माझी शाळा सुंदर शाळा | कौशल्य विकास | स्वयं रोजगार | बाल आनंद मेळावा | Bal anannd melava

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.พ. 2025
  • #माझीशाळासुंदरशाळा #swachatamonitor #जि.प. शाळा पिंपळकोठे ता. पारोळा जि. जळगांव #27031308701 #स्वच्छतामॉनिटर
    #माझीशाळासुंदरशाळा
    #swachhatamonitor#जि. प. प्राथमिक शाळा पिंपळकोठे #zpjalgaon #drPradipbhadane #बालआनंदमेळावा
    जि. प . पिंपळकोठे शाळेत बालआनंद मेळावा व सेल्फीपॉईंट चेअनावरण
    #माझी शाळा, सुंदर शाळा. आमच्या शाळेत कौशल्य विकास व स्वंयरोजगार याचा परिचय विद्यार्थ्याना व्हावा यासाठी बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने बाल आनंद मेळाव्या बरोबर भविष्य वेधी शिक्षणात आव्हान पूर्ण करणारे, स्वच्छ्ता मॉनिटर व इतर बाबी यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या व नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या विद्यार्थ्याना प्रेरणा देण्यासाठी आकर्षक सेल्फी पॉईंट ची निर्मिती करण्यात आली आहे . या सेल्फी पॉईंट चे अनावरण करण्यात आले.
    बाल आनंद मेळाव्याच्या निमित्ताने विदयार्थी वेगळ्या उत्साहाने सहभागी होताना दिसले. इ.1 ली च्या विद्यार्थ्याने 14 रुपयाच्या मॅगीचे 60 रुपये केले, तर दुसरीच्या विद्यार्थ्याने पास्ता करून आणला शिक्षकांनी त्याला पास्ता कसा विकला जाईल ?असा प्रश्र्न केल्यावर मी माझ्या आईला दररोज रडून पास्ता करायला लावतो, माझी आई खूप छान पास्ता बनवते असे आत्मविश्वासाने उत्तर दिले आणि हट्टाने पास्ता बनवून आणला आणि विकला सुध्दा त्याने 20 रुपयात तयार केलेला पास्ता 120 रुपयात विकला. इयत्ता चौथी च्या नंदिनी जाधव ने तिचे आई वडील गावाला गेले असतांना आपल्या इ.10 वीत शिकणाऱ्या बहिणीच्या मदतीने 100 रुपयाच्या खर्चाने बनवलेली पाणी पूरी विकून 300 रूपये नफा कमावला. या मुलींचे सर्वानाच कौतुक वाटले अगदी कुशल व्यावसायिका प्रमाणे बटाटे, चने,कांदे, गोड पाणी, तिखट पाणी स्वच्छ्ता टापटीप, पाणी पूरी प्लेट तयार करण्यात असलेला सफाईदार पणा सर्वच अद्वितीय होते. त्यांच्या स्टॉल समोर रांग लागलेली होती आणि गर्दी नियंत्रित करण्यासाठी तिथे उभे राहून हे सर्व निरीक्षण करतांना या मुलींचा अभिमान वाटत होता. इयत्ता चौथी च्या अंजली ने 60 इडली 5 रूपये नगाने विकून भरागोस नफा कमावला. स्टॉल लावणाऱ्या प्रत्येकाची कथा विशेष आहे. यातून विद्यार्थ्याच्या नजरेतील आत्मविश्वास खूप काही बोलत होता. मिळवलेल्या कमाईतून किती रक्कम शाळेच्या बचत बँकेत जमा करायचे ते पालकांशी चर्चा करून सोमवारी निर्णय कळवणार आहेत. आम्ही वाट पाहतोय निर्णयाची. *हाच कौशल्य विकास असेल का? हेच स्वयं रोजगाराचे पाहिले पाऊल असेल का?*.

    @जि. प. शाळा पिंपळकोठे ता. पारोळा जि. जळगांव

ความคิดเห็น •