- 125
- 917 370
Rupak Sane
India
เข้าร่วมเมื่อ 9 ต.ค. 2011
माझ्या हा चॅनल चाकोरी बाह्य काम केलेल्या व्यक्तींचे काम शाळेतील वयाच्या मुलांसमोर यावे म्हणून केलेला आहे. अनेक खेड्यापाड्यात ध्येयवेड्या व्यक्ति असतात. काही अतिशय कौतुकास्पद काम केलेले तरुण, विद्यार्थी, मुलं / मुली, किंवा अशिक्षित असूनही मोठे काम केलेल्याही व्यक्ति असतात. त्याची माहिती व आदर्श मुलांपर्यंत पोहोचण्याचा हा एक लहानसा प्रयत्न आहे.
याच बरोबर पर्यटन , बागकाम आणि निसर्गप्रेम या विषयी व्हिडिओ पहायला मिळतील.
माझ्या चॅनलला subscribe, like, share करा.
मोबाईल - 9420444969
rupaksane@gmail.com
www.youtube.com/@rupaksane?sub_confirmation=1
#motivational interview in marathi
#best nature documentary in marathi
#seniorcitizen
#gardening
#nature
#marathi
www.youtube.com/@rupaksane?sub_confirmation=1
मनाला भुरळ घालणारे सुंदर वृक्ष | गुलमोहर | नीलमोहोर | सोनमोहोर
कवी,चित्रकार आणि लेखकांना भुरळ घालणारा हा सुंदर वृक्ष म्हणजे गुलमोहर.
याचं शास्त्रीय नाव डिलॉनिक्स रेजिया.
हा उष्ण प्रदेशात वाढणारा वृक्ष मूळचा मादागास्करचा .
याला इंग्लिशमध्ये मे फ्लॉवर ट्री असंही नाव आहे.
जसा वैशाखातला रणरणत्या उन्हाचा वणवा वाढत जातो तसा हा गुलमोहोर आपल्या फुलांनी बाहरत जातो.
जगभरात हे झाड अगदी निरनिराळ्या भौगोलिक परिस्थितीतसुद्धा बहरताना दिसत.
समुद्रकिनारी असो वा समुद्रसपाटीपासुन ह्जारो फूट उंचीपर्यंतचा डोंगराळ भाग असो.
मे पासून जुलै-ऑगस्ट पर्यंत या वृक्षाच्या सौंदर्याचा आस्वाद घेता येतो.
झटपट वाढणारा हा वृक्ष 30 40 फूट उंची पर्यंत वाढतो. याचे सरासरी आयुर्मान 30 ४० वर्ष.
याला तिसऱ्या-चौथ्या वर्षापासून बहर येऊ लागतो आणि लाल भगव्या फुलांचा बहर ओसरल्यावर गुलमोहरावर चपट्या फूट दीड फूट लांब आणि दोन ते तीन इंच रुंदीच्या तलवारीसारखा बाक असलेल्या तपकिरी रंगाच्या शेंगा लटकू लागतात.
कालांतराने या शेंगातील बिया जमिनीवर पडून त्यातून नवीन गुलमोहराची रोपं अंकुरतात.
जमिनीकडे झेपावणाऱ्या फांद्यांमुळे गुलमोहराचा छत्रीसारखा घुमट तयार होतो.
फेब्रुवारी-मार्च दरम्यान गुलमोहोराची पाने गळायला सुरुवात होते आणि गुलमोहोराचे झाड ओकेबोके दिसू लागते.
गुलमोहराला पुन्हा पालवी फुटते एप्रिल-मेच्या सुमारास....नेच्यासारखी दिसणारी लुसलुशीत कोवळी पाने गुलमोहराच्या सौंदर्यात भर टाकतात.
वैशिष्ट्यपूर्ण पाच लाल-केशरी पाकळ्यांवर पांढऱ्या-पिवळ्या रंगाच्या आकर्षक रेषा असतात याने फुलाचे सौंदर्य अधिकच खुलते.... याची एक पाकळी इतर पाकळ्यांहून निराळी असते.
अशा सुंदर गुलमोहराचा एक अवगुण म्हणजे याची मुळे आधार असल्याने इमारतींचा भक्कम पाया उखडून टाकू
शकतात. जमिनीवर येणाऱ्या मुळांमुळे बगिच्यांत बांधलेले रस्ते किंवा दगडी पायवाटा उखडून जातात.
हा वृक्ष अत्यंत कमकुवत असतो. जोरदार वाऱ्या-वादळात हा सहज पडू शकतो.
१८४० साली सर्व प्रथम मुंबईत शिवडी येथे गुलमोहराचे झाड आढळल्याचा उल्लेख एस.एम.एडवर्ड्स या शास्त्रज्ञाने गॅझेटर ऑफ बाॅबे सिटी अँड आयलंड यात केला आहे.
महाराष्ट्रातील सातारा येथे दरवर्षी १ मे रोजी गुलमोहर दिन साजरा केला जातो.
जनसामान्यांचे निसर्ग आणि पर्यावरण रक्षण आणि संवर्धन यांकडे लक्ष वेधावे म्हणून आकर्षक अशा फुलांनी बहरलेला ह्या वृक्षाचा गुलमोहर दिन साजरा केला जातो.
त्या दिवशी लहान थोरां सगळे जण निसर्ग विषयक कविता वाचन, PAINTINGS,
फोटोग्राफ्स, यांचा आनंद लुटतात. गेली कित्येक वर्षे हा उपक्रम चालू आहे. ही मोठी कौतुकाची बाब आहे.
अमेरिकेतीलही फ्लोरिडा प्रांतात दरवर्षी गुलमोहर बहरात येण्याच्या काळात 'गुलमोहर फेस्टिव्हल'चे आयोजन केले जाते....मिरवणुका काढल्या जातात....फुगे फुगवून, कॉन्फेटी उधळत नाच, गाणी म्हणत, सहली काढतात.
पर्यावरण प्रेमासाठी असे महोत्सव साजरे करणे हे पुढच्या पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायक आहे.
काही झाडं पोटभऱ्याची असतात तसं हे मनभऱ्याचं झाड आहे अश्या शब्दात कवियत्री बहिणाबाई चौधरी यांनी गुलामोहोराला मनभऱ्याचं झाडं म्हटल आहे.
----------------------------------------------------------------------
नीलमोहर
असाच मन भरून टाकणारा अजून एक वृक्ष म्हणजे नीलमोहर.
हा एक जांभळ्या फुलांचा वृक्ष आहे. त्याचे इंग्रजी नाव जॅकरांडा.
मुळचा दक्षिण अमेरिकेतील पण आता भारतात अनेक ठिकाणी आढळतो त्यामुळे तो आता आपलाच झालाय.
हा वृक्ष १५ मीटर उंचीपर्यंत वाढू शकतो.
ह्याचं गुलमोहराशी बरेच साम्य आहे म्हणून त्याला निळा गुलमोहर किंवा नीलमोहर असही म्हणतात.
याचं खास वैशिष्ट्य म्हणजे थंडीमध्ये याची पानगळ सुरु होतें आणि यावर जेव्हा फुलांचा पाहिला तुरा येतो तेव्हा आता थंडी संपली आणि उन्हाळा सुरु झाला असा तो संकेत असतो.
उन्हाळा सुरू होताच नीलमोहराचा बहर सुरू होऊन संपूर्ण वृक्ष सुंदर निळ्या जांभळ्या बहाराने रंगून जातो.
हा बहर मार्च ते मे असा दोन तीन महिने टिकतो.
नंतर झाडाखाली गळून पडणाऱ्या फुलांचा जांभळा गालिचा पसरल्याचा भास होतो.
बहर संपल्यानंतर लांबट गोलाकार चपट्या हिरव्या शेंगा लागतात. नंतर त्या तपकिरी होतात आणि त्या लाकडासारख्या कठीणही होतात.
कालांतराने त्या उकलतात आणि त्यातून पातळसर बिया बाहेर पडतात.
कविवर्य श्री वसंत बापट यांनी त्यांच्या ‘जॅकरांडा’ ह्या कवितेत याचं सुरेख वर्णन केलाय.
आता हा सोनमोहोर वृक्षही असाच मनाला भुरळ घालणारा.
हे झाड तसे मुळचे अंदमान, मलेशिया,भागातले पण आता ते भारतात स्थिरावले.
ब्रिटश काळात महाराष्ट्रात हे झाड प्रथम खंडाळा येथे लावण्यात आले.
त्यानंतर त्याचा डेरेदार व देखणा आकार,त्यांची दाट सावली आणि सुंदर फुलोऱ्यामुळे या झाडाची लागवड विविध उद्यानांमध्ये व रस्त्याच्या दूतर्फा करण्यात आली.
मेळघाटातही ही झाडे असंख्य आहेत.
या वृक्षाचा विस्तार मोठा असून ते ४०-50 फूट उंचीपर्यंत वाढते.
या झाडाच्या मुख्य खोडाची साल करडी आणि खवल्याखवल्याची असते.
पानांचा गर्द हिरवा काळपट रंग फुलांच्या आणि शेंगांच्या रंगाला सुरेख उठाव देतो.
सोनमोहराला कळ्या धरू लागल्या की त्यांचे तांबूस तपकिरी तुरे भुकटीत घोळवलेल्या मण्यांसारखे सुरेख दिसतात.
मग एकेक मणी फोडून नाजूक पिवळ्या जर्द क्रेप कागदासारख्या पाकळ्यांची फुले त्यातून बाहेर पडू लागतात आणि हळूहळू सर्व झाड पिवळेधमक होऊ लागते.
फुलांनी जडावले की झाडाच्या तळाशी गळून पडलेल्या फुलांची आणि पाकळ्यांची सुंदर सजावट हॊते.
हिरव्यागार हिरवळीला लागून लावलेले सोनमोहराचे वृक्ष म्हणजे तर ते त्या बागांचे सौदर्य स्थान ठरतात.
हे झाड वर्षभर हिरवेगार असते.
या झाडाची फळे म्हणजे शेंगा. मातकट तांब्याच्या रंगासारखी दिसतात म्हणून या झाडाला इंग्रजीत कॉपर पाॅॅड म्हणतात.
वृक्ष निष्पर्ण झाला तरी झाडाला मागच्या वर्षीच्या शेंगा तशाच लटकताना दिसतात.

มุมมอง: 209
วีดีโอ
वृक्षारोपणाचा वसा घेतलेले लिमये कुटुंबिय | कॅमेरा - जगदीश पाटील, तळेगाव दाभाडे.
มุมมอง 16K14 วันที่ผ่านมา
Prdnya Pisolkar Limaye 919689949003 कॅमेरा - जगदीश पाटील, तळेगाव दाभाडे. माझ्या चॅनलला subscribe, like, share करा. मोबाईल - 9420444969 rupaksane@gmail.com www.youtube.com/@rupaksane?sub_confirmation=1
लक्ष्मीचे वाहन घुबड पक्षी | Indian red lapwing | The Owls Of India
มุมมอง 736หลายเดือนก่อน
ह्या आपल्या अंगणापासून भेटणार्या निसर्गात अनेक सुंदर झाडे, कीटक, पशू , पक्षी आपल्या आजूबाजूला दिसत असतात. पण जनमानसात त्यातलं काही उगाचच अशुभाचा शिक्का माथी घेऊन सतत घृणास्पद ठरत असतात. त्यातलेच हे दोन पक्षी म्हणजे #टिटवी, #घुबड, खरतर दिसायला सुंदर अशी ही टिटवी जनमानसात सर्वांच्या परिचयाची पण नकोशी मनलेली. संपूर्ण भारतभर आढळणारा हा सर्वसामान्य पक्षी बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका, म्यानमार, इरा...
गिरीपुष्प, भेंड आणि घायपात | आपल्या सभोवती असलेले उपयुक्त वृक्ष
มุมมอง 4.5Kหลายเดือนก่อน
गिरीपुष्प निसर्ग अंगणापासून डोंगरपर्यंत या मालिकेत तुमचं स्वागत. आपल्या शहरच्या किंवा गावाच्या थोड बाहेर गेल्यावर तुम्हाला दिसून येईल की काही वर्षांपूर्वी उघडे बोडके दिसणारे डोंगर काही प्रमाणात आता हिरवे आणि भरपूर झाडीने भरलेले दिसतात. याचं कारण म्हणजे 1976 साली भारत सरकारने मानवी वस्तीच्या जवळ असलेल्या सर्व न वापरलेल्या पडीक जमिनी आणि डोंगर उतरांवर झाडे लावून वनसंवर्धन केले त्यामुळे आता काही व...
एक समाजप्रिय कीटक - वाळवी | Termite | #insects
มุมมอง 2.6K2 หลายเดือนก่อน
वाळवी (ओडोण्टोटर्मिस ओबेसस) (टर्माइट). एक उपद्रवी कीटक. वाळवीचा समावेश संधिपाद संघातील कीटक वर्गाच्या आयसॉप्टेरा (सदृशपंखी) गणाच्या टर्मिटिडी कुलात करतात. वाळवीला ‘पांढऱ्या मुंग्या’ असेही म्हणतात. वाळवीचा प्रसार जगात सर्वत्र आहे. वाळवीची सहा कुले असून सु. दोन हजार जाती आहेत. भारतात त्यांच्या सु. २६० जाती आढळून येतात. त्यांपैकी प्रामुख्याने आढळणाऱ्या वाळवीचे शास्त्रीय नाव ओडोण्टोटर्मिस ओबेसस आहे...
दोन विलक्षण पक्षी सातभाई आणि खाटीक | Babbler | Shrike
มุมมอง 36K2 หลายเดือนก่อน
आपल्या आजूबाजूला अनेक पक्षी सतत दिसत असतात. त्यात दिसणारे काही पक्षी विलक्षण असतात. त्यातल्याचा काही पक्ष्याची ही रंजक माहिती आपण पाहणार आहोत. सातभाई म्हणजे इंग्रजीत याला Babbler म्हणतात. याच शास्त्रीय नाव टरडॉइड्स माल्कोमी हे नेहमीच सहा-सातच्या समूहाने राहतात. म्हणून त्यांना ‘सातभाई’ हे नाव पडले आहे. भारतात सातभाई पक्ष्याच्या सात जाती आढळून येतात; १) छोटा सातभाई : (टरडॉयडीस कॉडेटस; कॉमन बॅब्लर...
ज्योती गोखले यांची गच्चीवरील सक्युलंट,कॅक्टस आणि ऑर्किडची बाग | #सक्युलंट #कॅक्टस #ऑर्किड
มุมมอง 2.5K2 หลายเดือนก่อน
ज्योती गोखले यांची गच्चीवरील सक्युलंट,कॅक्टस आणि ऑर्किडची बाग | #सक्युलंट #कॅक्टस #ऑर्किड
जंगलातील अविस्मरणीय अनुभव | संजय ठाकूर
มุมมอง 7113 หลายเดือนก่อน
जंगलातील अविस्मरणीय अनुभव | संजय ठाकूर
घरातील धान्य, डाळी, गहू, तांदूळात पोरकिडे आणि टोकेकिडे का होतात ? # Rice weevil
มุมมอง 8673 หลายเดือนก่อน
घरातील धान्य, डाळी, गहू, तांदूळात पोरकिडे आणि टोकेकिडे का होतात ? # Rice weevil
Rustom Rice पुण्यातील पारसी - मराठी पदार्थांचे फ्यूजन रेसिपी मिळणारे मस्त ठिकाण #pune #RustomRice
มุมมอง 5K4 หลายเดือนก่อน
Rustom Rice पुण्यातील पारसी - मराठी पदार्थांचे फ्यूजन रेसिपी मिळणारे मस्त ठिकाण #pune #RustomRice
हे ढगांचे प्रकार तुम्हाला महिती आहेत का? | Types Of Cloud | ढगांची मनोरंजक माहिती
มุมมอง 1.9K4 หลายเดือนก่อน
हे ढगांचे प्रकार तुम्हाला महिती आहेत का? | Types Of Cloud | ढगांची मनोरंजक माहिती
Relaxation Film | Nature Video with Peaceful Relaxing Music | शांत संगीत आणि निसर्ग
มุมมอง 1074 หลายเดือนก่อน
Relaxation Film | Nature Video with Peaceful Relaxing Music | शांत संगीत आणि निसर्ग
वयाच्या 50 नंतर एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेक पूर्ण करणारे सहा ट्रेकर.
มุมมอง 1.5K4 หลายเดือนก่อน
वयाच्या 50 नंतर एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेक पूर्ण करणारे सहा ट्रेकर.
कसर आणि प्लास्टर बॅगवर्म - हे किडे तुमच्या घरात असतातच. #Plaster Bagworm #silverbug
มุมมอง 1.6K4 หลายเดือนก่อน
कसर आणि प्लास्टर बॅगवर्म - हे किडे तुमच्या घरात असतातच. #Plaster Bagworm #silverbug
तुमच्या लहानपणीच्या आठवणीतला किडा | उंट किडा | भुईमोरा, घुंगुरपाळया, Antlion #antlion #nature
มุมมอง 10K5 หลายเดือนก่อน
तुमच्या लहानपणीच्या आठवणीतला किडा | उंट किडा | भुईमोरा, घुंगुरपाळया, Antlion #antlion #nature
तुमच्या बाल्कनीत रोज येणारी खारुताई | Indian palm squirrel | #खार #squirrel #खारुताईची गोष्ट
มุมมอง 1.4K5 หลายเดือนก่อน
तुमच्या बाल्कनीत रोज येणारी खारुताई | Indian palm squirrel | #खार #squirrel #खारुताईची गोष्ट
निसर्गातील एक महत्वाचा स्वछतादूत...| कावळा #nature #crow #birds
มุมมอง 2.4K6 หลายเดือนก่อน
निसर्गातील एक महत्वाचा स्वछतादूत...| कावळा #nature #crow #birds
डोळ्यासमोर येणारी चीलटे | केमरी COMMON FRUIT FLY | #kemari #nature
มุมมอง 9736 หลายเดือนก่อน
डोळ्यासमोर येणारी चीलटे | केमरी COMMON FRUIT FLY | #kemari #nature
कोकिळा एक लबाड पक्षी | Asian koyal | #kokila #koyal
มุมมอง 88K7 หลายเดือนก่อน
कोकिळा एक लबाड पक्षी | Asian koyal | #kokila #koyal
एकट्याने फिरताना आनंद कसा शोधता येतो | solo travel | रामदास महाजन | विवेक मराठे |
มุมมอง 1.1K7 หลายเดือนก่อน
एकट्याने फिरताना आनंद कसा शोधता येतो | solo travel | रामदास महाजन | विवेक मराठे |
गोष्ट ऑर्किड फुलांची | Story of Orchid |
มุมมอง 7447 หลายเดือนก่อน
गोष्ट ऑर्किड फुलांची | Story of Orchid |
गृहीणींना घरबसल्या रोजगार मिळवून देणारा टेराकोटा आर्टिस्ट. | Home-based employment to housewives.
มุมมอง 1.1K8 หลายเดือนก่อน
गृहीणींना घरबसल्या रोजगार मिळवून देणारा टेराकोटा आर्टिस्ट. | Home-based employment to housewives.
निसर्गातील ठिकाणे | Sahyadri glory | Biodiversity of Sahyadri
มุมมอง 2968 หลายเดือนก่อน
निसर्गातील ठिकाणे | Sahyadri glory | Biodiversity of Sahyadri
बैलपोळ्याचा भारी व्हिडीओ Farmers Festival of Maharashtra |#बैल पोळा #villagevlog #villagelifestyle
มุมมอง 1588 หลายเดือนก่อน
बैलपोळ्याचा भारी व्हिडीओ Farmers Festival of Maharashtra |#बैल पोळा #villagevlog #villagelifestyle
250 वर्षांचा वैभवशाली सांस्कृतिक वारसा जपणारे | प्रकाश करंदीकर | वाई | 250 year old WADA | WAI
มุมมอง 198K9 หลายเดือนก่อน
250 वर्षांचा वैभवशाली सांस्कृतिक वारसा जपणारे | प्रकाश करंदीकर | वाई | 250 year old WADA | WAI
सुरवंट | माणसाला खाजेने हैराण करणारा जीव | Moth caterpillar
มุมมอง 4K9 หลายเดือนก่อน
सुरवंट | माणसाला खाजेने हैराण करणारा जीव | Moth caterpillar
उंबरातले किडे मकोडे, उंबरी करिती लीला! | Ficus racemosa | फायकस रेसिमोझा |
มุมมอง 6K10 หลายเดือนก่อน
उंबरातले किडे मकोडे, उंबरी करिती लीला! | Ficus racemosa | फायकस रेसिमोझा |
पावसाळ्यातला मावळ | #cinematic #rainyday
มุมมอง 36510 หลายเดือนก่อน
पावसाळ्यातला मावळ | #cinematic #rainyday
रंगांची उधळण करणारा वसंत ऋतु | वसंत ऋतूची माहिती | documentary
มุมมอง 60911 หลายเดือนก่อน