भरीताचे वांगे लागवड संपूर्ण माहिती : लागवडी पासून ते काढणीपर्यंत संपूर्ण माहिती. Brinjal Cultivation

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ม.ค. 2024
  • Bartok combines strong growth and high fruit production with excellent quality, the fruits are easily visible with harvesting due to the open plant habit.
    People also ask
    Which brinjal variety is best?,
    Which variety of brinjal is seedless?,
    What is the botanical name of eggplant?,
    What is the yield of brinjal?,
    Which is the highest yielding brinjal variety?,
    How much is 1 kg of brinjal?,
    What is the new name for brinjal?,
    What are the 7 levels of classification for brinjal?,
    Why is eggplant called egg?,
    What are the 4 types of brinjal?,
    Which is the hybrid in brinjal?.
    What is the hybrid variety of brinjal?
    Which colour brinjal is tasty?
    What is brinjal the king of?
    Which brinjal is thickest?
    Related searches
    Bartok brinjal seeds
    bartok brinjal seeds price
    gallon brinjal
    seedless brinjal
    black gem brinjal
    aubergine black pearlवांगे (शास्त्रीय नाव: Solanum melongena, सोलानम मेलाँजेना ;) ही सोलानम प्रजातीतील एक वनस्पती आहे. त्याची फळे स्वयंपाकात खाद्यपदार्थ म्हणून वापरली जातात. मुळातील दक्षिण आशियातून उगम पावलेल्या या वनस्पतीची लागवड आता उष्णकटिबंधात व समशीतोष्ण कटिबंधातील अन्य भूप्रदेशांमध्येही केली जाते. चीन मध्ये सर्वप्रथम वांगी वापरात आल्याचा उल्लेख आढळतो. महाराष्ट्रात पीक आल्यावर खंडोबाला वांग्याचे भरीत अर्पण करण्याची प्राचीन परंपरा आहे.
    वांग्याला हिंदीत बैंगन व इंग्रजीत Brinjal किंवा Eggplant म्हणतात. संस्कृतमध्ये वृन्तांकम्, भण्टाकी असे दोन शब्द आहेत.
    निघण्टु रत्नाकर या ग्रंथात वृन्तांकं स्वादु तीक्ष्णोष्णं पाके कटु च असा वांग्याचा आयुर्वेदीय उल्लेख आढळतो. तसेच 'वृन्तांकम् बहुबीजानाम् कुष्मांडम् कोमलं विषम् | अर्थात - खूप बिया असलेले वांगे व फारच कोवळे कोहळे खाल्ले असता ते विषाप्रमाणे बाधते असे आयुर्वेदात नमूद केले आहे.-
    टोपलीत ठेवलेली जांभळ्या सालीची वांगी
    वांग्यांची भाजी करतात. मोठ्या आकारमानाच्या काळ्या वांग्यांचे भरीत करतात. वांगी घालून वांगीभात होतो. वाळवलेल्या वांग्याचे लोणचेही केले जाते.वांगी प्रामुख्याने ३ प्रकारात आढळतात. गोल, लांब व सडपातळ, व ठेंगण्या झाडाची.
    वांग्याच्या पारंपरिक जाती -गुलाबी, हिरवी, पांढरी, जांभळी आणि काळ्या रंगाची वांगी. ‘रवय’ आणि ‘कल्यामी’ अश्या दोन जातींची वांगी, आणि घुडी, वेली, बाणवांगे, भोंगाफाईट अशा आकारांमधली वांगी वसई भागात पिकतात.
    जाती - पुसा पर्पल क्लस्टर, पुसा क्रांती, पुसा अनमोल, पुसा पर्पल राउंड, अर्का शील, अर्का शिरीष, अर्का कुसुमाकर, अर्का नवनीत, आझाद क्रांती, विजय हायब्रीड आहेत .
    महाराष्ट्रात लागवडीस शिफारस केलेल्या वांग्याचे प्रकार - मांजरी गोटा, वैशाली, पुसा क्रांती, पुसा जांभळी गोल, पुसा जांभळी लांब
    सुधारित जाती - मांजरी गोटा, कृष्णा, फुले हरित, फुले अर्जुन, को-१, को-२ व पी. के. एम. १.
    वांग्याची आधी रोपे तयार करून नंतर ती पुनर्लागवड पद्धतीने पेरली जातात. निचरा होणाऱ्या जमिनीत यांची लागवड केली जाते.
    वांगे, टोमॅटो आणि मिरची या तिन्हीचे जनुकीय गुणधर्म सारखे असतात. परंतु ही पिके एकाच वाफ्यात घेतली जात नाहीत. कारण सूत्रकृमींचा प्रादुर्भाव होतो. वांग्याच्या रोपट्यांवर तुडतुड्यांचा प्रादुर्भाव झाल्यास,ते या पिकावरील रस शोषून घेतात. यामुळे ते पीक पिवळे पडते, वांग्यांची वाढ होत नाही.
    वांग्यासंबंधी मराठी पुस्तके
    वांग्याची भाजी
    गवार, भेंडी व वांग्याचे पदार्थ (प्रिया नाईक)
    वांगी मिरची टोमॅटो लागवड (डॉ. भी.गो. भुजबळ, डॉ. बी.बी. मेहेर)
    वांगी लागवड (डॉ. वि.ग.राऊळ
    वांग्याचे चविष्ट रुचकर ५० प्रकार (ज्योती राठोड)
    वांग्याचे रुचकर ४३ प्रकार (ज्योती राठोड)
    वांग्याच्या पारंपरिक भाज्या (ज्योती राठोड)
    (ब्रिंजल). एक फळभाजी. वांगे ही वनस्पती सोलॅनेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव सोलॅनम मेलोंजेना आहे. सो. मेलोंजेना ही जाती रानवांगी म्हणजे सो. इंसानम या वन्य जातीपासून उत्पन्न झाली आहे. बटाटा, टोमॅटो व मिरची या वनस्पतीही सोलॅनेसी कुलातील आहेत. वांग्याचे मूलस्थान भारत असून नंतर या वनस्पतीचा प्रसार चीन, यूरोप आणि अमेरिका येथे झालेला दिसून येतो. ही वनस्पती केवळ उष्ण हवामानात वाढते. वांगे या वनस्पतीची लागवड मुख्यत: तिच्या फळांसाठी केली जाते. पश्चिम बंगालमध्ये रानवांगी म्हणजे सो. इंसानम ही जाती आढळते. तिची फळे लहान व कडू असतात.
    वांग्याचे झुडूप ४०-१५० सेंमी. उंच वाढते. खोड नाजूक आणि काटेरी असून वनस्पतीचे सर्व भाग केसाळ असतात. पाने साधी, १०-२० सेंमी. मोठी, एकाआड एक, दोन्ही पृष्ठभाग केसाळ व खंडित किनारीची असतात. फुले निळसर जांभळी असून ती एकेकटी किंवा २ ते ५ च्या गुच्छांत येतात. पुंकेसर पिवळे असतात. मृदुफळे ३-३० सेंमी. लांब, मृदू, अनष्ठिल, अंडाकृती किंवा लांबट असून त्यांचा रंग पांढरा, हिरवट पिवळा, गडद जांभळा असतो. फळाबरोबर वाढणारा पुष्पमुकुट म्हणजेच निदलपुंज जाड असतो आणि फळाबरोबर टिकून राहतो. बिया अनेक, मऊ व खाद्य असतात. बियांमध्ये तंबाखूसम निकोटिनॉइड असते. त्यामुळे बिया चवीला कडू असतात.
    वांग्याचा उपयोग मुख्यत: फळभाजी म्हणून होतो. भारतात वांग्याचा उपयोग सांबार, चटणी, करी, लोणचे यांसाठी केला जातो. तसेच वांग्याचे भरीत आणि भरली वांगी अशा पदार्थांचा समावेश भारतीय आहारात अनेक ठिकाणी होतो. १०० ग्रॅ. वांग्यामध्ये ९२% पाणी, ६% कर्बोदके आणि १% प्रथिने असतात; मेदाचे प्रमाण अत्यल्प असते. वांग्यामध्ये खनिजेही, विशेषकरून मँगॅनीज, असतात. फळांचा आकार, आकारमान व रंग यांनुसार वांग्याचे विविध प्रकार आहेत. भारतात वांग्याचे सर्वाधिक प्रकार लागवडीखाली आहेत. बाजारात मुख्यत: सो. मे. एस्कूलेंटम, सो. मे. सर्पेंटिनम आणि सो. मे. डिप्रेसम हे तीन प्रकार आढळतात. गंगा, यमुना या नद्यांच्या प्रदेशात वजनाने सु. १ किग्रॅ. असलेली वांगी पिकवली जातात, तर अन्यत्र वजनाने कमी असलेली वांगी पिकवली जातात. जांभळ्या रंगाच्य

ความคิดเห็น • 6

  • @indianculture2459
    @indianculture2459 5 หลายเดือนก่อน +2

    माहिती कामाची वाटली

  • @satish2558
    @satish2558 5 หลายเดือนก่อน +2

    छान 👌🏻👌🏻

  • @shetkarimh28
    @shetkarimh28 5 หลายเดือนก่อน +2

    Sar nambar milela ka tumca

  • @user-yc7oo1ib6h
    @user-yc7oo1ib6h 5 หลายเดือนก่อน +1

    ८० ते ९० टन उत्पादन मिळाले म्हणतात आणि बाजार १० ते ३० रू पर केजी म्हणजे एव्हरेज १५ रू पर केजी जर पकडलं तर किती होतात पाहा आणि हे महाशय म्हणतात की दोन लाख झाले म्हणतात हे खोटं वाटतं नाही का

    • @krushisavardhanmaharashtra
      @krushisavardhanmaharashtra  5 หลายเดือนก่อน +1

      पुन्हा चर्चा करून महिती देतो तुम्हाला, cost of cultivation