कथा- ओघळ | लेखक- सुभाष तोंडोळकर | अभिवचिका- स्वाती कर्वे कोल्हटकर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
  • कथा- ओघळ | लेखक- सुभाष तोंडोळकर | अभिवचिका- स्वाती कर्वे कोल्हटकर
    .
    .
    .
    लेखक- सुभाष तोंडोळकर.
    अभिवाचीका- स्वाती कर्वे कोल्हटकर
    भाषा संवर्धन- सुनिता तोंडोळकर
    संकलन- शुभम गोसावी
    .
    .
    .
    कथा - " ओघळ "
    काय झालं कळलंच नाही पण श्रीमंत माणसांचा देता हात आखडता झाला नी पुन्हा ती अनाथआश्रमातून रस्त्यावर आली.
    भूकेलीच होती ती माहित नाही किती दिवसांपासून ?
    शरीरात त्राण होतेच कुठे बसली होती एका पडक्या भिंतीला टेकून.
    कसा कुणास ठाऊक एकातील देव जागा झाला नी कुठल्यातरी श्रीमंत हाताने तिच्या हातात भरलेलं ताट आलं.तिने फक्त देणारे हात बघितले नी आघाशा सारखी तुटुन पडली. तिला पाणी पिण्याचे साधं भान ही नाही राहीलं तृप्तीचा हुंकार येईपर्यंत.
    आताशा कुठे तिने वर पाहिले चेहरा थोडा ओळखीचा वाटला
    अजुन जरा निरखून पाहिलं मात्र हो हा तोच तर होता
    तिच्या पदराखाली मोठा झालेला श्यामच तो.काही वर्षापूर्वी तिला अनाथाश्रमात सोडून गेलेला
    त्याची पूर्ण ओळख पटताच भरल्या डबडबलेल्या डोळ्याने फक्त इतकंच म्हणाली
    " किती वाळलास रे लेकरा,फार आबाळ नाही ना रे झाली
    माझ्या माघारी ? "
    काही क्षणच उभा असलेला तो थोड्याशा त्राग्यानेच म्हणाला
    " कुठल्या कुठल्या रस्त्यावर शोधावं लागलं गं माय तुला ?
    आज मातृदिन होता ना ,बरं येतो माय "
    म्हणत लगबगीने चारचाकीत निघूनही गेला तिचे अश्रू ओधळण्या अगोदर .
    कमालीच्या व्याकूळतेने ती इतकंच पुटपुटली ----
    " खूप थोपवून ठेवलेलं काळजातल एका क्षणात कसं बाहेर येतं
    ना ? "
    (मूठभर सब्दांची पसाभर कथा )
    सुभाष मधुकरराव तोंडोळकर /छत्रपती संभाजीनगर.
    Mo-9595611161
    .
    .
    .
    #marathi #marathikatha #youtube #marathikavita #explorepage #subhashtondolkar #marathikavya
    #bhaukkatha #aaibaba #vastavachishokankika#reality

ความคิดเห็น • 5

  • @omkarkarve3772
    @omkarkarve3772 2 หลายเดือนก่อน +3

    हृदयस्पर्शी कथा आणि सुंदर प्रस्तुती स्वाती यांची👌👏

  • @ShubhaKarve
    @ShubhaKarve 2 หลายเดือนก่อน +1

    Swati far surekh sadri karan kelas Khup khup abhinandan ❤🎉

  • @SangitaKulkarni-j8c
    @SangitaKulkarni-j8c 2 หลายเดือนก่อน +1

    विचार करायला लावणारी कथा. स्वातीचे सादरीकरण उत्तमच

  • @aratigupte4411
    @aratigupte4411 2 หลายเดือนก่อน +1

    अतिशय मन हेलावून टाकणारी भावस्पर्शी कथा आणि तितकेच सुरेख सादरीकरण हा दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल. सुभाष जी आणि स्वाती, आपल्या दोघांचे ही मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा🌹🌹🌹

  • @SubhashTondolkar
    @SubhashTondolkar  2 หลายเดือนก่อน

    स्वातीजी----
    अभिवाचन छान केलं
    सहकार्या बद्दल मनापासून धन्यवाद.