ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

१२ मोटेची ऐतिहासिक विहीर | Baramotichi Vihir Satara |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ก.ค. 2024
  • १२ मोटेची ऐतिहासिक विहीर | Baramotichi Vihir Satara | #marathivlog
    राष्ट्रीय महामार्ग क्र.४ ने सातारा #शहरापासून #satara बारा किलोमीटरवर पुण्याकडे (Pune) येताना कृष्णा नदीच्या (Krishna River) तीरावर लिंब (Limb) या गावी वास्तुकलेचा हा अप्रतिम नमुना पाहायला मिळतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे (#Shivaji_Maharaj) नातू, संभाजी महाराजांचे (Sambhaji_Maharaj) पुत्र, - शाहू महाराजांची(Shahu Maharaj) पत्नी वीरुबाई हिनं ही दगडी विहीर इ.स.वी.सन. १७१९ ते १७२४ या दरम्यान बांधली. बारामोटेची विहीर (Baramotichi Vihir) दोन टप्प्यात आहे. २७ पायऱ्या उतरल्यानंतर आपण विहिरीच्या पहिल्या टप्प्यात पोहोचतो. याला उपविहीर किंवा आड असे देखील म्हणतात. खाली उतरल्यानंतर समोरच्या भिंतीवर पाहायला मिळतात व्याल शिल्प. वाघाचे तोंड आणि सिंहाचं शरीर असणारी ही शिल्पं राज्याची समृद्धी आणि पराक्रमाचं प्रतीक ठरतात. आडाच्या पहिल्या टप्प्यात ६ मोटी आहेत. पूर्वीच्या काळात सहा मधील ३ चालू होत्या. अष्टकोनी विहिर : विहीरीचं सर्व बांधकाम हेमाडपंती आहे आणि याची खूण म्हणजे विहीर बांधताना दगड एकमेकांना जोडण्यासाठी चुना सिमेंट अशा कोणत्याही गोष्टीचा वापर केला नाही. संपूर्ण दगडातून अतिशय कोरीव शिल्प उभं केलं आहे. अष्टकोनी विहीरीच्या प्रत्येक कोनात नागदेवतेची मूर्ती आहे. मुख्य विहिरीला ९ आणि आडाला ६ मोटी - एकूण १५ मोटीची विहीर आहे, मात्र पूर्वीच्या काळात १२ मोटा सुरूअसल्याने या विहिरीला १२ मोटेची विहीर (Baramotichi Vihir) म्हटले जाते. या विहिरीचे पाणी बैलाच्या साह्याने काढण्यात येत असे. या विहिरीकडे पाहिल्यावर ही विहीर आहे की राजवाडा असा प्रश्न पडतो असतो.
    नंतर आपण वरती निघालो विहीरच्या खासे बैठकीत.
    गणपती, हनुमान, कमलपुष्पे अशी अनेक शुभशिल्पे तर दिसतातच मात्र त्यांसोबत विशेष म्हणजे हत्तीवर आणि घोड्यावर विराजमान झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे शिल्प देखील ह्या खांबावर कोरलेले दिसते. पेशव्यांच्या, शाहुंच्या अनेक खासगी बैठकी, निवांत क्षण यांना साक्ष असलेली ही विहीर.
    मध्यभागी दोन मजली राजवाडा आणि दोन्ही बाजूला दोन विहिरी आणि आड असल्याने ही अत्यंत सुंदर वास्तू नेमकी कशा पद्धतीने बांधली असेल याचे कोडे अजून देखील सुटले नाही. मुख्य विहिरीच्या चारही कोपऱ्यांमध्ये हत्तींवर आरूढ झालेल्या वाघाचं शिल्प पाहायला मिळते. ही व्याघ्र शिल्प त्या काळातील मराठ्यांचे वर्चस्व प्रदर्शित करते. विहीर निर्माण करते वेळी ३३०० आंब्याची कलमं लावून इथे आमराईची निर्मिती करण्यात आली होती.जवळपास १०० फूट खोल आणि ५० फुट रुंद असलेली ही विहीर गावकऱ्यांसाठी आजीवन पाण्याचा उत्तम स्रोत ठरली आहे.
    जमिनीखालील महालात असणारी ही विहीर वरच्या बाजूने शिवलिंगाकृती आहे. येथे मोडी लिपीतील एक शिलालेख आहे. वर आले की १२ मोटांची जागा, दरबाराची आणि सिंहासनाची जागा बघायला मिळते.
    मराठ्यांचे शौर्य, वीरता आणि समृद्धीचे प्रतीक असणाऱ्या या विहिरीतील प्रत्येक कोरीव शिल्पाच्या पाठीमागे शिल्प मराठ्यांच्या भरभराटीचा इतिहास सांगते. सुंदर स्थापत्यशास्त्राचे उत्तम उदाहरण असणाऱ्या या विहिरीला भेट देऊन इतिहास बोलता करण्याची संधी दवडू नका.
    #बारा_मोटेची_विहीर,
    #Bara_Motechi_Vihir,
    #विहिरीत_महाल,
    #Shivaji_Maharaj,
    #Sambhaji_Maharaj,
    #Shahu_Maharaj,
    #Satara,
    #Bara_motechi_vihir_limb_Satara

ความคิดเห็น •