सोयाबीन चक्री भुंगा नियंत्रण | chakri bhunga soyabean | soybean girdle beetle

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
  • ✅👨‍🌾नमस्कार शेतकरी मित्रांनो ! 🙏
    कृषि डॉक्टर🌽 या मराठी यूट्यूब चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे.👍
    या चॅनेल वरती तुम्हाला शेती निगडीत सर्व प्रकारचे विडियो पहायला मिळतील, ते देखील तुमच्या मराठी भाषेत. तुम्ही जर एक शेतकरी असाल तर हा चॅनेल तुमच्यासाठी नक्कीच फायद्याचा ठरणार आहे, कृपया चॅनेल ला Subscribe -▶️ करा शेजारील घंटा 🔔 वरती देखील क्लिक करा.
    ✅विषय - सोयाबीन चक्री भुंगा नियंत्रण | chakri bhunga soyabean | soybean girdle beetle
    🔗ग्रुप लिंक - chat.whatsapp....
    1️⃣प्रादुर्भावाची वेळ - सोयाबीन चक्री भुंगा (soybean girdle beetle) किडीचा प्रादुर्भाव सोयाबीनचे पीक साधारपणे २० ते २५ दिवसांचे झाल्यानंतर सुरू होताना दिसतो.
    2️⃣प्रादुर्भावाची लक्षणे | soybean girdle beetle symptoms -
    1. शेतात फिरताना झाडाचे एखादेच पान किंवा फांदी सुकलेले दिसते.
    2. पान फक्त सुकलेले असेल तर चक्रीभुंग्याने नुकतेच अंडे दिलेले असते.
    3. जर पान वाळलेले असेल तर काही दिवसांपूर्वी अंडे दिलेले असते.
    4. पान वाळलेले असेल तर काही दिवसांपूर्वी दिलेल्या अंड्यातून लवकरच अळी निघण्याची स्थिती असेल. या किडीचा प्रौढ भुंगा फिकट तपकिरी रंगाचा असतो.
    5. त्याचे समोरचे पंख खालच्या बाजूने एक तृतीयांश ते अर्धा भाग काळया रंगाचे असतात.
    6. अंड्यातून अळी निघाल्यानंतर ती पानाचे देठ, खोड पोखरत खाली जमिनीकडे जाते. त्यामुळे खापेच्या वरील भाग सुकून नंतर वाळतो.
    7. चक्री भुंग्याच्या प्रादुर्भावामुळे शेंगा कमी लागतात व त्या पूर्ण भरत नाहीत.
    8. तसेच पीक काढणीच्यावेळी खापा केलेल्या जागून खोड तुटून पडते, त्यामुळे देखील नुकसान होते.
    3️⃣चक्री भुंगा (soybean girdle beetle) किडी साठी पोषक वातावरण -
    1. सलग रिमझिम पाऊस व सततचे ढगाळ वातावरण या किडीस पोषक असते.
    2. सतत अधिक आर्द्रता असलेल्या वातावरणात या किडीची वाढ झपाट्याने होते.
    3. नत्रयुक्त खतांचा असमतोल व अतिवापरामुळे किडीची वाढ झपाट्याने होते.
    4️⃣एकात्मिक कीड व्यवस्थापन | IPM - अळी व भुंग्याच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी खाली एकात्मिक किड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा.
    अ) मशागतीची पद्धत -
    1. वेळेवर पेरणी करावी.
    2. ज्या भागामध्ये या किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो तेथे पेरणी जूनअखेरपर्यंत पूर्ण करावी.
    3. दोन ओळीतील आणि झाडातील अंतर योग्य ठेवावे जेणेकरून पीक दाटणार नाही.
    4. माती परीक्षणानुसार खताच्या मात्रा द्याव्यात व जास्त नत्राचा वापर टाळावा.
    5. वेळेवर आंतर मशागत करून पीक तण विहिरीत ठेवावे.
    6. यांत्रिक पद्धत भुंग्याना आकर्षित करण्यासाठी प्रकाश सापळ्यांचा (लाईट ट्रॅप) 1 प्रति हेक्‍टरी लावावा.
    ब) जैविक पद्धत -
    1. विविध मित्र कीटकांचे संवर्धन करावे.
    2. 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.
    क) रासायनिक पद्धत - किडीच्या नियंत्रणासाठी थायोमेथॉक्झाम + लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (अलिका, सिजेंटा) @ 80 मिली प्रति एकर याप्रमाणे घेऊन पिकात फवारणी करावे.
    ✅संपर्क -
    📱What's App:- 9168911489 ☎️
    📱Mail id:- st89114.ack@gmail
    ✅आमचे इतर सोशल मीडिया अकाऊंट -
    1️⃣Linked In - / krushidoctor
    2️⃣Twitter - / krushidoctor
    3️⃣Website - krushidoctor.com/
    4️⃣TH-cam Marathi - / krushidoctor
    5️⃣Facebook - / krushidoctorofficial
    6️⃣Instagram - / krushi_doctor_official
    7️⃣TH-cam Hindi - / @krushidoctorhindi
    #agriculture #krushidoctor #farming #crop #sheti #krushidoctorsuryakant

ความคิดเห็น • 16

  • @GopalAdhao
    @GopalAdhao 2 หลายเดือนก่อน +2

    अलिका +profex super donhi ekatra takale tr chaltil ka reply please

    • @krushidoctor
      @krushidoctor  หลายเดือนก่อน

      Chalel pn, garaj nahi

  • @anandsonunepatil9244
    @anandsonunepatil9244 2 หลายเดือนก่อน +1

    Chakri bhungyasathi anpligo ,syngenta kam karte ka

  • @sudhakardhumal1062
    @sudhakardhumal1062 2 หลายเดือนก่อน +1

    अर्धवट माहिती का देताय

    • @krushidoctor
      @krushidoctor  หลายเดือนก่อน

      माफ करा. आपल्याला कशी माहिती अपेक्षित आहे

  • @superbayer2011
    @superbayer2011 2 หลายเดือนก่อน +1

    Soloman che chan result aahet

  • @radheshyamdangi710
    @radheshyamdangi710 ปีที่แล้ว

    Sir MP me job cahiye Fresher ke liye

    • @krushidoctor
      @krushidoctor  ปีที่แล้ว

      kripya mujhe 9168911489 is number pe samprk karen

  • @amolshelke7602
    @amolshelke7602 ปีที่แล้ว +1

    सर आय सी एल न्यूट्रीवॉन्ट पूर्ण सिरीज बद्दल माहिती द्या प्लीज सर

    • @krushidoctor
      @krushidoctor  ปีที่แล้ว +1

      ओके. मी आपल्या पुढील विडियो मध्ये नक्की प्रयत्न करीन

  • @mulikbs148
    @mulikbs148 3 หลายเดือนก่อน +1

    good informetinon sir

    • @krushidoctor
      @krushidoctor  2 หลายเดือนก่อน

      Thanks and welcome

  • @surajpande5000
    @surajpande5000 ปีที่แล้ว

    Sir chakri bhongya chi survat zali ahe konta sprey krayla pahije

    • @krushidoctor
      @krushidoctor  ปีที่แล้ว

      विडियो मध्ये सांगितल्या प्रमाणे उपाय योजना करा