हे बघायचं नाही, जगायचं..!!✨|| सयाजीराव with शामराव || EP - 4 || Sayaji Shinde ||

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 เม.ย. 2024
  • The Final Episode of Sayaji with Shamrao, when Shamrao Kokre expressed his desire to visit his native place Maldev where he belonged...
    To his request Sayaji Shinde arranged a trip to Maldev with help of State Forest Department.
    U can see the emotions after visiting his place after 5 long years....✨
    #sayajishinde #forest #forestlife #maharashtra #tourism #marathi #nature #naturelovers
    ===========================================================
    TH-cam:-
    / @sayajishinde .
    ============================================================
    Visit Website:-
    sayajishinde.com/
    ============================================================
    My Social Media Accounts:-
    Follow me on-:👇🏻
    Instagram:-
    sayaji_shinde?i...
    Facebook:-
    www.facebook .com/SayajiShindeOnline?mibextid=ZbWKwL
    Twitter:-
    SayajiShinde?s=20
    ===========================================================
    Show ur support to our Environmental Conservation Organisation:-
    SAHYADRI DEVRAI.
    Visit Website:-
    www.sahyadridevrai.org/
    Follow us on:-👇🏻
    Instagram:-
    sahyadridevrai?...
    Facebook:-
    groups/19938...
    ============================================================
    #sayajishinde
    #sayajishindevideo
    #maharashtra
    #sayajishindeinkapilsharmashow
    #sayajishindemimicry
    #sayajishindetreeplantation
    #sayajishindemovies
    #sayajishindevlog
    #sayajishindecomedyscene
    #forest
    #forestlife
    #wildlife
    #savetrees
  • บันเทิง

ความคิดเห็น • 532

  • @focusedanjulika
    @focusedanjulika 3 หลายเดือนก่อน +238

    हुंदके मारूनी मारूनी आरोळी घालतोय तो शंकराला,
    आरोळी ऐकुनीच तर शंकराने पाठवलय सयाजीला,
    शामराव गेले आपल्या गावच्या आठवणी जाग्या करायला,
    का कुणास ठाऊक त्यांच्या आठवणीत आमचे डोळे चालु झाले बुडायला ....😢
    दुष्काळी भागात राहण्याराला कुठे एवढा निसर्ग अनुभवायला मिळतोय अन् निसर्गाच प्रेम तरी कुठ मिळतय पण हे सर्व बघुन मन मात्र शांत अन् टवटवीत झालय

    • @Sayajishinde.
      @Sayajishinde.  3 หลายเดือนก่อน +23

      खूप छान...!!!☺️👌🏻

    • @mamabhacheenterprices6412
      @mamabhacheenterprices6412 3 หลายเดือนก่อน +1

      नक्कीच.

    • @mayanksalunkhe5018
      @mayanksalunkhe5018 3 หลายเดือนก่อน +1

      Really heart touching 😢 Thank Sir 🫡

    • @akshaybhosale5878
      @akshaybhosale5878 3 หลายเดือนก่อน +5

      माणसातला देवमाणूस सयाजी शिंदे

    • @SatishPingle-gk6wh
      @SatishPingle-gk6wh 3 หลายเดือนก่อน

      ❤❤

  • @user-hn5fz8iy8f
    @user-hn5fz8iy8f 3 หลายเดือนก่อน +89

    सर शब्द नाही तुमच्या कार्याला गरीब माणसाचा दिलदार माणूस सयाजी शिंदे

  • @parmarthawati6071
    @parmarthawati6071 3 หลายเดือนก่อน +21

    सर ती जनावरे आजोबाना आनुन दिली तर किती आनद होईल त्याना यासाठी तुम्ही प्रयन्त करा माझी कळकळीची विनती आहे डोळ्यातून पानी आल 😢😢 गुरे व आजोबाना बघून

  • @sachinhorambale4815
    @sachinhorambale4815 7 วันที่ผ่านมา +3

    सयाजी दादा अगदी विलक्षण आहे तुमचे वागणे माणसातले माणूसपण शोधता. निसर्गासी खरी नाळ जुळली आहे तुमची. सलाम

  • @aniketmudalkar7527
    @aniketmudalkar7527 3 หลายเดือนก่อน +10

    हेच्या वरती पाठ्यपुस्तकात एक धडा होऊ शकतो मुलांना खूप काही ज्ञान मिलू शकते खूप भावनिक आजकालच्या शहरी मुलांना काय माहित की निसर्ग आणि गावा मधील लोकांच आयुष्य कस असत.

  • @adityajangle1251
    @adityajangle1251 3 หลายเดือนก่อน +8

    इतकं सगळ होऊन शामरावांनी शंकराकडे स्वत साठी काहिही न मागता मागीतल ते गूराढोरांसाठी मुलांसाठी
    खरच शामराव हे ग्रेट माणुस आहेत.🙌
    सयाजी सर धन्यवाद
    आणि सर एक विनंती आहे आम्हाला शामरावांना आणि त्यांची गुरे भेटतांना बघायचं आहे part 5 मधे🙏🙏

  • @PravinBarhate-wz3dx
    @PravinBarhate-wz3dx 3 หลายเดือนก่อน +9

    आपण मोठे कलाकार असून आपली संस्कृती व आपले जुने मित्र न विसरता त्यांची आठवण काढण हे अलौकिक आहे

  • @krishnar1992
    @krishnar1992 3 หลายเดือนก่อน +12

    काहीतरी लिहूया म्हनून इथे आलोय...पण व्हिडीओ पाहातां डोळ्यात आलेले अश्रु हिच खरी कमेंट ❤

  • @OmShivdatt
    @OmShivdatt 3 หลายเดือนก่อน +6

    सयाजी दादा तुम्हीं तुम चा जिवनातल खुप महत्वा च पुण्या च कार्य केलत या कर्मा मुल तुमचा आत्मा भगवंता चा निकट जानार हर हर महादेव श्री गुरुदेव दत्त❤️🌏⛳️🙏🏻🌸

  • @SameerSawant-zg3rv
    @SameerSawant-zg3rv 3 หลายเดือนก่อน +13

    सर आमचं हे जुनं गाव मालदेव ❤️ इथे जाण्याची खूप ओढ आहे पण आपल्या माध्यमातून हे आम्ही बघू शकलो धन्यवाद सर. हर हर महादेव श्री आई जानाई वाघजाई च्या नावानं चांगभलं

    • @anantdomale1462
      @anantdomale1462 3 หลายเดือนก่อน +1

      कुठे आहे नक्की हे

  • @santoshwaghmode2535
    @santoshwaghmode2535 3 หลายเดือนก่อน +6

    वाॅल्डन जितकं रिलेट होत नाही इतका शामराव तात्या आपले वाटतात...❤
    आपला भाग आपली गोष्ट आपली माणसं....

  • @kashinathghule2797
    @kashinathghule2797 3 หลายเดือนก่อน +5

    व्वा सयाजी सर वा.
    मी कित्तेक वर्षापासून utube बघतोय पण असा heart touching व्हिडिओ आज बघतोय.
    निसर्गावर किती प्रेम असाव याच मुर्तीमंध उदाहरण म्हणजे शामराव.

  • @subhashgajare-jt3rm
    @subhashgajare-jt3rm 3 หลายเดือนก่อน +4

    वा..सयाजी सर❤❤❤...या शामराव बाबाच आयुष्य खरंच अब्जावधी खर्च केले तरी आसं आयुष्य कोणी जगु शकत नाही.....आज विडीओ पाहातानी अक्षरशा डोळे भरुन 😢आले...सयाजी सर तुम्ही खरच ग्रेट आहात..आज माणसात खर्या आर्थाने देव शोधला तुम्ही...hats off🫡🫡🫡🫡🫡🫡🫡

  • @AniketSawant-gv5oy
    @AniketSawant-gv5oy 3 หลายเดือนก่อน +5

    सयाजी शिंदे साहेब तुमचे मानावेत तेवढे आभार कमी पडतील.. खरच अंगावर काटा आणि डोळ्यांन मध्ये पाणी आले कारण हे मालदेव गाव आजपर्यंत फक्त आणि फक्त स्वप्नात बगितले होते .. आज पर्यंत फक्त आमच्या आजी आजोबान कडून गावाबद्दल आईकले होते.. आज तुम्ही हा शामराव आजोांबरोबर व्हिडिओ केलात हा आमच्या नवीन माल देव मध्येल्या सर्व लहान थोरणी पहिले आणि त्यांचे मन दाटुन आले .. आमचे १९६० साली पुनर्वसन झाले आणि आम्ही जुन्या मालदेव मधूननवीन माल देव मध्ये रमलो गमलो पण आज श्यामराव अजोबन कडे बगुन वाटले की आमच्या गावचे जे जुने लोक आहेत ते किती त्या गावाला Miss करत असतील... साहेब तुम्हाला आम्ही विनंती करतो फक्त तुम्ही तिथल्या अधिकाऱ्यांना सांगा की नवीन मालदेव मध्ये जर आमच्या इकडून कोणी गेले तर त्यांना परवांगी द्या .... खरच साहेब तुमचे मानावे तेवढे आभार कमी आहेत साहेब धन्यवाद साहेब तुमच्या मुळे आम्हाला आमचे गाव बगता आले ... अनिकेत सावंत नवीन मालदेव पेण रायगड

  • @sakharammohite4886
    @sakharammohite4886 14 วันที่ผ่านมา +4

    शाम काका सध्या राहतात कोठे, त्याचा परिवार कोठे आहे, जर या ठिकाणी कोणी रहात नसतील तर देवळाचा परिसर इतका स्वछ कसा, दुभंती गुरे सोडुन काका का गेले, मग त्यांची उपजीविका कशी चालते, सयाजी सर आपण फिल्म स्टार। आहात पण असपलर वागणे फिल्मी नाही, त्या मुळे आम्ही तुमचे फॅन आहोत, जय शिवराय

  • @paragkaldate
    @paragkaldate 3 หลายเดือนก่อน +5

    ऐकुन शामरावाची वाणी,
    गुरा-ढोराच्या नयनी पाणी।
    एका गोष्टीतला तो देव,
    त्या देवाच्या पाऊलखूणा।
    देव दिसला माणसांत,
    का जाऊ आता देव्हाऱ्यात॥
    🌸🌸🌸🌸🌸

  • @janardanbavdhane5301
    @janardanbavdhane5301 3 หลายเดือนก่อน +9

    सर आमचं धनगरांचं जीवन असच असतं आमचे वडिल गेल्यावर आमचं घर,गुरं म्हशी ,कुत्री तिथली झाडं सोडून तालुक्याला आलो.पण महिन्यातून एकदा जातो.एक दोन दिवस राहतो.

  • @bhushanjadhav216
    @bhushanjadhav216 หลายเดือนก่อน +2

    सर... तुम्ही एवढे मोठे कलाकार..पन तुमचे पाय जमिनीवरच....सलाम तुमच्या कार्याला ❤❤❤

  • @traveldiaries2614
    @traveldiaries2614 3 หลายเดือนก่อน +8

    हा खरा हिंदू धर्म आहे..निसर्ग,पशू पक्षी, झाडं यांची पूजा म्हणजेच हिंदू धर्म...आजोबांकडे पाहून खरंच जुनी माणसं किती निःस्वार्थी आणि निसर्गाला धरून राहत होती याची प्रचिती येते.
    आता सर्वत्र भकासपणा वाढत आहे,लोक निसर्गाला ओरबाडून खात आहेत..

  • @bharatkokare7328
    @bharatkokare7328 3 หลายเดือนก่อน +4

    खरचं..! साहेब तुमचे आभार आम्ही शब्दातही मांडू शकत नाही तुम्ही एवढे कष्ट करून एवढ्या जंगलातून तुम्ही आमच्या बाबांना आमच्या गावी परत घेऊन गेलात आम्हाला खरचं तुमचे सगळे विडिओ बघून आमच्या डोळ्यात पाणी आले.
    तुमचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत......
    पुनश्च आभार......🙏🙏

  • @bibhishangore2434
    @bibhishangore2434 3 หลายเดือนก่อน +3

    🙏🙏नमस्कार सयाजी दादा.शामराव बाबांना नमस्कार तुम्ही शोधून शोधून माणसं काढता खरंच हा शामराव बाबा देव माणूसच आहे 👏👏

  • @amolsalunkhe5310
    @amolsalunkhe5310 3 หลายเดือนก่อน +3

    माणसातला देव माणूस शामराव बाबा जनावरावर मनापासून प्रेम करणारे 🙏🙏 सयाजी शिंदे सर ग्रेट माणूस ❤❤

  • @shivajigorade7968
    @shivajigorade7968 2 หลายเดือนก่อน +2

    गोरगरिबांच्या काळजातील माणूस म्हणजेच सयाजी शिंदे सर सलाम तुमच्या कार्याला

  • @SureshJumale
    @SureshJumale 3 หลายเดือนก่อน +3

    काळजात हात घातला साहेब मन भरून आलं एक नंबर कोणालाच जमलं नाही हे काम आज पर्यंत

  • @shyamgayke8807
    @shyamgayke8807 3 หลายเดือนก่อน +7

    सर धनगराच जीवन आस आसत जगद त्याची आई आसते आणी मेढर त्याचे लेकर आसतात देव त्याच्या राकनदार माणुस म्हनुन जगन शिकलो

  • @kidimidiaadi9017
    @kidimidiaadi9017 3 หลายเดือนก่อน +3

    तुम्ही येका व्यक्तीला त्याचं चांगल क्षण पुन्हा जगण्याची आनंद प्राप्त करून दिला.❤
    Feels i met my grandfather ❤
    Lots of love ❤️❤️

  • @SB-rd6tq
    @SB-rd6tq 3 หลายเดือนก่อน +3

    खुपच सून्दर वीडियो आमच्याही डोळ्यात पाणी आले, इतके साधी माणसं होती त्यामुळे आपल्यावर अनेकानी राज्य केली गुलाम बनवले,

  • @prakashpathave2660
    @prakashpathave2660 3 หลายเดือนก่อน +4

    सयाजीराव शिंदे साहेब तुम्हाला त्रिवार मुजरा... पुनर्वसन म्हणजे काय हे फक्त ज्याचं गेलय . त्यालाच माहित असतं.आमची पण आख गाव निळवंडे धरणात गेलं आणि आम्हाला पण असेच वेगवेगळ्या गावांत नेवून टाकलं.खूप त्रास होतो! कोणाला सांगणार.

  • @rameshphatkare4847
    @rameshphatkare4847 2 หลายเดือนก่อน +2

    एवढा मोठा कलाकार असून सुद्धा पाय जमिनीवर आहेतं, धन्यवाद सयाजी सर, ही तुमच्या आई बाबांची शिकवन आणि संस्कार आहते, 🌹🙏

  • @pradipsawant9335
    @pradipsawant9335 3 หลายเดือนก่อน +5

    शिंदे साहेब ह्या सर्व गोष्टीवर एक पुस्तक लिहा. शामराव यांचे सगळे जीवन, सगळी स्थळे यांचा समावेश असणारे फोटो असणारे पुस्तक लिहावे ही विनंती

  • @adpatil2383
    @adpatil2383 3 หลายเดือนก่อน +5

    श्यामराव म्हणजे चालत बोलत जंगल 🙏🙏🙏

  • @VJFarms4423
    @VJFarms4423 หลายเดือนก่อน +2

    सयाजी बापू सलाम तुमच्या कार्याला, तुमच्यासारखा अवलिया होणे नाही तुम्ही बाबांची आणि त्यांच्या गाई म्हशीची भेट घडवलीत. त्यांच् आखे आयुष्य जिथं गेलं तिथलं दर्शन घडवलात

  • @marathi.asmita913
    @marathi.asmita913 2 หลายเดือนก่อน +4

    काय ती झाडी ,काय तो डोंगर
    काय ते शामराव ,काय त्या म्हशी,,,,मन हेलावुन टाकल सयाजी सर तुम्ही,, ग्रेट सॅलुट🙏🙏

  • @DSB0429
    @DSB0429 3 หลายเดือนก่อน +4

    सयाजीराव कोणत्या मातीचा बनलायस बाबा.. जुगजुग जियो..

  • @rku03
    @rku03 3 หลายเดือนก่อน +2

    साहेब तुम्हाला निसर्ग सदैव निरोगी ठेवेल अशी निसर्ग चरणी प्रार्थना.

  • @indugajbhiye8974
    @indugajbhiye8974 3 หลายเดือนก่อน +3

    श्यामराव दादा जनावरावर प्रेमकरगे सया झाडावर प्रेम करतो शेवटी डोळ्यात अश्रु आवरेना खरच सया तु दयाळु मायाळु मानुष आहेस देव तुला आर्शीवाद देवो❤❤❤🌳🌳🌳

  • @prakashpatil5359
    @prakashpatil5359 3 หลายเดือนก่อน +4

    हृदयस्पर्शी...डोळ्यात पाणी आले,तुमचे मनःपूर्वक धन्यवाद साहेब ,तुमच्या कार्याला मानाचा मुजरा साहेब 🚩 🚩🙏

  • @user-ly1os7qb5z
    @user-ly1os7qb5z 3 หลายเดือนก่อน +4

    तुमच्या या रांगड्या कार्य कर्तृत्वाचा कौतुक करावं तेवढं थोडाच आहे शिंदे साहेब.....येणाऱ्या पिढ्यांना आयुष्यभर पुरावी अशी शिदोरी आपण या चॅनल chya माध्यमातून देत आहात...छत्रपती ग्रुप महाराष्ट्र राज्य चा आपल्या कार्याला मानाचा मुजरा🙏🙏🚩🚩❤️❤️❤️❤️

  • @Sujatawaghmare0223
    @Sujatawaghmare0223 3 หลายเดือนก่อน +4

    Speechless sir..... पहिल्यांदा मला तुम्हाला काय बोलावं किंवा काय feel झाले हे सांगायला शब्द च नाहीत....sir तुम्ही असेच रहा कायम please 🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺

  • @user-cu5ri8uz5p
    @user-cu5ri8uz5p หลายเดือนก่อน +2

    दादा व्हिडिओ मुळे मला कळले तुमचा स्वभाव खूप छान आहे

  • @user-lf7pu9ni8u
    @user-lf7pu9ni8u 3 หลายเดือนก่อน +3

    आज पासून माझा आवडता हिरो फिल्म इंडस्ट्री मधला फकत सयाजी शिंदे ❤❤❤❤❤

  • @apurvmarathe7604
    @apurvmarathe7604 3 หลายเดือนก่อน +2

    हा विडिओ बघून अक्षरशः ' माचीवरला बुधा ' ही कादंबरी वाचतोय असा भास झाला. मानवी मनाचे आणी रानाचे सगळे भावजीवन ह्यात एकत्रित करून एक सुंदर अनुभव स्मृती तयार झाली.
    सयाजी शिंदे सर पडद्यावर जरी तुम्हाला खलनायक म्हणून पाहिलं असलं तर तरी आयुष्यपटावरचे तुम्ही नायकचं. 🙏🏼

  • @monalipawar9548
    @monalipawar9548 3 หลายเดือนก่อน +3

    त्यांचं पुनर्वसन का केलं...? आणि जनावरांना का नाही नेल मग सरकारने? पाहून डोळ्यात पाणी आलं आज ... ही शेवटची पिढी आहे अस जीवन जगलेली ... सर्व निसर्गातील नियम जाणंनारी... आपल गाव आपल्या आठवणी सोडून दुसरीकडे राहण खूप अवघड असत... खूप छान सर तुम्ही अजून पण जमिनीशी जोडून आहात हे बघून नेहमीच तुमच्या विषयी अजून च आदर वाढला❤ कायम च आयुष्यात तुमच्या सारखं व्हावं अशी देवा कडे प्रार्थना करते🙏 proud of you sir❤

  • @narendrawaghe3808
    @narendrawaghe3808 หลายเดือนก่อน +2

    मानसाणी माणसांशी मानसारखे वागावे. हयाचे उत्तम उदाहरण महणजे सयाजी शिंदे.
    मी मला भाग्यवान समजतो की अशा निसर्गप्रेमी , माणुसकी असणारे यांच्या बरोबर सुधा गडावर जाता आले. तयांची ती शेंगदाण्याची चटणी (खरडा ) अजुनही माझ्या लक्षात आहे, तुम्ही कलाकार म्हणुन महान आहात , पण माणसामधे राहणारा टेव माणुस आहात. तुमहाला माझा साष्टांग नमस्कार , 🙏🙏🙏🙏🙏

  • @dpadirajsuresh
    @dpadirajsuresh 2 หลายเดือนก่อน +3

    कदाचित हिच ती शेवटची पिढी आहे जी मर्यादित गरजा ठेवणारी निसर्गाला सोबत राहणारी आहे इथून पुढे पूर्ण वेगळ असणार आहे

  • @dhanu236
    @dhanu236 3 หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम कार्य करत आहात सयाजी सर... व्हिडीओ च्या सुरुवाती ला शामराव बाबांनी मस्त विठ्ठलाची ओवी म्हणाली... असा ओव्यांचा एखादा व्हिडीओ बनवावा ही विनंती... धन्यवाद 🙏❤

  • @prabhanikam7410
    @prabhanikam7410 3 หลายเดือนก่อน +2

    निःशब्द केले सर, हे तुम्ही एक एक भाग टाकत आहात ते नुसते व्हिडिओ नाही आयुष्य आहे जे तुम्ही प्रत्यक्ष पाहून जगत आहात आणि आम्हाला पण तो योग घडवून देत आहात , माणूस हरतो थांबतो थकतो तेव्हा त्याने हे पाहावं परत नवीन उमेद मिळेल जगायला . डोळे भरून आले सर्व काही पाहून . निसर्ग प्रेम प्राणी प्रेम देवानं विषयी प्रेम आणि ह्या सगळ्यात पुढे तुमचं एक मित्र सखा म्हणून प्रेम जे शामराव ना इतका मोठा आनंद दिला खूप छान.

  • @user-cu5ri8uz5p
    @user-cu5ri8uz5p หลายเดือนก่อน +2

    गावाबद्दल गावातल्या माणसांबद्दल तुमचे मन किती छान आहे मी तुमचे पिक्चर खूप पाहिले मला तुमचा राग यायचा खरोखर आपला मराठी माणूस असाच आहे का काय पण आता कळाले तुमचा स्वभाव खूप छान आहे

  • @jaydeepdesai3622
    @jaydeepdesai3622 3 หลายเดือนก่อน +2

    किती पुण्यवंत असतील ते आई वडील. ज्यांच्या पोटी निसर्गावर भरभरून प्रेम करणारे, जंगल हेच विश्व मानणारे, जंगल हेच जीवन मानणारे शामराव जन्माला आले.

  • @sunilghuge2218
    @sunilghuge2218 2 หลายเดือนก่อน +1

    सयाजीराव शिंदे आपणास कोटी कोटी प्रणाम,एवडा मोठा सेलिब्रिटी असून देखील सर्व सामान्य माणसाला येवढी किंमत देणारा माणूस आयुष्यात पहिल्यांदाच पाहिलं.😢😢😊

  • @user-zz4kx5pr6m
    @user-zz4kx5pr6m วันที่ผ่านมา

    सयाजी शिंदे सर तुम्हाला सलाम आहे कारण आज या माणसला तूम्ही त्यांना त्यांच्या खर्या निसर्गाच्या माय भूमी्त खरोखर आजोबांच्या डोळ्यातील आलेल पाणी आमच्या डोळ्यात आपोआप येवू लागले ही खरी जगंलाशी मैत्री करणारी माणसे 👍🙏🙏

  • @sandeepsawant3172
    @sandeepsawant3172 3 หลายเดือนก่อน +4

    खर जीवन हेच आहे.
    बाकी सगळ व्यर्थ आहे.
    का जगतोय माहीत नाही.
    कशासाठी जगतोय माहीत नही.
    सगळ व्यर्थ आहे.

  • @dhairyashilchavan6529
    @dhairyashilchavan6529 3 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद धन्यवाद धन्यवाद सयाजी शिंदे साहेब तुमच्या सारखे लोक सध्या च्या काळात आहेत हेच पटत नाही

  • @amolmohite8447
    @amolmohite8447 2 หลายเดือนก่อน +2

    निःशब्द सयाजीराव शिंदे खरंच तुम्ही खूप great आहात. डोळ्यात पानी आले काय बोलू तेच कळत नाही. मनाला खूप समाधान वाटलं video पाहून. माणसाने असच साधं simple असावं.

  • @mauilawari.2100
    @mauilawari.2100 3 หลายเดือนก่อน +3

    सर काहीही करा पण बाबांचे जनावर त्यांना आता सध्या ते राहतात तिथे नेऊन द्या. एवढीच इच्छा❤❤

  • @umajiborhade1117
    @umajiborhade1117 3 หลายเดือนก่อน +3

    हरवलेल्या वाटा शोधणारा कलाकार सलाम आहे सर तुम्हाला आणि बाबांना

  • @devanandnawalkar5908
    @devanandnawalkar5908 3 หลายเดือนก่อน +2

    खूप छान सर, जगाच्या पाठीवर सर्वात सुंदर निसर्गसंपदाच आहे.... तिथल्या सारख सुख नाही कुठे...

  • @appasahebbalame3017
    @appasahebbalame3017 3 หลายเดือนก่อน +2

    काय बोलणार मुक्या जनावरांवर च प्रेम पाहून त्या च्या पुढे शब्द फीके आहेत किवा शब्दांच्या पलीकडले प्रेम

  • @ajitsargar2285
    @ajitsargar2285 3 หลายเดือนก่อน +2

    सयाजी शिंदे सर 🙏 तुम्हाला मी
    ' अरण्यराणा ' म्हणूनच संबोधू इच्छितो.🙏❤️

  • @35858
    @35858 3 หลายเดือนก่อน +3

    व्यवसाय आणि जीवन असच जगत आहे आज कालची जवळपास सगळीच मानस pn त्याव्यतिरिक्त ही जीवन असत हे तुमच्याकडून शिकायला मिळतं आहे नाहीतर कुटुंब नोकरी व्यवसाय मित्र परिवार याशिवाय दुसर काही जगणं अस्त हे विसरूनच गेलाय माणूस.

  • @vishalkashid4658
    @vishalkashid4658 3 หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम अगदीच निशब्द ❤👌🙏देवमाणूस निसर्गाचा

  • @d.m.5410
    @d.m.5410 2 หลายเดือนก่อน +2

    सयाजी शिंदे हे एक जमिनीवरचे यशस्वी कलाकार

  • @hemlatajagtap2117
    @hemlatajagtap2117 3 หลายเดือนก่อน +3

    फक्त साष्टांग नमस्कार तुमच्या महान कार्याला

  • @sameeradake3636
    @sameeradake3636 3 หลายเดือนก่อน +2

    बापू, शामराव काकांच्या साथीने झाडातला देव पाहिला, जनावराचा देव पाहिला, निशब्द भावनांचा ओलावा पाहिला, आणि तुमच्या रूपाने अभिनेत्याला देव माणूस पाहिला.. तुमच्या माणुसकीचा आणि जगण्यातला रुतबा पाहिला धन्य हो बापू❤❤❤

  • @NitinIndianAsmr4648
    @NitinIndianAsmr4648 2 หลายเดือนก่อน +4

    सयाजी शिंदे या वेक्ती ची सरळ सरळ मातीशी नाळ जोडलेली आहे आणि या वेक्ती चे मित्र देखील गरीब शेतकरी आहे आहे कि नाही ज्यांना खरं माझी कॉमेंट बरोबर वाटे त्यांनी like करा 😊

  • @mayaborade8139
    @mayaborade8139 3 หลายเดือนก่อน +2

    सर तुम्ही माणसातला देव शोधून काढला आहे‌ 🧿🥰

  • @djsmash1987
    @djsmash1987 3 หลายเดือนก่อน +2

    निसर्गाचा पुजारी श्यामराव...अन देवा देवांची भेट घडवणारा शिंदे सय्याजी...❤❤❤
    देवांची पालखी जश्या एकत्र येतात तशी भेट घालून दिलीत तुम्ही... तुमच्या आयुष्याला एक अवलिया तुमच्यात जागा झाला आहे...कायम असेच रहा सर... ❤

  • @panditjagtap132
    @panditjagtap132 4 วันที่ผ่านมา +1

    आपल्या मातीची माणुसकी जपणारा माणूस🙏

  • @smitajadhav5722
    @smitajadhav5722 3 หลายเดือนก่อน +2

    सयाजी सर तुमच्या या कार्याला शब्दाचा अपुरे पडतील असं तुमचं काम आहे शतशः प्रणाम हे काम करते खूप छान वाटते

  • @PurvaPatil-5152
    @PurvaPatil-5152 3 หลายเดือนก่อน +3

    डोळे भरून आले.😢मोबाइल च्या जगात आताची पिढी कितीही मी निसर्ग प्रेमी आहे म्हणुन निसर्गाच्या सान्निध्यात राहून छान videos बनवतात पण खरे निसर्ग प्रेमी हेच 😢 कोणती अपेक्षा नाही फक्त देवानी बनवलेला निसर्ग सुरक्षित रहावा म्हणून त्याच्याकडेच प्रार्थना करतात.फक्त निरपेक्ष प्रेम.धन्यवाद या खास video साठी.🙏

  • @navnathsudake1545
    @navnathsudake1545 3 หลายเดือนก่อน +3

    सयाजी शिंदे सर. तुम्हाला सलाम.....आहे.🎉🎉

  • @user-rr2wq7og5t
    @user-rr2wq7og5t 3 หลายเดือนก่อน +2

    काय बोलावं सर खूप भावनिक होतं शामराव नावाच्या माणसाची हीच संपत्ती आहे आणि ती संपत्तीची भेट घडवून आणणारा देव सयाजी च्या रूपाने भेटला आणि तुम्ही हे घडवला शमरावना निसर्ग पहाण्याची संपत्ती आणि तुम्हाला आशीर्वादाची ज्याची किंमत होणे नाही ग्रेट

  • @sakharammohite4886
    @sakharammohite4886 14 วันที่ผ่านมา +2

    काका ना हुंदके आले कारण आपल्या मनातील वेदना समजणारा त्यांना सर तुम्ही भेटला

  • @shivdasphad1827
    @shivdasphad1827 2 หลายเดือนก่อน +3

    तळ गळतला माणूस गरीबाची जाणं असलेला माणूस आमचा म्हणजे पूर्ण महारष्ट्र मधील आवडता अभिनेता सयाजी दादा शिंदे ❤❤❤❤ मला अभिमान आहे या मराठी अभिनेत्याचा जो साऊथ फिल्म मधे सर्वात आवडता villen म्हणून प्रसिद्ध आहे love you सयाजी दादा ❤❤❤❤

    • @ganeshshirsath1732
      @ganeshshirsath1732 2 หลายเดือนก่อน

      नेता म्हणून लयभारी रोल करतात,

  • @radhabaviskar9102
    @radhabaviskar9102 3 หลายเดือนก่อน +2

    सर तुमच्या कार्यास सलाम,खरच तुम्ही लोकांचा आणी निसर्गाचा इतका खोलवर विचार करू शकता,,खुप खुप धन्यवाद

  • @sanjayraut4419
    @sanjayraut4419 2 หลายเดือนก่อน +1

    सयाजी शिंदे सारखा अतिशय महान कलाकार असून देखील आजही त्यांची नाळ ग्रामीण भागातील लोकांशी आणि गरीबांशी जोडलेली आहे.हे पाहून मीही एक सातारकर असल्याचा अभिमान वाटतो.

  • @Anirum267
    @Anirum267 3 หลายเดือนก่อน +1

    शिंदे साहेब तुम्ही ग्रेट माणूस ... 🙏🙏🙏🙏
    लई आनंद झाला आजोबा ना .. गुर पाहून ... त्यानं ते गुर .... त्यांचा घरी देता आले तर बघा ... आम्हाला पण बोलवा help la ... Me सातारा मधनच आहे....

  • @navnathsudake1545
    @navnathsudake1545 3 หลายเดือนก่อน +2

    सयाजीराव नि :शब्द आहोत आम्ही.....ग्रेट🎉..... शाम बाबा....🎉

  • @jyotinalode982
    @jyotinalode982 3 หลายเดือนก่อน +3

    मला पण माझं गाव आठवलं,सयाजी सर तुम्ही माझे आवडते हिरो आहात

  • @shrikantchangulpai4982
    @shrikantchangulpai4982 3 หลายเดือนก่อน +2

    शब्द नाही सर तुमच्या क्क कार्याला ...
    तो 80वर्ष वयाचा .....जंगल,आणि गाई,बैल, म्हेर्इस.निसर्ग बघून पुन्हा वाघ झाला...शामराव😊🙏
    सरते शेवटी तो निरोप स्मरणीय ...सयाजी सर तुमच्या मुळे शामराव आणि त्यांची जीवन गाथा आम्हाला ही अनुभवयाला मिळाली .
    आज च्या या स्वार्थी दुनियेत शामराव 🙏😶....... धनयवाद श्री सयाजी सर.🙏

  • @dattapawar6192
    @dattapawar6192 3 หลายเดือนก่อน +1

    खूपच सुंदर निसर्गरम्य वातावरणातला गावची आठवण करून देणारा हा व्हिडिओ आपण बनवला त्याबद्दल आपले आणि श्यामरावांचे खूप खूप धन्यवाद.

  • @prakashingulkar4802
    @prakashingulkar4802 2 หลายเดือนก่อน +1

    धरणग्रत सर्व लोकांची हीच अवस्था आहे. सरकारने भावनिक व आर्थिकदृष्ट्या यांना नागविले आहे.

  • @harryogivlogs131
    @harryogivlogs131 3 หลายเดือนก่อน +3

    डोळे भरून आले हे सगळ बघताना.. खूप धन्यवाद

  • @backoffice1689
    @backoffice1689 3 หลายเดือนก่อน +2

    माणूस कुठेही गेला तरी आपल्या देवाशी जुळलेली नाळ तोडू शकत नाही. महादेव आपल्याला दीर्घ आयुष्य देऊ 🔱🙏🙏

  • @dadasovaliv6540
    @dadasovaliv6540 3 หลายเดือนก่อน +5

    शामराव पिक्चर आला पाहिजे सर 🙏

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 3 หลายเดือนก่อน +2

    सयाजी भाऊंच करावं तेवढं कौतुक कमीच सामान्य जनतेत जाऊन आपला आनंदी द्विगुणित करतात आणि समोरच्याला देखील आनंदित करतात यापेक्षा दुसरा आनंद काय असू शकतो 🤝

  • @SagarGorad-wl3lp
    @SagarGorad-wl3lp 2 หลายเดือนก่อน +2

    माणसातील देव सयाजी सर सलाम
    त्यांच्या कार्याला

  • @ramchandrasapkal3271
    @ramchandrasapkal3271 21 วันที่ผ่านมา +2

    देवमाणूस सर तुम्ही

  • @dnyaneshthesia
    @dnyaneshthesia 3 หลายเดือนก่อน +2

    अतिशय हृदयस्पर्शी❤❤
    सयाजीराव यांच्या बद्दलचा आदर अनेक पटीने वाढला❤❤

  • @nandrajjadhav76
    @nandrajjadhav76 3 หลายเดือนก่อน +1

    ज्या ठिकाणी बालपण गेले तो परिसर ते गाव डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही.
    तसेच आमचं झाले आहे
    आमचे कण्हेर धरण
    माझे गाव हे कण्हेर धरणात गेले
    गोगावले वाडी
    सर मुजरा तुमच्या मेहनतीला
    ऐंशी वर्षं आजोबांना जुन्या आठवणी दाखवून त्यांच्या शरीरात बळ आणून धीर देवून त्यांना पुन्हा पुनर्जन्मच झाला.
    धन्यवाद सर!
    आपले खुप खुप आभारी आहे.

  • @pratikpatil8400
    @pratikpatil8400 2 หลายเดือนก่อน +2

    प्रति महाराष्ट्र सरकार,
    आत्तापर्यंत आम्ही पुनर्वसित लोकांचं आयुष्य बघितलं.... विकासाच्या नावाखाली / वाढत्या लोकसंख्येच्या निमित्ताने पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी म्हणा सरकार या लोकांचं विस्थापन करतं..... पण खरं सांगायचं झालं तर नुसतं विस्थापनचं होत नाही तर या लोकांची पिढ्याणपिढ्याचे साठवून ठेवलेल्या आठवणी, त्यांची संस्कृती, त्यांचं गावपण विकासाच्या नावाखाली संपुष्ठात आणलं जातं.
    निसर्गाला देव माननारी आणि साधी राहणीमान जगणारी ही माणसं.... बाहेरच्या जगाशी कसलीही स्पर्धा नसलेली ही माणसं नैसर्गिक जिवन जगताना इतकी सुखी असताना सरकार विस्थापन करताना त्यांना काय देतं.???
    आत्तापर्यंत विस्थापित केली गेलेली लोकं खरोखर मनापासून खुश आहेत??? ह्याचा कुठेतरी सरकारने विचार केला गेला पाहिजे.
    कारण आपण त्यांचं जगणं हिरावून घेत आहोत.

    • @vasundharaborgaonkar9770
      @vasundharaborgaonkar9770 2 หลายเดือนก่อน

      अश्या बऱ्याच आठवणी लोकांचे मन खातात शहरी लोकांना घर बदलण्याची सवय झाली ग्रामीण भागाची नाळ किती जोडली धाय मोकलुन रडु लागले

    • @HiraSomu2306
      @HiraSomu2306 27 วันที่ผ่านมา

      विस्थापन हा शब्द किती भयाण आहे...माणसाला उखणून टाकणंच आहे हे. त्या जनावरांना तरी काय मिळतं असेल? खाणंपिणं, आसरा, सुरक्षा?

  • @pankaj16598
    @pankaj16598 3 หลายเดือนก่อน +2

    तुमच कार्य खूप मोठ आहै सर...

  • @pss9734
    @pss9734 3 หลายเดือนก่อน +1

    मातीतल्या माणसांची किंमत जगाला माहिती करून देणारे सिनेअभिनेते👌👌👍👍सयाजी शिंदे सर

  • @anilnaik5408
    @anilnaik5408 3 หลายเดือนก่อน +1

    देवाचे दर्शन घडवलं सयाजी शिंदे साहेबांनी अप्रतिम माहित नाही पण आतून खूप गलबल अविस्मरणीय

  • @meenapawar3520
    @meenapawar3520 3 หลายเดือนก่อน +1

    सर एवढे मोठे सुपरस्टार तुम्ही आणि रानावनात तर वावरता पण गोरगरिबां साठी जी तुमच्या मनात आस्था आहे त्या माणुसकिला सलाम सर ❤🙏🙏👌👌👍

  • @samindian4662
    @samindian4662 2 หลายเดือนก่อน +1

    सर, मी सिक्कीम आणि अरुणाचल पहिला एवढा निसर्ग समृद्ध पण एवढा सुंदर महाराष्ट्र आणि त्याचा आत्मा दाखवतात. खूप धन्य वाटलं.

  • @mavalatrekker9922
    @mavalatrekker9922 3 หลายเดือนก่อน +3

    जिवंत पनी स्वर्ग सुख अनुभवलेले शामराव यांच्या सारखे नशीब कुठल्याही अरबपतीला मिळू शकत नाही

  • @prashantdesai9521
    @prashantdesai9521 3 หลายเดือนก่อน +1

    Khup chaan kam karat aahat sir. Tumchya kamala salam.

  • @ratnaprabhaborhade4337
    @ratnaprabhaborhade4337 3 หลายเดือนก่อน +3

    माझे डोळे वाहू लागले. वाटले कुठे मी शहराच्या गर्दी हरवले आहे .
    फक्त एकच इच्छा ईश्वर सर्वांना सुखी ठेवो

  • @NawaleFabricators
    @NawaleFabricators 2 หลายเดือนก่อน +1

    जुनी मानस खूप साधी भोळी व मनमिळाऊ
    देवावर अमाप श्रद्धा
    गरजा खूप कमी
    देवासारखी 🙏🙏🙏