गहू खत व्यवस्थापन | गहू खत नियोजन | gahu khat vyavasthapan
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
- ▶️ व्हिडीओमध्ये दिलेली कृषी उत्पादने खरेदी करण्यासाठी आता खाली दिलेल्या 👇🏼 लिंकवर क्लिक करा आणि 🥳 100% कॅशबॅकसह उत्पादन घरपोच मिळवा! 📢 कॅश ऑन डिलिव्हरी सुविधादेखील उपलब्ध!
👉लिंक - krushidukan.bh...
============================================================
👨🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏
🌱भारतअॅग्रीमध्ये आपले स्वागत आहे.
✅आजचा विषय - 🌱गहू पिकातील रासायनिक खतांचे वेळापत्रक👍
महाराष्ट्रात घेतल्या जाणाऱ्या अन्नधान्य पिकांपैकी गहू हे रब्बी हंगामातील एक महत्वाचे पीक आहे. गहू हा जिरायत व बागायत अशा दोन्ही प्रकारे घेतला जातो. गव्हाच्या चांगल्या उत्पादनासाठी खत व्यवस्थापनाचे योग्य नियोजन असणे गरजेचे आहे.
✅दाणेदार खताच्या माध्यमातून अन्नद्रव्य व्यवस्थापन:
👉 बागायती गव्हाच्या पिकासाठी एकरी ३ टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत दयावे.
👉 बागायती गव्हाच्या वेळेवर पेरणीसाठी एकरी ४५ किलो नत्र, २५ किलो स्फुरद व २० किलो पालाश म्हणजेच युरिया ३० किलो + डीएपी - ५० किलो + एम ओ पी ३० किलो दयावे. निम्मे नत्र व संपूर्ण स्फूरद आणि पालाश पेरणीच्यावेळी व उरलेले निम्मे नत्र म्हणजेच ५० किलो युरिया पेरणीनंतर ३ आठवडयांनी खुरपणी झाल्यावर पहिल्या पाण्याच्या वेळी दयावे.
👉 जिरायती गव्हासाठी आणि उशिरा केलेल्या पेरणीसाठी हे प्रमाण एकरी ३० किलो नत्र, २० किलो स्फुरद आणि २० किलो पालाश म्हणजेच युरिया २० किलो + १०:२६:२६ - ७५ किलो इतके दयावे. निम्मे नत्र व स्फूरद आणि पालाश पेरणीच्या वेळी व उरलेले निम्मे नत्र म्हणजेच ३० किलो युरिया पेरणीनंतर ३ आठवडयांनी दयावे.
👉 बेसल डोस देताना रासायनिक खतांसोबत सल्फर ९०% दाणेदार - ८ किलो + मायक्रोनुट्रीएंट १० किलो प्रति एकरी द्यावे.
✅ फवारणी माध्यमातून अन्नद्रव्य व्यवस्थापन :
1️⃣ लागवडीनंतर २५ दिवसानी - १९:१९:१९ - ३ ग्राम + सीवीड एक्सट्रॅक्ट १.५ ग्राम + सिलिकॉन १ ग्राम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
2️⃣ लागवडीनंतर ४० दिवसानी - १२:६१:०० - ५ ग्राम + चिलेटेड मायक्रोनुट्रीएंट १ ग्राम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
3️⃣ पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना १३:००:४५ - ५ ग्राम + सीवीड एक्सट्रॅक्ट १.५ ग्राम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
4️⃣ लागवडीनंतर १०० दिवसानी - ००:००:५० - ५ ग्राम + चिलेटेड मायक्रोनुट्रीएंट १ ग्राम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍
✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस -
👉भारतअॅग्री ऍप - bit.ly/2ZyV2yl
👉फेसबुक हिन्दी - bit.ly/36KuGOe
👉फ़ेसबुक मराठी - bit.ly/36KuGOe
👉इंस्टाग्राम - bit.ly/3B9Ny8G
👉वेबसाइट - www.bharatagri.com
👉लिंक्ड इन - bit.ly/3TWtK0Z
👉भारतअॅग्री मराठी यूट्यूब चैनल - bit.ly/3Ryf3zt
👉भारतअॅग्री हिन्दी यूट्यूब चैनल - bit.ly/3L2cRxF
#bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal
निम्मे खत 30आठवड्याने म्हणजे पीक काढून गेल्यावर पुढच्या वर्षीच्या पिकासाठी का?
😂😂😂
😅😅😅 शब्दात पकडले रे 😂😂😂
छान माहिती दिली धन्यवाद
एवढा खर्च केल्यावर हातात काय केळ घ्याच
😂😂😂😂
केळ पाहिजे तर केळीची बाग लावा 😂😢😮
केळ पण नाही उरणार पण कृषि केंद्र चालक मालामाल होणार 😂😂😂
😮
😂😂😂
गहू काढणीसाठी ब्रश कटर कोणता घ्यावा side vs backpack?
चांगली आणि उपयुक्त माहिती धन्यवाद !
धन्यवाद
Chandan mahiti
माहिती छन दिली आहे
Excellent.........🙏
धन्यवाद
गहू पिकातील तण व्यवस्थापण व कीड /रोग याविषयी पण माहिती द्या
सुंदर आहेत माहिती
धन्यवाद
Sara sari amchyakade 21 divasnanter tan nashak chi favarni karta. Tar barobar ahe ka
Very good
गहू दानेभरण्याच्या अवस्थेत micronutren आणि 13:00:45 यांची फवारणी केली तर चालेल ka🙏
हो चालेले सर !
बायोझाईम हे गहु मध्ये वापरले तर चालेल का सर
सर आता गहू पेरणी करायची 7 डिसेंबर ला. कोणती व्हरायटी पेरावी. राण हलके आहे. आणि बेसळ डोस सांगा
अरे सूर्यकांत यामध्ये कीटकनाशक उपोषण नाशक कधी वापरायचे सांगितलं नाहीस बाळा
Koop ushira vedio takla sir
हो थोडा उशीर झाला . पुढे प्रयत्न करू जरा लवकर विडियो टाकण्याचा
येणाऱ्या कांदा लागवडी विषयी बेसल डोस व्हिडियो बनवा लवकरात लवकर
ओके
सर निमेटोड साठी रिजेंट दानेदार चालेल का प्रमाण किती
गहू पेरणी वेळेस DAP टाकले .
नंतर तणनाशक
आता यूरिया , झिंक सल्फेट, आणि Micro nutrient .
हे combinatation चांगलं आहे का
चालेल पण आता सुपर ( सिंगल सुपर ) पण वापरा
उन्हाळी सोयाबीन मध्ये बेसल डोस सोबत घरडा च महावीर ग्रॅन्युयल टाकावे का.?
चालेल. ( ते एक दानेदार कीटकनाशक आहे. वापरू शकता )
सर पण काही जाती 95 दिवसात निघतात तर 00=00=50 ची फवारणी लवकर घेतली तर चालेल ना परिस्थिती बघून
युरीया खतासोबत मायक्रोनुटन दिले तर चालेल का
चालेल की फायदाच होईल
Acre 50 q nighel ka mg sir evda khat taakyavr
आम्ही सर्व शेतकरी मित्रांचा विचार करून अवरेज खत दिल आहे.
ir Apn दिलेली माहिती खूप चांगली आहे पण ह्याचा गहु पीक पुर्ण पेरणी ते काढणी वेळापत्रक लेखी पाठवा
नमस्कार सर, भारत ऍग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया Bharat Agri एपद्वारे आमच्याशी चॅट करु शकता , तसेच कृषी दुकानात औषध पाहू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता, चॅट करण्यासाठी किंवा एप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - app.bharatagri.co/chat
Futava yene khat konte
गहू पिकाला पेरणी बरोबर मी 15.15.15. ची एक बॅग दिली होती..आता पुढे कोणते खत देऊ
नमस्कार सर , आपण ३० दिवसांनी पुढे यूरिया - ३० किलो + १८:४६:०० - २५ किलो +पोटॅश २५ किलो + मिक्रोनिट्रिएंट्स -५ किलो @ एकर पुन्हा ४५ दिवसांनी - युरिया ३० किलो +पोटॅश २५ किलो + झिंक सल्फेट ५ किलो @ एकर .धन्यवाद सर !
सर मी पेरणी करताना 1 पोटॅश , 1 सिंगल सुपर , आणि 1 मायक्रो न्यूट्रियन टाकले आहे पेरणी करून 20 दिवस झाले आता काय टाकू
गहू पिकात कोणत्या तणनाशकाची फवारणी घेतली पाहिजे..... जेणेकरून संपूर्ण तानांचे नियंत्रण होईल
*गहू पिकात पेरणी नंतर ३०-३५ दिवसांनी -
मेट्रीब्युझीन ७०% डब्लू पी ( टाटा मेट्री- टाटा) ४०० ग्राम किंवा २,४ डी (विडमार सुपर - धानुका ऍग्रीटेक) ३०० मिली किंवा क्लॉडिनोफोप प्रोपीगील १५% + मेटसल्फ्यूरोन मिथाईल १ डब्लू पी (वेस्टा- युपीएल) १६० ग्राम प्रति एकर या प्रमाणात फवारणी करावी .
अतिशय छान माहिती सर
धन्यवाद सर !
Maja gahu 13 divsacha ahe me kay karu
👍👍
thank you sir !
Very nice👍👍👍👌👌👌
Thanks
सर केळीला खतमाञा विषायी माहिती सागावे
ओके , एक नवीन विडियो बनऊ . ( विषय थोडा मोठा आहे )
🙏
धन्यवाद
😢
Sir tumhi 45 kg natra sangital te 30 kg urea madhun kase uplabdh hoil..
३० किलो मधून आपल्याला - १३.८ किलो पडेल
ज्वारी पिकावर विडीओ बनवा
ओके, नक्की प्रयत्न करू
100 दिवसांनी गहू मध्ये चालता तरी येत का
त्यासाठी आपल्याला दोन सरीमध्ये ( वाफ्यामध्ये ) पुरेसे अंतर ठेवावे लागते.
Ok sar
एवढा खर्च केला तर शेत विकाव लागेल
गव्हाची जास्तीत जास्त ओंबी बाहेर पडण्यासाठी आणि ओंबी लांबण्यासाठी कोणते विद्राव्य खत फवरावे
00:52:34 - , 13:40:13 हे विद्रव्य खत वापरू शकता सर .
@@bharatagrimarathi सर धन्यवाद
NAMSTE SIR TOMETO PIKAS 1261 3 KG 13 045 2 KG MIX DHILE TAR CHALEL KA TOMETO SIZE VADNIYA KARITA
१३:००:४५ ,चालेल साईज साठी .धन्यवाद !
सर माझा गहू 4 फूट वाढलाय ओंब्या पण आल्यात पण ओंब्या मधे दानेच भरले नाहीत आता काय करावे 😢
आपण विचारल्या प्रमाणे पुढील लिंक वर क्लिक करून व्हिडिओ पाहावा ,धन्यवाद !th-cam.com/users/shortsrJYbyKRat90
Hii Sir mi pan krushi campani madhya Kam aahe ka bsc agri culture dipaluma zala
आपल्याला या विषय ऑनलाईन माहिती मिळेल तिथे आपण बघावी . धन्यवाद सर !
सर,
अर्धा एकर -गहु पिक २५-२८ दिवसाचे झाले आहे, पेरणीसोबत फक्त दाणेदार सिंगल सुपर पेरले आहे. तरी पुढील फवारणी व अर्धे नत्र सोबत आणखी काही द्यायची आवश्यकता आहे का ?
नत्र बरोबर झिंक सल्फेट द्या - ५ किलो / एकरी आणि फवारणी - अँट्राकोल- ३७ ग्रॅम + हमला -३० मिली + टाटा बहार - ३० मिली + मिक्रोनिट्रिएंट्स -१५ ग्राम + स्टिकर ५ मिली @ १५ लि फवारणी .
गहु खोडकिडा विषयी माहिती द्या
खोडकिडीच्या नियंत्रणासाठी एंड्रीन, फॉस्फोमिडॉन किंवा एंडोसल्फॉन यांची फवारणी करतात. ज्वारी, ऊस, गहू, मका या पिकांवरील खोडकिडीच्या नियंत्रणासाठी २ टक्के दाणेदार एंड्रीन पोंग्यांत घालतात.
@@bharatagrimarathichukichi mahiti sangu nako suryakant
52 ते 53 आठवड्याचे 1 वर्ष असते. गहू 4 महिन्याचे पिक आहे. म्हणजे 16 ते 20 आठवड्याचे. 30 आठवड्यानी म्हणजे सात ते साडे सात महिन्यांनी असं म्हणायचंय का तुम्हाला?
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे, क्षमा करा सर! आपण आमची चूक सुधारली त्याबद्दल आपले आम्ही आभारी आहोत, धन्यवाद सर!
युरिया 400रूपला मिळत आहे कशी शेती करावी
272 la ahe
Chana crop
ओके
टरबूजा विषयी थोडं व्हिडिओ बनवा संपूर्ण माहितीबद्दल
ओके . मी प्रयत्न करतो
सर मी १८ १८ १० टाकले आहे
चालेल. चांगले आहे ते पन
बायोविटाX
हो
साहेब गहू लावून झाल्यावर सांगा काय राव 😏
हो थोडा लेट झाला पण इथून पुढे आम्ही थोडे लवकर टाकण्याचा प्रयत्न करू
Bhau ne sheti keli nahi vattay,pubg khelun army join😂😂,yevdi khate takli tr kharch kiti nhoil
सर माझा गहु खुप लेट झाला आहे आणि पेरतना त्याला 14-35-14 हे खत दिले आहे दि 5/1/2023
आपल्या जवळ काही किट बनवल्या आहे आपण या लिंक वर जाऊन माहिती चेक करू शकता - krushidukan.bharatagri.com/products/wheat-suraksha-kit-rust-1?_pos=6&_sid=dd9cfaa50&_ss=r
खर्च जास्त उत्पन्न कमी झाल्यावर काय उपयोग? 🤭😉
नियोजन कसे या वर परिणाम दिसतात धन्यवाद सर !
सर गहू १ महिने चं झाला आहे आता युरिया सोबत एमओपी दिले तर चालेल का❓
नको , आता उरिया सोबत सुपर द्या
एवढ केल्य कलमवर काती उरत नाही
आपला अनुभव खूप महत्वाचा आहे, धन्यवाद सर !
गुहुकदिपेरावे
१००दिवसांनी गहू पिकात औषद मारून दाखव
😂😂