ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

शेतकरी बापाला मयतीचा 80 रू चा आहेर/shetkari bapala mayaticha 80रू चा आहेर.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 พ.ย. 2019
  • Jay javan kay kisan..
    शेतकरी बापाला 80 रु चा आहेर..
    सध्याचं झालेल्या अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांचं प्रमाणापेक्षा जास्त नुकसान झालंय त्यात सत्ता स्थापनेची गडबडत असताना ना कुठे तरी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज होती पण सगळ्यांचं दुर्लक्ष?
    का अस?
    शेती अन् शेतकरी असणे गुन्हा आहे का?
    त्यात केंद्र सरकार कडून मदत मिळाली बर वाटल पण त्यांच्या अटी व नियम बघून ती मदत नकोशी वाटत आहे शेतकऱ्यांना.
    #8000 रु मदत कोरडवाहू
    #18000 रु मदत बागायती
    मदत घोषणा झाली.
    पण विचार केला तर ती मदत फारच कमी आहे.
    का तर लाखोंचं नुकसान झालंय अन् 8000 त्यात पण नियम व अटी?
    8000 हेक्टर का तर 80 रू गुंट्याला असा सरासरी आकडा येतो.
    अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतलेल्या पीडित शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचा आढावा घेत आर्थिक मदत जाहीर केली आहे. खरीप पिकांसाठी ८००० रुपये प्रति हेक्टर आणि बारामाही पिकांसाठी १८ हजार रुपये मदत देण्यात येणार आहे.
    बारामाही पिकांमध्ये फळबागांसह विविध पिकांचा समावेश होतो. अवकाळी पावसामुळे या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. सुरुवातीला पावसाने दडी मारली आणि नंतर अतिवृष्टी झाली. त्यामुळे जे काही पीक आलं होतं, ते सर्व गमावण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली.
    या मदतीसह नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या मुलांना परीक्षा शुल्क माफ करण्यात आलं आहे. महाविद्यालये आणि शाळांमध्ये द्यावी लागणारी फी यामुळे माफ केली जाईल. जाहीर केलेली मदत तातडीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी प्रशासनाला आदेशही देण्यात आले आहेत, राज्यात सध्या राष्ट्रपती राजवट लागू असल्याने राज्यपाल कार्यभार सांभाळत आहेत. राज्याच्या मुख्य सचिवांच्या निगराणीत शेतकऱ्यांपर्यंत ही मदत पोहोचवली जाणार आहे. यापूर्वी विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी नुकसानग्रस्त भागाचा आढावा घेऊन मदत जाहीर करण्याची मागणी केली होती.

ความคิดเห็น • 1

  • @ankeshnasre9199
    @ankeshnasre9199 4 ปีที่แล้ว

    Prati Hector 8000 , yanda 40% nukasaan det aahe government, fakt 3200 bhetanar aahe prati Hector