महाराष्ट्रातील सर्वात थरारक अपरिचीत घाट मार्ग | Most Adventurous Trek in Sahyadri |पोशी ची नाळ

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
  • भटकंती:
    "पोशीची नाळ चढाई आणि माडाची नाळ (तुट्या चा दारा) उतराई"
    🔹 भटकंती मार्ग - मढ वाघाची वाडी - पोशीची नाळ चढाई - डोणी गाव चाल - माडाची नाळ उतराई - मढ वाघाची वाडी
    🔹 भटकंती विशेष ( थोडक्यात ):
    🔹 पोशीची नाळ: त्रिगुणधारा या त्रिकुटतील ही पहिली नाळ आहे. डोणी दारा किंवा डोणी घाट ही एकमेव वापरातील वाट घाटावरील डोणी व कोकणातील मढ या गावांना जोडणारा महत्वाचा रस्ता.
    - पोशीच्या नाळेकडे कधी कोणी फिरकत नाही कारण या नाळेत असलेले मोठे पॅच जिथे चढताना अथवा उतरताना टेक्निकल साहित्याची गरज पडते.
    - ही नाळ 2 टप्यांची आहे. पहिला टप्पा डोणी दाराच्या तोंडपासून पूर्वेकडे अर्धा व दुसरा टप्पा दक्षिणेकडे 90 डिग्री कोनात वळतो.
    - जिथून दुसरा टप्पा सुरू होतो, इथेच खरा थरार आहे. बिना safety equipment शिवाय इथे जाणे धोकादायक आणि कोणीपण एक टप्पा आऊट होऊ शकतो.
    - वरच्या भागात जाताना चार भले मोठे रॉक पॅच आणि घसारा क्रॉस करून माथा गाठता येतो.
    पहिला टप्पा: जवळपास 15 - 20 फूट जिथे पूर्वी गेलेली चक्रम हायकर्स ची टीम ने तारेची शिडी लावली आहे. सध्यातरी शिडी सुस्थितीत आहे.
    दुसरा टप्पा: 20 - 30 फूट असून फ्री क्लाइंब होऊ शकते.
    तिसरा टप्पा: Z टाईप 20 - 30 फूट असून फ्री क्लाइंब होऊ शकते.
    चौथा टप्पा: निमुळती घळीचा लूज रॉक युक्त अंदाजे 50 फूट आणि पुढे घसारा युक्त 20 - 30 फुटाचा पॅच.
    🔹 लागलेला कालावधी:
    वाघाची वाडी ते पोशी नाळ पहिला पॅच: सकाळी 5:30 ते 8:30
    पहिला पॅच ते माथा: सकाळी 8:30 ते सकाळी 11:30
    डोणी कड्यापाशी जेवण व आराम: 11:30 ते दुपारी 1:30
    डोणी कडा ते माडाची नाळ चाल: दुपारी 1:30 ते 2:00
    माडाची नाळ उतराई: दुपारी 2:00 ते संध्याकाळी 7:30
    वाघाची वाडी: रात्री 8 वाजता.
    🔹 सहकारी:
    चंद्रकोर ट्रेकर्स चे सदस्य:
    मंजीत माळवी ,ज्ञानेश्वर खाडे ,राजेंद्र साळुंखे ,नारायण धनावडे
    सह्याद्री रॉक ॲडवेंचर्स चे सदस्य:
    दर्शन देशमुख,भूषण पवार,अक्षय जमदरेकल्पेश बनोटे,लतीकेश कदम,सागर डोहाळे,संजय कारे,प्रशील अंबाडे,मुकुंद ,फडकलेMusic from #InAudio: inaudio.org/
    Track Name.inaudio - Infraction - Alioth
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Ignor Hashtags:
    #adventure #trekking #danger #climbing #jungkook #jungle

ความคิดเห็น • 265