विश्वामित्र सिंड्रोम पुस्तकाचे लेखक पंकज भोसले यांच्याशी गप्पा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ต.ค. 2024
  • पंकज भोसले हे पत्रकार असण्याबरोबर सिनेमा आणि साहित्याचा चाणाक्ष अभ्यासक आहेत , एका अस्वस्थ काळाचा निरीक्षक आहेत . आणि हे टोकदार निरीक्षण ‘विश्वामित्र सिण्ड्रोम’मधल्या कथांना त्यांच्या साऱ्या विक्षिप्तपणासह जिवंत करतं.
    विसाव्या शतकाच्या अखेरीला जागतिकीकरण नामक काहीतरी झालं आणि त्याचे पडसाद समाजाच्या सर्व थरात उमटले. जग लहान झालं. इंटरनेटच्या माध्यमातून हव्या नको त्या बऱ्याचशा गोष्टी थेट आपल्या दारात येऊन पोचल्या आणि त्यांनी आपल्या जगण्याचं तंत्रच बदलून टाकलं. ‘विश्वामित्र सिण्ड्रोम’मधल्या जोडकथा या अशा मोठ्या बदलाच्या साक्षीदार आहेत. वरवर पाहता त्या मुंबईनजीकच्या एका वस्तीत इंटरनेटवरून अवतरलेल्या पोर्नोग्राफीचा आणि त्यामुळे वरकरणी पापभीरू वाटणाऱ्या समाजातल्या विविध वृत्तीदर्शनाचा धांडोळा घेतात, पण प्रत्यक्षात तो त्यांचा केवळ एक पैलू आहे. तंत्रज्ञानापासून संगीतापर्यंत आणि राहणीमानापासून नातेसंबंधांपर्यंत आपला भवताल कसा बदलत गेला, याचं हे एकाच वेळी धक्कादायक तरीही गमतीदार असं दर्शन या पुस्तकात केलं आहे.
    पुस्तक मागविण्यासाठी संपर्क : ९२०९०७६११७ / ७२७६०४०२४८
    #BOOK #MARATHIBOOK #JOURNALIST #PANKAJBOSLE#book #marathibook #journalist #pankajbhosle #writer #writersdiary #writersthoughts #writerscommunity #bookstagrammer #bookstore

ความคิดเห็น • 2