Majhi Renuka Mauli / Trumpet Solo - Vasantraw Pawar - 9763389828 🎺🎺🎺

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ม.ค. 2025
  • कोरोनामुळे बँड बंद, पोटासाठी नवी मुंबईच्या रस्त्यावर ट्रम्पेट वादन
    राज्यात कोरोना विषाणूमुळे अनेकजण आर्थिक संकटात सापडले आहे. कोरोनाची त्सुनामी आता प्रत्येक ग्रामीण भागापर्यंत पोहोचू लागली आहे. कोरोनामुळे अनेक लहान-सहान व्यवसाय हे केव्हाच बुडून गेले आहेत. तर शासनाने सभा- लग्न समारंभांवर बंदी घातल्याने ऐन लग्न हंगामातही कार्यक्रमांचे विडे मिळत नाही. त्यामुळे बँड व्यवसायाचाच ‘बँड’ वाजला आहे.
    सातारा जिल्ह्यातील वसंत पवार यांनाही कोरोनामुळे बिकट परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. सध्या त्यांच्या परिवाराची उपासमार होताना दिसत आहे. तसेच त्यांच्या मुलांचे अपघाती निधन झाल्यावर नातवंडांची जबाबदारी त्यांच्यावर आली. सध्या त्यांच्या परिवारातील सात जणांची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली आहे.
    गेल्या ३५ वर्षांपासून ते स्वतःचा व्यवसाय करतात. त्यांचा श्री म्युझिकल नावाचा बँड आहे. मात्र गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे त्यांचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला. त्यामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांना सातारा सोडून नवी मुंबईत यावे लागले. गेल्या काही महिन्यांपासून नवी मुंबईत रस्त्यावर फिरुन ते आपली उपजीविका करत आहेत. आपल्या परिवारला घेऊन ट्रॉम्पेट वाजवत ते नवी मुंबईत फिरत असतात. तर दुसरीकडे त्यांच्या बँड पथकातील अनेक कलाकार हे कामाविना घरीच हतबल होऊन बसले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याची स्थिती पाहायला मिळत आहे.
    दरम्यान श्री साई कला सर्कल ब्रास बँन्ड दिवाळे कोळीवाडा यांच्यावतीने आज वसंत पवार यांना आर्थिक मदत देण्यात आली, तर बँड मास्तर आनंद जोशी यांच्या कडून ट्रम्पेट वाद्यांचं माऊथपीस हि छोटीशी भेट म्हणून देण्यात आली. या संकट समई एका कलाकाराने दुसऱ्या कलाकाराला मोलाची मदत दिल्याने वसंत पवार यांचे डोळे पाणावले होते.
    कुटुंबियांसोबतच २५ हून अधिक कलाकार पथकात काम करत होते. ते लग्न, यात्रा, सण, उत्सव, जयंती, महोत्सवाच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नातून कुटुंबांचा उदरनिर्वाह करायचे. पण कोरोनामुळे कलाकारांवर घरातच बसण्याची वेळ आली आहे. लॉकडाऊन काळात अनेक कुटुंबांची परवड होत आहे. त्यामुळे शासनाने कलाकारांकडे लक्ष देण्याची गरज आहे.
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

ความคิดเห็น •