कोमळ वाचा दे रे राम | पठण आणि निरूपण - स भ मोहनबुवा रामदासी | Komal Vacha : Samarth Ramdas

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ต.ค. 2024
  • कोमळ वाचा दे रे राम ||
    विमळ करणी दे रे राम ||
    प्रसंग ओळखी दे रे राम ||
    धूर्त कळा मज दे रे राम ||
    हितकारक ते दे रे राम ||
    जनसुखकारक दे रे राम ||
    अंतरपारखी दे रे राम ||
    बहु जन मैत्री दे रे राम ||
    विद्या वैभव दे रे राम ||
    उदासीनता दे रे राम ||
    मागो नेणे दे रे राम ||
    मज न कळे ते दे रे राम ||
    तुझी आवडी दे रे राम ||
    दास म्हणे मज दे रे राम || धृ ||
    समर्थ संप्रदायातील प्रचार आणि प्रसार स.भ. मोहनबुवा रामदासी करत आहेत. १९७१ सालापासून २०१६ पर्यंत सज्जनगडावर श्री समर्थांचे सान्निध्यात अखंड वास्तव्य व समर्थ सेवा. २००० साला पासून सज्जन गडाचे स्वस्थापक म्हणून समर्थांची १६ वर्षे सेवा केली. ABP माझा वरील 'देव माझा' या कार्यक्रमातून समर्थ साहित्याचे निरूपण १० वर्षे सतत केले.

ความคิดเห็น • 59