कर्म व मृत्यू यांचे रहस्य - The mystery of Karma & death

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ต.ค. 2024
  • 'कर्म' हा आशयघन असा संस्कृत शब्द अलीकडच्या काळात पुन्हा एकदा सर्वपरिचित झालाय. तसेच मृत्यू हा शब्द सोबत भीती व गूढता घेऊन येतो. या दोन्हीही संज्ञा तसे पाहिले तर सामान्य लोकांना रहस्यमय भासतात. अलीकडेच दिनांक २८ जानेवारी २०२३ रोजी पुण्यातील बाणेर येथील परांजपे स्किम्स यांच्या 'अथश्री' या ज्येष्ठ नागरिक वसाहतीमध्ये श्रीमती अमृता चांदोरकर यांचे याच विषयावर व्याख्यान झाले.
    व्याख्यानाचा केंद्रबिंदू होता मृत्यू व कर्म. साधारण १३० ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत झालेल्या या व्याख्यानात श्रीमती चांदोरकर म्हणाल्या, “भारतीय परंपरेत मानवी जीवनाचे सार म्हणजे कर्म असे म्हणता येईल. आपले विचार, भावना व कृती आणि पुढे जाऊन त्यांचे होणारे चांगले-वाईट परिणाम म्हणजेच आपले कर्म. सूक्ष्म असलेला आत्मा हा अमर असून तो प्रत्येक जन्मात नवे शरीररूपी वस्त्र परिधान करतो, हे वैश्विक सत्य किंवा रुत भारतीय परंपरेत प्रतिपादित केलेले आहे. आपल्या आत्ताच्या जन्मातील कर्मावरून ठरते की आपला पुढील जन्म व त्यातील अनुभव कसे असतील? म्हणजेच आपले आजचे कर्म हे खरेतर पुढील वाटचालीची गुंतवणूक असते. म्हणूनच संपूर्ण लक्ष कर्मावर केंद्रित केल्यास तात्कालिक आनंद व समाधान तर मिळेलच, पण पुढच्या अनंत प्रवासाची पायाभरणीसुद्धा होईल.”
    उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना सदर व्याख्यान अतिशय भावले. अथश्री वसाहतीतर्फे सौ. चांदोरकर यांचा सत्कार करून त्यांना गौरविण्यात आले. व्याख्यानासोबतच सर्वांनी श्रीमती चांदोरकर यांच्याबरोबर केलेले ध्यान अतिशय उपयुक्त ठरले. सत्राच्या शेवटी झालेली प्रश्नोत्तरे सर्वांसाठी उद्बोधक होती. एकंदरीतच भारतीय तत्त्वज्ञानातील लाखमोलाचे विचार हे ज्येष्ठ नागरिकांना अंतर्मुख करीत स्फूर्तिदायी आणि मानवी जीवनाचे व्यापक ध्येय व स्वरूप उलगडवून दाखविणारे ठरले!
    -----
    The mystery of Karma & death
    The profound Samskrut word Karma has once again become popular in the present times. Similarly, the word death brings with it fear and suspense. Normally the common man finds both these terms mysterious. Smt. Amruta Chandorkar recently delivered a lecture at the Athashri senior citizens’ complex by Paranjape Schemes in Baner in Pune on 28th January 2023.
    The focal point of the lecture was Karma and death. Speaking in the presence of about 130 senior citizens, Smt. Chandorkar said, “One can say that Karma is the crux of human life according to Indian tradition. The universal fact that the individual consciousness is immortal and dons new clothes in the form of the body in every birth has been propounded in the Indian tradition. Our deeds in the present birth decide the nature of our next birth and the experiences therein. Thus, our present deeds are in a way the investment for our future journey. Hence, if one focuses the entire attention on the task on hand, it will not only give contentment and bliss in the moment; but also lay the foundation of the long journey ahead.”
    The lecture was well received by the senior citizens. Mrs. Chandorkar was honoured on behalf of the Athashri complex. Along with the lecture, the Dhyan session with Smt. Chandorkar also proved useful. The Q&A session at the end was indeed enlightening for all. In short, the gems of wisdom from the Indian philosophy made the seniors introspect and also inspired them, while also unraveling the larger goal and nature of human life.
    #mystery #karma #death
    अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
    Website : niraamay.com/
    Facebook : / niraamay
    Instagram : / niraamaywellness
    Telegram : t.me/niraamay
    Subscribe - / niraamayconsultancy
    --------
    Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.

ความคิดเห็น • 253

  • @mainaDamale
    @mainaDamale 6 หลายเดือนก่อน +2

    खुप छान बोलणं आणि आवाज 👌👌🙏🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  6 หลายเดือนก่อน

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @shailendrapatil7111
    @shailendrapatil7111 ปีที่แล้ว +1

    🌻 🙏🌻गुरु माऊलीस कोटी कोटी प्रणाम🌻 🙏🌻

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  ปีที่แล้ว

      🙏🙏🙏

    • @pushpalatakarande5123
      @pushpalatakarande5123 ปีที่แล้ว +1

      खूप छान वाटतंय खुप सार्‍या शुभेच्छा

    • @sujatanatu421
      @sujatanatu421 7 หลายเดือนก่อน

      षयययययरररफफ​@@NiraamayWellnessCenter

  • @sudhakarkamble-rx7mt
    @sudhakarkamble-rx7mt 2 หลายเดือนก่อน

    तथागत भगवान बुद्धाचा शिष्य पतंजली होता !
    मॅडम आपला खूप खुप आभारी आहे मी
    एवढ ज्ञान दिलेत मनापासून धन्यवाद !

  • @shailajadeshmukh5385
    @shailajadeshmukh5385 ปีที่แล้ว +5

    हे व्याख्यान ऐकून खूप शिकायला मिळाले, योग्य ज्ञान मिळाले, समाधान वाटले.मी स्वतः पूर्ण पणे प्रामाणिक प्रयत्न करणार आहे;करत आहे स्व ला बदलण्यासाठी.आपण जी मेहनत घेऊन हे बोधामृत आम्हाला दिलेत त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद! 🙏 🌷🌷

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  ปีที่แล้ว +1

      मनःपूर्वक आभार 🙏,
      तुमचे हे प्रोत्साहन आम्हाला पुढील कामासाठी उर्जा देऊन जाते. तुम्ही केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांचा आणि त्यामुळे तुमच्यामध्ये होणाऱ्या सकारात्मक बदलाचा आपला अनुभव जरूर कळवा.
      धन्यवाद 🙏.

    • @deepaj6471
      @deepaj6471 ปีที่แล้ว

      ​@NiraamayWellnessCenter

  • @jyotigawande1385
    @jyotigawande1385 ปีที่แล้ว +1

    खूप अभ्यास पूर्वक व्याख्यान मनापासून धन्यवाद

  • @radhaagare4240
    @radhaagare4240 ปีที่แล้ว

    तुम्ही खूप छान विचार सांगितले आहेत धन्यवाद तुम्हाला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🌹🙏🙏🙏🌺🌹

  • @AnitaShedge-uj3mp
    @AnitaShedge-uj3mp 2 หลายเดือนก่อน

    अति सुंदर

  • @sharmishthajadhav4194
    @sharmishthajadhav4194 ปีที่แล้ว +4

    आपणं खूप छान बोलता माहिती देता तेही अगदी सहज सोप्या पद्धतीने हा आपला आज वरचा आणुभव आहे तोच अनुभव इतकी समाजाप्रती आस्ता दाखवते आहे

  • @vishakhakulkarni1360
    @vishakhakulkarni1360 ปีที่แล้ว +5

    अमृता ताई खुप मनापासून आभार . आजचे व्याख्यान खुप उर्जात्मक झाले. मृत्यू बद्दलचा सकारात्मक विचार , प्रत्येक गोष्टीला लागणारे कर्म
    तसेच स्वताच्या शरीराबद्दलची कृतद्यता उत्तम सांगितले .
    मी तुमचे प्रत्येक युट्यूब वरचे भाग बघते व त्याप्रमाणे आचरणात आणण्याचा मनापासून प्रयत्न करते.
    खुप धन्यवाद 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद 🙏 ,
      आपले आजचे कर्म हे खरेतर पुढील वाटचालीची गुंतवणूक असते. म्हणूनच संपूर्ण लक्ष कर्मावर केंद्रित केल्यास तात्कालिक आनंद व समाधान तर मिळेलच, पण पुढच्या अनंत प्रवासाची पायाभरणीसुद्धा होईल.”
      आपण युट्यूब वरचे भाग बघून व त्याप्रमाणे आचरणात आणण्याचा मनापासून प्रयत्न करत आहात हे तर खूपच छान.
      कुठलीही क्रिया हि सातत्य , संयम , ठेऊन केल्यास त्याचे आवश्यक फायदे मिळू लागतात.

    • @shubhangitapaswi542
      @shubhangitapaswi542 ปีที่แล้ว

      अमृता ताई नमस्कार,
      खूप सुंदर विवेचन करता तुम्ही.
      धन्यवाद.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  ปีที่แล้ว

      🙏 🙏

    • @anantnimkar958
      @anantnimkar958 ปีที่แล้ว

      असाध्य ते साध्य करीता सायास ठेवावे लागते सातत्य निम्या (मी) म्हणे.😅

  • @deepadeshpande4013
    @deepadeshpande4013 11 หลายเดือนก่อน

    नमस्कार मॅडम खुपच छान आहे व्याख्यान ऐकतच राहाव वाटल खुपच छान समजाऊन सांगता धन्यवाद

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  11 หลายเดือนก่อน

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @mukunddeshpande3837
    @mukunddeshpande3837 ปีที่แล้ว +4

    अमृता ताई, आपलें व्याख्यान नेहमीच अभ्यासपूर्ण आणि श्रवणीय असते. त्यामुळे तें मीं नेहमीच आवडीने ऐकत असतो.

  • @subhashlomte2322
    @subhashlomte2322 ปีที่แล้ว

    खुप सुंदर विचार आहेत ताई, आपला शब्द न शब्द खरा आहे, हे सर्व प्रकृतीचे नियंम आपण खुप सुंदर पद्धतीने सांगितले. माझा वक्तीगत अनुभव सुद्धा असाच आहे. संधी मिळाली तर अवश्य आपल्याला भेटेन. खुप खुप धन्यवाद!!

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  ปีที่แล้ว

      मनःपूर्वक आभार 🙏 .
      अवश्य भेटू शकतो.
      Appointment साठी पुढील संपर्क क्रमांकावर संपर्क करावा.
      Contact : 020-67475050, 9730822227.
      Website : www.niraamay.com

  • @devikakelkartravels3432
    @devikakelkartravels3432 ปีที่แล้ว +1

    खुप छान... अतिशय सोप्प्या भाषेत सांगितले आणी खुप महत्वापूर्ण.. छोटया छोटया गोष्टी आहेत पण त्याच लक्षात आल्या नाहीत... पण आज ताईंमुळे खुप नवीन गोष्टी कळल्या... खुप खुप धन्यवाद 🙏

  • @sunandadeokar2509
    @sunandadeokar2509 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती मिळाली,मनाला positive energy मिळाली,परत परत ऐकावे असा संवाद

  • @sumanputhran5107
    @sumanputhran5107 ปีที่แล้ว

    Khup Chan bollatay. Madam. Khup khup Dhyanywad. 💐🙏👌

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  ปีที่แล้ว

      मनःपूर्वक आभार 🙏.
      आपले आजचे कर्म हे खरेतर पुढील वाटचालीची गुंतवणूक असते. म्हणूनच संपूर्ण लक्ष कर्मावर केंद्रित केल्यास तात्कालिक आनंद व समाधान तर मिळेलच, पण पुढच्या अनंत प्रवासाची पायाभरणीसुद्धा होईल.”

  • @pramilasawant6030
    @pramilasawant6030 ปีที่แล้ว

    तुमचे बोलणे, तुमचे चेहेऱ्यावर चे हावभाव, तुमचे समजावणे, तुमच्या हातानची क्रिया, तुमचे हसणे, तुमचे सुंदर दात, सगळं सगळं विलक्षण विलोभनीय आहे. मला खूप छान वाटले. आणि ज्ञान हे मुख्य. खूप आश्चर्यजनक सत्य कळलं. ताई अनेक शुभेच्छा. खूप खूप आभार ताई.

  • @pratimagajare5257
    @pratimagajare5257 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद ताई

  • @deepalishinde648
    @deepalishinde648 ปีที่แล้ว

    Khup chan margdarshan tai

  • @sharmilakadam4964
    @sharmilakadam4964 ปีที่แล้ว

    नमस्कार , मॅडम
    खूप खूप छान सुंदर ऐकतच रहावं तुमचं संभाषण संपूच नये असं वाटत होतं तुमचे किती आभार मानले तरीही कमीच होतील
    धन्यवाद, धन्यवाद धन्यवाद

  • @suvarnaphalke4687
    @suvarnaphalke4687 ปีที่แล้ว +2

    Dhanyavad madam tumchya mule samjle ya dehach mahtv....Ani mrutuv kiti changla ahe .....👍🙏😊

  • @ashwinigidh2524
    @ashwinigidh2524 ปีที่แล้ว +1

    Tai sunder ukal,kharach tumhi khup sunder margdarshan agadi sopya shabdat mandata, tumache khup khup abhar

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  ปีที่แล้ว

      खूप खूप आभार 🙏,
      आपले आजचे कर्म हे खरेतर पुढील वाटचालीची गुंतवणूक असते. म्हणूनच संपूर्ण लक्ष कर्मावर केंद्रित केल्यास तात्कालिक आनंद व समाधान तर मिळेलच, पण पुढच्या अनंत प्रवासाची पायाभरणीसुद्धा होईल.”
      निरामय You Tube channel subscribe करून नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा.

  • @sulabhasawargaonkar314
    @sulabhasawargaonkar314 ปีที่แล้ว

    🙏🙏Madam khuch chan sangta. Apratim 👌👌👍👍

  • @rameshkolhe679
    @rameshkolhe679 ปีที่แล้ว

    ताई फारच सुन्दर ज्ञान दिले

  • @sarojdeore852
    @sarojdeore852 ปีที่แล้ว

    एक तासाचा व्हिडिओ ऐकताना, मला लहान पणा पासून आज पर्यंत स्वतःचेच आयुष्य डोळ्यासमोर
    उभं राहिलं.सुख दुःख आठवलं पण त्यात नेमकं आपल्या हातातून काय निसटले ह्याची जाणीव झाली.
    मंत्रमुग्ध करणारे वक्तव्य करून तुम्ही खुप छान ज्ञान दिले . यास्तव तुमचे मनापासून आभार.💐🙏
    आपली कृपाभिलाषी 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  ปีที่แล้ว +1

      मनःपूर्वक आभार 🙏 .
      आपले आजचे कर्म हे खरेतर पुढील वाटचालीची गुंतवणूक असते. म्हणूनच संपूर्ण लक्ष कर्मावर केंद्रित केल्यास तात्कालिक आनंद व समाधान तर मिळेलच, पण पुढच्या अनंत प्रवासाची पायाभरणीसुद्धा होईल.”

  • @asmitaloke4880
    @asmitaloke4880 ปีที่แล้ว

    व्याख्यान खूप सुंदर,पण पूर्ण हवे होते,अपूर्ण आहे🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  ปีที่แล้ว

      लवकरच पुढील भाग आपल्यासमोर प्रक्षेपित होईल .
      धन्यवाद 🙏

  • @alkagore5252
    @alkagore5252 ปีที่แล้ว

    अमृताताई खूप खूप अभ्यासपूर्ण आणि सोप्या भाषेत सांगितले. मला तर तुमच्या उपचार पद्धतीचा खूपच उपयोग होत आहे. प्रत्येक गोष्टीकडे घटनेकडे सकारात्मक पण अलिप्त वृत्तीने पहायला जमू लागले आहे. 🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  ปีที่แล้ว

      नमस्कार,
      आपणास निरामय उपचार पद्धतीचा लाभ होत आहे. फारच छान! तुम्ही सकारात्मक आहात तसेच तुमची ग्रहणशीलता चांगली आहे. त्यामुळे शरीराकडून सुरेख प्रतिसाद मिळत आहे. नियमित स्वयंपूर्ण उपचार घ्या आणि पूर्णपणे बरे व्हा. मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @nilimakulkarni797
    @nilimakulkarni797 ปีที่แล้ว +1

    कर्म व मृत्यू या कार्याबद्दल खूप छान माहिती मिळाली धन्यवाद देते स्वता मद्दल कृतज्ञता व्यक्त करावी आणी हे खर आहे 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  ปีที่แล้ว

      होय नक्कीच, स्वता बद्दल कृतज्ञता व्यक्त करावी .रामरक्षा स्तोत्रात ह्याच शरीराचे आभार मानलेले आहेत. शरीराविषयी कृतज्ञता-आभार मानण्याची ही प्रक्रिया म्हणजेच ध्यानाची पहिली पायरी. जी आपण जाणून घेऊन करायला हवी. त्यातून ध्यानही साधेल आणि शरीर व मन प्रसन्न व निरोगी राहील.
      मनःपूर्वक आभार 🙏.

  • @vijayaraskar3191
    @vijayaraskar3191 2 หลายเดือนก่อน

    धन्यवाद

  • @kishorghumade879
    @kishorghumade879 ปีที่แล้ว +2

    आजच्या काळात निरामय जीवन जगण्यासाठी आवश्यक आहे. सुंदर मार्गदर्शन केले 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  ปีที่แล้ว +1

      नमस्कार,
      निरामय म्हणजे दोषविरहित स्थिती. आपले विचार, भावना व कृती आणि पुढे जाऊन त्यांचे होणारे चांगले-वाईट परिणाम म्हणजेच आपले कर्म. आपले आजचे कर्म हे खरेतर पुढील वाटचालीची गुंतवणूक असते. म्हणूनच संपूर्ण लक्ष कर्मावर केंद्रित केल्यास तात्कालिक आनंद व समाधान तर मिळेलच, पण पुढच्या अनंत प्रवासाची पायाभरणीसुद्धा होईल.” शरीरात आजार उत्पन्न करणाऱ्या नकारात्मक ऊर्जेचा स्वयंपूर्ण उपचारांद्वारे संपूर्ण निचरा करता येतो.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @anupamakulkarni8720
    @anupamakulkarni8720 ปีที่แล้ว

    निरामय वेलनेस सेंटर.. खुप छान माहिती सांगितलीत. एकदा निरामय सेंटरमध्ये दाखल होईन.
    आत्मानंद धन्यवाद.!!!
    💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐99

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  ปีที่แล้ว +1

      खूप खूप आभार 🙏.
      अवश्य भेट द्या निरामय परिवारात आपले स्वागतच असेल .

  • @DipakMore-yo7bl
    @DipakMore-yo7bl ปีที่แล้ว

    प्रत्येक जीवन सुंदर व यशस्वी होण्याचा मूलमंत्र एक नवनिर्माणाची ऊर्जा वृत्ती प्रत्येक अंतकरण यामध्ये धारण करण्यासाठी व प्रस्थापित होण्यासाठी ताई आपण साध्या सोप्या शब्दात व उदाहरणांच्या साहाय्याने स्व ची ओळख करून दिली त्याबद्दल लक्ष लक्ष धन्यवाद

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  ปีที่แล้ว

      नमस्कार,
      तुमचे हे प्रोत्साहन आम्हाला पुढील कामासाठी उर्जा देऊन जाते. धन्यवाद 🙏

  • @rajendrakolvankar6187
    @rajendrakolvankar6187 ปีที่แล้ว +1

    सामाजिक बाधिंलकीची तळमळ, नेहमी सारखच आपण खुप छान माग्दशन केलय . 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  ปีที่แล้ว

      मनःपूर्वक आभार 🙏 .
      तुमचे हे प्रोत्साहन आम्हाला पुढील कामासाठी उर्जा देऊन जाते.

  • @vaishalidesai7695
    @vaishalidesai7695 ปีที่แล้ว +2

    छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद मॅडम🙏🙏❤🌹

  • @prblocks9003
    @prblocks9003 ปีที่แล้ว

    Thank I tai.khup chan sangitlay.self confidence. 🎉🎉.

  • @seemakulkarni1438
    @seemakulkarni1438 ปีที่แล้ว +1

    खूप खूप छान, सुंदर, सकारात्मक मार्गदर्शन
    मनापासून धन्यवाद ताई 🙏😊
    👌👌👍👍👏👏✌️✌️🙏🌹❣️💞

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  ปีที่แล้ว

      खूप खूप आभार 🙏.
      निरामयचे इतरही सर्व व्हिडीओ पहाआणि इतरांना देखील शेअर करा.

  • @priyadongre5047
    @priyadongre5047 ปีที่แล้ว

    Dhanywad tai 🙏
    Khup simple words . Sarav karate .🌹

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  ปีที่แล้ว

      खूप खूप आभार🙏
      अर्थ समजून उत्सव साजरे करण्यासाठी सदर मालिका बघत राहा व आपल्या परिचयातील तमाम भारतीयांना नक्की पाठवा.

  • @kavitakale7986
    @kavitakale7986 ปีที่แล้ว +9

    शरीराला , लिव्हिंग,non living things la gratitude , dhanyavad दिल्यास कोणतेच आजार जवळ पास सुद्धा येत नाहीं ❤ forgiveness & Gratitude is the best medicine

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  ปีที่แล้ว +3

      नमस्कार,
      आपल्या शरीराविषयी कृतज्ञता व्यक्त करायला हवी. आपल्या सगळ्या आज्ञा शरीरातील सांध्यामध्ये नाड्यांमध्ये साठत असतात. त्या पूर्ण झाल्या नाहीत तर दोष-आजार निर्माण होतात. दुखणारा हात किंवा दुखणारा गुडघ्यावर प्रेमानं हात फिरवा. सर्व काही तुमच्यासाठी सुरू आहे असं म्हणून बघा, तुमची रिकव्हरी निश्‍चितच जलदगतीने होईल असेही करून पाहू शकता. हे शरीर आपल्याला जे हवं ते सारं मिळवून देतं. त्यासाठी ते सतत कष्ट करत असतं. त्याचा मोबदला म्हणून हि कृतज्ञता व्यक्त करायला हवी.
      शरीराला व मनाला शांती देणारी ध्यान प्रक्रिया जाणून घेण्यासाठी पुढील व्हिडीओ जरूर पाहा आणि इतरांनाही शेअर करा.
      th-cam.com/video/wP-EDtNgd2Q/w-d-xo.html

    • @kavitakale7986
      @kavitakale7986 ปีที่แล้ว

      Dhanyavad WITH Gratitude

    • @CVVinde
      @CVVinde ปีที่แล้ว

      Vah chan aaplya jivnshilee karita khup. Upayukt.

  • @pallavighanekar9279
    @pallavighanekar9279 ปีที่แล้ว +1

    Khup Sundar tai thank you so much🙏🤩

  • @varshakhude3757
    @varshakhude3757 ปีที่แล้ว

    लब यू जिंदगी, आणि धन्यवाद 💓💓🎉🎉,🙏🙏

  • @sharadbhalerao6568
    @sharadbhalerao6568 ปีที่แล้ว

    Apratim shabda suchat nahit

  • @sangitagadekar1492
    @sangitagadekar1492 ปีที่แล้ว

    Khup Chan vatle mam

  • @sarikagalange5111
    @sarikagalange5111 ปีที่แล้ว

    Khup chhan mahiti sangitli madam, dhanyawad

  • @varshakulkarni1525
    @varshakulkarni1525 ปีที่แล้ว

    Khup chhan.Dhanyawad.

  • @shubhangiyewale5033
    @shubhangiyewale5033 ปีที่แล้ว

    धन्यवाद धन्यवाद धन्यवाद मॅडम तुम्ही सांगितलेले सगळया गोष्टी मी प्रयत्न पूर्वक करत आहे आणि मला जे हवं आहे ते नक्कीच मिळेल हया बद्दल मला पूर्ण खात्री आहे. हे सर्व तुमच्या मुळे शक्य झाले आहे. खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  ปีที่แล้ว

      वा! खूपच छान. नियमित असेच सकारात्मक विचारांनी उर्जित राहा .
      निरामय TH-cam channel वरील इतरही भाग बघत राहा आणि इतरांनादेखील शेअर करा आणि हो आपला अनुभव आम्हाला जरूर कळवा.
      धन्यवाद 🙏

    • @vaishalizombade9110
      @vaishalizombade9110 10 หลายเดือนก่อน

      ​@@NiraamayWellnessCenter❤❤❤

  • @prachibehere1074
    @prachibehere1074 7 หลายเดือนก่อน +1

    टाकाऊ गोष्टी टाकल्या जात नाहीत. जळवेसारख्या चिकटून राहतात. खरच या गेल्या तर जीवन खूप सुंदर होईल. ओघवती वाणी ऐकत रहावेसे वाटते.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  7 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏,
      You Tube Channel वरील निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.

  • @ManjiriShembekar-ku1el
    @ManjiriShembekar-ku1el ปีที่แล้ว

    फारच सुंदर विवेचन ताई

  • @anitapatkar6590
    @anitapatkar6590 ปีที่แล้ว

    Chaan vivechan

  • @shraddhaphodkar3375
    @shraddhaphodkar3375 ปีที่แล้ว

    Madam खूपच छान वाटलं.
    माझे विचार तुम्ही सांगितलेल्या विचाराशी मिळतेजुळते आहेत त्यामुळे मी हा देह कशासाठी धारण केलंय हेच कळत नाही सारखं वाटत हा प्रपंच सोडून शांत एकांतात बसुन ध्यान करावे पण हे रहाटगाडगे ओढताना माझ्यासाठी वेळ नसतो आणि त्यामुळे सारखी चिडचिड होते मन बेचैन असतं काय करावे सर्व.सोडून दूर जावे कुठेतरी धार्मिक स्थळावर जावे असे वाटते काय करावे अशा वेळी

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  ปีที่แล้ว

      नमस्कार,
      विहित कर्तव्यांकडे पाठ फिरवून , एकांतात जाऊन ध्यान साधना व ईश्वर चिंतन करणे हा एक प्रकारे पलायनवादच आहे . संसारातील सर्व कर्तव्ये पूर्ण झाली असल्यास कुटुंबियांना न दुखावता एकांत साधना करणे योग्य ठरेल. मात्र ती शिल्लक असल्यास कर्तव्यपूर्ती करीत त्यामागे ईश्वर सेवेची भावना ठेवणे व अखंड नामस्मरण करणे हेच अधिक इष्ट आहे. कर्मभोग बाकी असेल तर एकांतामध्ये जाऊनही रहाटगाडगे चुकवता येत नाही .

  • @urmilaapte9853
    @urmilaapte9853 ปีที่แล้ว

    अमृता ताई तुमचं दिसणं आणि आवाज ऊर्मिला कानिटकर-कोठारे सारखा आहे1. अगदी बहिणी शोभाल इतकं साम्य आहे... की खरंच आहात बहिणी ❤🎉

  • @svdeodhar6764
    @svdeodhar6764 ปีที่แล้ว +1

    खूप छान,खूप छान सांगता.

  • @pramodshinde5075
    @pramodshinde5075 ปีที่แล้ว +2

    Good information 🙏🙏

  • @swatioak9966
    @swatioak9966 ปีที่แล้ว

    🙏 श्रीराम 🙏 🙏 अप्रतिम

  • @anantdhekane6598
    @anantdhekane6598 ปีที่แล้ว

    खूप छान! मनापासून धन्यवाद 🙏

  • @mamtapawar2452
    @mamtapawar2452 ปีที่แล้ว +3

    Keep Chan mahiti

  • @prabhakarmarodkar5574
    @prabhakarmarodkar5574 ปีที่แล้ว

    🙏☘️👌🚩💫🌺05/23धन्यवाद महोदय नमस्कार

  • @ulkaalawani7709
    @ulkaalawani7709 ปีที่แล้ว

    खुप सुंदर माहिती.धन्यवाद ताई🙏🙏

  • @nalkurganapathiprabhu9255
    @nalkurganapathiprabhu9255 ปีที่แล้ว

    Nicely explained. Dhanyavad 🙏

  • @swatighodake2034
    @swatighodake2034 ปีที่แล้ว +5

    Mam your work is excellent proud of you

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  ปีที่แล้ว

      Thank you so much. 🙏
      our present deeds are in a way the investment for our future journey. Hence, if one focuses the entire attention on the task on hand, it will not only give contentment and bliss in the moment; but also lay the foundation of the long journey ahead.”

  • @shraddhakutekar7635
    @shraddhakutekar7635 ปีที่แล้ว

    Khup chan madam

  • @jyotibhosale5268
    @jyotibhosale5268 ปีที่แล้ว

    धन्यवाद🙏🙏

  • @suvarnavelankar7357
    @suvarnavelankar7357 ปีที่แล้ว

    सुंदर विवेचन.धन्यवाद

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  ปีที่แล้ว

      खूप खूप आभार 🙏

    • @vaibhavikanade5836
      @vaibhavikanade5836 ปีที่แล้ว

      Madam you are great
      मला एक शंका आहे की प्रत्येकाचा आत्मा वेगवेगळा असतो का आणि असेल तर अनेक आत्मे आहेत का अस्तित्वात .काही समजत नाही 😮

    • @madahviballal469
      @madahviballal469 ปีที่แล้ว

      खुप सुंदर उद्बोबोधन. धन्यवाद. 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  ปีที่แล้ว

      नमस्कार,
      प्रत्येकाचा आत्मा वेगवेगळा असतो. अनेक आत्मे अस्तित्वात आहे.
      विश्वात्मा एकाच आहे. त्याचा आपण एक भाग आहे . जसे डाळिंब हे एक उत्तम उदाहरण आहे जणू डाळिंब यामध्ये असंख्य दाणे असतात. सगळं मिळून डाळिंब होते . परमात्मा हा डाळिंबाप्रमाणे मानूयात पण त्यातला प्रत्येक दाणा स्वतंत्र आहे . त्या प्रत्येक दाण्याला स्वत:ची चव आहे स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व आहे पण असे असले तरी तो एक डाळिंबाचा दाणा आहे आणि आपण (आत्मा) एक दाणा आहे .

  • @aratishindholkar4239
    @aratishindholkar4239 ปีที่แล้ว +1

    Really Madam nice information! ❤

  • @anjalibhave3303
    @anjalibhave3303 ปีที่แล้ว

    ' Panchi Karan ' Vishay uttam prakare samajavun dila aahe. Khup khup dhanyavad.

  • @amrutapunde2813
    @amrutapunde2813 ปีที่แล้ว +2

    खूप छान 🙏🏼

  • @swatikoranne6274
    @swatikoranne6274 8 หลายเดือนก่อน

    व्याख्यान अर्धवट बंद केले आहे, तरी पूर्ण करावे, ही विनंती

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  8 หลายเดือนก่อน

      नमस्कार,
      आपण उर्वरित भाग पुढील लिंकवर क्लिक करून पाहू शकता.
      आयुष्य सार्थकी लावण्यासाठी ध्यान व मनाची स्वच्छता आवश्यक - th-cam.com/video/0SAIWPoBV4g/w-d-xo.html

  • @govindbhoir4249
    @govindbhoir4249 ปีที่แล้ว

    खूप च छान

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏.
      निरामयचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.

  • @rekhadawand2178
    @rekhadawand2178 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏👌👌👌 Thank you madam

  • @deepachandorkar7868
    @deepachandorkar7868 2 หลายเดือนก่อน

    मला डायबेटिस आहे मनात वाईट विचार येतात त्याबद्दल मी प्रश्नः विचार रलि त्यांचे उत्तर मीळले नाही ते कसे मिळेल

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार,
      डायबेटिस आहे व मनात वाईट विचार येत असतील तर आपण स्वयंपूर्ण उपचारांचा लाभ घ्यावा. स्वयंपूर्ण उपचार हे निसर्गोपचार व योगशास्त्रावर आधारित आहेत. स्वयंपूर्ण उपचार रुग्णांच्या शरीर, मन व ऊर्जा या ३ स्तरांवर काम करते , पंचतत्त्वे व सप्तचक्रे यांच्या संतुलनातून दूरस्थ पद्धतीने दिल्या जाणाऱ्या या विना स्पर्श, विना औषध तसेच समुपदेशनाच्या माध्यमातून व्याधीमुक्त करणारी उपचार पद्धती आहे.
      आज भारतात मधुमेहींची संख्या सर्वाधिक आहे. याचं मुख्य कारण म्हणजे आपली बदललेली आणि चुकीची जीवनशैली. याबद्दलच्या अधिक माहितीसाठी पुढील Video पाहावा.
      १) मधुमेहातून तुम्ही मुक्त होऊ शकता? निरामय जीवन - भाग - ८
      th-cam.com/video/nWEYKyXeY2k/w-d-xo.html
      २) मनातील अतिविचार, डिप्रेशन यासारखे त्रासातून बरे झालेय पेशंटचा अनुभव पहा.
      कुठलंही औषध न घेता, डिप्रेशनमधून हा तरुण बाहेर आला - th-cam.com/video/C4V5LCi8O0o/w-d-xo.html
      यासारखे इतरही अनुभव आपण निरामयच्या you tube channel वर पेशंट अनुभव या विभागात पाहू शकता.
      धन्यवाद 🙏.

  • @sadhanakhisti631
    @sadhanakhisti631 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली .धन्यवाद
    जरूर बदलण्याचा प्रयत्न करू।
    निरामय सेंटरला अवश्य भेट देऊ।

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  ปีที่แล้ว

      नमस्कार,
      निरामय परिवारात आपले नक्कीच स्वागत असेल 🙏अवश्य भेट द्या .
      शरीराविषयी कृतज्ञता-आभार मानण्याची ही प्रक्रिया म्हणजेच ध्यानाची पहिली पायरी. जी आपण जाणून घ्यायला हवी. त्यातून ध्यानही साधेल आणि शरीर व मन प्रसन्न व निरोगी राहील.
      नियमित ध्यान करण्यासाठी पुढील Video पाहू शकता .
      ध्यानाची पहिली पायरी कृतज्ञता - th-cam.com/video/wP-EDtNgd2Q/w-d-xo.html
      धन्यवाद 🙏

    • @shubhangikumbhojkar2577
      @shubhangikumbhojkar2577 ปีที่แล้ว

      Very nice speech explian very easy to us with difficult topic

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  ปีที่แล้ว

      🙏🙏

  • @sandhyakulkarni5057
    @sandhyakulkarni5057 ปีที่แล้ว

    Salute tai kiti knowldge

  • @sanuraut1755
    @sanuraut1755 ปีที่แล้ว +1

    नेहमीप्रमाणे नीशब्द,ताई अनंतकोटी दंडवत

  • @sumanputhran5107
    @sumanputhran5107 ปีที่แล้ว

    Hayya center cha. Addree. Please sannggal. Ka? Kothee. Ahee

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  ปีที่แล้ว

      नमस्कार,
      पुणे, मुंबई-दादर, चिंचवड, कोल्हापूर, व ऑनलाईन यापैकी कुठेही अपॉइंटमेंट घेऊन आपण भेटू शकता.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      www.niraamay.com

  • @vasudhadiwan8320
    @vasudhadiwan8320 ปีที่แล้ว +2

    1:09:06 😅Inspiring and motivated speech thanks

  • @rajendrakamble1716
    @rajendrakamble1716 ปีที่แล้ว

    Great

  • @anuradhakulkarni9478
    @anuradhakulkarni9478 ปีที่แล้ว

    Tai aajkal khup janana iron , calcium kiwa b12 chi kamtarta astat ., haifall , vitamin d deficiency asa kahi kahi kamtarta astat tyawar supplement gheyachi. wel yete .. yawar tumi kahi sangu shakal ka.. supplement na gheta he aahar ne te shakya aahe ka ?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  ปีที่แล้ว

      नमस्कार,
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. स्वयंपूर्ण उपचार रुग्णांच्या शरीर, मन व ऊर्जा या ३ स्तरांवर काम करते , पंचतत्त्वे व सप्तचक्रे यांच्या संतुलनातून दूरस्थ पद्धतीने दिल्या जाणाऱ्या या विना स्पर्श, विना औषध तसेच समुपदेशनाच्या माध्यमातून व्याधीमुक्त करणारी उपचार पद्धती आहे .
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @sumanputhran5107
    @sumanputhran5107 ปีที่แล้ว

    Good. Morning. Madam
    Hae. Center. Kothe. Ahee

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  ปีที่แล้ว

      नमस्कार,
      पुणे, मुंबई-दादर, चिंचवड, कोल्हापूर, व ऑनलाईन यापैकी कुठेही अपॉइंटमेंट घेऊन आपण भेटू शकता.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. www.niraamay.com

  • @urmilaapte9853
    @urmilaapte9853 ปีที่แล้ว +1

    माझाही या विषयात सखोल अभ्यास आहे. बाई आपण खूप अभ्यासपूर्ण बोलत आहात. पण थोडं खालच्या पट्टीत बोललात तर ऐकणे सुखकर होईल आणि आपल्याही स्वरयंत्राला ताण पडणार नाही. माईक आहेच ना !! 😍🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  ปีที่แล้ว

      🙏 🙏

    • @himgourisalunke283
      @himgourisalunke283 ปีที่แล้ว +1

      ती अंतरीची तळमळ आहे की समोरच्या व्यक्ती ला ते समजावं.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  ปีที่แล้ว

      🙏🙏 .. आपल्या सूचनेचे स्वागत आहे.

    • @urmilaapte9853
      @urmilaapte9853 ปีที่แล้ว

      @@himgourisalunke283 खरं आहे पटलं... माझी सुद्धा अंतरीची तळमळ आहे की ताईंना बोलण्याने त्रास होऊ नये ; काही चुकलं असल्यास क्षमस्व😌🙏🌹

    • @urmilaapte9853
      @urmilaapte9853 ปีที่แล้ว

      @@NiraamayWellnessCenter धन्यवाद ताई 😊👍 अंतरीच्या तळमळीने लिहिलं ; चुकलं असल्यास क्षमस्व😌🙏🌹

  • @neelambhosale6487
    @neelambhosale6487 ปีที่แล้ว +1

    मॅडम , आपण म्हणता ते सर्व बरोबर च आहे पण मग प्रारब्धा ला स्थान कुठे?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  ปีที่แล้ว

      नमस्कार,
      प्रारब्ध हा मुळात कर्माचा भाग आहे .कर्माचे जे ३ प्रकार आहेत. प्रारब्ध , संचित आणि क्रियमाण . एखाद्या गोष्टीत अपयश आल्यास अनेकदा आपण नशिबाला दोष देत बसतो. परंतु, आजच्या चांगल्या क्रियमाण कर्मातून उद्याचे नशीब (संचित व प्रारब्ध कर्म) घडत असते, हे आपण ध्यानात घेतले पाहिजे.याबद्दल अधिकमाहितीसाठी आपण पुढील video पाहू शकता.
      कर्मातून चांगले संचित कसे मिळवाल? - th-cam.com/video/jid4hPcES8A/w-d-xo.html
      धन्यवाद 🙏.

  • @supriyakulkarni3375
    @supriyakulkarni3375 ปีที่แล้ว

    नमस्कार निरामय सेंटर कुठे आहे?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  ปีที่แล้ว

      नमस्कार,
      पुणे, मुंबई-दादर, चिंचवड, कोल्हापूर, व ऑनलाईन यापैकी कुठेही अपॉइंटमेंट घेऊन आपण भेटू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. www.niraamay.com

  • @mangalhinge4639
    @mangalhinge4639 ปีที่แล้ว

    सुंदर

  • @snehalkadam3217
    @snehalkadam3217 ปีที่แล้ว

    उर्वरित video कधी पहायला मिळेल?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  ปีที่แล้ว

      नमस्कार,
      तुम्हा सर्वांचे भरभरून प्रेम मिळत आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏
      लवकरच उर्वरित भाग निरामय You Tube channel वर प्रदर्शित केला जाईल.

  • @sujatakothalkar4967
    @sujatakothalkar4967 7 หลายเดือนก่อน

    ❤👍🙏

  • @govindutekar9351
    @govindutekar9351 ปีที่แล้ว

    🙏🙏

  • @gourimali4019
    @gourimali4019 ปีที่แล้ว

    Mam calendar kuthe order karayche?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  ปีที่แล้ว

      नमस्कार,
      ‘समयनिरामय’ मराठी दिनदर्शिका आपल्याला घरपोच हवी असल्यास आपले संपूर्ण नाव, संपूर्ण पत्ता (पिनकोड सहित), आपला संपर्क क्रमांक ही माहिती पुढील what's app नंबरवर ९७६६१००४०५ पाठवावी . तसेच ही दिनदर्शिका विनामूल्य असून फक्त टपाल खर्च रुपये - ७५ पाठविणे आवश्यक आहे. टपाल खर्च खालील बँक खाय्तामध्ये भरून त्याची पावती या नंबरवर पाठवून द्यावी.
      Bank Details : A/C : Niraamay Wellness Center (Current A/c)
      A/C No. 9411820962 Bank : Kotak Mahindra Bank Ltd, Model Colony,, Pune.
      IFSC Code : KKBK0001759

  • @bharatimate8895
    @bharatimate8895 ปีที่แล้ว

    पूर्णव्याख्यान कुठे?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  ปีที่แล้ว

      नमस्कार,
      उर्वरीत भाग लवकरच बघावयास मिळेल.
      दिनांक २८ जानेवारी २०२३ रोजी पुण्यातील बाणेर येथील परांजपे स्किम्स यांच्या 'अथश्री' या ज्येष्ठ नागरिक वसाहतीमध्ये श्रीमती अमृता चांदोरकर यांचे कर्म व मृत्यू यांचे रहस्य विषयावर व्याख्यान झाले.

  • @triptigore
    @triptigore ปีที่แล้ว

    Tai lagn jamun modtat...kelele lagn divorse hoto...sodun detat..karan nastana tras dila jato ...fasvnuk keli jate...anyay hoto...mag he konte runanubandh astat...ase ka ghadte...

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  ปีที่แล้ว

      नमस्कार,
      ऋणानुबंध हे तुम्ही पूर्वकाळात केलेल्या कर्मानुसार घडत जातात. एखाद्या व्यक्तीचे तुमच्या हातून काही अमंगल किंवा त्यांच्यावर काही अन्याय झाला असेल तर ती व्यक्ती त्या अन्यायाचा प्रतिकार म्हणून जो संकल्प करते तो तुम्हाला त्या व्यक्तीने दिलेल्या वेगवेगळ्या त्रासाच्या रुपात अनुभवयाला येतो. ती व्यक्ती पुर्नजन्म घेऊन आलेली असेल तरी ती वेगवेगळ्या रुपात तुम्हाला त्रास देऊ शकते. काहीही कारण नसताना किंवा या भौतिक जगात कोणतेही कारणमीमांसा, कार्यकारणभाव दिसत नसताना जेव्हा एखाद्या व्यक्तीमुळे तुम्हाला निष्कारण त्रास भोगावा लागत असतो त्याचा अर्थ त्याव्यक्तीवर तुमच्या हातून नकळत पूर्वजन्मामध्ये काही अन्याय गोष्ट घडलेली असू शकते. त्यामुळे त्या अन्यायाचा पूर्ण परतफेड होईपर्यंत हा त्रास सोसावा लागतो. ज्याक्षणी तुम्ही केलेला अन्याय आणि त्याची झालेली परतफेड हि समान होते तेव्हापासून तुमच्या सर्व त्रासावर उतार पडत जातो.
      धन्यवाद🙏.

  • @swativaze1242
    @swativaze1242 ปีที่แล้ว +6

    अपघातात मृत घोषित करण्यात आल्यानंतर, त्या व्यक्तीचे ,liver,heart,kidney काढून कोणाला तरी बसवतात, मग तेअवयव जिवंत असतात ना,मग जातो तो कोण मागे रहाते ते कोण ,आपला आत्मा कोणत्या चक्रात असतो ,शंकानिरसन झाले तर बरे होईल

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  ปีที่แล้ว +2

      नमस्कार,
      आत्मा कुठल्याही चक्रात नसतो . सगळी शरीरातील चैतन्य केंद्र मिळून शेवटी जे परमचैतन्य उरतं त्याला आपण आत्मा असे म्हणतो. शरीरामधला आत्मा म्हणजे चैतन्य जे मुख्य इंजिन असून ते हे शरीरुपी यंत्र चालवत असते. शरीर हे सचेतन नाही ते पंचभौतिक आहे. आत्मा शरीर सोडून गेल्यानंतर पाच महाभूतांमध्ये जेवढं मुलभूत चैतन्य असते तेवढे त्या शरीरामध्ये काही काळ उरते व हळूहळू विलयास जाते. त्यामुळे मृत्यूनंतर ३ तासाच्या आत अवयव काढावे लागतात, अन्यथा ते अवयवदेखील निकामी होतात. तो अवयव असूनसुद्धा वापरता येत नाही, कारण शरीरातून हे उपप्राणही निघून गेल्यावर कुजण्याची किंवा नाशाची क्रिया सुरु होते त्याला विपरीणाम असे म्हटले जाते. या सगळ्यामध्ये देहाला चालवणारी शक्ती म्हणजे आत्मा जो पूर्ण देहाला व्यापतो आणि देहाच्या पलीकडे जे कोश आहे तेही व्यापून घेत असतो. थोडक्यात जातो तो आत्मा आणि राहते ते शरीर जे काही तासांतच पंचमहाभूतामध्ये विलीन होते.
      आपला प्रश्न खरच खूप छान आहे, अजूनही सविस्तर उत्तर देता येईल परंतु इथे सर्व मांडणे अशक्य आहे. अजूनही शंका असल्यास विचारू शकता.
      धन्यवाद 🙏

  • @himgourisalunke283
    @himgourisalunke283 ปีที่แล้ว +1

    Live पाहायला आलो असतो मॅडम
    माहिती नाही मिळाली.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  ปีที่แล้ว +1

      नमस्कार,
      दिनांक २८ जानेवारी २०२३ रोजी पुण्यातील बाणेर येथील परांजपे स्किम्स यांच्या 'अथश्री' या ज्येष्ठ नागरिक वसाहतीमध्ये व्याख्यान झाले. सर्वाना याचा लाभ घेता
      यावा यासाठी निरामयच्या You Tube Channel वर हा भाग प्रदर्शित केला आहे.
      आपले मनःपूर्वक आभार ! असाच स्नेह कायम ठेवा. 🙏
      नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा

    • @himgourisalunke283
      @himgourisalunke283 ปีที่แล้ว

      🙏🙏🙏🌹🌹🌹🌹👍👍

  • @padmavatidivekar4468
    @padmavatidivekar4468 ปีที่แล้ว

    👌🏻 👌🏻 👌🏻 👌🏻 👌🏻 👌🏻 👌🏻 👌🏻

  • @anaghagosavi1013
    @anaghagosavi1013 ปีที่แล้ว +1

  • @himgourisalunke283
    @himgourisalunke283 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏🙏👌👌👌👍👍

  • @rashmivengurlekar3574
    @rashmivengurlekar3574 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏🙏🙏

  • @triptigore
    @triptigore ปีที่แล้ว

    Sanyojakana vinanti....desk jast unch zale ahe...mice Khali asava...chehra maneparyant Kiva ajun thode Khali asa purn disava...mhanje hat vare vyavsthit distat jyanule bhashan adhik parinamkatak hoel...

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  ปีที่แล้ว

      नमस्कार,
      आपण संगीतल्याप्रमाणेच अनेकांनी याबद्दल सूचना दिली पुढील कार्यक्रमाच्या वेळी असे घडणार नाही याची नक्कीच काळजी घेतली जाईल .आपण Video बघत आहात आणि इतक्या आवर्जून आपली मतं आमच्यासमोर व्यक्त करत आहात त्याबद्दल धन्यवाद आपल्या सूचनेचे नेहमीच स्वागत आहे.

  • @anantnimkar958
    @anantnimkar958 ปีที่แล้ว +20

    मी देह नाही तर आत्मा (spirit) आहो. देह म्हणजे अंगरखा.मृत्यु म्हणजे ट्रान्सफाॅरमेशन आॅफ एनर्जी.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  ปีที่แล้ว +10

      नमस्कार,
      सूक्ष्म असलेला आत्मा हा अमर असून तो प्रत्येक जन्मात नवे शरीररूपी वस्त्र परिधान करतो, हे वैश्विक सत्य किंवा रुत भारतीय परंपरेत प्रतिपादित केलेले आहे. आपल्या आत्ताच्या जन्मातील कर्मावरून ठरते की आपला पुढील जन्म व त्यातील अनुभव कसे असतील? म्हणजेच आपले आजचे कर्म हे खरेतर पुढील वाटचालीची गुंतवणूक असते. म्हणूनच संपूर्ण लक्ष कर्मावर केंद्रित केल्यास तात्कालिक आनंद व समाधान तर मिळेलच, पण पुढच्या अनंत प्रवासाची पायाभरणीसुद्धा होईल.”
      धन्यवाद 🙏

    • @anantnimkar958
      @anantnimkar958 ปีที่แล้ว +2

      खरं आहे परंतु मोक्षप्राप्ती हे ध्येय असायला हवे. 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  ปีที่แล้ว +1

      मोक्ष हा प्राप्तीचा विषय नाही. मोक्ष म्हणजे स्वत:च्या अनंत, नित्यमुक्त स्वरूपाला जाणणे. जे आपण आहोतच तेव्हा नव्याने काही मिळत नाही पण ते आपण अनुभवाने जाणतो.मात्र ती अवस्था पूर्ण चित्तशुद्धी झाल्याशिवाय येणे शक्य नाही. चित्तशुद्धी होण्यासाठी सत्कर्माला पर्याय नाही.
      धन्यवाद 🙏.

    • @vinodmoon4896
      @vinodmoon4896 ปีที่แล้ว

      💯✔️👌👍

    • @surekhakulkarni1607
      @surekhakulkarni1607 ปีที่แล้ว

      7:20

  • @suvarnahattarki2611
    @suvarnahattarki2611 ปีที่แล้ว

    👌👌👌👌👌👌👌👍👍👍🏆

  • @kundlikrainirmale1435
    @kundlikrainirmale1435 ปีที่แล้ว

    🕉️🙏🕉️

  • @poonamchavan5990
    @poonamchavan5990 ปีที่แล้ว

    👌👍🙏🙏

  • @meenaalwani3338
    @meenaalwani3338 ปีที่แล้ว

    ज्ञान को कर्म कैसै कह सकते हैं

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  ปีที่แล้ว

      हमारी पात्रता के अनुसारही हमे ग्यान प्राप्त होता है| जैसा ग्यान, वैसा कर्म हम करते है| और हमारे कर्मोके अनुसार हमारी पात्रता बढती जाती है| 🙏

  • @rekharane5224
    @rekharane5224 ปีที่แล้ว

    ताई खूप छान माहिती आहे .
    पण बरेच लोकांना हे ज्ञान माहीत नाही आणि ते आपल्या वेड्यात कडतात.
    पण है ज्ञान पूर्वी ऋषी मुनी पासून चे आहे.
    लोक अज्ञान ने वागतात याची खंत वाटते.
    ज्ञानेश्वर ,तुकाराम यांनी ही मना बद्दल सागीतले आहे.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  ปีที่แล้ว

      🙏🙏
      ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज यांनी ही मनाबद्दल सांगीतले आहे. रामरक्षा स्तोत्रात ह्याच शरीराचे आभार मानलेले आहेत. शरीराविषयी कृतज्ञता-आभार मानण्याची ही प्रक्रिया म्हणजेच ध्यानाची पहिली पायरी. जी आपण जाणून घ्यायला हवी. त्यातून ध्यानही साधेल आणि शरीर व मन प्रसन्न व निरोगी राहील.
      बदलाची सुरुवात आपल्यापासून करूयात आणि शरीराला व मनाला शांती देणारी ध्यान प्रक्रिया जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ जरूर पाहा आणि इतरांनाही शेअर करा.
      ध्यानाची पहिली पायरी कृतज्ञता - th-cam.com/video/wP-EDtNgd2Q/w-d-xo.html
      धन्यवाद 🙏.

    • @hemamulay547
      @hemamulay547 ปีที่แล้ว

      @@NiraamayWellnessCenter खूप छान

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  ปีที่แล้ว

      🙏 🙏

  • @varshapatwardhan4801
    @varshapatwardhan4801 ปีที่แล้ว

    विदाऊट पोडियम बोलायला हवं तुमचा फक्त चेहराच फक्त दिसतोय तुम्ही संपूर्ण दिसला असता तर जास्त इफेक्टिव झालेअसते.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  ปีที่แล้ว

      नक्कीच . पुढील वेळेस याची काळजी नक्की घेऊ. धन्यवाद🙏