mangi-tungi /मांगी-तुंगी /tek mangi tungi /भारतातील दोन सूळक्याना जोडणारी सर्वात लांब भिंत /

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
  • बागलाणच्या बागुलवंशीय राठोड घराण्याचा ११ वा राजा विरमशहा राठोड याने मांगी तुंगी वर असलेली लेणी बनवून घेतली.
    बागलाण सुपीक, सधन आणि संपन्न असा मुलूख आहे.
    सह्याद्रीच्या उत्तर दक्षिण डोंगररांगेची सुरुवात होते,
    ती या बागुलगेड (बागलाण) विभागातूनच होते.
    येथे असणाऱ्या दुहेरी पूर्व-पश्चिम रांगेला सेलबारी-डोलबारी असे संबोधण्यात येते.
    सेलबारी रांगेवर मांगीतुंगी सुळके, न्हावीगड आहे.
    त्यातील प्रसिद्ध अशे मांगी तुंगी सुळके आणि या मध्ये असलेली लेणी पाहायला आपण निघालो आहोत
    मांगी सुळक्याच्या पोटातील गुहांमधे महावीर, पार्श्वनाथ, आदिनाथ आणि इतर तिर्थंकरांच्या मुर्ती कोरलेल्या आहेत.
    यातील वैशिष्ट्यपूर्ण मुर्ती म्हणजे बलभद्राची मुर्ती.
    बलभद्र म्हणजे श्रीकृष्णाचा भाऊ बलराम, जैन पुराणात त्याचा बलभद्र म्हणुन उल्लेख येतो.
    बलभद्राची मुर्ती पाठमोरी कोरलेली आहे.
    डोंगराकडे तोंड करुन तपाला बसल्यामुळे आपल्याला त्याची केवळ पाठच पाहाता येते.
    मांगी तुंगी या दरम्यानच्या डोंगर सोंडेवर बलरामाने श्रीकृष्णावर अग्निसंस्कार केले व त्यानंतर त्याने जैन धर्माची दिक्षा घेतली अशी आख्यायिका आहे.
    श्रीकृष्ण व बलराम यांच्या पादुका या डोंगर सोंडेवर आहेत. तिथेच एक पाण्याच कुंड आहे. त्याला कृष्णकुंड म्हणुन ओळखले जाते.

ความคิดเห็น • 17