खाडीतून कालवं कशी काढतात 😍 | सासरोडी बायकोने बनवली तव्यातली कालवं | Oyster - Sea Food (Konkan)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ส.ค. 2024
  • खाडीतून कालवं कशी काढतात 😍 | सासरोडी बायकोने बनवली तव्यातली कालवं | Oyster - Sea Food (Konkan) आम्ही सासरोडी साखरीला गेलो होतो तेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळी समुद्राला ओहोटी होती तेव्हा खाडीतली कालवा काढायला गेलो होतो. खाडीतली कालवा खूप महाग आहेत आणि अतिशय चविष्ट असतात. गर्मी सुरू झाली की खाडीला कालवा चांगली येतात. कालवांचा समा असतो तेव्हा साखरी आणि आजूबाजूच्या गावातील महिला खास करून कालवा काढायला खाडीत जातात. केळशीच्या खाडीमध्ये भारजा नदीच्या मुखाशी खूप कालवा असतात. आम्ही सकाळी कालवा काढायला गेलो तेव्हा गावातील इतर महिला सुद्धा आल्या होत्या. गावी खाडीतून कालवा कशी काढतात, कालवा काढण्याची पद्धत या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. कालावांचा डोळा म्हणजे मोठी कालवा खास करून पाण्यात बुडून काढलेल्या कालवांना असतो. पाण्यातली बुडून काढलेली कालवा यांना बुडकालवं असे सुद्धा बोलतात. समुद्राला ओहोटी आली तर जी कालवा पाण्यात असतात ती खूप मोठी कालवा असतात. पाणी कमी झाल्यावर भाटीवर असतात ती साईजने थोडी छोटी असतात. ही कालवा भाजून खूपच छान लागतात. कोयतीच्या टोकीने कालवा फोडली जातात. कालवांचे कालवण आणि सुकी भाजी केली जाते. कालवा अतिशय स्वादिष्ट असतात. आम्ही कालवा घरी घेऊन वर्षाने तव्यात सुकी कालवा बनवली. तांदळाच्या भाकरीसोबत ही कालवा जाम भारी लागतात. #KhaditliKalavaKashiKadhtat #KhaditaliKalava #OysterSeaFood #sforsatish
    तुम्हाला या व्हिडिओमध्ये खाडीतून कालवा कशी काढतात आणि कालवा तव्यात कशी बनवली जातात हे दाखवले आहे. व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.
    तुमचे प्रेम असेच कायम असुद्या!
    मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    www.imstagram....

ความคิดเห็น • 1K

  • @dipakphalake5601
    @dipakphalake5601 3 ปีที่แล้ว +81

    किती नशीबवान आहात तुम्ही लोक. निसर्गात पुर्णपणे एकरूप होवून मजा घेतायं जीवनाची. ग्रेट यार.

    • @latarane3550
      @latarane3550 3 ปีที่แล้ว

      अगदी खरं 👌

    • @meghrajmehndidesignworld7753
      @meghrajmehndidesignworld7753 3 ปีที่แล้ว

      Ho

    • @sandeepk846
      @sandeepk846 3 ปีที่แล้ว +3

      अरे असं काही नाही तुम्ही पण येऊ शकता कोकणात पण कोकणी मित्र पाहिजे.

    • @ankushkedar4357
      @ankushkedar4357 3 ปีที่แล้ว +1

      @@meghrajmehndidesignworld7753 ho

    • @pravintupe7497
      @pravintupe7497 3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/v3puISU1WhA/w-d-xo.html

  • @gp7326
    @gp7326 3 ปีที่แล้ว +37

    दादा अप्रतिम आहे तुमचे सर्व विडीओ , मला तुमच्या गावात यायचंच आहे कधीतरी मला खूप आवडलं तुमचं गावातील लोकजीवन ,संस्कृती वातावरण .असेच विडीओ बनवत राहा हीच आमची इच्छा!!!

  • @sandipbaing4316
    @sandipbaing4316 3 ปีที่แล้ว +7

    फार छान हे village life म्हणजे स्वर्ग सुख आहे ते सर्वना नशिबी नसत
    पण तुम्ही आम्हाला नेत्र सुख तरी अनुभवलत थँक्स राव।

  • @deepakshinde1096
    @deepakshinde1096 3 ปีที่แล้ว +13

    ☺दादा मी पंन रोहा ❤ कोलाड चा आहे . मुंबई च्या जीवना पेक्षा आपले कोकणातील जीवन सुंदर आहे 👍 अशाच छांन व्हिडिओ बनवत रहा 🤝🙏

  • @ravindrawatkar3468
    @ravindrawatkar3468 3 ปีที่แล้ว +9

    कालवा प्रकार पहिल्यांदा च
    बघितला.
    नविन काही तरी बघायला मिळाले
    खुप छान सतिश
    रविन्द्र वाटकर, नागपूर

    • @sandeepk846
      @sandeepk846 3 ปีที่แล้ว +1

      अजुन भरपुर आहे कोकणात.पैसा नसला तरी कोकणी माणूस उपाशीपोटी राहत नाही.निसर्गाने पोट भरण्यासाठी भरपूर दिलं आहे.फक्त मेहनत घ्यावी लागते. ती ठासून भरलेली आहे कोकणात .🙏🙏🙏

    • @jiyansh04
      @jiyansh04 3 ปีที่แล้ว

      साहेब आता पाहीलीत कालव, पण कधी जमलं तर टेस्ट करून बघा, जबरदस्त असते चव, मटण विसरून जाल.

  • @sanikakupte217
    @sanikakupte217 3 ปีที่แล้ว +10

    खूप छान. शहरातील आयुष्य एकदम रटाळ झाले आहे,गावचे आयुष्य रंगीबेरंगी असते.नवीनच खाद्यपदार्थ बघितला . छान वाटला.

  • @krushnatshinde9353
    @krushnatshinde9353 3 ปีที่แล้ว +4

    खुप छान रे भावा खर् खुप नशीबवान आहात कोकण म्हणजे स्वर्ग ❤️❤️❤️❤️🙏🙏🙏

  • @shaileshjadhav2661
    @shaileshjadhav2661 3 ปีที่แล้ว +2

    एक नंबर सर्वाना अशी सासुरवाडी नाही मिळतं खूपच भारी

  • @dattatrayambhore811
    @dattatrayambhore811 3 ปีที่แล้ว +5

    दादा खुपच भारी राव👌, तुम्ही व्हिडिओ बघणाऱ्या सर्वांना परिवारातील सदस्य समजून एकरूप करून घेतलेत👍 आणि आम्हाला कोकणातील दर्शन🍵 घडविले, त्याबद्दल खरंच मनापासून आभार 🙏
    🙏🙏🙏

  • @chetanpatil9850
    @chetanpatil9850 3 ปีที่แล้ว +21

    जिना इसिका नाम है 👍
    जगी सर्व सुखी असा कोण आहे 😃 only s for सतीश
    मस्तच मित्रा तुला गावच निसर्ग सुख ग्यायला भेटत

    • @Guru-rf1ly
      @Guru-rf1ly 3 ปีที่แล้ว

      😃👌👌👌👍

  • @neelamdeshpande1494
    @neelamdeshpande1494 3 ปีที่แล้ว +2

    किती छान कालवं, माझे आजोळ केळशी म्हणून मलाही कालव आवडतात लहानपणी खूप खाल्ली.

  • @anindian977
    @anindian977 3 ปีที่แล้ว +4

    Kalwa...Wow mazhe favourite, India la alyawar Varsha chya gaavi jayla khup avdel...Mastaa

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 ปีที่แล้ว +1

      Jarur ya, aamhi gheun jau tumhala

  • @sushantjadhav8748
    @sushantjadhav8748 3 ปีที่แล้ว +4

    खुप छान सतिश दादा गावच्या पायवाटा रानात जाणारे रस्ते डोंगर पाहुन मझ्या गावची आठवण आली खुप छान तुझा मुलगा आणि मुलगी खुप गोड आहेत

  • @shreyavlog2597
    @shreyavlog2597 3 ปีที่แล้ว +7

    खूपच छान दादा कालव 😋 आणि त्यात गावच्या चुली वरची तर मजाच वेगळी असते लय भारी

  • @bhaskargaikar8906
    @bhaskargaikar8906 3 ปีที่แล้ว +2

    Jithe garibi , tithech sukh, shanti Aani Maan sanman Aani aaple pan milte,,, khup khup Chan video aahe...

  • @sanyogitakakade1211
    @sanyogitakakade1211 3 ปีที่แล้ว +1

    खूप मस्त "कालव"😀😀घर खूप छान. मला फार आवडले सतीश . किती छान वातावरण आहे. खाडी चा परिसर पण छान. वर्षा चे बहीण साखरी ला असते का. छान. स्वयंपाक केला. घर व घरातील वातावरण १दम खास. भारीच 😀😀 आहे आणि खूप छान वाटतेय

  • @manishmhatre6363
    @manishmhatre6363 3 ปีที่แล้ว +3

    खुप छान काळवे खाऊन जमाना झाला
    आज पुन्हा खायची इच्छा झाली गाव पण खुप छान आहे

  • @Guru-rf1ly
    @Guru-rf1ly 3 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम व्हिडीओ तुमचा कालवे तर 1नंबर मस्त व्हिडीओ होता.... तुमचा👌👌👍 आवाज 👍🤷खूपच मस्त वाटतो ऐकायला

    • @gumastagumasta2255
      @gumastagumasta2255 3 ปีที่แล้ว +1

      अडखळला माझी मावशी आ हे

  • @saritapatil8221
    @saritapatil8221 3 ปีที่แล้ว +1

    मी कोल्हापूरमधील खेड्यात रहातो.समुद्रसपाटीपासून खूपच दूर असल्याने
    हे सुख आमच्या नशिबातच नाही.मात्र माझे बालपण म्हणण्यापेक्षा दहावीपर्यंतचे सर्व शिक्षण
    हरवळ,ओढे,तळी अशा ठिकाणी गळाने मासे पकडणे,खेकडी धरणे,पोहणे,झाडांवर चढून आंबे,जांभळे,धामने ,फणस खाणे आणि संध्याकाळी न चुकता मार खाणे -अन् वर्गात
    मात्र १ला नंबर ठेवणे.खूप धम्माल केली.
    भैय्या,तुझा व्हिडीओ पाहून आठवणी जाग्या झाल्या.हारवळीतील शिंपली खाल्ली पण
    कालवं नाही खाल्ली.
    व्हिडिओ कधी संपूच नये असं वाटलं.
    👌🙏👌🙏👌

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 ปีที่แล้ว

      Thank you ❤️❤️

  • @dilipkamble3015
    @dilipkamble3015 3 ปีที่แล้ว +1

    तुमचा चॅनेल खरोखरच फार आवडला. कारण सर्व गोष्टी नैरसर्गिक दाखवल्या.

  • @PRAYAS8055
    @PRAYAS8055 3 ปีที่แล้ว +8

    भावा मी मराठवाडा मध्ये लातूर जिल्ह्यातील आहे पण आमच्याकडे कोकणातील खूप काही फळे आणि मासे , कालव नाही भेटत. आमच्याकडे सगळे खूप काही भेटत पण कोकणातल्या काही वस्तू भेटत नाहीत. आणि आम्हाला माहीत पण नाही असे काही पाहिलं की खूप नवीन वाटत आणि माहिती पण भेटते. धन्यवाद आम्हाला कालव बद्दल माहिती दिली.

  • @smitachavande4171
    @smitachavande4171 3 ปีที่แล้ว +5

    हि आपली कोकणची शान कोकण आपला बरो असा👍

  • @lawfulgyandr.gyanendrafulz4020
    @lawfulgyandr.gyanendrafulz4020 3 ปีที่แล้ว +1

    सतीश खूपचछान माहीत दिलीत.
    तुम्ही फारच प्रेमळ आहात आणि माती शी जोडलेले आहात.
    सगळ्यात महत्ववाची गोष्ट जस आहे तसा दाखवता... आणि स्वतच्या घरच्यांना पण सामील करून घेता...
    तुम्हा सर्वाना हार्दिक शुभेछा

  • @sumitagale9114
    @sumitagale9114 3 ปีที่แล้ว +2

    स्वर्गाहुनी सुंदर आपलं कोकण...

  • @digitalprasads7423
    @digitalprasads7423 3 ปีที่แล้ว +11

    Satish bhau I simply liked the way in which u showed us life here at ur village so simple and fantastic. N s I liked this oyesters too,

  • @saurabhphatak2802
    @saurabhphatak2802 3 ปีที่แล้ว +20

    गावची मजा ही वेगळीच मजा आहे ... त्याची तुलना कशाशीही होऊ शकत नाही ...

  • @udayghadi2995
    @udayghadi2995 2 ปีที่แล้ว +1

    Mi tula olkhat nahi but tuze he videos khup आवडतात आणि खूप kahi sangun jatat mla...mla pan khup aavad aahe ya saglyachi... खर बोलायचं झालं तर तुला नक्की भेटेन केव्हातरी.... लाईक मनापासून.... खूपच मज्जा आहे तुझ्या गावी. आणि मला हे सगळ काही अनुभवायचं आहे...ते गाव , त्या गावातील घरे, ते निसर्ग सौंदर्य, आणि खूप काही......सगळ्या गोष्टी कश्या मनाला भुरळ घालणाऱ्या ...... Keep it up

  • @snehalkasare1028
    @snehalkasare1028 3 ปีที่แล้ว +2

    Khup bhari... gavala Khanyachi majja ch bhari aste 👌👌👌👌

  • @sanjivanichavan8862
    @sanjivanichavan8862 3 ปีที่แล้ว +3

    तुम्ही लोक खूप नशीबवान आहात खरच

  • @machindranathmane4077
    @machindranathmane4077 3 ปีที่แล้ว +14

    दादा तु खास माणूस आहेस किती छान माहिती देतोस कोकणातील जसा कोकणी निसर्ग ईश्वरासमान तसं तुझ स्वरूप घरी बसून कोकण दर्शन घडवतोस परमेश्वराने तुझा जन्मच अशा चांगल्या कामासाठी निर्माण केलारं राजा भरून पावलो तुझे व्हिडिओ बघून घन्य तुझे माता पिता

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 ปีที่แล้ว +1

      खूप खूप आभार तुमचे ❤️❤️❤️

    • @karunatate7987
      @karunatate7987 3 ปีที่แล้ว

      फार सुंदर आणि समर्पक शब्दात कॉमेंट केली आहे .👌👌👍👍

  • @kanchanharpale8635
    @kanchanharpale8635 3 ปีที่แล้ว +1

    Yaar great....konkanat gelyawar aamhi fakta beaches var udya marto...he khara kokni mansache jeevan aahe...great....

  • @anilmixmax244
    @anilmixmax244 3 ปีที่แล้ว

    सुंदर...पाहुन आनंद वाटला..व तोंडाला पाणी सुटले....फार छान...

  • @satishsuradkar3935
    @satishsuradkar3935 3 ปีที่แล้ว +9

    भाऊ तुम्ही तुमच्या परिवार व नातलगांसोबत असेच सदैव आनंदी रहावे ही सद् इच्छा.

  • @rajandesai7723
    @rajandesai7723 3 ปีที่แล้ว +24

    A very honest simple TH-camr I have evr seen. kudos to you Mr. Satish wish you a great future ahead, keep uploading! 🙏

    • @Rpk21
      @Rpk21 3 ปีที่แล้ว +1

      True.. His simplicity make us watch his videos

    • @vijaykule2056
      @vijaykule2056 3 ปีที่แล้ว +1

      Really it's true

    • @divakarrao8725
      @divakarrao8725 2 ปีที่แล้ว

      Yes true. His wife Varsha and children too support him equally. Varsha, hardworking lady managing house, children and a good chef too. Great to watch.

  • @dipakchaudhari3475
    @dipakchaudhari3475 3 ปีที่แล้ว +2

    Kalve ky asttay ajun Amhala mahit nahi but tumhi dakhavlya mule pahilyanda baghital. Great he Dada tumhi....kokan madhe sarv kahi baghayla ani Anubhavayla miltay.... Nisha Chaudhari Nashik

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 ปีที่แล้ว

      ❤️❤️🙏

  • @vishaldongare4127
    @vishaldongare4127 3 ปีที่แล้ว +2

    मस्त वीडियो ♥️😍.... स्वर्गसूख हे खाल्यावर च कळेल.... म्हणून एकदा खाऊन बघा..... सुकी कालवा म्हणजे 😋😋😋😋

  • @lalchandlohana3479
    @lalchandlohana3479 3 ปีที่แล้ว +6

    हम शहर वाले इनका मज़ा ही नहीं लें सकते गाओं का मज़्ज़ा ही कुछ और है बस एक कमी है या अगर रोजगार हो तो पैसा ही पैसा
    प्रणाम 🙏

  • @pushkar3530
    @pushkar3530 3 ปีที่แล้ว +4

    मस्त vlog दादा, मी हर्णैचा. कालव म्हणजे प्रेम, मला दोन मोठ्या कल्व्यांमध्ये मोती सापडलेले मालगुंड ला. पण ते मोती पॉलिश करत नाही तोपर्यंत दगडच वाटतात.

    • @vishalsitap3276
      @vishalsitap3276 3 ปีที่แล้ว

      Tu aamchya gavache moti neles
      Parat kar aamhala😅
      Malgund maze gav aamhala nahi kadhi sapadale moti😱🤮😭😭

    • @samunagre1968
      @samunagre1968 3 ปีที่แล้ว

      @@vishalsitap3276 हाहाहा

  • @amolpokale4702
    @amolpokale4702 3 ปีที่แล้ว +1

    मी पहिल्यांदा बघितला channle खुप छान आहे nice जोडी आणि एकदम प्रामाणिक पणे सगळे खर सांगितले भाऊ तुम्ही

  • @manjushanaik2779
    @manjushanaik2779 3 ปีที่แล้ว

    खूप मस्त कोकण , ताजी कालव आणून ती फ्राय करून मस्त . ताजी ताजी खायची किती आनंद व सुखी जिवन . तुम्हाला शुभेच्छा .
    👌👌👌👍👍💟💚💗💛

  • @yogitamhatre398
    @yogitamhatre398 3 ปีที่แล้ว +3

    Ekdum bhari video bhau. Gaavchi maja mumbai la nahi. Enjoy at village. Mumbai la yeu naka. Tumhi safe aahat gaavi.

  • @surajmengal3732
    @surajmengal3732 3 ปีที่แล้ว +5

    आरारारा मस्तंच ना दादा 😍😍😍😍 आम्ही पण आमच्या मामाच्या गावाला गेलो की खेकडे पकडायला जातो. पकडता येत तर नाही😂पण त्यांच्यासोबत ते कसे पकडतात ते बघायला आणि फिरायला खूप मज्जा येते.😊😁 शहरातील जीवनापेक्षा ग्रामीण जीवन कधीही चांगलं.🥰❤️

    • @deepakshinde1096
      @deepakshinde1096 3 ปีที่แล้ว +2

      अगदी बरोबर आहे दादा शहरा पेक्षा आपल गावचे जीवन छांन

    • @meghrajmehndidesignworld7753
      @meghrajmehndidesignworld7753 3 ปีที่แล้ว

      Ho dada

  • @aartimayekar8903
    @aartimayekar8903 3 ปีที่แล้ว

    मस्त मस्त कालव मसाला छान बघुन समाधान गावातील जीवनच सुंदर थोड कष्टाचं पण शांत

  • @ushahatwar2249
    @ushahatwar2249 3 ปีที่แล้ว +2

    I remembered my child hood spent in deogad. Kalvanchi size ani bharpur available hoti khadit ani size mothi hoti.khup Chan

  • @shrikantsonkamble2604
    @shrikantsonkamble2604 3 ปีที่แล้ว +5

    सासुर वाडीत आल्या नन्तर आपल्या घरी असल्या सारख राहील पाहिजे मस्त छान भाऊ असच सासू सोबत आई सारख रहा

  • @dhanashreeniwate8393
    @dhanashreeniwate8393 3 ปีที่แล้ว +4

    Khup bhari mazya gavchi athvan zali 👌

  • @ratnasalve6534
    @ratnasalve6534 2 ปีที่แล้ว

    आम्ही कधी खाडी पाहीली नव्हती आणि शिंपल्यातुन खायला मिळतं...हे माहिती नव्हतं खुप छान माहिती दिली.

  • @anitavedga8088
    @anitavedga8088 3 ปีที่แล้ว

    एकदम मस्त 👌 भाजी बघून तोंडाला पाणी आलं.

  • @shrikantdeshpande6842
    @shrikantdeshpande6842 3 ปีที่แล้ว +4

    Egddam mast nature, konkan village, such naturally video shooting wonderful

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 ปีที่แล้ว

      ❤️❤️🙏

  • @hemakotian7334
    @hemakotian7334 3 ปีที่แล้ว +3

    Satish ur native is so pleasant n nice....so peaceful it looks.....life should be simple n peaceful ...just like ur's. 🥰👍

  • @asmitabhayde8858
    @asmitabhayde8858 2 ปีที่แล้ว

    ♥️सर्व विडीओ खुपच छान आहेत...आणि विडीओ करताना जो आनंद तुमच्या आणि घरच्या च्या चेहर्यावर आहे..ते बघुन खुपच छान वाटतं...♥️🤗

  • @sandeepharekar5703
    @sandeepharekar5703 2 ปีที่แล้ว

    खुप छान रेशिप कालव तर खुप छान सासर वाडी पण सुंदर आहे

  • @prabhakarvetal5019
    @prabhakarvetal5019 3 ปีที่แล้ว +5

    Let all family be blessed!
    Thank you for the video!

  • @vickybait9399
    @vickybait9399 3 ปีที่แล้ว +5

    भाजुन पण मस्त लागतात😻

  • @jyotisawant1183
    @jyotisawant1183 3 ปีที่แล้ว +1

    मि खुप विडिओ कालव्याची बघितली सगळ्यांत हा विडिओ अप्रतिम मस्तच ..थोड्यात वेळेत खुप कालवे काढलेत वहीनिने बनवले पण छान ......मी दापोलिकर.....

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 ปีที่แล้ว

      Thank you 😊❤️❤️

  • @jyotibhatkar2691
    @jyotibhatkar2691 3 ปีที่แล้ว +1

    तोडांला पाणी सटले खूप छान👏✊👍 गाव आणि तुम्ही

  • @maheshdeokate9027
    @maheshdeokate9027 3 ปีที่แล้ว +3

    Bhau mi pahilanda pahil.. Thanks🙏 kokan Aparatim. 😃

  • @MM-so7py
    @MM-so7py 3 ปีที่แล้ว +3

    Satish bhau... Yar assal gavran video.... Mumbai madhun gavak gelyavar.... Hich maja.... Gavchi athwan ali bhau.. 😍😍😍😍

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 ปีที่แล้ว

      😍😍🙏❤️

  • @sujataloke5186
    @sujataloke5186 3 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर ,आम्ही पण गावी अशीच मजा करतो.

  • @manojbhagare2300
    @manojbhagare2300 3 ปีที่แล้ว +2

    बघूनच तोंडाला पाणी सुटतं यार ❤️😋😋😋

  • @abhibhonde
    @abhibhonde 3 ปีที่แล้ว +3

    Dada! tuz gaav khup sunder aahe, as vatat pretyek video madhye aamhi tuzya sobatc aahot tuzya bajula. Itak chan vlogs astat tuze. Keep it up Dada! Lot's of love and blessings from Kolhapur.

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 ปีที่แล้ว +2

      Thank you ❤️🙏
      Sagala thik zala ki ya aamchya gavi 🙏😊

    • @abhibhonde
      @abhibhonde 3 ปีที่แล้ว

      @@SFORSATISH nakki Dada tuzya sobat nakki yein me tuzya Gavi. Thank you for inviting me Dada!

  • @pravinwanivadekar7326
    @pravinwanivadekar7326 3 ปีที่แล้ว +6

    हे सर्व अनुभवायला स्वर्गात कोकणात जन्माला याव लागत लय भारी

  • @rupalivengurlekar3899
    @rupalivengurlekar3899 2 ปีที่แล้ว

    व्वा...किती छान कालवे...मला भारी आवडतात...मजा आहे तुमची...नशीबवान माणसे..खरच स्वर्ग सुख आहे..लहानपणी आम्ही रोज आणायचे आणि खायची...आता नाही भेटत..मुंबईत😔😔

  • @nileshbhadwankar4228
    @nileshbhadwankar4228 3 ปีที่แล้ว +2

    वा...1 च नंबर तोंडाला पाणी सुटले राव🍜👍👌👌👌🙏🙏

  • @manoharbhagne5601
    @manoharbhagne5601 3 ปีที่แล้ว +12

    भावा तू खूप भाग्यवान आहेस कोकणात राहून कोकणचा मेवा तू अनुभवतोस..

  • @sachinnaik3903
    @sachinnaik3903 3 ปีที่แล้ว +7

    दादा तुझ्या, संदेश दादाच्या, अविनाश दादा च्या आणि अनिकेत दादा च्या व्हिडिओ तुन आम्हाला पण गावी आल्यासारखे वाटते, खूप छान असेच व्हिडिओ अपलोड करत रहा, देव तुमचे भले करो 🙏👍👍👍

  • @prajaktagaikwad6094
    @prajaktagaikwad6094 3 ปีที่แล้ว +2

    Outstanding ! 👌👌👌 I love villages. Very beautiful sinary.. No Tam -Jham at all. Keep it up. My best wishes to you.

  • @Rpk21
    @Rpk21 3 ปีที่แล้ว +2

    भारी दादा....आपल्या माध्यामातून गावाकडचा आनंद मिळाला👍

    • @pravintupe7497
      @pravintupe7497 3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/v3puISU1WhA/w-d-xo.html

  • @kiranmhatre8522
    @kiranmhatre8522 3 ปีที่แล้ว +3

    I like Kalwa very much.. my favourite.

  • @subhashbhoir916
    @subhashbhoir916 3 ปีที่แล้ว +9

    जावई बापुना तोडच नाही खूपच छान vlog सतीश

  • @asmitajumare2361
    @asmitajumare2361 3 ปีที่แล้ว +2

    Ek number dada ...chan mahiti dilis Dada ..thank you

  • @sandipsutar7891
    @sandipsutar7891 3 ปีที่แล้ว +2

    Royal डोकीव बुट्टी घेतली छान वाटले गावची जिवन वेगळेच आहे👌

  • @amolghosalkar9991
    @amolghosalkar9991 3 ปีที่แล้ว +3

    कालव मस्तच लय भारी

  • @rupeshbavkar6362
    @rupeshbavkar6362 3 ปีที่แล้ว +4

    खूप छान भावा 👍 कालव पहिल्यांदा पाहिलं आहे 👍 छान वाटलं बघुन तोंडाला पाणी सुटलं 👍 माहिती दिल्या बद्दल मनःपूर्वक आभार मानतो 👍 असच काहीसं नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठव जा 👍 आमच्या गावी न्हाई भेटतं 👍 राजापूर सईदला 👍 तोपर्यन्त 🚩 जय शिवराय 🚩

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 ปีที่แล้ว

      🙏🙏❤️❤️

  • @bhatkantikokanatali3072
    @bhatkantikokanatali3072 3 ปีที่แล้ว +1

    छान व्हिडिओ झाला सतीश मित्रा .खूप मस्त कालव काढायला समुद्राच्या खाडीत जाऊन काढायची मज्जा .आपला गाव तो गावच .गावाच्या सारखी मज्जा कुठेच नाही.

  • @atharvjoshi1460
    @atharvjoshi1460 3 ปีที่แล้ว +1

    काल्व हे पहिल्यांदाच बगितलेत ते हि तुमच्या माध्यमातून खुपच छान दादा तुज्या विडीओ च्या माध्यमातून खुप काही नवीन बघायला मिळते
    आगदी मनापासून धन्यवाद दादा

  • @tusharborole916
    @tusharborole916 2 ปีที่แล้ว +3

    Satish, I love your videos due to natural and simplicity.

  • @sapnasutar8272
    @sapnasutar8272 3 ปีที่แล้ว +3

    Mast kalva mala khup avadtat chan banavli mumbaila khup mahag ahet

  • @ashwinithakur7380
    @ashwinithakur7380 3 ปีที่แล้ว +2

    Satish da vahini khup kashtalu aahe aai la sun shobhte tashi aai chi sar konalach yenar nahi pan vahini sudha khup chhan tichyakde baghital tari khup chhan vatat doghehi asech chhan raha

  • @ashutoshrathod9223
    @ashutoshrathod9223 3 ปีที่แล้ว +2

    Ek number..kahi punya kela ashil re mitra pahilya jalmala

  • @namitapotdar2173
    @namitapotdar2173 3 ปีที่แล้ว +8

    Mavshi chikat aahe pranjula kalve nahi det😂😂😂

  • @user-du8ou4zn7p
    @user-du8ou4zn7p 3 ปีที่แล้ว +13

    आम्ही हे कालवे भाजून मग ते फोडून खातो.. जिभेला पाणी सुटल... 😀

  • @priyakhadye2116
    @priyakhadye2116 3 ปีที่แล้ว

    Wow..mazhi khup divasachi echha hoti kalav bagayachi.ani ti kashi banavayachi ....bagun ase vatale ki tikade gavi yave ani tumi je sarv dakhavale te pratyaksh anubhavayache...mastach video banavala bhau tumi👍🏻🙏 apala kokani manus

  • @dhruvdave1844
    @dhruvdave1844 3 ปีที่แล้ว +1

    I love this video seen many times , kalvanchi baji mast lagate 👍👍

  • @vineetanalavade8603
    @vineetanalavade8603 3 ปีที่แล้ว +3

    मी वाट बघत होती तुमच्या विडीयोची 🤗🤗🤗🤗

  • @vinayaksitap3563
    @vinayaksitap3563 3 ปีที่แล้ว +5

    मी काशीद ला माझा मीत्राकडे पहीलांदा खाली खुप सुंदर होती करा मजा तुम्ही नशीबवान आहात

    • @vishalsitap3276
      @vishalsitap3276 3 ปีที่แล้ว +1

      Malgund ganpatipule la jat raha tithe pan miltat 😅😅😅🙏🙏

  • @ShravaniSanket
    @ShravaniSanket 3 ปีที่แล้ว

    खुप खुप मज्या आली विडिओ बघायला... कालव पण भरपूर मिळाली आणि मोठी मोठी आहेत... मेहनत पण खुप लागते ♥♥♥♥♥👌👌👌👌👌

  • @sampadabhagat3502
    @sampadabhagat3502 3 ปีที่แล้ว

    खूप सुंदर कालवा चे गोल रास भारी😋😋खूप मज्जा आहे गावाला मस्त व्हिडिओ👌❤️

  • @santoshdevrukhakar4634
    @santoshdevrukhakar4634 3 ปีที่แล้ว +4

    नमस्कार दादा....
    तुम्ही लय भारी बोलता राव...आणि तुमचे सगळे वीडियो लय भारी असतात...
    एकदा भेटायाची इच्छा आहे तुम्हाला...

  • @truptijadhav3950
    @truptijadhav3950 3 ปีที่แล้ว +5

    Hi kalav ha prakar me pahilyandacha pahilay

  • @swapnalijalavikhupchsunder3468
    @swapnalijalavikhupchsunder3468 3 ปีที่แล้ว +1

    Kharach video bghtana khup bhari vatl mast video

  • @sailikasekar3158
    @sailikasekar3158 3 ปีที่แล้ว +1

    Khup Chan aamhala gavi jata yet nahi pan tumhi Anubhav deta

  • @rakeshpuribuva4917
    @rakeshpuribuva4917 3 ปีที่แล้ว +3

    खूपच सुंदर ❤️

  • @visharamvaradkar9662
    @visharamvaradkar9662 3 ปีที่แล้ว +8

    Waa satisfy lay bhari yar kalwa bharpur kha

  • @mohammedhaneef2484
    @mohammedhaneef2484 3 ปีที่แล้ว

    Ak nambar dada hee saglaa bagoon aani tumcha gave bagun mala khoob aavardlaa

  • @rachanadhamapurkar9510
    @rachanadhamapurkar9510 3 ปีที่แล้ว

    Kalwa fakt khaun mahiti hoti pan tyachya mage yevdhi mehnat astye tye tumhi hya videotun aamchya paryant pochavlyabaddal khup khup aabhari. Tumchi taai aani mami hyani kalwa phodayla khup mehnat ghetli, Varshani kalwyachi receipe khup chhan dakhavli

  • @siddhantmhatre7059
    @siddhantmhatre7059 3 ปีที่แล้ว +4

    वाट बघून थकलो...... व्हिडिओ पहिली की दिवस खूप मस्त जातो❤️

  • @rajeshmore995
    @rajeshmore995 3 ปีที่แล้ว +4

    Mast

  • @pravin1122
    @pravin1122 3 ปีที่แล้ว

    खूपच छान. तोडांला पाणी सुटले कालव करताना

  • @seemashalakavlogs1782
    @seemashalakavlogs1782 3 ปีที่แล้ว +2

    Khup chan mahiti dili satish bhavu. Gavich raha ekadachi paristiti khup kharab ahe.

    • @seemashalakavlogs1782
      @seemashalakavlogs1782 3 ปีที่แล้ว

      Majhe mister ani sasare admit ahet. Ata bare ahet. Tumhi gavi jayacha nirnay agadi yogya ghetlat pranju ani pradnu chi kalaji ghya. Ani tumachya kutumbachi pan.