रूप रामाचे पाहु चला हो
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
- कौमुदी परिवार
संचालिका - सौ. सुनिता तळवेलकर.
तबला - श्री. अभिजीत वैद्य.
जोगेश्वरी भजनी मंडळ, नाशिक.
रूप रामाचे पाहु चला हो
नाम रामाचे घेऊ चला हो || धृव. ||
एक बाणी एक पत्नी, एक वचनी राम राया
ऋषिवरांचे यज्ञ रक्षिण्या,अवतारच हा राघव राया
गुण रामाचे वर्णू चला हो, राम नामात रंगू चला हो || १ ||
पद स्पर्शाने राघवाच्या , अहिल्या हो शाप मुक्ता
हनुमंताच्या हृदया मधुनी ,सीतामाई बघते नाथा
नाते भक्तांचे जोडू चला हो, राम रंगात रंगू चला हो || २ ||
सहा रिपुंच्या वनवासातुन , मुक्ती झाली भक्त गणाची
झाले मानस अयोध्याही, ओढ लागली राम रूपाची
तीर मुक्तीचा गाठू चला हो, राम नामात न्हाऊ चला हो || ३ ||