Kavitecha Paan | Episode 37 | N. D. Mahanor | Part - 1

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2024
  • KAVITECHA PAAN | कवितेचं पान - Episode # 37 | N. D. Mahanor
    Concept | Direction : Madhurani Gokhale - Prabhulkar
    Camera : Dhanesh Potdar, Yogesh Salunkhe
    Editing : Muktal Mawal
    Jewellery Courtesy : Tribes Vibes ( Shilpa Pandit )
    Location Courtesy : Jain Farms, Jalgaon
    Production : Miracles Academy of Arts & Media Pvt.Ltd.
    #KavitechaPaan #MarathiKavita

ความคิดเห็น • 234

  • @prateekjain8850
    @prateekjain8850 ปีที่แล้ว +12

    आज उदास उदास दूर पांगल्या साउल्या ...
    एकांताच्या पारावर हिरमुसल्या डहाळ्या ...
    भावपूर्ण श्रद्धांजली ...

  • @bharatikelkar159
    @bharatikelkar159 5 ปีที่แล้ว +34

    अरे, काय आहे हे! या विलक्षण कवीला भेटवल्याबद्दल मधुराणी, कवितेचं पान नाही, कवितेचा वृक्षच तू भेटवला आहेस, तुला मन:पूर्वक धन्यवाद!
    पुढच्या भागासाठी, पाण्यासाठी जशी भुई आसुसलेली असते तसे आम्ही आसुसलेले आहोत.

  • @MiraclesFilms
    @MiraclesFilms 5 ปีที่แล้ว +18

    मन उजळून निघालं मधुराणी.......तू किती मनापासून करतेस हे पहातोय मी गेली 2 वर्षे......असाच आनंद दे रसिकांना......तू लोकांमधील तरलतेला touch करते आहेस....स्वच्छ.... नितळ .....आनंद!कवितेचं पान

  • @mohitpashte5072
    @mohitpashte5072 ปีที่แล้ว +19

    महान कवीला..भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐

  • @rajendrachavan39
    @rajendrachavan39 ปีที่แล้ว +7

    आज प्रथमच हा कार्यक्रम पाहिला, खूप छान वाटला.
    ना. धो. महानोर साहेब तुम्ही आमच्यातच आहात कवितेच्या रूपाने🙏

  • @vrushalislittleworld
    @vrushalislittleworld ปีที่แล้ว +13

    एक प्रतिभावंत कलाकार...
    तुमच्या कवितांच्या रूपात तुम्ही अजरामर आहात दादा🙏
    तुमची उणीव मराठी साहित्य क्षेत्राला कायमच भासेल..
    विनम्र अभिवादन 🥺🙏
    मधुराणी ताई.. धन्यवाद.. ह्या सुंदर आठवणींसाठी❤

  • @arunpatil5443
    @arunpatil5443 ปีที่แล้ว +9

    मातीशी घट्ट नाळ जुडलेल्या महान कवीस भावपूर्ण आदरांजली 🙏

  • @bhartiwagh9021
    @bhartiwagh9021 3 ปีที่แล้ว +8

    निसर्गाच्या ऋणांची उंची किती मोठी असावी आणि तितकीच सुंदर कविता ती जगावी, अजरामर व्हावी, यासाठी कवी ना. धो. महानोर यांच्या कवितेत तल्लीन होऊनच जीवन जगावे...

  • @rahulshinde3847
    @rahulshinde3847 5 ปีที่แล้ว +16

    किती सुंदर ..वा ..No words..कवितेचे पानचे सगळेच एपिसोड अत्यंत सुरेख.मंत्रमुग्ध करणारे आहेत. मधुरा मॅडमचा गाढा अभ्यास दिसतो..सुंदर कवी कवयित्री आणि त्यांच्या कवितांची मेजवानी... सुरेख सुंदर अप्रतिम.

  • @jayshreenikam5420
    @jayshreenikam5420 5 ปีที่แล้ว +12

    आजचा भाग म्हणजे महानोरांची मुलाखतच ! रविवारची मेजवानी ! साहित्यिक समृध्दीची पखरण! मनःपूर्वक धन्यवाद! दस्तुरखुद्द महानोरांकडुन गेय काव्य ऐकण्यासाठी पुढच्या भागाची प्रतीक्षा !

  • @kumudinikadhao953
    @kumudinikadhao953 ปีที่แล้ว +7

    मंत्रमुग्ध करणाऱ्या कविता , मुलाखत बघताना स्वर्ग सुखाचा आनंद झाला. मधुराणी चा आवाज देखील तितकाच गोड आहे.

  • @varsharajenimbalkar8987
    @varsharajenimbalkar8987 5 ปีที่แล้ว +29

    संवादातून सहजपणे कविता ऐकायला मिळाली.....त्यामुळे खरंच हा एपिसोड विशेष अनुभव, आनंद देऊन समृद्ध करून गेला.
    खूप खूप अभिनंदन व शुभेच्छा!!

  • @SundeepGawande
    @SundeepGawande 5 ปีที่แล้ว +8

    फार काही बोलुच शकणार नाही ह्या अद्भुत अनुभवाबद्दल. कवितेचं प्रत्येक पान माझ्यातला माणूस आणखी समृद्ध करून जातं.
    दुसऱ्या भागाच्या प्रतीक्षेत....

  • @Hgfdsi
    @Hgfdsi 5 ปีที่แล้ว +56

    मला आनंद या गोष्टीचा आहे की अगदी खेड्यातला माणूस, शेतात राबणारा माणूस, केवळ पुस्तके वाचून इतक्या अप्रतिम न् शेतकऱ्यांला आपल्या वाटणार्‍या कविता लिहून सन्मान मिळवू शकतो. निसर्गाचा याच्यापेक्षा दुसरा विजय कसला????

  • @Deepakshrikhandesir
    @Deepakshrikhandesir 2 ปีที่แล้ว +27

    खान्देशी जळगाव चे महाराष्ट्र व मराठी कवितेचे अनमोल रत्न🙇🌹

  • @deepaknirmal4506
    @deepaknirmal4506 4 ปีที่แล้ว +3

    आज पहिल्यांदा असं वाटलं की मधुराणी ताई , तू सुद्धा मधे बोलू नये ..फक्त ना धों च ऐकत राहावं .. तुला सुद्धा असच वाटलं असेल
    ....अगदी मध पाझळतोय असं वाटलं .....खूप छान
    आणि तुझे खूप खूप धन्यवाद ....शुभेच्छा...👌👌

  • @vaishalideshpande7186
    @vaishalideshpande7186 5 ปีที่แล้ว +8

    निसर्गाचे दान ह्या कवीने आपल्या झोळीत भरभरून ओतले आहे .आपल्या सारख्या शहरी लोकांना त्या शब्द -झर्या त चिम्ब भिजवले आहे ! शतशः धन्यवाद ! !

  • @janhavigyan
    @janhavigyan 5 ปีที่แล้ว +6

    मधुराणी आणि टीम अहो काय बोलू..३६ मिनिट अक्षरशः संपूच नये असे वाटलं. खरतर माझ्याकडे शब्द नहीतपण डोळ्या पाणी आहे. खूप खूप आभार.

  • @yogeshchaudhari8682
    @yogeshchaudhari8682 3 ปีที่แล้ว +3

    अशा प्रतिभासंपन्न व्यक्तीमत्वाचा सहवास लाभला की जीवन सार्थकी झाल्यासारखे वाटतं..

  • @pallavichaudhary534
    @pallavichaudhary534 4 ปีที่แล้ว +6

    रसिक गाण्यांवर आणि शब्दावर जगतात...
    काय विलक्षण प्रतिभा आहे... आपल्या पूर्वजांची....

  • @poemsfoodtravelling1037
    @poemsfoodtravelling1037 5 ปีที่แล้ว +11

    तृप्त करणारा एपिसोड.... ❤🙌कौतुक करायला शब्द कमी पडत आहेत जणू... हा एपिसोड बघतानाच असा अजून एक भाग व्हावा असं सारखं वाटत होतं आणि तुम्ही दुसराही भाग करत आहात त्याबद्दल कौतुक आणि आभार🙏

  • @sunitalasurkar243
    @sunitalasurkar243 3 ปีที่แล้ว +3

    मधुराणी खुप छान , आयुष्यभराच्या संघर्षातुन जम्माला आलेला कवी म्हणुन ना धो महानोर यांची वेगळी बाजु कवितेचं पान मधुन दाखवली . जळगांवी साहीत्य संमेलन झाले होते तेव्हा मी त्यांना प्रत्यक्ष भेटले होते.

  • @sandhyakapadi4112
    @sandhyakapadi4112 5 ปีที่แล้ว +11

    ‘कवितेचं पान’ला आभाळभर अनंत शुभेच्छा
    महानोरांच्या शब्दश्रीमंतीमधे एक शब्द खूप आवडला ‘मितव्यय’
    खूप खूप मजा आली 🙏🏻

  • @sachinwagh6474
    @sachinwagh6474 5 ปีที่แล้ว +8

    अप्रतिम 36 मि.49 से.,,,,,,,जात्यावर गाणं म्हणणारी आजी आठवली .
    ,,,,,,,सर्वात जास्त आनंद केव्हा झाला माहित आहे ,,,,दुसरा भाग आहे म्हंटल्यावर. हैप्पी बिर्थडे,,,,,कवितेचं पान....!!!!

  • @shilpakhare4624
    @shilpakhare4624 5 ปีที่แล้ว +5

    Hi मधुराणी,
    ना धों महानोर यांची 'कवितेच पान' मधील मुलाखत आताच पाहिली. खूपच सुंदर. अभ्यासपूर्ण मुलाखत घेणारी तू आणि तुझ्या या उपक्रमाद्वारे ऐकणारे आम्ही सुद्धा खूप भाग्यवान.
    मी मूळची electronic engineer pan आर्मी ऑफिसर शी लग्न केल्यामुळे पुढे MA B Ed केले.
    तर BA second yr la रानातल्या कविता हे पुस्तक अभ्यासाला होत. सायन्स student असल्याने मुळात भाषा किंवा कावितेच वेड नव्हत म्हणून खूप कंटाळवाण वाटल मला....
    पण पुढच्या काळात वाचन करावं लागलं, कविता आवडायला लागली, आणि ' रानातल्या कविता ' हे पुस्तक वाचलं, खरं सांगते तेंव्हा पासून कविता भिनली, भिडली, रुजली आणि नंतर स्फुरायला पण लागली...
    आणि आता तो एपिसोड बघताना इतकी आनंदून गेले, भारावून गेले काय सांगू....
    रानातल्या कविता पुन्हा नव्याने वाचायला घेतलं आता...
    सध्या दहावीच्या अभ्यासक्रम,प्लॅनिंग,
    scripting आणि स्वत:च्या आवाजात रेकॉर्डिंग पण करते..... त्यात कविता आणि संत कविता माझा फार जिव्हाळ्याचा विषय झालेला आहे. तुला खूप खूप dhanywad या कार्यक्रमासाठी.
    मी विद्यार्थ्यांना पण हे एपिसोड बघायला सांगते...

  • @arunaduddalwar4854
    @arunaduddalwar4854 5 ปีที่แล้ว +2

    महानोरांच्या प्रत्यक्ष मुलाखतीतून केवळ कविताच नाही तर एक कवितेच्या जगण्याचा ग्रंथच हाती दिला.मधुराणीला धन्यवाद द्यावे तेवढे कमीच.ऋषीतुल्य निसर्ग कवींचे विचार आमच्या पर्यंत पोहचवले.धन्यवाद!👌

  • @SanjeevBorse-vw1kj
    @SanjeevBorse-vw1kj ปีที่แล้ว

    कवी मन किती नितळ सुंदर स्वच्छ आनंदी उत्साही चैतन्याने भरलेलं दुसर्याच्या आनंदातच
    सरलेलं शब्दांच्या ओढीन भरलेलं आणि ढग जसे आभाळातून धरणीवर कोसळताना ओघळताना
    विरून जातात तसं आगी मध्ये जळणारं किती तरल मन अगदी अंतःर्मुख करणारं हे एक निसर्गाने दिलेलं अनमोल जाणीवांनी भरलेलं
    संवेदनशील ह्रदय याहून सुंदर जगण्यार्या माणसाला आणखी काय हवयं राखेत सामावून
    जाण्यासाठी मिटलेली मुठ तुझी जगी जन्मताना
    उघडी जेव्हा ती झाली राख पाहताना
    ना.धो.महानोर
    ना तो धोंडा होता ना होता महाचोर
    कवितेच्या पावसात चिंब चिंब भिजणारा
    एक होता मनमौजी मोर महानोर महानोर
    जेव्हा निघून गेला लागली मनाला घोर
    पुन्हा येणे तुझे कधी मीच येईन मागुन
    माग काढीत आकाश झाले काळे भोर
    मी संपलो तरी ही कानी घुमतील सुर
    मातीत झिरपता पाणी मनास येईल ओल
    मनास येईल ओल

  • @samitasulakhe4858
    @samitasulakhe4858 5 ปีที่แล้ว +6

    अप्रतिम. दुसरा शब्द नाही. ऐकत राहावंसं वाटतं. थोर लोकं आहेत. हा तुझा उपक्रम अजून अनेक वर्षे चालत राहो. शुभेच्छा💐

  • @vidyamslife13
    @vidyamslife13 5 ปีที่แล้ว +5

    आयुष्य असं सहज जगता यायला हवं जो जगतो त्यांना कविता किंवा ज्याची त्याची कला गवसतेच की ! ☺️

  • @yashavantijoglekar7203
    @yashavantijoglekar7203 ปีที่แล้ว +1

    कवितेचं महानोरांचं पान ऐकलं,थोडसं जगता आलं. खूप दिवसांची आनंदाची बेगमी पावली.

  • @kirankolhatkar2922
    @kirankolhatkar2922 5 ปีที่แล้ว +9

    कवीचं घडणं
    कवितेचं उतरणं
    शिकून सवरणं
    अस्सल अनुभवणं
    आणि
    भान हरपणं!
    आभार .. अभिनंदन .. शुभेच्छा मधुराणीताई!!
    ☘️☘️☘️

  • @rajendraborse340
    @rajendraborse340 ปีที่แล้ว +5

    सच्चा प्रतिभावान कविवर्य !!😊

  • @pratibhakale8396
    @pratibhakale8396 ปีที่แล้ว +2

    हा सर्वांगसुंदर कार्यक्रम ऐकून मनाला भुरळ पडली आता पुढील भाग ऐकण्यासाठी उत्सुकता निर्माण झाली.❤

  • @maltipatil6925
    @maltipatil6925 5 ปีที่แล้ว +2

    खूप खूप धन्यवाद मधुराणी. मला खूप इच्छा होती महानोरांना भेटायची. प्रत्यक्ष भेट नाही पण अशी कवितामय भेट तुझ्यामुळे शक्य झाली. तुझे खूप खूप आभार . खूप छान.

  • @vishwasrasalofficial1904
    @vishwasrasalofficial1904 3 ปีที่แล้ว +1

    काव्य क्षेत्रातील एक महान व्यक्तिमत्व ज्या व्यक्तीने आपली संपूर्ण हयात कामकरी कष्टकरी शेतकरी यांच्या आयुष्यावर त्यांच्या या जगण्यावर समाजातील वंचित वंचित घटक म्हणून सातत्याने काव्यलेखन केलं. आणि त्यांची ही कविता सातत्यानं उपेक्षित वर्गाचा जगणं मांडण्यासाठी. या कवीला थोर सलाम.

  • @arunbagul1962
    @arunbagul1962 5 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम, मराठी काव्यसृष्टीतील एक सुवर्ण पान म्हणजे ना.धो.महानोर सर. त्यांच्यासोबतची मैफिल 'कवितेचे पान'च्या निमित्ताने आपण घडवून आणलीत त्याबद्दल धन्यवाद.!

  • @sachinganjapurkar9820
    @sachinganjapurkar9820 3 ปีที่แล้ว +1

    मधुराणी, अप्रतिम! तुम्ही श्री. ना धो महानोर म्हणजेच आभाळा एवढ्या उंचीचा मातीची नाळ घट्ट जपलेला कर्मठ, सजग मनाचा माणूस,लेखक, कवी, समाज सुधारक या भागातून भेटीला आणला. दोनच दिवसांपूर्वी मी दादांसोबत बोललो आणि बरच मार्गदर्शन घेतलं. मी समजू शकतो ह्या साक्षात्कार कार्यक्रमानंतर वेगळीच अनुभूती तुम्हाला मिळाली असणार. प्रतिभेचा आणि प्रेरणेच आकाश आहेत ते.

  • @mrudulapatkhedkar8069
    @mrudulapatkhedkar8069 5 ปีที่แล้ว +2

    कविवर्य ना. धों. महानोर माझे आवडते कवी. त्यांनी चित्रपट गीतेही किती अप्रतिम लिहिली आहेत. खरंच! 'कवितेचं पान' उजळून टाकणारा भाग. पुढच्या भागाची वाट राहील. आवडत्या कवीच्या रचना, त्यांच्याच मुखातून ऐकणे, video च्या रुपात त्यांना बघणे हा केवळ आनंद तुमच्यामुळे, टीममुळे शक्य झाला मधुराणी जी. धन्यवाद.

  • @shrutichoudhari7770
    @shrutichoudhari7770 5 ปีที่แล้ว +6

    कवितेचे पान
    आहे खुपच छान
    म्हणून व्यक्त करते एक इच्छा
    कवितेच्या पानासाठी लाख शुभेच्छा💐💐💐👍👌

  • @sandipraut
    @sandipraut 4 ปีที่แล้ว +1

    ओहोहो काय सुंदर भाग झालाय. मनःपूर्वक धन्यवाद. आपल्या या चॅनल च्या माध्यमातून श्रेष्ठ कवींना भेटण्याचा दुर्लभ योग जुळून येतोय. हा प्रवास थांबवू नका. शुभेच्छा

  • @Hgfdsi
    @Hgfdsi 5 ปีที่แล้ว +1

    महानोर सरांचे काही विशिष्ट शब्द आहेत त्यांचे अर्थच समजून घेणं अवघड आहे. जसे की झिंगून जाणे, झिम्माड होणे, वलंस, भोवळ, होरा, तुम्ही म्हटल्याप्रमाणे कवितेतील घट्टपणा असे भरपूर शब्द आहेत.

  • @vandanamahajan209
    @vandanamahajan209 11 หลายเดือนก่อน

    Apratim kaviteche pan madam swargiya ना . धो . महानोर यांना भावपूर्ण आदरांजली परिस रूपी पान आहे मॅडम

  • @user-gz6tx7ni8o
    @user-gz6tx7ni8o ปีที่แล้ว +4

    महान कविला भावपूर्ण श्रद्धाञ्जलि 🙏🙏🙏

  • @manasvi1337
    @manasvi1337 ปีที่แล้ว +1

    Aaj dada anantat vilin zale Ani parat ya episode chi aathawan ali ...
    Pn janaval kiti sundar aayushya jagale te❤
    Aayushyach son yapeksha wegal kay asat..
    Dadana Bhavpurn Shradhanjali 🙏

  • @anilkumarkarande5033
    @anilkumarkarande5033 2 ปีที่แล้ว +2

    फारच छान. मा. पदमश्रीमहानोर साहेब 🙏🙏🙏🙏.

  • @nehashreeswamisamarthdighe7230
    @nehashreeswamisamarthdighe7230 ปีที่แล้ว +4

    खूप प्रतिभावंत कवि,कलाकार प्रणाम 🙏

  • @kalpananaik5156
    @kalpananaik5156 ปีที่แล้ว +1

    🌅🙏🌹खरचं सरस्वती मिरॅकल्सचं आहे "कवितेचे पान" ....दिग्गज कलावंत ऐकायला,बघायला मिळतात....मनापासून सगळ्यांचे धन्यवाद....💐💐

  • @rajendragaikwad7574
    @rajendragaikwad7574 11 หลายเดือนก่อน

    बहिणाबाई चे वारसदार, स्वर्गीय ना धो महानोर यांना विनम्र अभिवादन

  • @santoshchaskar3202
    @santoshchaskar3202 5 ปีที่แล้ว +2

    apratim ..... episode ahe ..... KAVITECHA PAAN sathi shubheccha

  • @ajinkyakinhikar
    @ajinkyakinhikar 5 ปีที่แล้ว +2

    Happy birthday dear कवितेचं पान.
    तू आणि मधुराणी दोघंही शतायुषी व्हा. 🎂🎂

  • @gaurav_dhere
    @gaurav_dhere 5 ปีที่แล้ว +2

    अभिनंदन तसेच खुप खुप शुभेच्छा मधुताई.. हा कार्यक्रम उत्तरोत्तर असाच चालत राहो. एकदा स्पृहा जोशी.

  • @dr.jibhaubachhav823
    @dr.jibhaubachhav823 ปีที่แล้ว

    आमचे लोकप्रिय निसर्गकवी,रान कवी, शोषित वंचित बहुजन समाजाला मानवतावादी, विज्ञानवादी दृष्टीकोन देणारे, शेतकरी, शेतमजूर यांच्या कष्टाचे जिवनगान करणारे, सन्मान करणारे आदरणीय ना.धों.महानोर यांना भावपूर्ण आदरांजली....
    डॉ. जिभाऊ बच्छाव.

  • @ravindrasuryawanshi549
    @ravindrasuryawanshi549 ปีที่แล้ว +1

    आदरणीय स्वर्गवासी ना.धो महानोर सरांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐🌼🌼🌱🌱🌿🌿🌾🌾☘️☘️🪴🪴🌵🌵🌴🌴🌳🌳🏝️🏝️

  • @swatisarvade9885
    @swatisarvade9885 2 ปีที่แล้ว +1

    अद्भूत ..खूपच सुंदर काव्य ..निसर्गाचे दर्शन ..☝👌👌👌👌👌🍁🍁🍁🍁🍁

  • @tanajimaharnawar5402
    @tanajimaharnawar5402 ปีที่แล้ว +1

    महान निसर्ग कवि ना धो महानोर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

  • @rohinikulkarni7765
    @rohinikulkarni7765 5 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुरेख अनुभव .....इतक्या मोठ्या कवीची ओळख झाली...आभारी आहोत....
    दुसरा भाग त्वरित आणा.

  • @sudhagokhale6593
    @sudhagokhale6593 5 ปีที่แล้ว +1

    वाह मधुराणी महानोर याचे हे कवितेचे सुवर्ण पान याचे मोल सुवर्णा पेक्षा जास्त आहे . धन्यवाद.

  • @amitmadane2211
    @amitmadane2211 5 ปีที่แล้ว +2

    आज कविता नाही तर संपुर्ण काव्यसंग्रह ऐकण्यास मिळाला..🙏🙏🙏🙏

  • @suhasinidahiwale3483
    @suhasinidahiwale3483 5 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर .रसाळ.रविवार आहा क्षण आज पुन्हा एकदा अनुभवायला मिळाला.मधुराणी खूप खूप शुभेच्छा.आजची उत्तम मेजवानी .होळीची गोड ,मधुर.पुरणपोळी आजच चाखायला मिळाले ......खूप आनंद मिळाला .....

  • @sunandapawar3582
    @sunandapawar3582 ปีที่แล้ว +1

    कविमनाचा समृद्ध शेतकरी

  • @swapnilvardekar2331
    @swapnilvardekar2331 5 ปีที่แล้ว +2

    काव्यप्रेमी ते काव्यधर्मी.... 2 वर्षांच्या काव्यमय प्रवासास शुभेच्छा.....आणि अभिनंदन 💐 💐
    आजचा एपिसोड खूपच सहज... आणि सुंदर.
    एक अनुभव संपन्न,निसर्गाशी वेगळच नातं असलेले ऋषितुल्य कवी....
    आम्ही दुसर्‍या भागाच्या प्रतिक्षेत आहोत ....
    धन्यवाद

    • @rekhakulkarni331
      @rekhakulkarni331 5 ปีที่แล้ว

      एका कवी आणि कवीतेच्या जन्माची सुरस सुरेल प्रवासाची सुंदर कधा

    • @santoshshendge7790
      @santoshshendge7790 3 ปีที่แล้ว

      अतिशय सुंदर

  • @savleramgawate6472
    @savleramgawate6472 ปีที่แล้ว

    अत्यंत प्रतिभावान कवी . कवीला जात धर्म पंथ व वंश काहीही नसतो. तुम्ही आमच्यात आहेत. भावपूर्ण श्रद्धांजली . आताच कार्यक्रम पाहिला.

  • @Swati_Pathak373
    @Swati_Pathak373 5 ปีที่แล้ว +1

    Vilakshan Anubhav, Madhurani!! Ha upakram satat 2varshe suru ahe...khoop kavita navyane samajalya... Manapasoon Shubhechha, Madhurani!!!

  • @meghanat6907
    @meghanat6907 5 ปีที่แล้ว +2

    खूप खूप शुभेच्छा .... May this journey continue forever....
    आजचा भागही अप्रतीम ... !!!!

  • @pratibhabarde366
    @pratibhabarde366 ปีที่แล้ว

    Pratibhavant kavi bhavpurn shradhanjali💐

  • @pratibhamatle5196
    @pratibhamatle5196 ปีที่แล้ว +2

    कवितांनी जीवन समृद्ध आणि सुंदर करणाऱ्या महानोर सरांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

  • @prakashkatalkar6684
    @prakashkatalkar6684 ปีที่แล้ว

    केवळ शब्दांच्या पलिकडले!
    समृध्द मराठी भाषेला जरतारी साज अनेकांनी चढविला. ना. धो. महानोरांची निसर्गकविता या मराठी मातीत रुजलेली.. फुललेली!
    फक्त जीव कानात आणून मनात साठवायची..

  • @vijaypaigude8596
    @vijaypaigude8596 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम , फारच छान. सुरूवातीपासुन ते शेवटपयॕंत खिळवुन ठेवले. कवितेतील सौदयाॕचा पुरेपूर आस्वाद घेता आला.सहज सुंदर मुलाखत घेतली .

  • @suhasinidahiwale3483
    @suhasinidahiwale3483 5 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद .........पुढील शैक्षणिक वर्षी .....सध्या परिक्षेचे पान चालू आहे ना....पुन्हा एकदा धन्यवाद ......नक्कीच बोलू या...सुसंवाद साधू या......रविवार .....आजचा अप्रतिम ......मस्त ......तुझा वेळ घेतला .....ना....लयभारी....वाटले पण....मला आज.

  • @swapnilchavan4618
    @swapnilchavan4618 5 ปีที่แล้ว +1

    मराठी कवितेतलं हे खूप मोठं संचित तुम्ही पुढच्या पिढ्यासाठी जतन करून ठेवता आहात , हे खूप महत्त्वाचं काम आहे आपलं

  • @pravinniungare3264
    @pravinniungare3264 9 หลายเดือนก่อน

    महानोर यांच्या कविता वाचताना परत परत त्या कवितांच्या प्रेमात पडाव वाटत

  • @amolmore29
    @amolmore29 3 ปีที่แล้ว +2

    Just learned that Sairat word introduced my NA. DHO. MAHANOR in his on of the poem... Just saw a Video released on Sahyadri Channel where Jabbar Patel was interviewing NA. DHO. MAHANOR...

  • @josephtribhuvan5214
    @josephtribhuvan5214 2 หลายเดือนก่อน

    फारच सुंदर

  • @shrirangchuyekar6665
    @shrirangchuyekar6665 ปีที่แล้ว

    Best 💐👌👌👌 Thank you 🙏🙏🙏🙏

  • @adnikhil1975
    @adnikhil1975 5 ปีที่แล้ว +1

    aprateeeem!!!! अत्तिशय समृद्ध करणारा आहे हा भाग !!

  • @mohanmohite5526
    @mohanmohite5526 ปีที่แล้ว

    खूप छान हा अनमोल ठेवा .अनमोल माणसं 🌷🌷 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏

  • @manjiribhagwat7110
    @manjiribhagwat7110 ปีที่แล้ว

    खरा खुरा रान कवी❤

  • @arunaduddalwar4854
    @arunaduddalwar4854 5 ปีที่แล้ว +1

    कवि आणि कविता ऐकतांना एक अद्भूत ,अलौकिक वातावरण अनुभवलं,दादांच्या काव्य मय जीवनाचा प्रवास मधुराणीनं सहजतेनं
    उलगडला.प
    निसर्गाच्या समृद्धीत दडलेली व कवींनी उलगडलेली कविता कवितेच्या पानातून मनाच्या गाभार्यात अलगद उतरली...!👌
    मधुराणी व कवितेच्या पानाला
    धन्यवाद द्यावे तितके कमीच...👌
    यात

  • @suhaspawar6424
    @suhaspawar6424 ปีที่แล้ว

    काय लिहावं. फाटकी झोपडी माझी हे ऐकून ओमर खय्याम यांची त्या तिथे तरु तळी एक वही कवितेची ही रुबाई आठवली. महानोर छंदमयी कवी आहेत. अप्रतिम.

  • @jyotsnakadam5320
    @jyotsnakadam5320 11 หลายเดือนก่อน

    कवितेचे पान खूपच छान 👍

  • @vinodpatil4465
    @vinodpatil4465 ปีที่แล้ว

    मी किती हो भिकारी हे शब्दाचे धनी अगदी जवळपास असतांना त्यांच दर्शन घेऊ शकलो .

  • @shridharambhure8025
    @shridharambhure8025 5 ปีที่แล้ว +1

    Kiti amazing.. thank a lot madhurani mam

  • @nileshindulkar295
    @nileshindulkar295 5 ปีที่แล้ว +5

    First of all "Heartiest Congratulations!" to you 🌹Madhurani🌹 for completing two years of glorious "Kavitecha Paan". So far, this arduous journey of "Kavitecha Paan" was challenging for you, but for us it was equally enriching one. "Kavitecha Paan" is an excellent example of "Teamwork" for which people came together for the love of poem (marathi literature). Also, in today episode, our most beloved nature loving poet "Namdeo Dhondo Mahanor" said poems do bring people closer together. The painstaking efforts you are taking, in bringing such enriching episodes of "Kavitecha Paan" to us, each month is indeed commendable. Last but not the least, my best wishes are always with you 🌹Madhurani🌹.

    • @bharatikelkar159
      @bharatikelkar159 5 ปีที่แล้ว +1

      अहो, मराठी कवितांच्या कार्यक्रमाबद्दलची प्रतिक्रया तरी निदान मराठीत लिहा!

    • @nileshindulkar295
      @nileshindulkar295 5 ปีที่แล้ว

      @@bharatikelkar159 English medium madhun shiklo mi. Marathi madhe lihta sdya yet nahi. Madhurani la english samjata. Phudcya veles praytna karen. Vicharle baddal aple dhanyawad.

  • @advocate.jayvant.sonawane
    @advocate.jayvant.sonawane 5 ปีที่แล้ว +1

    आहा 👌

  • @abhijittere3693
    @abhijittere3693 5 ปีที่แล้ว +2

    परत एकदा समृध्द करणारा अनुभव होता. खूप छान आणि गोड मर्‍हाठी कानावर पडलं.
    मधुराणी.. कवितेचे पान एेकणारा प्रत्येक जण आपला "ऋणी"च राहील या सुंदर सेवेकरता...
    तुमच्या नुकत्याच होऊन गेलेल्या वाढदिवसानिमित्त (२ मार्च) मनापासून शुभेच्छा..
    नेहमी प्रमाणे यावेळीसुद्धा मन ऐकण्यासाठी "अतृप्त"च राहिले आहे.,,
    भाग संपल्यानंतर एक वेगळीच हुरहुर लागून राहते....

    • @madhuraniprabhulkar6195
      @madhuraniprabhulkar6195 5 ปีที่แล้ว

      Thank you so much

    • @sanjaysvlog3159
      @sanjaysvlog3159 5 ปีที่แล้ว +1

      सौ.मधुराणीताई.....गेली सहा वर्षे मी राजकोट....गुजरात ला राहतो...माझे ४७ वर्षे आयुष्य केळवा/पालघर....महाराष्ट्र ह्या खेड्यात गेले.....मी गुजराती च आहे पण....मला मराठी कविता व मराठी साहित्या चे वेड आहे.....येथे येऊन सुद्धा माझे मराठी वाचन/गायन/ऐकणे/पाहणे.....कविता चालू च आहे.....स्मार्ट फोन मुळे आत्ता हे सगळे खूप सोपे झाले आहे......मी कवितेच पान चे सगळे एपिसोड पाहिले आहेत.....आजचा एपिसोड उत्तमोत्तम आहे.....खूप मोठ्ठे कवि व अत्यंत सरळ साधा माणूस शेतकरी.....
      मला आपल्या सी थोडे महत्त्वाचे बोलायचे आहे.....माझा मोबाईल नंबर ८५११८१५९९१ आहे.....प्लीज मला आपल्याला वेळ असेल तेव्हा फोन करा..... ही विनंती.....धन्यवाद व खूप खूप आभार सह खूप खूप शुभेच्छा

    • @vishvjit2732
      @vishvjit2732 3 ปีที่แล้ว

      खूपच सुंदर.. खूपच छान

  • @amarchauhan6608
    @amarchauhan6608 5 ปีที่แล้ว

    अतिशय महत्वाचा उपक्रम.मनपूर्वक अभिनंदन.महानोर हे अतिशय महत्वाचे कवी आहेत.पण ग्रामीण कवितेचा टप्पा त्यापुढे गेला आहे. महानोर यांच्या नंतरचा सर्वात महत्वाचा टप्पा आहे ते श्रीकांत देशमुख.साहित्य अकादमी पुस्कारविजेते. त्यांचा समावेश यात नाही ही दुःखद बाब आहे.कविता समजून घ्यायची तर समतोल असायला हवा.देशमुखांनी इतके भरीव काम केले आहे की ना धो ना गुरु मानून हा कवी त्यापुढे गेला.दुर्दैवाने हे लक्षात नाही घेतले गेले.
    आपण ते घ्यावे येवढीच अपेक्षा.

    • @madhuraniprabhulkar6195
      @madhuraniprabhulkar6195 5 ปีที่แล้ว

      त्यांच्या समवेतही एक भाग करायला आम्हाला आवडेल.... आपल्याकडे संपर्क असल्यास जरुर द्यावा

    • @amarchauhan6608
      @amarchauhan6608 5 ปีที่แล้ว +1

      देशमुख हे मराठी भाषेतील समकालीन महत्वाचे कवी आहेत.सदानंद मोरे त्यांच्या बाबत म्हणतात,महाराष्ट्राच्या कृषी संस्कृती विषयी ज्यांना आस्था आहे वा जिज्ञासा आहे,त्यांना श्रीकांत देशमुख हे नाव माहिती असतेच.तसा अतिशय अलिप्त राहून लेखन करणारा हा कवी.त्यांना बोलावे ते आम्ही या कविता संग्रहाला २०१७चा साहित्य अकादमी सन्मान प्राप्त झाला आहे.असो. त्यांचा मोबाईल ९४२२४३६७६९

    • @madhuraniprabhulkar6195
      @madhuraniprabhulkar6195 5 ปีที่แล้ว

      Dhanyavad

  • @arunkolekar6509
    @arunkolekar6509 3 ปีที่แล้ว

    अगदी कौतुकास्पद, अभिमानास्पद कवितेचे पान.

  • @sachinnikamofficialcreatio7157
    @sachinnikamofficialcreatio7157 4 ปีที่แล้ว +1

    ना धो महानोर हे अप्रतिम कवी आहेत.

  • @YetheKavitaLihunMiltil
    @YetheKavitaLihunMiltil 3 ปีที่แล้ว

    Kitti Surekh pravas aahe ha
    Kavitecha Paan tumhi amhala khup shikvat aahat
    Khup Dhanyawad 🙏😇
    ❤️ Love from #YKLMPoetry

  • @ajaypatil4083
    @ajaypatil4083 ปีที่แล้ว +2

    भावपूर्ण श्रध्दांजली ना.ध.महानोर साहेब 💐🙏

  • @mprahane9031
    @mprahane9031 ปีที่แล้ว

    भावपूर्ण श्रध्दांजली!

  • @pareshpawar7100
    @pareshpawar7100 5 ปีที่แล้ว +1

    मधुराणी खरंच खूप ऋणी राहेन मी कायम या एपिसोडसाठी ❤

  • @prakashjamadhade7468
    @prakashjamadhade7468 3 ปีที่แล้ว +1

    तुम्ही हे अमृतकुंभ आमच्यासाठी उपलब्ध करून दिलं, शतश धन्यवाद

  • @sunildatir
    @sunildatir ปีที่แล้ว

    खूपच सुंदर मुलाखत,,,, गायन मस्त तितकीच सुंदर कविता

  • @prjosh2
    @prjosh2 5 ปีที่แล้ว

    मधुराणी , कवितेच्या पानाचा प्रत्येक भाग पहिला , मैत्रिणींना, आई, मौशिला ऐकायला लावला अणि गेल्या भारत भेटीत मराठी कवितांची पुस्तक विकत घेतली ! शाळेत लागलेली कवितेची गोडी ... त्याची पुनः एकदा आठवण करुन दिलीस तु ! खुप खुप आभारी आहे !
    ह्या सीरीज मध्ये डॉ सलील कुलकर्णी ना पहिला आवडेल !

    • @madhuraniprabhulkar6195
      @madhuraniprabhulkar6195 5 ปีที่แล้ว +1

      थँक्यू प्रीती तू पुस्तक घेऊन वाचलीस हे हे वाचून खूप छान वाटलं असंच वाचत रहा आणि कवितेचं पान पहात रहा

  • @rajendrachaudhari7617
    @rajendrachaudhari7617 20 วันที่ผ่านมา

    दादा आपण आज नाही पण आपली कविता ही कायम समाजमणावर गारुड करेल यात कोणताही संधेय नाही.

  • @suhasinidahiwale3483
    @suhasinidahiwale3483 5 ปีที่แล้ว +1

    मधुराणी खूप धन्यवाद .एकदा माझ्या काॕलेजमध्ये येऊन एखादा एपिसोड केला तर आनंद द्विगुणित होईल .....अर्थातच जेव्हा तुला सवड असेल तेव्हा ....जोशी-बेडेकर काॕलेज ठाणे .....

  • @sanjeevsonawane3546
    @sanjeevsonawane3546 3 ปีที่แล้ว

    मधुराणी मॅडम आपले खुप खुप आभार आणि धन्यवाद. आपण ना. धो. यांची नव्याने भेट घडवून आणलीत. खरंच आई खुप काही करते. 🙏🙏🙏

  • @marutilad5420
    @marutilad5420 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर मुलाखत.ना.धो.सरांना शतशः प्रणाम 17:52

  • @sharadvedpathak82
    @sharadvedpathak82 5 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर मुलाखत व माहिती .
    खुप आवडली ' आभार .