पुरण करण्याची आधुनिक स्मार्ट रेसिपी | Smart Way To Make perfect Puran | Kanchan Bapat recipes |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ส.ค. 2024
  • #पुरणपोळी #पुरणरेसिपी #puranrecipe #instantpuran #झटपटपूरणरेसिपी #quickpuranrecipe #Kanchanbapatrecipes
    परफेक्ट पुरण करण्याची आधुनिक स्मार्ट रेसिपी
    A smart modern way to make pooran in a jiffy
    Kanchan Bapat Recipes
    1 वाटी - हरबरा डाळ
    पाउण वाटी - साखर
    अर्धी वाटी - गुळ
    पाव tsp - हळद
    #Kanchanbapatrecipes
    चिमूटभर - केशर
    प्रत्येकी पाव tsp - जायफळ आणि वेलची पावडर
    #Kanchanbapatrecipes
    कृती
    हरबरा डाळ धुवुन 2 वाट्या गरम पाणी घालून झाकून ठेवा. 2 अडीच तासांनी डाळ चांगली भिजल्यावर त्यात अजुन 2 - अडीच वाट्या पाणी आणि पाव tsp हळद घालून कुकरमध्ये शिजायला ठेवा. 1 शिट्टी होईपर्यंत गॅस मोठा ठेवा. #Kanchanbapatrecipes नंतर मध्यम गॅसवर 5-6 शिट्ट्या होऊ द्या. गॅस बंद करा. वाफ गेल्यावर कुकर उघडून जास्तीचं पाणी गाळून घ्या. डाळ गरम असतानाच masher वापरुन छान बारिक करुन घ्या. थोडी डाळ आमटी साठी काढून ठेवा. थंड झाल्यावर डाळ mixer मध्ये बारीक करुन घ्या.#Kanchanbapatrecipes त्यात साखर आणि गूळ घालून शिजायला ठेवा. आधी 5 मिनिटं त्यावर झाकण ठेवून शिजू द्या. केशर घाला नंतर बारीक गॅसवर त्यात चमचा उभा राहीपर्यंत शिजवा. गॅस बंद करा. त्यात वेलची आणि जायफळ पावडर घालून मिक्स करा. #Kanchanbapatrecipes
    How to make instant puran, पुरण झटपट कसं तयार करायचं, पुरण करण्याची स्मार्ट सोपी पद्धत, traditional maharashtrian recipes, how to make puranpoli, पुरणपोळी कशी करायची, easy Puran recipe, सोपी पुरण रेसीपी, होळी साठी पुरणपोळी,

ความคิดเห็น • 155

  • @vpatil2581
    @vpatil2581 3 ปีที่แล้ว +5

    Perfect recipe thanks for uploading

  • @shubhangiagnihotri1776
    @shubhangiagnihotri1776 3 ปีที่แล้ว +2

    वा, खूप छान आणि अगदी सोपी पद्धत👌👌👍

  • @jyotsnashinde9536
    @jyotsnashinde9536 3 ปีที่แล้ว +3

    Very nice and systematic explaination .

  • @meenaekhande8028
    @meenaekhande8028 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान आणि सोपे ही.thanks.

  • @mirarevalkar261
    @mirarevalkar261 2 ปีที่แล้ว +1

    वाह मस्तच छान आहे रेसिपी

  • @malatinanal2527
    @malatinanal2527 2 ปีที่แล้ว +1

    खुपच छान वाटण्याचा त्रास कमि आयडिया खुपच मस्त आहे👌👌

  • @madhavijadhav6207
    @madhavijadhav6207 2 ปีที่แล้ว +1

    Lovely idea!! 👍 👍 👌 👌

  • @shraddhajuwatkar7746
    @shraddhajuwatkar7746 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान समजावून सांगितले

  • @supriyajoshi1592
    @supriyajoshi1592 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान होते पुरण आणि पोळी पण

  • @jayshrilad1280
    @jayshrilad1280 ปีที่แล้ว +1

    Checking tips

  • @swatipatil1398
    @swatipatil1398 3 ปีที่แล้ว +1

    मस्त👌

  • @manishakulkarni9819
    @manishakulkarni9819 3 ปีที่แล้ว +1

    Nice! I will definitely try! Very easy!

  • @medhadeshpande8449
    @medhadeshpande8449 3 ปีที่แล้ว +1

    छान पद्धत आहे

  • @anjanapatil7694
    @anjanapatil7694 ปีที่แล้ว +1

    तुमची रेसीपी खूपच आवडली 👍

  • @rekhar6065
    @rekhar6065 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan

  • @sandhyabobade1251
    @sandhyabobade1251 3 ปีที่แล้ว +1

    Khupch mastach chan

  • @Tejasvini_handmades
    @Tejasvini_handmades 3 ปีที่แล้ว +1

    Will try this

  • @shilpaghag210
    @shilpaghag210 3 ปีที่แล้ว +1

    Khup mast

  • @SwatiNalawade
    @SwatiNalawade 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान....मी नक्कीच करून बघेन

  • @DynamicDailies
    @DynamicDailies ปีที่แล้ว +1

    Kanchantai thank you

  • @shwetamande7885
    @shwetamande7885 3 ปีที่แล้ว +5

    डाळ भिजवल्यावर पुरण हमखास छान होते... मी असेच करते कायम 👍👍

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  3 ปีที่แล้ว

      That's great... N thanks 😊

    • @umadalvi961
      @umadalvi961 3 ปีที่แล้ว +1

      मी सुद्धा कित्येक वर्षे असेच करते आहे. ऑफिसला जाणा-या बायकांना अशा आयडिया शोधाव्या लागतात. आपल्या साठी हे नविन नाही पण नवीन मुलींसाठी खरंच या माध्यमातून समजेल.
      धन्यवाद!!!

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  3 ปีที่แล้ว +1

      @@umadalvi961 thanku so much !!
      खरंच आहे... नवीन मुलींच्या दृष्टीने अशा युक्त्या खुप उपयोगी पडतात...
      तुमचा positive attitude आवडला... Thanku 😊

    • @umadalvi961
      @umadalvi961 3 ปีที่แล้ว

      @@KanchanBapatRecipes Thank you 😊

  • @balkrishnamore2503
    @balkrishnamore2503 2 ปีที่แล้ว +1

    Khup chaan thanks 🙏👍👌👌👌

  • @arunahadap794
    @arunahadap794 3 ปีที่แล้ว +1

    Very nice

  • @rashmiharidas6568
    @rashmiharidas6568 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान आणि सोपी पद्धत.
    मी हे मायक्रोवेव्हमध्ये करते त्यामुळे अधिक सोपं होतं.

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 ปีที่แล้ว

      Ohhk.. तुमची पद्धत सांगू शकता का? मी करून बघेन त्याप्रमाणे.. मग जास्त सोपं असेल तर तशीही पद्धत दाखवता येईल मला

    • @swatimhatre7277
      @swatimhatre7277 2 ปีที่แล้ว

      हो मी पण हे मायक्रो मध्ये करते
      जर कधी पुरण पातळ झाल तर पाच मिनिट मायक्रो कराव नंतर परत हलऊन दोन तिन मिनट परत मायक्रो कराव

  • @vedavatiatre1462
    @vedavatiatre1462 3 ปีที่แล้ว +1

    Wow,thank you.😍

  • @preetichouhan6182
    @preetichouhan6182 3 ปีที่แล้ว +7

    Masta recipe, tried it and it was so easy to prepare puran than my previous method. ☺️

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  3 ปีที่แล้ว

      Thanku so much 😊 very happy to know that it was useful 👍

  • @shailajanair9922
    @shailajanair9922 3 ปีที่แล้ว +6

    Lots of love to you, mam . Presentation may seem simple but reality is its extraordinary and awesome 🙏😍

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  3 ปีที่แล้ว +1

      Thanku so much Shailaja for such a lovely compliment !! It means a lot for me...

  • @aparnapatil7860
    @aparnapatil7860 3 ปีที่แล้ว +3

    Thank u so much tai😊

  • @purvachalke3903
    @purvachalke3903 2 ปีที่แล้ว +2

    Mala tumchya receipies khup awadtat. Mala 15 puranpolisathi praman saga na tai please. Pithacha,Gulacha ani chana dalicha praman sanga. Gul kuthla vaprava? Tumchya reply chi vat bagaht ahe.

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 ปีที่แล้ว

      Thanku so much !
      गुळ चिक्कीचा नको.. बाकी कोणताही चांगल्या क्वालिटीचा गूळ चालेल..
      Video मधे दाखवल्याप्रमाणे प्रमाण घ्या..
      15 पोळ्यांसाठी अर्धा किलोहून थोडी कमी डाळ घ्या. 1 किलो डाळीच्या 50 मध्यम आकाराच्या पोळ्या होतात . त्यानुसार 300 - 400 gm डाळ पुरेशी होईल

  • @charukulkarni4758
    @charukulkarni4758 2 ปีที่แล้ว +1

    Chancha Thank you so much

  • @VirShri
    @VirShri 3 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद ताई

  • @shirishmodak8815
    @shirishmodak8815 2 ปีที่แล้ว +1

    चित्र एका बाजूला गेले आहे
    रेसिपी उत्तम

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 ปีที่แล้ว

      Thanku so much !
      चित्र एका बाजूला गेलंय म्हणजे काय मला कळलं नाही

  • @prabhanagavi9241
    @prabhanagavi9241 3 ปีที่แล้ว +2

    Chaan idea aahe Smasher ne mash
    Karayachi 👍. Mixer madhe ashach
    Takalyavar thodi thodi dhaane asach raahat hote. I will try this one
    Mi tar cooker madhech bijavate
    Medium gas ani simvar cook karte
    Gul shakkar mix karun grind karun ,++++

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  3 ปีที่แล้ว

      व्वा मस्तच... Actually डाळ गरम असतानाच smasher नी पटकन चांगली बारिक होते... मग थंड झाल्यावर तितकी छान होत नाही

    • @prabhanagavi9241
      @prabhanagavi9241 3 ปีที่แล้ว

      @@KanchanBapatRecipes correct.
      Thanq for your reply. In advance
      Naveen varshacha shubhechha 🎉🎆💐

    • @nirmalapawar7642
      @nirmalapawar7642 2 ปีที่แล้ว

      👌👍

  • @anjaliparulkar7753
    @anjaliparulkar7753 3 ปีที่แล้ว +1

    छान छान मस्तच 👌👌🌷🌷

  • @swapnalijadhav9825
    @swapnalijadhav9825 ปีที่แล้ว +1

    Ek vati Dali sathi fkt sarkhareche praman kase ghyayche

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  ปีที่แล้ว

      1 वाटी साठी सव्वा वाटी साखर वापरा

  • @sjahirabadkar
    @sjahirabadkar 3 ปีที่แล้ว +1

    Yummy!! And simple!

  • @sh_2489
    @sh_2489 3 ปีที่แล้ว +12

    यात स्मार्ट काय होते,किती भांडी खरकटी झाली मिक्सर स्मैशर, भिजवायला शिजवायला वेगळी भांडी या पेक्षा पारंपरिक पद्धतीने चटकन होते ... दाळ भिजवून ते छान होते हे ही नवीन नाही.....

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  3 ปีที่แล้ว +9

      😊 तुम्हाला खरंच असं वाटतं की यात स्मार्ट काही नाही ? I request you... या पद्धतीने एकदा पुरण करुन पहा... भिजवण्यासाठी घेतलेलं भांडं आणि smasher फक्त जास्त होतं.. भिजवण्यासाठी घेतलेलं भांडं नुसतं विसळून स्वच्छ होऊ शकतं... मी shooting करतांना चांगलं दिसावं म्हणुन ग्लास bowl घेतलं.. तुम्ही ज्यात पुरण शिजवणार आहात तेच भांडं भिजवायला वापरु शकता..
      पुरणयंत्र वापरण्यापेक्षा mixer वापरुन पाव पट वेळात पुरण वाटलं जातं.
      त्यातच साखर - गुळ घातला की कमी पाणी सुटतं त्यामुळे पुरण शिजवण्याचा वेळ कितीतरी कमी होतो.
      एक पुरणयंत्र धुण्यासाठी जो वेळ लागतो त्यापेक्षा Mixer चं भांडं आणि smasher धुणं जास्त सोपं आहे...
      याशिवाय पुरणयंत्राला चिकटलेलं पुरण काढणं किती अवघड आहे... Mixer च्या भांड्यातलं पुरण किती सहज निघतं...
      I hope तुमचं समाधान झालं असेल... Every genuine viewer is important for me 😊
      Thanks for watching my channel 🙏

    • @nandiniwanjari1671
      @nandiniwanjari1671 3 ปีที่แล้ว +1

      एक च काम डबल डबल केल, वेळखाऊ पद्धत.

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  3 ปีที่แล้ว

      @@nandiniwanjari1671 कोणतं काम डबल डबल केलं असं वाटतं तुम्हाला ? 🤔 माझं वरचं उत्तर वाचा प्लीज आणि नीट समजून घेऊन कमेन्ट करा.. ही पद्धत समजुन घ्या. नवीन मुलींसाठी खुप उपयोगी आहे हे.. Expert सुगरणींसाठी नाही...

    • @sunitawasnik4097
      @sunitawasnik4097 3 ปีที่แล้ว +1

      @@nandiniwanjari1671 kanchan itaki particular ahe ... kharach bhandi khup nahi lagali ... pan tu.... 😋 ek mahtwacha point visaralis ... puran yantra.... saf karayala kiti vel jato .. ani tyatun kadhayache ..ghandi kami .pan puran yantracha barbat wada hoto nasta

    • @sunitawasnik4097
      @sunitawasnik4097 3 ปีที่แล้ว +1

      recipes kanchan mazya pan puran polya chan hotat .. pan navin kahi shikayala kay harkat ahe... frankly mala puran yantracha result awadato ..pan te kam zalyavar open karne ani dhune ... nako watate ... tarihi mi lagech dhute .....mi karun pahin tuzi padhdhat

  • @jayshreetillu4187
    @jayshreetillu4187 2 ปีที่แล้ว +2

    Chan easy method sangital, nanin shiknaraila ani aged women la pan kami trass. Thanks for the idea.

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 ปีที่แล้ว +1

      Thanku so much 😊
      Yes you are right.. नवीन मुलींना सोईस्कर आहे
      Always welcome !

  • @rajashreerajwade9418
    @rajashreerajwade9418 3 ปีที่แล้ว +1

    वाह सोप्पी मुलायम पोळी

  • @anaghanittur3139
    @anaghanittur3139 2 ปีที่แล้ว +1

    Tai tuzhya recipe ne me kalach Puanpoli keli hoti. Kharach khupqch soft zhali hoti.

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 ปีที่แล้ว

      अरे व्वा छान 😊👍
      Always welcome.. Stay tuned for more interesting recipes

  • @ayushhallale7585
    @ayushhallale7585 ปีที่แล้ว +1

    I made pooran poli today , stuffing is moist but once stuffed in the dough and cooked stuffing gets dry and falls down. plz suggest solution on this

  • @chhayavedpathak8148
    @chhayavedpathak8148 2 ปีที่แล้ว +1

    यांत नवीन काय दाखवलं, ही तर पारंपरिक पद्धतच आहे, फक्त मिक्सर, कुकर,मॅशर नॉनस्टिक वापरलं की नवीन पद्धत होते का?

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 ปีที่แล้ว +2

      कदाचित तुमच्यासाठी नसेल, पण इतर अनेक जणांसाठी मॅशर आणि Mixer वापरून पुरण वाटणं हे नवीन असु शकतं.. नाही का ? तुम्ही जर कमेन्ट्स वाचल्या तर तुमच्या ते लक्षात येईल..नवशिक्याच काय पण अनेक मुरलेल्या गृहिणींनाही ही पद्धत माहित नव्हती... त्यांनी सांगितलय तसं.. प्लीज बाकी कमेन्ट्स वाचा 😊🙏

  • @kirtishailendrarahalkar2788
    @kirtishailendrarahalkar2788 2 ปีที่แล้ว +1

    डाळ शिजल्यावर मिक्सर ला चं लावायची असेल तर हातानं वाटली नाही तर चालेल का?

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 ปีที่แล้ว

      गरम असतानाच वाटली तर जास्त छान वाटली जाते.. गरम डाळ mixer वर वाटता येत नाही म्हणुन आधी हातानी वाटून मग mixer वर वाटायची..

    • @kirtishailendrarahalkar2788
      @kirtishailendrarahalkar2788 2 ปีที่แล้ว

      @@KanchanBapatRecipes मी कालच्या शुक्रवारी या पध्दतीने पूरण करण्याचा प्रयत्न केला आणि आयुष्यात पहिल्यांदाच तेही लग्नानंतर कुणाच्या ही मदतीशिवाय मला चक्क पूरण करायला जमलं! कणिक मळण्याच्या बाबतीत अजून सुधारणेला वाव आहे... पण मुख्य पूरणाचा प्रयत्न अजिबात फसला नाही हे ही ( माझ्यासाठी तरी!😛) नसे थोडके!☺️ उलट आता फक्त नैवैद्य पुरतं पूर्ण न करता, अगदी रीतसर सवाष्ण घालण्याचा आत्मविश्वास ही वाटतोय!
      अर्थात याचं सगळं श्रेय फक्त आणि फक्त तुम्हाला चं जातं.😊👏👏 मनापासून धन्यवाद आणि खुप खुप शुभेच्छा!🙏👍

  • @sinfomedia8004
    @sinfomedia8004 3 ปีที่แล้ว +3

    वा छान! पुरण करायचा तरी कॉन्फिडन्स आला 😊 पुरणपोळी पण कशी करावी हे दाखवाल का?

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  3 ปีที่แล้ว +1

      That's great... Happy to read this 😊 माझा पुरणपोळीचा video आहे already चॅनलवर... Please बघा... You can ask me anything if you want

    • @lakshmivaidyanathan2254
      @lakshmivaidyanathan2254 3 ปีที่แล้ว +1

      Tya puranala maidachi kanik malun tyachi. Poli karun tyacha aath bharun band karun karun parath latun poli karaychi

    • @sinfomedia8004
      @sinfomedia8004 3 ปีที่แล้ว +1

      @@KanchanBapatRecipes पुरण मस्त जमलं आणि पोळ्याही झक्कास झाल्या... खूप खूप आभार 💐🤘

    • @sinfomedia8004
      @sinfomedia8004 3 ปีที่แล้ว

      @@lakshmivaidyanathan2254 हो, अशीच केली. पुरणाची consistency perfect जमली की पोळ्या छान जमतात हे शिकले 😊

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  3 ปีที่แล้ว

      @@sinfomedia8004 that's great... Thanks... N you are always welcome 😊

  • @Travel-Wise
    @Travel-Wise 3 ปีที่แล้ว +2

    आपल्याकडे पुरण करणे या प्रकाराचा इतका बाऊ केला गेला आहे की मी लग्नाला 13 वर्षं होऊनसुद्धा कधी पुरण करण्याच्या भानगडीत पडले नाही. पण यावेळेस सासूबाई माझ्याजवळ नसल्यामुळे मलाच करावे लागेल.
    मला एक बेसिक प्रश्न आहे की आपण डाळ मिक्सरवरून काढणारच आहोत. तर मग आधी तिला मॅश करणे गरजेचे आहे का? शिजलेली डाळ डायरेक्ट मिक्सरमधून काढली तर चालेल का?

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  3 ปีที่แล้ว

      हो बरोबर आहे... Actually जेव्हढा बाऊ केला गेलाय पुरणाचा तेव्हढं अवघड नसतं ते..
      Thanks for this question... Actually माझ्याकडुन त्याचं कारण राहिलंय सांगायचं... गरम डाळ आपण mixer वर बारीक करु शकलो तर mash करायची गरज नाही.. पण कोणताही पदार्थ थंड झाल्यावर आपण तो Mixer मधे बारिक करू शकतो.. त्यामुळे गरम असतानाच masher वापरुन डाळ बारिक केली की mixer वर छान बारिक होते...
      Mash नं करता smoothness मधे थोडा फरक पडतो..
      खुप सोप्पी रेसिपी आहे... नक्की ट्राय करून पहा आणि मला सांग पुरण कसं झालं ते 😊👍

    • @Travel-Wise
      @Travel-Wise 3 ปีที่แล้ว +1

      @@KanchanBapatRecipes पुरण जमले. :)

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  3 ปีที่แล้ว

      That's great 😊👍👍

  • @sushama4714
    @sushama4714 3 ปีที่แล้ว +1

    👌👌👌👌

  • @kirtishailendrarahalkar2788
    @kirtishailendrarahalkar2788 ปีที่แล้ว

    डाळ जितकी भिजेल तितकी चांगल असेल तर असल्या रात्री अशीच डाळ भिजत घालून दुसऱ्या दिवशी पुरण केलं तर चालते का?

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  ปีที่แล้ว

      हो चालेल.. पण जर हवा जास्त गरम असेल तर डाळ आंबू शकते.. उन्हाळ्यात हे लक्षात घेऊन डाळ भिजवा..

    • @kirtishailendrarahalkar2788
      @kirtishailendrarahalkar2788 ปีที่แล้ว +1

      मी याआधीही तुम्ही सांगितल्याप्रमाणे पूरण केलंय जे पहिल्या प्रयत्नात चं अप्रतिम दाद मिळवून गेलय. पण या वेळी माझ्या ३ वर्षांच्या बाळाची जरा किरकिर सुरू राहिल्याने वेळेची उणीव ही परिस्थिती उद्भवली. म्हणून शंका...
      तर शंका अशी आहे की, मी जिवतीच्या सवाष्ण भोजनासाठी तुम्ही सांगितल्याप्रमाणे डाळ व्यवस्थित भिजवून, कुकरला शिजवून घेतली. नंतर हाताने शक्य तितकी हटून ही घेतली. पण, हे सगळ करेपर्यंत रात्री उशीर झाला म्हणून तशीच फ्रीज मध्ये ठेवली आणि दुसऱ्या दिवशी मिक्सर ला फिरवली तर चालेल का?

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  11 หลายเดือนก่อน

      @@kirtishailendrarahalkar2788 हो चालेल ना.. No problem

  • @vaibhavdhuri3054
    @vaibhavdhuri3054 2 ปีที่แล้ว +2

    Vel khau padhdhat

  • @jayadabapat7044
    @jayadabapat7044 ปีที่แล้ว +1

    तुम्ही डाळ शिजवताना हळद घालायला सांगितली हे वाचून आश्चर्य वाटले..ब्राह्मणी पद्धतीने करताना घालत नाहीत हळद...

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  ปีที่แล้ว +1

      ब्राह्मणी पद्धत नाही आहे ही.. आपण आपल्या विचारानी काही सुधारणा करतो तसं मला ही आयडिया आल्यावर मी करून पाहिलं आणि मला ते आवडलं.. अगदी थोडी हळद असल्यामुळे रंग येतो पण वास नाही येत.. ट्राय करून बघा

  • @user-xg3sx3df5b
    @user-xg3sx3df5b 2 ปีที่แล้ว +1

    पुरण तयार झालं आहे की नाही
    हे बघण्यासाठी पुरणात डाव
    उभा करुन बघण्याची चाचणी
    मला माहित नव्हती.
    तुमच्या मुळे समजली.

  • @jaishreepatil2453
    @jaishreepatil2453 2 ปีที่แล้ว +1

    dal bhijlya mule puran la pani nahi ka sutat

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 ปีที่แล้ว

      नाही.. अजिबात नाही.. त्यामुळे छान मऊ होतं पुरण

  • @snehalwadnerkar6613
    @snehalwadnerkar6613 3 ปีที่แล้ว +2

    Majha purnat baryach vela sakhreche lumps lagtat.ase ka?

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  3 ปีที่แล้ว +1

      साखर व्यवस्थित विरघळू द्या पुरणात. गॅसवर ठेवण्यापूर्वी आधीच साखर मिक्स करून ढवळून थोडा वेळ झाकून ठेवा. नंतर गॅसवर पुरण शिजवा.
      एकदा माझ्या रेसिपीनी पुरण करून पहा..

    • @snehalwadnerkar6613
      @snehalwadnerkar6613 3 ปีที่แล้ว +1

      @@KanchanBapatRecipes thank you ho nakkich tumchi recipe follow karnar.ani kalavte.thankyou

  • @kirtishailendrarahalkar2788
    @kirtishailendrarahalkar2788 3 หลายเดือนก่อน

    ताई, यावेळी जरा गडबड झालीय. गूळ आणि साखरेचं प्रमाण जास्त पडलय आणि त्यामुळं गॅस वर खूप वेळ ठेऊन ही पुरण गोळा होत नाहीये. आता काय करू?🙄

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  3 หลายเดือนก่อน

      गॅस बंद करून ठेवा.. पुरण थंड झाल्यावर गोळा होईल.. साखर जास्त झाल्यावर गरम असतांना पुरण पातळ वाटतं...
      थंड झाल्यावरही गोळा नाही झालं तर परत सांगा.. मी सांगते काय करायचं ते

  • @ashabonde134
    @ashabonde134 3 ปีที่แล้ว +2

    Hi khoopch kathin padhati ahe. Shivay ashya prakare puranchi chav far kahi changli lagat nahi. Mi karun pahiley ase puran.Aapli junich padhat changali. Yala vel pan ani bhandi pan khoop lagtat. This is not a smart way of cooking puran.

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  3 ปีที่แล้ว

      तुम्ही exactly माझ्या पद्धतीने पुरण करुन पहा आणि मला सांगा हे कठिण वाटतं की सोप्प... तुम्ही ज्या भांड्यात पुरण शिजवणार त्यातच डाळ भिजवू शकता...
      Masher शिवाय कोणती भांडी जास्त लागतात सांगा बरं...
      आणि त्याशिवाय तुम्हाला जुनी पद्धत आवडत असेल तर तर तुम्ही तीच वापरु शकता..
      Thanks for watching my channel 👍

  • @sandhyabhelande7701
    @sandhyabhelande7701 3 ปีที่แล้ว +1

    Please show your self too

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  3 ปีที่แล้ว

      😊 Sure... कधितरी नक्की तसा video करेन

    • @madhurikulkarni9498
      @madhurikulkarni9498 3 ปีที่แล้ว

      Pn ase puran kelyas chavimadhe, aani puranpoli disnyat farak padati experiment kele aahe

  • @surekhanikude8958
    @surekhanikude8958 2 ปีที่แล้ว +1

    don't use plastic spatula

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 ปีที่แล้ว

      I know.. पण खुप सोयीचा आहे.. फक्त shooting साठी वापरते 🙏

    • @janhavinikam7054
      @janhavinikam7054 2 ปีที่แล้ว +1

      It's not made of plastic. It's made of silicone.