ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

श्रीनाथ म्हस्कोबा मंदिर कोडीत | Shreenath Mhaskoba Temple Kodit | Purandar |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ม.ค. 2022
  • श्रीनाथ म्हस्कोबा मंदिर कोडीत | Shreenath Mhaskoba Temple Kodit | Purandar | #marathivlogs
    आज आपण निघालोय भक्तांच्या मनात मानाचे स्थान असणाऱ्या कोडित येथील जागृत श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांच्या मंदिरात. सासवडच्या पश्चिमेस ६ किमी. वर असलेले कोडीत जागृत देवस्थान म्हणून प्रचलित आहे . सध्या मंदिरात जाण्यासाठी बसची सोयही आहे. समोरच असलेल्या पुरंदरची आडवी रांग, निसर्गरम्य असा भरपूर मोकळा परिसर, आजूबाजूला असलेली हिरवीगार वृक्षराजी असा हा निसर्गसौंदर्याने नटलेला भाग. मंदिराभोवतीच्या सुंदर वातावरणामुळे हा भाग पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्धीस आलेला आहे.
    मंदिराच्या भिंतींवर दोन्ही बाजुंनी विविध प्रकारची शिल्पे पाहून मन खुश न झाले तर नवलच. आधुनिक पद्धतीतली कोरलेल्या पुराणकथांतील अनेक पात्रे येथे भेटतात. मंदिराचे भव्य प्रवेशद्वार पाहताच थक्क करते. मंदिराचे प्रवेशद्वार - दिंडी दरवाजांची उंची ५१ फूट असून प्रवेशद्वारा खाली ३०,००,००० (तीस लाख) लीटर पाण्याची टाकी आहे. प्रवेशद्वाराला दांडेली सागवानाचा लाकडी दरवाजा बसविण्यात आला आहे. लाकडी दरवाजावर अतिशय सुंदर असे कोरीव काम केले आहे. प्रवेशद्वारा विविध देवतांची शिल्पे साकारली आहेत.
    दरवाजातच भक्तांसाठी प्रसाद वाटपाची सोया केलेली आहे.
    मंदिरा भोवतचे वातावरण जितके सुंदर कदाचित त्यापेक्षा थोडा अधिकच मनमोहक असणारा मंदिराचा आतील परिसर. चारी बाजूनी असणाऱ्या ओवऱ्या, मध्यभागी असलेला मुख्य मंदिराचा भव्य सभामंडप आणि संपूर्ण दगडातील गाभारा अशी या मंदिराची रचना. मंदिराच्या २ एकर १ गुंठे क्षेत्रफळापैकी ५०,००० चौरस फुटात मंदिर उभारले गेले आहे. सर्वप्रथम पाहायला मिळते नवसाईचे मंदिर. १४ x १४ या छोट्याश्या वाहन मंडप चे कोरीवकाम मनाला भुरळ घालते. नवसाईचा आशीर्वाद घेतला कि पुढे भव्य कासवाच्या मूर्तीला नमन करून आपण मुख्य मंडपाकडे निघालोय. समोरील भागावरील अप्रतिम रंगीत कोरीवकाम सुखावणारे आहे .
    या सुंदर कोरीवकामाचा आस्वाद घेत आपण सभामंपाकडे निघालोय. १२ नक्षीदार, मजबूत कोरीव खांबाच्या आधाराने उभारलेला हा सुंदर सभामंडप पाहून एखाद्या राजदरबारी आल्यासारखे वाटते. मंडपाच्या छताला असणारे सुंदर रंगीबेरंगी नक्षीकाम आणि मध्ये अडकवलेली सुंदर काचेची झुबरे, संपूर्ण सभामंडपात केलेली लाइटिंग मंदिराचे सौंदर्य अजून खुलवते. सभामंड्पातच श्रीनाथांचे वाहन असलेली अश्वाची धातूची सुंदर प्रतिमा पाहायला मिळते. सौंदर्य न्याहाळत आपण मुख्य मंदिराकडे निघालोय. भक्तांची दर्शनासाठी लगबग पाहायला मिळाली, मुख्य मंदिर पायापासून कळसापर्यंत पूर्णपणे दगडात बांधकाम केलेले आहे. शिखराची उंची ७१ फूट आहे.
    श्री तुळाजीबुवा बडधे यांच्या भक्तीला पावून श्रीनाथ म्हस्कोबा महाराज वीरहून कोडीतला आलेले आहेत. येथे दर अमावस्येला श्रीनाथांच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी होते. भक्तांना अन्नदान, भंडारा असतो. मंदिराच्या सभोवताली अशा ओवऱ्या बांधलेल्या आहेत. ओवरीसह संपुर्ण मंदिरावर अतिशय सुंदर - सुबक नक्षीकाम करून मूर्ती बसविण्यात आलेल्या आहे. मंदिराचे काम करताना भारतातल्या बर्‍याच मंदिर शैलींचा वापर केला आहे. उदा. सोमपुरा शैली, दाक्षिणात्य शैली, द्रवीडी शैली, हेमाडपंथी शैली, महाराष्ट्रीयन शैली इत्यादी.
    मंदिराचे संपूर्ण काम समस्त श्रीनाथ भक्तांच्या सहभागातून - ग्रामस्थांच्या श्रमदानातून साकारले आहे. मंदिरावर सोन्याचा कळस बसवण्याचा कार्यक्रम १ मे २००९ रोजी मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहात पार पडला. श्रीनाथांवर अपार श्रद्धा असलेला समस्त श्रीनाथभक्त, जर एकवटला तर तो काय करू शकतो हे पहायचे असेल तर आपणाला कोडितला यायलाच पाहिजे. कोडित येथे साकारलेलं श्रीनाथांच भव्य-दिव्य मंदिर हे समस्त श्रीनाथ भक्तांच्या भावनांचे अपार श्रद्धेचे एक प्रतीक आहे.
    #purandar #shrinathmhaskoba #kodit

ความคิดเห็น • 24

  • @omkarjadhav5451
    @omkarjadhav5451 2 ปีที่แล้ว +4

    सवाई सर्जाच चांगभलं

  • @sanjaybhagat8902
    @sanjaybhagat8902 2 ปีที่แล้ว +1

    🙏

    • @MarathiMatter24
      @MarathiMatter24  2 ปีที่แล้ว

      Thank you. Please share and subscribe 😊

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 ปีที่แล้ว +1

    Apratim. Khoop. Sundar..

  • @prajwalkokate315
    @prajwalkokate315 2 ปีที่แล้ว

    श्री नाथ महाराजांचा चांगभलं..

    • @MarathiMatter24
      @MarathiMatter24  2 ปีที่แล้ว +1

      चांगभलं🚩😊
      पुरंदरमधील आणखी पोस्ट भविष्यात पाहण्यासाठी आमचा चॅनेल सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळच्या मित्रमैत्रीणीना शेअर करा😊

  • @sunildhawale4175
    @sunildhawale4175 7 หลายเดือนก่อน +1

    🔱✨सवाई सर्ज्याचं चांगभले ✨🔱

    • @MarathiMatter24
      @MarathiMatter24  7 หลายเดือนก่อน

      चांगभलं 😊

  • @surajvachkal7656
    @surajvachkal7656 2 ปีที่แล้ว +1

    👌🏻🕉️🔱🌺❤️⛳

  • @kodit_devasthan
    @kodit_devasthan 2 ปีที่แล้ว +3

    🙏🙏🥰

    • @MarathiMatter24
      @MarathiMatter24  2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद. कृपया आपल्या माध्यमातून सर्व श्रीनाथ भक्तांपर्यत पोहोचवा😊

  • @shubhampatwari5583
    @shubhampatwari5583 2 ปีที่แล้ว +1

    खुपच छान (भव्य) मंदिर आहे🙏

    • @MarathiMatter24
      @MarathiMatter24  2 ปีที่แล้ว

      होय. नक्की भेट देण्यासारखे आहे. अतिशय सुंदर आणि भव्य😊

  • @user-me7ke6kg2c
    @user-me7ke6kg2c 2 ปีที่แล้ว +2

    🙏🙏📿

  • @vedikaarjunwad9906
    @vedikaarjunwad9906 ปีที่แล้ว +1

    खूप छान मंदिर आहे. मंदिराचा परिसर भव्य आहे. बाकीचे सर्व बांधकाम पण आवर्जुन पाहण्यासारखे आहे.सासवडहून जायला बसची सोय नेहमी असते का? तसेंच श्री क्षेत्र नारायणपूर पासुन किती लांब आहे. हे सांगावे.

    • @MarathiMatter24
      @MarathiMatter24  ปีที่แล้ว

      सासवडहून बस नाही पण इतर गाड्यांची सोय असते. इथून नारायणपूर १५ मिनिटाच्या अंतरावर आहे.

    • @vedikaarjunwad9906
      @vedikaarjunwad9906 ปีที่แล้ว +1

      उत्तरादाखल मनापासून धन्यवाद.

    • @MarathiMatter24
      @MarathiMatter24  ปีที่แล้ว

      प्रश्नासाठी धन्यवाद. आशा आहे की तुम्हाला या माहितीचा उपयोग होईल