घरच्यांच्या फर्माईशीवर बनवले व्हेज कटलेट्स. | लीनाज सुगरणकट्टा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
  • #कटलेट #व्हेजकटलेट्स #नाश्ता #स्नॅक्स #लीनाजसुगरणकट्टा #लीनाजोशी
    व्हेज कटलेट्स
    उकडून मॅश केलेले बटाटे ४
    अर्धी वाटी मटार
    अर्धी वाटी स्वीट कॉर्न
    उकडलेले गाजर आणि बीट प्रत्येकी १
    कांदा अर्धा
    जाड पोह्यांचे पीठ १ वाटी
    आलं मिरची पेस्ट दीड चमचा
    मीठ चवीनुसार
    गरम मसाला १ चमचा
    धने पूड दीड चमचा
    जिरेपूड १ चमचा
    काळी मिरी पूड १ चमचा
    आमचूर १ चमचा
    चाट मसाला १ चमचा
    मैदा १चमचा
    कॉर्न फ्लोअर १ चमचा
    रवा लागेल तसा
    (खरं सांगायचं तर या पदार्थासाठी भाज्यांचे असे काही ठोस प्रमाण नाही. तुम्ही हव्या त्या भाज्या हव्या त्या प्रमाणात घेऊ शकता. फक्त काही गोष्टी बाइंडिंग साठी घ्याव्या लागतात. उदाहरणार्थ पोह्यांचे पीठ, ब्रेडक्रम्स.)
    सर्व भाज्या एकत्र करून कुस्करून एकत्रित करून घ्याव्यात. त्यात सगळे मसाले व पोह्यांचे पीठ पण घालावे. सर्व साहित्य एकत्र झाले की त्याचे हव्या त्या आकारात गोळे करून घ्यावे.
    मैदा आणि कॉर्न फ्लोअर एकत्र करून त्यात थोडेसे पाणी घालून त्याची स्लरी करून घ्यावी. ताटलीत थोडा रवा घेऊन त्यात चिमूटभर मीठ घालावे. आता एक- एक गोळा स्लरीत बुडवून नंतर रव्यात घोळवून घ्यावा.
    सगळे कटलेट एकतर शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करून घ्यावेत.
    कटलेट्स सॉस किंवा हिरव्या चटणी बरोबर सर्व्ह करावेत.
    Video shooting & editing:
    Varun Damle
    +91 95459 08040

ความคิดเห็น • 21

  • @smitamankame9933
    @smitamankame9933 7 หลายเดือนก่อน

    एकदम मस्त!!😮😊

  • @kalikavaidya6522
    @kalikavaidya6522 21 วันที่ผ่านมา

    Very tempting 👌🙏🌹 sandwich idea is good 👍

  • @milindkumarkhabade9915
    @milindkumarkhabade9915 7 หลายเดือนก่อน +1

    लीनाताई मस्तच यमी कटलेट बनले आहेत. खरच ऐनवेळेस काहीतरी वेगळं करुन खायला मजाच येणार असते कटलेट खुप छान दिसत आहेत. 👌👌👍👍🙏

  • @jitendrapatwardhan8128
    @jitendrapatwardhan8128 2 หลายเดือนก่อน

    Khupach mast ani yummy 😋👍

  • @mandarkhade251
    @mandarkhade251 7 หลายเดือนก่อน

    मस्त रेसिपी. रव्यात घोळवण्या ऐवजी ब्रेड क्रंब किंवा शेवेचा चुरा किंवा कॉर्नफ्लोअर पण चालेल नाही का?

  • @shraddhachewoolkar7831
    @shraddhachewoolkar7831 7 หลายเดือนก่อน

    खरंच सुंदर दिसतायत कटलेट. यम्मी तर असणारच. येऊ म्हणताय खायला. खूप छान खूप छान.धन्यवाद

  • @rashmisumant4139
    @rashmisumant4139 7 หลายเดือนก่อน +1

    After coating with suji keep the cutlets in fridge for half an hour. It will give cutlets more crispy taste and suji will also get stuck to it.

    • @leenasugran68
      @leenasugran68  7 หลายเดือนก่อน

      Yes, you are right.

  • @MyPSVideoQq32
    @MyPSVideoQq32 7 หลายเดือนก่อน

    मैदा corn flour नसेल tar काय?

  • @madhavigarud6279
    @madhavigarud6279 7 หลายเดือนก่อน

    Khup Chan mast yummy tasty 😋 tai thanks 👍👍👍👍👍

  • @madhaviscooking-cs2lo
    @madhaviscooking-cs2lo 7 หลายเดือนก่อน

    एकदम मस्त!!!👌👌👌

  • @mohinitayade3147
    @mohinitayade3147 7 หลายเดือนก่อน

    My favourite winter dish

  • @prasadjayade6006
    @prasadjayade6006 7 หลายเดือนก่อน

    खूप छान कटलेट

  • @archanachavan9841
    @archanachavan9841 7 หลายเดือนก่อน

    ❤sunder

  • @ujwalakavathekar7992
    @ujwalakavathekar7992 7 หลายเดือนก่อน

    छानच मँम👌👌👌

  • @chayaudas7951
    @chayaudas7951 7 หลายเดือนก่อน

    Chanchan

  • @truptikapse3730
    @truptikapse3730 7 หลายเดือนก่อน

    Chan cutlet

  • @sunitadasalkar676
    @sunitadasalkar676 7 หลายเดือนก่อน

    Mast disj

  • @vikaspethe3459
    @vikaspethe3459 7 หลายเดือนก่อน

    Nice

  • @nitadhavale4505
    @nitadhavale4505 7 หลายเดือนก่อน

    छान दिसत आहेत

  • @kirtijoshi4451
    @kirtijoshi4451 7 หลายเดือนก่อน

    मस्त