संत नामदेवांची औंढा नागनाथ येथील कीर्तन सेवा aundha nagnath namdev maharaj
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
- संत नामदेव विठ्ठल भक्त होते. एकदा संत नामदेव व संत ज्ञानेश्र्वर एकत्र तीर्थयात्रेला निघाले होते. गया, प्रयाग असे करत करत ते औंढा नागनाथ येथे आले, श्री शंकराचे स्थान आहे ते. येथे संत नामदेव यांनी कीर्तन करायचे ठरविले, ईश्र्वर चरणी सेवा द्यावी असे वाटले. महादेवांना वंदना करून कीर्तनाला प्रारंभ केला. पुष्कळ लोक आले होते, कीर्तनात लोक गुंगन गेले होते.
.
एवढ्यात कांही ब्राह्मण आत आले व त्यांनी संत नामदेव यांना कीर्तन करण्यास थांबविले. बराच वाद झाला ब्राह्मणात आणि लोकांमध्ये, नामदेव मात्र शांत. लोक म्हणाले, काय हरकत आहे विठ्ठल काय, आणि महादेव काय, एकच देव आहे.
.
ब्राह्मण म्हणाले, विठ्ठलाच्या दारी जाऊन विठ्ठलाचे काय गोडवे गायचे ते गां. ब्राह्मण ऐकानात व लोकहि ऐकेनात. शेवटी ब्राह्मण म्हणाले देऊळाच्या मागच्या बाजूला जाऊन खुशाल कीर्तन करा.
.
संत नामदेव यांनी ब्राह्मणांना नमस्कार केला आणि मागच्या बाजूला जावून कीर्तन करू लागले, लोक पण तेथे आले.
.
कीर्तन करतां करतां नामदेव इतके तल्लीन झाले, की देऊळच फिरले. देवळाचे तोंड संत नामदेवाच्या बाजूला गेले. नामदेवांची आणि ऐकणाऱ्या लोकांची तल्लीनता इतकी वाढली, ती भक्ती, तो आर्त भाव बघून महादेवांना त्यांची आर्ततेची हाक आली. देऊळ पूर्व दिशा असलेले नामदेव यांच्या कडे बाजूला झाले. महादेव संत नामदेवांच्या समोर येऊन उभे ठाकले, कमरेवर हात ठेवून, “महादेव”. काय ते दर्शन. आज सुध्दा हे फिरलेले देऊळ जसे फिरलेले होते तसेच आहे.
.
पूजा झाल्यानंतर ब्राह्मणांना कळले, अरे कांही तरी गडबड झाली आहे. देऊळ फिरलेले आहे हे समजले. नंतर ब्राह्मण पण संत नामदेवांच्या विठ्ठल कीर्तनाला बसले.
जय जय राम कृष्ण हरी
फिरविले देऊळ जगामाजी ख्याति।
संत नामदेव महाराज
नामदेव हाती दूध प्याला
❤❤❤❤
Jay bholenath..
Jay mahakal