ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

पळसनाथ मंदिर पळसदेव उजनी | Palasnath temple Palasdev |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ส.ค. 2024
  • उजनी धरणातील पळसनाथ मंदिर पळसदेव | Palasnath temple Palasdev | #marathivlog
    पुणे जिल्ह्य़ातील इंदापूरजवळ साकारलेल्या उजनी जलाशयातील पळसदेवमधील पळसनाथ (Palasnath temple) हे प्राचीन मंदिर. पळसनाथाचे मंदिर पूर्णपणे पाण्यात बुडालेले. उन्हाळा तापू लागला, दुष्काळ पाण्याचा तळ गाठू लागला, की ही दोन्ही मंदिरे व्यवस्थित पाहता येतात. पुणे-सोलापूर (Pune Solapur Road) महामार्गावर ११० किलोमीटरवर पळसदेव. इंदापूर (Indapur), सोलापूरकडे जाणाऱ्या सर्व एस.टी बस इथे थांबतात. या गावापासून उत्तरेला दोन किलोमीटरवर उजनी जलाशय (Ujani Dam) आहे. या जलाशयातच १९७५ साली मूळ पळसदेव (Palasdev) गाव बुडाले. गावाभोवती तट होता. गावाभोवतीने वाहणाऱ्या भीमेस पश्चिमेपासून उत्तरेपर्यंत घाट होता. १९७५ साली इथे जलाशय साकारला आणि अन्य गावांबरोबरच पळसदेवलाही उजनीने आपल्या पोटात घेतले. आज इथे फिरू लागलो, की धरणात बुडालेले पळसनाथ आणि काठावरचे श्रीराम मंदिरे आल्या-आल्या लक्ष वेधून घेतात.
    शेकडो वर्षांचा प्राचीन इतिहास असलेले इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथील ग्रामदैवत श्री पळसनाथाचे प्राचीन मंदिर (Ancient Palasnath temple) उजनी धरणाच्या (Ujani Dam) पाण्यात राहूनही सुस्थितीत असल्याचे आढळून आले आहे. उजनी धरणाच्या पाण्याची पातळी कमी झाली की हे मंदिर नागरिकांचे आकर्षण असते. आता हे संपूर्ण मंदिर दिसत आहे. मंदिरासमोरील ओवऱ्यांचे छत उघडे झाले आहे. हेमाडपंथी पद्धतीने बांधण्यात आले हे मंदिर स्थापत्यशैलीचा उत्कृष्ट नमुना आहे. साधारणत: ११ व्या शतकात या मंदिराची निर्मिती करण्यात आली. धरणाच्या निर्मितीपासून हे मंदिर पाण्यात आहे. मंदिराची पूर्ण रचना केवळ २७ दगडी नक्षीदार खांबांपासून तयार करण्यात आलेली आहे. शिखर भागाकडे प्रवेश करण्यासाठी छोटेसे दार आहे. शिखर भागात सतत सूर्यप्रकाश खेळता राहावा, याकरिता चारही बाजूंनी मोठमोठे छिद्र आहेत. मंदिराच्या आवारात जुन्या झाडांची खोडे स्थितप्रज्ञ सारखी कणखरपणे उभी दिसतात. मंदिराच्या सभोवताली भव्य दगडी तटबंदी आहे. तिची बऱ्यापैकी पडझड झाली असली तरी दिमाखदार आस्तित्व आजही कायम आहे.
    मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करताना अप्रतिम कोरीव काम केलेली चौकट दिसते, त्यावर वाद्य वाजवणारे वादक, पशु पक्षी कोरलेले आहेत. बाहेरून गाभाऱ्यात पहिले असता आतमध्ये फक्त गाळ शिल्लक आहे. मंदिरातील शिवलिंग गावकऱ्यांनी स्थलांतरित करून आता गावामध्ये नवीन मंदिर उभारलं आहे. मंदिरात देवाची मूर्ती नसली तरी देवत्वाच अस्तित्व अजून टिकून आहे. मंदिरात जसं प्रसन्न वातावरण असतं अगदी तसं वातावरण आपण अनुभवतो.
    मंदिराचा कळस अतिशय वैशिष्टपूर्ण असा आहे. भाजक्या विटा आणि चुना यांचा वापर करून कळसाचे बांधकाम केलेले आहे. सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे हा कळस आतून पूर्णपणे पोकळ आहे. आणि आतमध्ये जाण्यासाठी १ रस्ताही आहे.
    श्रीराम मंदिर
    मंदिर पश्चिमाभिमुख. पश्चिम, उत्तर व दक्षिण दिशांना द्वारमंडप, सभागृह आणि गर्भगृह अशी त्याची रचना. शिखर पूर्णपणे कोसळलेले. द्वारमंडप व सभामंडपातील खांब कोरीव, रेखीव छत, तर बाह्य़ भिंती घडय़ांच्या आकारात दुमडत बांधलेल्या. त्यावर पुन्हा रेखीव कोनाडे, उठावदार शिल्पे. सारा प्राकारच एखाद्या अद्भुत जागी उभे असल्याचा भास निर्माण करणारा.
    भिंतीवरील सारी शिल्पे आजही जिवंत. अगदी काल-परवा कोरल्याप्रमाणे. यात रामायणावर आधारित अनेक प्रसंग. अशोकवनातील ती सीता, हाती शिळा घेऊन सेतू बांधणारे वानर, समुद्रातील जलसृष्टी, राम-रावणाचे युद्ध असे हे प्रसंग जणू त्या मंदिराचीच कथा बांधू पाहतात.
    हे सारे पाहत आतमध्ये गाभाऱ्यात यावे. मात्र इथे कुठलीही मूर्ती दिसत नाही. स्थानिक गावकरी सांगतात, की अनेक वर्षांपासून देवतेविनाच हे मंदिर आहे. यासाठी ते इथे एक दंतकथाही पुरवतात, पांडवांनी एका रात्रीमध्ये हे मंदिर बांधले, पण इथे कुठल्या देवतेची स्थापना करायची, यावरून त्यांच्यात भांडण झाले. शेवटी हे मंदिर देवतेविनाच राहिले.
    Discover the mystical allure of Palasnath Temple, an ancient Hindu sanctuary nestled in the historic town of Palasdeo, Maharashtra. With its rich history dating back centuries, Palasnath Mandir stands as a testament to spiritual devotion and architectural marvel. Immerse yourself in the sacred atmosphere as you explore the temple's intricate carvings and timeless rituals. From breathtaking drone views capturing the temple's majestic beauty to captivating documentaries delving into its revered past, Palasnath Temple offers a unique blend of tradition and modernity. Situated near the picturesque Ujani Dam, this revered site draws pilgrims and history enthusiasts from far and wide. As one of the oldest and most famous temples in Maharashtra, Palasnath Mandir continues to enchant visitors with its awe-inspiring presence and profound significance in the religious landscape of India. Experience the divine serenity of Palasdeo's beloved landmark and uncover the secrets of its underwater temple, nestled beneath the tranquil waters of the Ujani Dam. Plan your visit to Palasnath Temple today and embark on a spiritual journey unlike any other.
    Way to Palasdev from Pune Google map : maps.app.goo.g...

ความคิดเห็น • 5

  • @MarathiMatter24
    @MarathiMatter24  4 หลายเดือนก่อน +1

    मंडळी पळसदेवाचे हे सुंदर मंदिर पाहण्याचा योग्य क्वचितच येतो. तेव्हा ही संधी बिलकुल चुकवू नका. रसिकांना विनंती की आपले विचार नक्की कमेंट करा.

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 2 หลายเดือนก่อน +1

    Apratim. Khoop. Sundar 💓

  • @user-bq5zz5ed2d
    @user-bq5zz5ed2d 3 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर माहिती दिली आहे... धन्यवाद