare577
    @shekharwaghmare577 ปีที่แล้ว +11

    बनाई ताई आजचा वीडियो लय भारी केला खुप आनंदात रमत गमत प्रवास सुरू केला 🙏

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt ปีที่แล้ว +32

    खुप कष्टप्रद आहे जीवन ..बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 ปีที่แล้ว +27

    वर्षाचा महत्वाचा क्षण,प्रवास म्हणायचं.छान व्हीडिओ

  • @SONIGUNJAN111
    @SONIGUNJAN111 ปีที่แล้ว +21

    रोज तुमच्या व्हिडिओ ची वाट पाहत असतो... खुप छान भाऊ

  • @ashashinde8838
    @ashashinde8838 หลายเดือนก่อน

    भाणाबाई सोज्वळ निसर्ग रम्य सकाळी सकाळी उठल्यावर पहीली आंघोळ देवपूजा व नंतर जेवणं बनवून खायला घालणं कीती मनाला समाधान मिळतं पाहीले घरच्या साठी मग कुत्रं मांजर कोंबडी शेळ्या मेंढ्या देवबाप्पा कुलदैवत कुलदेवता पहीला विठोबा नंतर पोटोबा खरच तूझ्या निस्वार्थी सोज्वळ निरागस हास्य चेहर्यावर झळकत असणार्या बाणाबाईला खंडोबा म्हाळसा यांच्या आशीर्वादाने उंदड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना कोटींच्या आसपास लाईक मिळूदे देवा खंडोबा महाराजा

  • @ranemadam4994
    @ranemadam4994 8 หลายเดือนก่อน +6

    धनगर खोट कधी बोलत नाही म्हणून तो सधन आहे मी पण धनगर समाजाची आहे ❤❤

  • @rameshchaudhari7362
    @rameshchaudhari7362 ปีที่แล้ว +15

    तुमच्या कष्टाला आणी मेहनतीला मानाचा मुजरा 🙏

  • @santoshnighot5129
    @santoshnighot5129 ปีที่แล้ว +5

    खुपच छान माहीती दिलीत 👌👌👏👏

  • @rahulbachkar1634
    @rahulbachkar1634 ปีที่แล้ว +6

    बानु ताईच्या व्हिडिओ तुन आपल्या शिग्रोबो देवाचं पण दर्शन झालं हेच माझं परम भाग्य समजतो... धन्यवाद बानु ताई

  • @anupamapawar1690
    @anupamapawar1690 ปีที่แล้ว +7

    खरंच सिदूभाऊ,बाणाई जीवन ही एक आनंद यात्रा आहे हे पटलं हा व्हिडिओ पाहून.

  • @harshawarade5565
    @harshawarade5565 ปีที่แล้ว +3

    बानाई ताई,किती छान व्हिडिओ बनवला तुम्ही...संकट आले...तरी पण न डगमता सर्व आनंदानी करून घेतात...siklelyana लाजवेल असा व्हिडिओ.🙏👌👍

  • @sonalisasane7552
    @sonalisasane7552 ปีที่แล้ว +5

    खरंच बाणाई तुझं कौतुक करावसं वाटतं किती कष्टाळू आहेस ग एवढे कष्ट करून देखील तू आनंदी आहेस तुमचं गाव कोणत्या जिल्ह्यात आहे अजून किती दिवस लागेल तुम्हाला 👍👍👍⭐️⭐️⭐️⭐️🙏🙏🙏🙏

  • @dattatraytungatkar7923
    @dattatraytungatkar7923 ปีที่แล้ว +4

    खुप कष्ट बानाई ताई खुप शुभेच्छां.घोङयाचा जीव जानता पण छान विश्लेषण आवाज मस्त तङा तङा तङा व दैना.

  • @sunandagalande5983
    @sunandagalande5983 3 หลายเดือนก่อน

    👌👌👍🙏🙏 बाणाई तुझे खूप कौतुक वाटते खूप धाडसी आहेस तू. तुझे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. रोज मी तुझा एक तरी व्हिडिओ पाहतेच

  • @rajshreeshirke1404
    @rajshreeshirke1404 ปีที่แล้ว +3

    आजचा व्हिडीओ खूप छान आहे कष्टकरी जीवन तुमचे तरीही चेहऱ्यावर हसू आंनद असतो सलाम बाणाई व भाऊ तुम्हांला श्री स्वामी समर्थ 💐💐

  • @jyotsnamore118
    @jyotsnamore118 ปีที่แล้ว +9

    Banai tu खुप खुप हुशार आहे. अभिनंदन 🎉🎉🎉🎉

  • @balasahebvarpe356
    @balasahebvarpe356 ปีที่แล้ว +34

    ह्याला म्हणतात असली धनगरी जीवन. आपल्याला भाकरी झुणका खाताना पाहुन आम्हालाही तोंडाला पाणी सुटत. ह्या जेवणा पुढ पंचपक्वान्न फिके.

  • @dnyeshwaraurgand3508
    @dnyeshwaraurgand3508 หลายเดือนก่อน

    बानुबाई तुझा हात दुखन्या पासुन तर बिर्याणी लोनंच मिसळ पण खायली आता तुमचा प्रवास बघतो खुप खुप आवडला सीगरुबाच्या पाया पडा आता🌹💘🌹💐👍💐👌🙏🙏

  • @vitthalvajeer8019
    @vitthalvajeer8019 ปีที่แล้ว +10

    ताई तुला लाख लाख सलाम 🙏🙏🌹🌹

  • @smb4459
    @smb4459 11 หลายเดือนก่อน +1

    जीवनाचा आनंद घेता आला पाहिजे हे या व्हिडिओ मधून शिकायला मिळाले. खूप छान व्हिडिओ बाणाताई तुला सलाम 🙏

  • @seemapatil2449
    @seemapatil2449 7 หลายเดือนก่อน +5

    बाणाईचे सतत हसत मुख असते.😊

  • @vinayaksangle3449
    @vinayaksangle3449 11 หลายเดือนก่อน +1

    एवढं खडतर जीवन असून सुद्धा किती आनंदाने जीवन जगतात खरोखरच आजच्या पिढीला प्रेरणा आणि आदर्श घेण्यासारखे आहे.

  • @godavarichoudhari4165
    @godavarichoudhari4165 ปีที่แล้ว +6

    सर्व गुण संपन्न बानाबाई ,,,👌

  • @janardanbavdhane5301
    @janardanbavdhane5301 ปีที่แล้ว +12

    बानाईची पण चांगलीच तयारी झालेली आहे.बानाईनही लय चांगलचं वर्णन केलेलंआहे.

  • @swapnajoshi3763
    @swapnajoshi3763 ปีที่แล้ว +6

    बाणाई खूप हुशार आहें. आज व्हिडिओ पण छान बनवला. 👌🏻👌🏻

  • @anaghashelar946
    @anaghashelar946 ปีที่แล้ว +1

    मी पुण्यात न तुमचे नेमी व्हिडीओ पाहतो अतिसये सुंदर आणि मला खूप खूप आणि रेसिपी 1 च नंबर। आवडतात।। बेस्ट ऑफ लक। take care..

  • @Swayampakachikala1473
    @Swayampakachikala1473 2 หลายเดือนก่อน

    एकदा सहज म्हणुन तुमचा व्हिडिओ पाहिला.पण आता रोजच बघते. तुमचे जुने व्हिडिओ पण बघते. खुपच संघर्ष करत आयुष्य जगताय तुम्ही. पण त्यातही अतिशय आनंदात जगताय.खुपच ग्रेट आहात तुम्ही सगळे.शब्दच नाहीत बोलायला.पुण्याच्या जवळपास कुठे आलात की नक्कीच कळवा.भेटायची इच्छा आहे बाणाईला, अर्चनाला.

  • @shriniwaswaghmode8028
    @shriniwaswaghmode8028 ปีที่แล้ว +6

    बानाई मामी तुम्ही बोलण्यात लय तरबेज हाय👍🙏🏽

  • @sakharammahanvar6231
    @sakharammahanvar6231 ปีที่แล้ว +21

    राम राम हाके पाहुणे. बानाईला सुध्दा राम राम. ❤

  • @minakshiagawane6940
    @minakshiagawane6940 ปีที่แล้ว +5

    खरंच दादा तुमचे विडिओ खूप छान वाटत बघायला.... आमची बानाई वहिनी सर्व गुण संपन्न आहे.....☺️☺️

  • @youcankc
    @youcankc ปีที่แล้ว +6

    क्या बात हें ❤आमची लोकं फेमस झाली 😊

  • @sushmashete7396
    @sushmashete7396 ปีที่แล้ว +3

    आग बानाई तू वेस दाखवली ना खोपोलीची एक गावात रस्ता जातो व एक घाटात जातो गावात जातो रस्ता तिथे जवळच दत्ताचे मंदिर आहे वेशीच्या आत खोलीतच राहत होते नोकरीच्या निमित्ताने आता नारायणगाव ला राहतो बानाई तू खूप हुशार आहेस चालता चालता व्हिडिओ बनवला खूप कष्टाळू व आनंदित पण आहेस तूझे कौतूक करावे तेवढे थोडेच आहे तूमचा मोबाइल नंबर द्या व्हिडिओ मधून मग बोलता तरी येईल नाही भेट होत तर तूम्हाला पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा बानाई

  • @sunilkadam8475
    @sunilkadam8475 ปีที่แล้ว +4

    बाणाई खूपचं कष्टाळू व सतत हसतमुख असते दोघांचेही मनापासून कौतुक वाटते.

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 ปีที่แล้ว +8

    बाणाई खूप खूप कष्ट असून किती छान व्हिडिओ केलाय शेळी मुळे प्रॉब्लेम झाला

  • @pratibhavaidya8884
    @pratibhavaidya8884 ปีที่แล้ว +5

    तुम्ही येता जाता चालत का जाता जाताना पहिल्या मुकामा ला गाडीने जायचं तसेच घरी परतताना गाडीने येयच इतके तुमचे हाल बघवत नाही जगात इतकी पैसेवाली माणसं आहेत मंत्री आहेत ह्यांना ह्याचे हाल दिसत नाही करोडो रुपये देवस्थानांना दान करतात जरा ह्यांच्याकडे बघा ह्यांना फोल्डिंग घर द्या इतक्या खडक उन्हात पोरं बाळ घेऊन रहातात खूप वाईट वाटते उन्हातून महिना महिना चालतात खूप वाईट

  • @reshmasahani6779
    @reshmasahani6779 ปีที่แล้ว +4

    जय शिंगरोबा 🙏🏻🌷जय मल्हार 🙏🏻🌷तुमच्या कडून खुप शिकायला मिळते निसर्ग कसा टिकवून ठेवायला पाहिजे पायी चालणे आणि खुप काही 🙏🏻🙏🏻🌷🌷

  • @mahi76061
    @mahi76061 ปีที่แล้ว +14

    🙏🙏🙏🙏🙏🙏❤❤❤❤ बाळुमामा सदैव तुमच्या पाठीशी राहोत 🙏🌺

  • @nirmalagorad7653
    @nirmalagorad7653 5 หลายเดือนก่อน

    खुप च आवडलं तुमचे सगळे च विडिओ आवडतात.निरागस प्रेमळपणा आणि मोकळेपणा आवडला..

  • @gokulsonavane
    @gokulsonavane 4 หลายเดือนก่อน

    अगर बानाई ताई तुमाला कीती तरी देवांच दरशन सहजा सहजी मीडतया बघा खुपच छान आमाला तरह गाडयानमधे फिरुन पैसा खरच करुन सुंघा ऐवढ्या देवांची दरशन नाही मीडत खुपच छान आनी आमी पन धनगरच आहे बरका जडगाव जींला तालुका जामनेर खानदेश तुमी लोकांना बघतो तर आमचे वाड वडील आमाला आठवतात आमचे वाड वडीलाचे ही जीवन असेच होते पहीले आता आमी थोड शीकलो आनी शहराकडे नीघालो पैसे मीडवायला बानाई ताई तुमच्या हातचे जेवन खुपच छान आसत बरका आमाला तुमचे वीडीयो बघायला खुप आवडतात

  • @sureshpawar613
    @sureshpawar613 ปีที่แล้ว +16

    गंगुबाई आणि बानाई दोघींनी घाट सर केला धन्यवाद

  • @bhosaleamit5952
    @bhosaleamit5952 ปีที่แล้ว +2

    खर धनगरी जीवन हे आजून भी परंपरे नुसार चाले आहे खूप छान. श्रीमंत लोकांना काय करायचे. माणुसकी हिच खरी श्रीमंती आहे.

  • @nirmalarashinkar7456
    @nirmalarashinkar7456 7 หลายเดือนก่อน +2

    देवा कीती कस्टमय जिवन आहे तूमचे बानाई देव तुमाला सूखी ठेवो❤

  • @janardhanbangar1696
    @janardhanbangar1696 ปีที่แล้ว +7

    आम्ही पण धनगर,शहरी वातावरणात रूललेलो.पण या भगीनी परीस्थितीने लढणे, जगणे शिकवलेल्या.खुप खडतर आयुष्य कणखर पणे जगणार्या .

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 10 หลายเดือนก่อน +3

    देवावरील अपार श्रद्धा,प्रेम आपुलकी...खरच तुम्हाला पांडुरंग सदा सुखी समाधानी आनंदी ठेवो

  • @ashwinipadalkar1868
    @ashwinipadalkar1868 ปีที่แล้ว +1

    कॅमेराचा मस्त उपयोग ,वेडिओ पण मस्त बनवला. कष्टप्रद जीवन.सलाम तुमच्या कष्टाला.

  • @mangalbhosale8086
    @mangalbhosale8086 ปีที่แล้ว +2

    आपला प्रवास सुखाचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना❤❤

  • @ashwinipadalkar1868
    @ashwinipadalkar1868 ปีที่แล้ว +2

    शिंग्रोबा दर्शन वा मस्त.

  • @meenashipaigude4315
    @meenashipaigude4315 7 หลายเดือนก่อน +1

    बानाई खुप छान व्हिडिओ केलास अख्या वाटचं दर्शन घडवलस दादा तुम्हाला लक्ष्यी मीळाली😅

  • @shahajighutukade6280
    @shahajighutukade6280 ปีที่แล้ว +6

    काकी मुळे आपल्या देशाचं दर्शन मिळाले आहे 🙏🙏

  • @santoshnighot5129
    @santoshnighot5129 ปีที่แล้ว +4

    फारच कष्ट करावे लागतात धनगर बांधवांना ग्रेट ❤❤❤🙏 🙏

  • @sulochanabutte-pq3oy
    @sulochanabutte-pq3oy 7 หลายเดือนก่อน

    बाणाई तुझ्याबरोबर आमचा पण छान प्रवास झाला खूप मज्जा आली मला तुझे व्हिडिओ फार आवडतात

  • @Dada_devkate
    @Dada_devkate ปีที่แล้ว +2

    बानाई खुप छान विडिओ आहे अप्रतिम खुप कष्ट घ्यावे लागत 👌👌🌹🌹🌹🌺💐💐

  • @vidhyapimple7003
    @vidhyapimple7003 ปีที่แล้ว +12

    शाब्बास बाणाई .छान व्हिडिओ बनवलास ग.

  • @user-op1sh1ku4s
    @user-op1sh1ku4s ปีที่แล้ว +1

    हाके दादा
    बाणांई ताईने सुद्धा अप्रतिम video बनविला. 👍

  • @anjalikulkarni4450
    @anjalikulkarni4450 11 หลายเดือนก่อน +1

    बाणाई सिद्धु मामा तुमचे सर्व व्हीडिओ मी पहातेच तुमचे कष्टप्रद जिवन पाहुन खुप कौतुक वाटते सरवांशी प्ेमळ वागणे स्वयंपाकाची पद्धत अप्रतिम

  • @kisanjadhav-tr6cb
    @kisanjadhav-tr6cb หลายเดือนก่อน

    😊 बाणाई खूप मस्त व्हिडिओ बनवला आहे तुझे अभिनंदन अभिनंदन

  • @babandhawale8262
    @babandhawale8262 ปีที่แล้ว +1

    बाणाई ताई खूप छान व्हिडिओ बनवला तुम्ही..

  • @Prakashgarole3132
    @Prakashgarole3132 ปีที่แล้ว +7

    लोक तुमच्यावर खुप प्रेम करतात. आम्हाला पण खंडोबा आहे. देवकार्यात खंडोबाला बकर द्याव लागत अन् वाघे उभे करुन वाघ्यांच्या हातची पुजा होते.तेव्हा देवूक मारोतीला जाते.

  • @sarikaghule958
    @sarikaghule958 4 หลายเดือนก่อน

    बानाई किती हसतमुख आहेस तू... तुझ्याकडून खूप शिकण्यासारखे आहे ग ..जमायला हवे किती आनंद... धन्यवाद