Mann Suddha Tujha Season 2 : आय ॲम विथ यू | मन सुद्ध तुझं | Episode 1

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ส.ค. 2024
  • #abpmajhalive #abpमाझा #mannsuddhatujha #season2 #mentalhealth #mentalhealthawareness #psychological #subodhbhave #vaibhavmangle #muktabarve
    Mann Suddha Tujha Season 2 : आय ॲम विथ यू | मन सुद्ध तुझं | Episode 1 | I am With You
    Mann Suddha Tujha Season 2 | Mann Suddha Tujha Serial | मन सुद्ध तुझं सीझन २ | Mental Health | ABP Majha
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------

ความคิดเห็น • 256

  • @rahulp9558
    @rahulp9558 หลายเดือนก่อน +59

    अशा साध्या सरळ मालिका पाहायला सुद्धा बरं वाटतं नाहीतर आजकालच्या विषय नसलेल्या मालिका एक डायलॉग नंतर सर्वांचे थोबडे दाखवतात हेच बघून वीट आलाय आता, ह्या मालिकेला जुन्या मालिकांचा गंध आहे जो खूप उत्तम आहे

    • @dollhousedelight8553
      @dollhousedelight8553 หลายเดือนก่อน +1

      Agdi khara❤

    • @Comment_Man123
      @Comment_Man123 หลายเดือนก่อน +2

      बरोब्बर ओळखलंत. त्याच कारण दिग्दर्शक, सर्व कलाकार आणि अगदी शीर्षक गीताचे संगीतकार हे सर्व जण जुने दिग्गज आहेत.

    • @swatigosavi7634
      @swatigosavi7634 หลายเดือนก่อน

      Weekly आहे कि daily?

    • @archanapanchal5655
      @archanapanchal5655 26 วันที่ผ่านมา

      खूप सुंदर मालिका ❤🎉

    • @aniketpusadkar558
      @aniketpusadkar558 24 วันที่ผ่านมา

      Man bharun aale ❤❤❤❤

  • @latarayate5257
    @latarayate5257 11 วันที่ผ่านมา +3

    हा अनुभव एपिसोड सर्व मुले आणि पालकांनी जरूर बघायला पाहिजे

  • @playwithfriends8968
    @playwithfriends8968 หลายเดือนก่อน +11

    अतिशय उत्तम व मनोरुग्णांना दिशा दाखवणारी अभ्यासपूर्ण लेखन व अनुभवसिद्ध मालिका. चंद्रकांत कुलकर्णी चें दिग्दर्शन गहन विषय थोडक्यात
    हाताळनं ग्रेटच. अभिनय उत्तम न्याय! किशोर देशपांडे पुणे.

  • @kalpavrukshapublication
    @kalpavrukshapublication หลายเดือนก่อน +37

    उत्तम अभिनय सुबोध सर...👌👍आजच्या पिढीतील मुलांची गोष्ट आहे ही. राजीव सर आभारी आहोत पुन्हा कार्यक्रम चालू केल्याबद्दल ❤🙏

    • @sandhyajoshi2081
      @sandhyajoshi2081 หลายเดือนก่อน +2

      कुठल्या app वर आहे

    • @kalpavrukshapublication
      @kalpavrukshapublication หลายเดือนก่อน +2

      @@sandhyajoshi2081 App vr nahi Abp maza vr ahe...

  • @bharatithakar8247
    @bharatithakar8247 หลายเดือนก่อน +17

    स्वप्नील जोशी आणि सुबोध भावे... अभिनय करताहेत असं वाटतच नाही. आणि भेटणारे पेशंट पण... सगळ्या टीमचे आभार.... 🙏🙏🙏🙏❤💐

  • @deepteemusmade2953
    @deepteemusmade2953 หลายเดือนก่อน +13

    Season 1 नंतर वाट पहात होते पुढील भागाची, त्या अपेक्षा वर खरा उतरला आहे पहिला भाग.. खुप शभेच्छा 🎉

  • @taramarathe1635
    @taramarathe1635 18 วันที่ผ่านมา +1

    किती छान एक नवा विषय घेऊन ही मालिका आणलीय, सुबोध भावे ग्रेट व्यक्तिमत्त्व आणि त्यांच्या अभिनय म्हणजे अगदी विषयाला न्याय देणं आणि समाजाभिमुख मेसेज....

  • @sunitakumbhar8063
    @sunitakumbhar8063 23 วันที่ผ่านมา +3

    Season 1 चे सगळे एपिसोड अतिशय भावोत्कट झाले . स्वप्निल जोशी डॉक्टर म्हणून खूप भावलेले...
    मी स्वतः एक डॉक्टर आहे. यातला प्रत्येक भाग मला माणसांशी जोडत गेला. पेशंटच्या मनाची व मनातली आवडती डॉक्टर होता आलं हाच खरा आनंद..
    खूप आतुरतेने दुसऱ्या भागाची वाट पाहत होतो. हा भाग पाहिल्यानंतर तो तितकाच सुंदर वाटला. सुबोध भावे तितकेच परिपक्व डॉक्टर शोभलेत...
    खूप छान व टीमचे मनापासून आभार
    ❤❤❤

  • @shailakulkarni119
    @shailakulkarni119 14 วันที่ผ่านมา +1

    अतिशय संवेदनशील सुंदर , काही ठीकाणी दोन भावंडात नेहमी तुलना केल्यावर जे पाहायला मिळत ,आप आप सातवले मतभेद संवादातून व्यक्त न होता एकमेकांविषयी मनात अढी धरून ठेवल्या मुळे प्रश्न सुटत नाहीत. गुंता अधिकच वाढत जातो.
    I am with you. एवढं प्रेमानी बोलल्यावर मनातील किल्मीश दूर होण्यास मदत होते. खरच सुंदर आहे भाग.

  • @rohininirmale6035
    @rohininirmale6035 หลายเดือนก่อน +10

    असे विषय घ्यावेत जेणेकरून आम्हीपण शिकु..आमचे चुका😊..खरचं गरज आहे अशा विषयांवर चर्चा होणे...इतर नकोसे मालिका दाखवु नका पण असे विषयांवर नक्कीच मालिका होणे गरजेचे..

  • @viveknaralkar6007
    @viveknaralkar6007 หลายเดือนก่อน +4

    भाग १ अनेक वेळा पाहिला होता. अनेकांना बघायला सांगत असे. दुसऱ्या सिझनचा १ भाग पहिला.. खूप छान वाटले! आपली माणसं भेटली..सुमारे १५ वर्षं सर्व मालिका बघणे सोडले होते. सुबोध भावे यांचे सय्यमी आणि श्वासक संवाद अधिक आवडले. सर्व टीम ला अनेक शुभेच्छा.❤

  • @chhayaogale9752
    @chhayaogale9752 หลายเดือนก่อน +10

    खूप सुंदर होता भाग...आजच्या काळातील महत्वाचा विषय...ज्याला जनरेशन गॅप म्हणू शकतो आपण...म्हणूनच शेवटी सांगितलं तस् आपण त्यांच्या सोबत आहोत आणि त्यांच्यावर विश्वास आहे..हे म्हणणं बरोबरच ठरेल...

  • @hritiktamhankar8163
    @hritiktamhankar8163 หลายเดือนก่อน +4

    सगळ्या कलाकारांचा अभिनय खूप सुंदर आहे हे कलाकार उत्तम दर्ज्याचे आहेत त्यात काही शंका नाहीं असे प्रहसन या समाजात खूप मोठ योगदान देतात.....
    जाई खूप सुंदर अभिनय केला keep it up 😊😊👍👍
    - हृतिक ताम्हनकर जबलपूर

  • @divyathombare7516
    @divyathombare7516 หลายเดือนก่อน +8

    वाह!! किती सुंदर आणि मस्त कार्यक्रम आहे. इतका छान आणि सध्याच्या परिस्थितीला साजेसा विषय किती छान रित्या मांडला आहे. अप्रतिम. सर्व कलाकारांचे काम छान. सुबोध सर 👏👏👏 पुढच्या भागाची उत्सुकता लागलीय आता.

  • @devashree6706
    @devashree6706 หลายเดือนก่อน +2

    हॅट्स ऑफ सुबोध तुला!! किरण दादा चे "वडील" पण खूपच छान! विषय खूप साध्या सोप्या पद्धतीने मांडला तुम्ही!

  • @dr.shobhar.beloskar1311
    @dr.shobhar.beloskar1311 หลายเดือนก่อน +6

    I am with you ही सुसंवादाची,सहकाराची पहिली पायरी आहे.

  • @milindpendharkar9467
    @milindpendharkar9467 หลายเดือนก่อน +6

    चेहर्याची भाषा म्हणजे काय ते करमरकर सरांच्या अभिनयातून कळतंय..!!
    पहिलाच भाग No-1 great 👍👌

  • @physicsdepartment-abhankar132
    @physicsdepartment-abhankar132 หลายเดือนก่อน +2

    खुप छान ,मनाची आंदोलने ,प्रत्येक व्यक्तीचे वेगळे असणे ,तुलना न करणे या सर्व गोष्टी अतिशय सोप्या पद्धतीने व मानसशास्त्राचा विचार करून मांडल्या आहेत .छान

  • @vinoddasud7950
    @vinoddasud7950 หลายเดือนก่อน +4

    सुबोध भावे उत्कृष्ट अभिनेता

  • @meenakarekar6140
    @meenakarekar6140 หลายเดือนก่อน +4

    चांगला विषय. हल्ली हीच पालक व मुले यांच्या नात्यात घुसमट चालली आहे. त्यामुळे गैरसमज, चिडचिड, टोकाचा हटवाद वाढत आहे. या भागामुळे पालक व मुलांना योग्य मार्गदर्शन मिळेल अशी अपेक्षा आहे.

  • @sunildeshpande1436
    @sunildeshpande1436 หลายเดือนก่อน +3

    उत्तम विषय, तसेच दिग्गज कलाकार खुप छान अभिनय, अदिती छान अभिनय केला आहेस दिग्गज कलाकार यांच्या सोबत काम करण्याची संधी मिळाली तुला खरंच आनंद झाला तुझ्या पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @snigdhapandit2352
    @snigdhapandit2352 หลายเดือนก่อน +3

    खूपच सुरेख अभिनय,लेखन, संवाद.फारच छान.असं वेगळं काही तरी समाधान देऊन जातं.आज टिव्हीवर च्या मालिका बघतच नाही.पण आज एबीपी माझा ने पुनश्च आनंद दिला.धन्यवाद.❤❤❤❤❤

  • @bharatisonawane4587
    @bharatisonawane4587 หลายเดือนก่อน +3

    अप्रतिम..खरंच मी आहे तुझ्या सोबत हे शब्द खूप काम करतात एक भक्कम आधार..

  • @arunaranade-go8qw
    @arunaranade-go8qw หลายเดือนก่อน +2

    खूपचं...छान वाटलं बघताना..सिरीअल पाहतोय असं वाटलचं नाही....सुबोध भावे तर आवडतोच..पण सगळ्यांचा अभिनय अगदि छान..खूप..खूप धन्यवाद..आणि शुभेच्छा!!

  • @pragatiwaghmare6938
    @pragatiwaghmare6938 หลายเดือนก่อน +1

    खुप छान , खुप आनंद झाला पुन्हा हा कार्यक्रम चालू झाला , सुबोध भावे छान चव आहेत,पण स्वप्नील जोशी यांना missकरते

  • @madhavilapate1554
    @madhavilapate1554 15 วันที่ผ่านมา

    Vah subodh bhave,mi म्हटलं हल्ली दिसत नाही noni shivay pan he chhan🎉

  • @pratibhaotari2897
    @pratibhaotari2897 หลายเดือนก่อน +3

    खूप सुंदर विषय घेतला आहे. आजच्या काळातील वास्तव आहे. धन्यवाद सर.

  • @kalpanadalvi9610
    @kalpanadalvi9610 6 วันที่ผ่านมา

    खूप छान विषय घेऊन ..अतिशय संयमाने.....अणि दर्जेदार कलाकारांनी समृद्ध अशी मालिका बनवल्या बद्दल दिग्दर्शक कुलकर्णी यांचे मनःपूर्वक आभार🙏....आपले पण असेच problem असतातच....
    अश्याच एका counselor चा no कोणी देऊ शकता का...जे खरोखरीच अश्या पद्धतीने treatment देतात. 🙏

  • @ashasawant948
    @ashasawant948 หลายเดือนก่อน +3

    खूप सुंदर विचार, संवाद, मोठ्या विषयावर, सहज विश्लेषण. धन्यवाद.

  • @yogitasubhedar3336
    @yogitasubhedar3336 19 วันที่ผ่านมา

    अप्रतिम, अप्रतिम खूप खूप खूप सुंदर सुबोध भावे तर काय बोलायचं नाही पोलीस इतरही सर्व कलाकार तेवढेच ताकदीचे आहेत आगळं वेगळं कथानक . खूप वास्तववादी. अशा विषयांची नितांत आवश्यकता आहे. खूपच भारी

  • @sharmilasubandh6133
    @sharmilasubandh6133 หลายเดือนก่อน +1

    Most awaited serial, पहिल्या सेशन इतकीच अप्रतिम

  • @adityashinde6688
    @adityashinde6688 หลายเดือนก่อน

    खूप उत्तम अभिनय आणि लेखन..💯 season 1 प्रमाणेच season 2 सुद्धा अप्रतिम.. एका medical student ला सुद्धा थोडे धडे घेता येतील असे लेखन आहे ❤ धन्यवाद abp majha आणि संपूर्ण team फक्त लेखक कोण आहे हे सांगण्यात यावं 💯🔥❣️

  • @prakashkulkarni6224
    @prakashkulkarni6224 หลายเดือนก่อน +1

    किती सोपं गोष्ट आणि किती कठीण करून टाकत असतो आम्ही. . विचार लावण्या सारखे आहे हे एपिसोड. Really very interesting one . Best wishes for upcoming episodes.

  • @sunitakumbhar8063
    @sunitakumbhar8063 27 วันที่ผ่านมา +1

    माझी अतिशय आवडती मालिका.. खूप आभार तुम्ही पुन्हा ही मालिका घेऊन आलात...

  • @user-eh4pm3by7w
    @user-eh4pm3by7w หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर ! अशाच काऊन्सिलिंग ची गरज पालकांना आणि मुलांना हवीय . अशी परिस्थिती निर्माण झाली आहे !😊

  • @sumanmahajan1127
    @sumanmahajan1127 หลายเดือนก่อน +1

    खुप सुंदर भाग, वाट पाहत होतो दुसऱ्या सीझन ची.
    मनापासुन धन्यवाद 🙏

  • @vasudhapatil5485
    @vasudhapatil5485 หลายเดือนก่อน

    खूप चांगल्या पद्धतीनं मांडला आहे हा विषय
    अप्रतिम अभिनय सुबोध भावे न चा !!

  • @aratijoshi7853
    @aratijoshi7853 9 วันที่ผ่านมา

    खूप सुंदर मालिका आहे... अशीच चालू राहू दे...

  • @shankarghoradwad3520
    @shankarghoradwad3520 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान, वास्तववादी, घराघरातील चित्र

  • @vasudhadiwan8320
    @vasudhadiwan8320 หลายเดือนก่อน

    मन सुद्धची वाट पहात होते . वेगवेगळ्या समस्यांची उकल होणे खू प आवश्यक आहे टीमचं मनःपूर्वक अभिनंदन

  • @chitrapandit597
    @chitrapandit597 หลายเดือนก่อน

    अप्रतिम लिखाण,संगीत,अभिनय....दर्जेदार प्रस्तुती...बातम्या नंतर हे पहावे अन्यथा TV पहातच नाही.

  • @RupaliDeshpande-xx6nu
    @RupaliDeshpande-xx6nu หลายเดือนก่อน +1

    खूप छान सादरीकरण, आणि सुबोध भावे यांचं काम नेहमीप्रमाणे उत्तम, संपूर्ण टीम च अभिनंदन

  • @kalpanadalvi9610
    @kalpanadalvi9610 6 วันที่ผ่านมา

    Agadi barobar👍🏼

  • @vaibhavidamle7587
    @vaibhavidamle7587 หลายเดือนก่อน

    खूप उत्कृष्ट व दर्जेदार मालिका.विषय तर इतका आगळावेगळा व रोचक आहे कि मालिका बांधुन ठेवते.नात्यात येणारे तिढे उत्तम रितीने सोडविले.👌👏👍

  • @anshikashitole5428
    @anshikashitole5428 หลายเดือนก่อน +1

    कितना अच्छा विषय काश ये मैसेज सबको मिलता।

  • @santoshhiremath2565
    @santoshhiremath2565 หลายเดือนก่อน +1

    आजच्या पिढीतील मुलांची गोष्ट आहे ही. पुन्हा कार्यक्रम चालू केल्याबद्दल👌🙏

  • @arundhatimahajan3755
    @arundhatimahajan3755 หลายเดือนก่อน +2

    फारच सुंदर अणि उपयुक्त प्रोग्रॅम

  • @user-qq6ee4zw5p
    @user-qq6ee4zw5p 18 วันที่ผ่านมา

    खूप छान विषय आणि हाताळणी पण सुंदर.

  • @latakulkarni709
    @latakulkarni709 20 วันที่ผ่านมา

    खूप छान मालिका सुबोध भावेच्या अभिनयाला खूप डेप्थ आहे सुंदर अभिनय

  • @ruchikasindhkar1492
    @ruchikasindhkar1492 หลายเดือนก่อน +2

    Heartiest congratulations to the team. Excellent and a very important topic covered today. Subodh sir will definitely carry the role well. Thanks once again.

  • @kalyanikulkarni1106
    @kalyanikulkarni1106 13 วันที่ผ่านมา

    Wooow fantastic acting by Legendary actors❤

  • @tejashreekulkarni1399
    @tejashreekulkarni1399 หลายเดือนก่อน +1

    खूप छान लिखाण.अभिनय सर्वांचेच उत्तम .नातेवाईकात चालणा-या कुरघोड्यापेक्षा असे विषय हाताळले गेले तर नक्कीच दोन पिढीतले बाॅन्डींग अधिक घट्ट होतील.❤

  • @snehamathkar9485
    @snehamathkar9485 10 วันที่ผ่านมา

    खूप सुंदर
    Thank you for this episode

  • @shobhajuvekar7502
    @shobhajuvekar7502 15 วันที่ผ่านมา

    फारच छान!

  • @pramodsakhare4038
    @pramodsakhare4038 หลายเดือนก่อน +1

    खूप छान मालिका खूप खूप धन्यवाद अबीपी माझा

  • @p.marawar
    @p.marawar หลายเดือนก่อน

    अशा प्रकारचे विषय घेऊन मालिका बनवणे हे खूप अभिनंदनीय आहे
    खूप छान एपिसोड 👌👌👌

  • @user-lq2tp2rn2b
    @user-lq2tp2rn2b หลายเดือนก่อน

    खूप खूप धन्यवाद माझा चे कारण त्यांनी हा कार्यक्रम पुन्हा सुरू केला.

  • @makarandsawant-e7i
    @makarandsawant-e7i หลายเดือนก่อน

    Subodh Bhave actually sounds like a doctor...best acting.

  • @user-nu2vq1nc3f
    @user-nu2vq1nc3f 27 วันที่ผ่านมา

    सुबोध भावे उत्तम अभिनय खुप सुंदर ❤

  • @user-vf7hb3nd4y
    @user-vf7hb3nd4y 6 วันที่ผ่านมา

    अप्रतिम ❤❤❤

  • @vishalwankhade348
    @vishalwankhade348 หลายเดือนก่อน

    थँक यु ..
    मन शुद्ध तुझ या टीम ला...
    खूप वाट बगत होतो सीजन 2 ची..पहिल्या सिजन प्रमाणे हा पण सिजन् बेस्ट होणार हे नक्की...

  • @makkasbekar2701
    @makkasbekar2701 หลายเดือนก่อน +2

    Keep this series going.! Great work👍

  • @manishavasagadekar7709
    @manishavasagadekar7709 หลายเดือนก่อน

    सर्वांनी ऐकण्यासारख व त्यातून बोध घेण्यासारख आहे. सादरीकरण व प्रक्षेपणासाठी सर्व कलाकार व टिपचे अभिनंदन व शुभेच्छा..

  • @latakulkarni709
    @latakulkarni709 20 วันที่ผ่านมา

    खूप छान विषय आहेत वास्तव

  • @jayashrimodak6689
    @jayashrimodak6689 14 วันที่ผ่านมา

    फॅमिली नी बघावी अशी सिरीयल आहे खूप सुंदर

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 15 วันที่ผ่านมา

    आजच्या पालकांच्या आणि मुलांच्या व्यथा

  • @snehajoshi8223
    @snehajoshi8223 28 วันที่ผ่านมา

    अप्रतिम भाग..

  • @vaidehigadre9787
    @vaidehigadre9787 หลายเดือนก่อน

    खूपच छान आहे निराळा विषय सगळ्यांनीच बघावी अशी मालिका !!!

  • @SanskritiPatil-no8gn
    @SanskritiPatil-no8gn 16 วันที่ผ่านมา

    Apratim lekhan

  • @chandrakalashilwant7
    @chandrakalashilwant7 18 วันที่ผ่านมา

    I already watched session one.I am very interested and excited to see these videos

  • @gaurikatti4362
    @gaurikatti4362 21 วันที่ผ่านมา

    Atishay sunder malika.subodh bhave sunder acting.amche sir Naidu sir pn asech samjaoon sangtat

  • @SukanyaSarade
    @SukanyaSarade 25 วันที่ผ่านมา

    खूप सुंदर अश्या दर्जेदार मालिकेची वाट पहात होते
    नाहीतर टीव्ही पहात नाही
    विषय छान

  • @sunitaw7372
    @sunitaw7372 หลายเดือนก่อน

    खूपच छान व्हीडीओ

  • @evazen7178
    @evazen7178 หลายเดือนก่อน

    माझ्याबरोबरही असच होतंय अगदी त्या मुलीसारख

  • @neetashinde6423
    @neetashinde6423 25 วันที่ผ่านมา

    छान मालिका. मस्त एपिसोड. Season 1 पण खूप आवडला होता. Season 2 साठी खूप शुभेच्छा.

  • @swarooopraparti7304
    @swarooopraparti7304 หลายเดือนก่อน

    अतिशय उत्तम. आजच्या काळात अशा कार्यक्रमाची खूप गरज आहे.

  • @mangeshdeo2399
    @mangeshdeo2399 25 วันที่ผ่านมา

    सुंदर!!!

  • @swatikulkarni491
    @swatikulkarni491 หลายเดือนก่อน

    भारी❤

  • @vaishaliwajpe2400
    @vaishaliwajpe2400 หลายเดือนก่อน

    अप्रतिम

  • @shailrege10
    @shailrege10 หลายเดือนก่อน

    अप्रतिम आशय, अप्रतिम अभिनय आणि above all अप्रतिम मनोप्रबोधन 🙏

  • @renukakulkarnijoshi1744
    @renukakulkarnijoshi1744 29 วันที่ผ่านมา

    Chhan. I was waiting for season 2. Thank you

  • @sulbharansing3417
    @sulbharansing3417 16 วันที่ผ่านมา

    खूप खूप छान

  • @user-fc6pr1bv6p
    @user-fc6pr1bv6p หลายเดือนก่อน +1

    आत्ता गरज आहे अश्या प्रकारच्या कार्यक्रमाची,👍

  • @manjushreesahasrabuddhe7866
    @manjushreesahasrabuddhe7866 หลายเดือนก่อน

    पहिला भाग अतिशय सुंदर.सादरीकरण त्याहून सुंदर, आजकालच्या पिढीची हीच समस्या आहे फारच छान

  • @achalabandivadekar
    @achalabandivadekar หลายเดือนก่อน

    खूपच छान

  • @jayashriparadkar8556
    @jayashriparadkar8556 หลายเดือนก่อน

    Khup Sundar ❤

  • @nanachavan9877
    @nanachavan9877 หลายเดือนก่อน

    सुंदर 👌👌👌👌

  • @shobhasonawane7442
    @shobhasonawane7442 หลายเดือนก่อน

    खूप छान विषय ❤

  • @harshadagashe
    @harshadagashe หลายเดือนก่อน

    निओमी आणि नायशा - ही असली नावं का वापरावी.

  • @user-bj7lo2vp6e
    @user-bj7lo2vp6e 10 วันที่ผ่านมา

    व्हेरी nice

  • @apekshatare8241
    @apekshatare8241 26 วันที่ผ่านมา

    सुबोध भावे मस्त अभिनय

  • @chitrajoglekar2461
    @chitrajoglekar2461 29 วันที่ผ่านมา

    अशा सिरियल ची सध्या खूप गरज आहे.छान उपक्रम हाती घेतला आहे.

  • @ashalatainamdar8703
    @ashalatainamdar8703 หลายเดือนก่อน

    खूप छान.

  • @walimbenita7774
    @walimbenita7774 หลายเดือนก่อน

    फार गरज आहे अशा series तयार करण्याची .... सुंदर सादरीकरण. ❤

  • @ravindrapawar2382
    @ravindrapawar2382 หลายเดือนก่อน

    मला हे episode खुप आवडतात, त्याचा आयुष्यात खुप ऊपयोग होईल

  • @akshayphopherkar5517
    @akshayphopherkar5517 หลายเดือนก่อน

    शेवटच्या scene ला टचकन डोळ्यात पाणी आलं 😢

  • @pramilasomkure8852
    @pramilasomkure8852 หลายเดือนก่อน

    Khupch suñdar aahe ha vishay subodh bhàvenni khupch chhan samjawanyacha prayatna kela superb performance Subodh 💯👌👍❤️

  • @sonalijinturkar8929
    @sonalijinturkar8929 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर, बघतच राहावे असे एपिसोडस ,

  • @hemapte
    @hemapte หลายเดือนก่อน

    ही मालिका परत सुरू केली हे फार छान झाले.

  • @pradeepjoshi969
    @pradeepjoshi969 21 วันที่ผ่านมา

    Apratim