Thanjavur Beerangi | तंजावर राजगोपाल बिरंगी | Tamilnadu | SNT Vlog | Thanjavur cannon

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024
  • मराठ्यांच्या पराक्रमाचा दक्षिणेतील पाऊलखुणा शोधत आपण वेल्लोर - साजरा - गोजरा - जिंजी - कुंभकोणं - तरंगमबडी असे फिरत फिरत आता एका सर्वात महत्वाच्या खुणेपाशी येवून पोहोचलो आहे ही जागा दक्षिणेतील मराठ्यांचे महत्त्वाचे शक्तिस्थान होती. दक्षिणेतील मराठा सिंहासनाची जागा म्हणजेच तंजावर आता आपण पहाणार आहोत.
    तंजावर शहराला एकेकाळी तटबंदीचा भक्कम घेरेदार कोट होता आज ह्याचे काही अवशेष उरले आहेत. ह्याच तटबंदीवर पूर्वेला एक अजस्त्र आग ओकणारी तांजावरची रक्षणकर्ती तोफ आज आपण पहाणार आहोत. मुळुखमैदान तोफेच्या तोडीची ही 26 टनी तोफ मराठ्यांच्या दक्षिण राजधानीच्या रक्षणाची हमी घेत आजही कोटाच्या एका बुरुजावर विराजमान आहे. चला आज तंजावरच्या ह्या अपरिचित राजगोपाल बिरंगी चे दर्शन करुया.
    ====================================================

ความคิดเห็น • 8

  • @sandipgadhe3886
    @sandipgadhe3886 19 วันที่ผ่านมา +2

    अफलातून माहिती अप्रतिम व्हिडिओ 🙏🙏🙏

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  15 วันที่ผ่านมา

      आपल्या मातीची संस्कृती, अभियांत्रिकी, तत्त्वज्ञान, धर्म ह्यातील बारकावे शोधून अपरिचित माहिती आपल्यासारख्या इतिहास प्रेमिंसमोर सादर केल्यावर येणाऱ्या प्रतिक्रिया वाचून मेहनतीचे सार्थक झाल्यासारखे वाटते

  • @sunildmello
    @sunildmello 17 วันที่ผ่านมา

    बांगडी तोफांबाबत वाचत असताना या तोफेविषयी वाचले होते. आज तुमच्यामुळे ती प्रत्यक्ष पाहता आली. खूप खूप धन्यवाद

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  15 วันที่ผ่านมา

      आपण आमचे व्हिडिओज नेहमी बघून आपली प्रतिक्रिया देतात त्यासाठी आम्ही सर्व टीम आपले मनापासून आभारी आहोत सर

  • @gabbar_jan_blossom4834
    @gabbar_jan_blossom4834 20 วันที่ผ่านมา +1

    सुंदर 👌🏽👍🏽
    बाकी मी निशब्द.... निवेदन अफलातून 👍🏽👍🏽👌🏽👌🏽🙏🏽🙏🏽🙏🏽

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  15 วันที่ผ่านมา

      आपल्या मातीची संस्कृती, अभियांत्रिकी, तत्त्वज्ञान, धर्म ह्यातील बारकावे शोधून अपरिचित माहिती आपल्यासारख्या इतिहास प्रेमिंसमोर सादर केल्यावर येणाऱ्या प्रतिक्रिया वाचून मेहनतीचे सार्थक झाल्यासारखे वाटते

  • @LTCFWTM
    @LTCFWTM 20 วันที่ผ่านมา +1

    Don't stop traveling
    Don't get married