Kalavantin | कलावंतीण | घाटवाटांचा उत्तुंग पहारेकरी | Most Dangerous Trek in India |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 23 ธ.ค. 2024
- #kalavantin #kalavantindurgtrek #कलावंतीण #forts #fortsofmaharashtra #fortsofindia #chatrapati #shivajimaharaj #chatrapatishivajimaharaj #maharashtra #maharashtratourism #india
किल्याचे नाव : कलावंतीण
उंची : २२५० फूट
कसे जाल : पनवेल - शेऊंड फाटा -ठाकूरवाडी-प्रबळमाची
शिखरावरून बघण्यासारखे : कलावंतीणचे अखेरचे टोक , प्रबळगडची पसरलेली डोंगररांग माथ्यावरून दिसणारा दक्षिणेकडील प्रबळगडाचा माथा,पूर्वेकडे माथेरान डोंगर,पश्चिमेकडे मुंबई शहर असा चौफेर मुलुख.
कलावंतीन दुर्ग पश्चिम घाटात स्थित असून ते एक 2,250 फूट (686 मीटर) उंच शिखर आहे.हे शिखर कलावंतीनीचा सुळका किंवा कलावंतीन शिखर म्हणून देखील ओळखले जाते हे एक लोकप्रिय दुर्गारोहण स्थान आहे.
दुर्ग कलावंतीण हा मुंबई-पुणे गतिमार्गावरून पुण्याकडे जाताना पनवेलच्या पूर्वेला माथेरानच्या रांगेत असलेला एक डोंगरवजा किल्ला आहे.
कसे जाल?
हा गड मुंबई-पुणे हायवेवरून दिसतो. मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर (NH4) शेडुंग फाट्यापासून गडाकडे जायचा मार्ग आहे. १० लोकांचे साधारणतः २००-२५० रुपये द्यावे लागतात आणि दुसरा मार्ग म्हणजे पनवेल ते ठाकुरवाडी बससेवा आहे. माणशी १२ रुपये बसचे टिकीट आहे. ठाकुरवाडीला आल्यावर प्रबळ गडाच्या दिशेने पायी पायी जावे लागते.
कलावंतीण दुर्गाचा इतिहास-
कोण्या ऐका राजाने कलावंतीण नावाच्या राणीवर असलेल्या प्रेमापोठी या शिखरास कलावंतीण नाव ठेवले .
हा दुर्ग प्रबळगडाच्या लगतच्या भागाला लागून आहे.
संपूर्ण दुर्ग चढण्याकरिता खडक कापून पायऱ्या बनवल्या आहेत.
या दुर्गाशी प्रबळमाची गावामधील आदिवासी लोकांचे खूप जिव्हाळयाचे नाते आहे. ते प्रत्येक वर्षी शिमग्याच्या सणाला या दुर्गावर आदिवासी नृत्ये करतात.
पुर्वी व्यापारी मार्ग व नजिकच्या समुद्र किनार पट्टीवर लक्ष ठेवण्यासाठी याचा वापर केला जाई.
@soundridemusic
Music: Fear of The Dark by Soundridemusic
Music: Rain
Musician: @iksonmusic