Industries in Maharashtra | Automobile | MIDC | Tata Mercedes Volkswagen Mahendra |Sharad Pawar |Ep5

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 พ.ค. 2024
  • राज्यभर औद्योगिकीकरण वाढवताना त्यासाठी लागणारे रस्ते, महामार्ग, रेल्वे, विमानसुविधा, वीज, पाणीपुरवठा अशा सर्व गोष्टींकडेही त्यांनी बारकाईनं लक्ष दिलं. कोकण रेल्वेचा आर्थिक तिढा सोडवण्यात पुढाकार घेणं असो किंवा नाशवंत कृषिमालासाठी आंतरराष्ट्रीय एअर-कार्गो टर्मिनल व्हावा, यासाठी प्रयत्न करणं असो, यातून शरद पवारांच्या सर्वांगीण विकासाच्या दूरदृष्टीचं दर्शन होतं.
    त्यांच्या या कामगिरीची दखल राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली. ‘देशात आर्थिक सुधारणा सुरू करण्यामध्ये पवार यांचे योगदान समान होते. फार थोडे राजकारणी औद्योगिक विकासाची काळजी घेतात आणि पवार यांपैकी एक आहेत’, अशा शब्दांत माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ज्ञ मनमोहनसिंग यांनी शरद पवारांच्या कार्याचा गौरव केला आहे. आज महाराष्ट्रानं औद्योगिक विकासात जी गती घेतलीय, त्याची चाकं शरद पवारांच्याच काळात तयार झालीयेत आणि त्यांनीच दाखवलेल्या विकासाच्या दिशेनं महाराष्ट्र प्रगतीची वाटचाल करतोय. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाच्या प्रगतीला दिशा देणाऱ्या या कणखर नेतृत्त्वाला सलाम!

ความคิดเห็น • 3

  • @abhijeetborse
    @abhijeetborse หลายเดือนก่อน +2

    90's नंतरच्या काळात गती थांबली एमआयडीसी तील कंपनी उठू लागले आणि गुजरात गाठू लागले हे कसे झाले हेही माहिती द्या शरद पवारांच्या कामगिरीला सलाम 👍👍💐💐🙏

  • @sushantwangate5619
    @sushantwangate5619 หลายเดือนก่อน +1

    100 % कॉन्ट्रॅक्ट कोणाचे आहेत कंपन्या मध्ये आणि कोन चालवत आहे

  • @sharadnetare733
    @sharadnetare733 หลายเดือนก่อน

    🙏👌👍