कागदी लिंबू नवीन व्हरायटी,दीड वर्षात उत्पादन,घडाने लिंबू लागतात,वर्षभर भरघोस उत्पादन lemon farming

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.ย. 2024
  • श्री रामदास नामदेव दरेकर
    M.Sc (Agriculture)
    उपविभागीय कृषी अधिकारी कर्जत
    94222 30959
    श्री अभिषेक रामदास दरेकर (Agri diploma)
    मो.नं ..95515 23737
    साईकृपा नर्सरी हिरडगाव
    ता श्रीगोंदा जि अहमदनगर
    कागदी लिंबू लागवड
    जमीन
    मध्यम काळी, हलकी, मुरमाड, पाण्याचा उत्तम निचरा होणारी, ६.५-८.० सामू, चुनखडी विरहीत, क्षारांचे प्रमाण ०.१% पेक्षा कमी व चुन्याचे प्रमाण ७-८% पेक्षा कमी असलेली जमीन लागवडीस योग्य आहे.
    लागवडीचे अंतर
    ६ X ६ मीटर, खड्डयाचे आकारमान १ X १ X १ मीटर.
    उत्पादन -
    ७५ ते १२५ किलो/ झाड (५ वर्षावरील झाड)
    खत व्यवस्थापन
    लागवडीचे वेळी शेणखत १० किलो, सिंगल सुपर फॉस्फेट २ किलो, निंबोळी पॅड १ किलो ट्रायकोडर्मा २५ ग्रॅम
    वरील खतांशिवाय गरजेनुसार ५०० ग्रॅम व्हॅम + १०० ग्रॅम स्फुरद विरघळणारे जिवाणू + १०० ग्रॅम ॲझोस्पिरिलम + १०० ग्रॅम ट्रायकोडर्मा हरजियानम द्यावे.
    सूक्ष्म अन्नद्राव्याची कमतरता आढळल्यास ०.५ % मॅग्नेशिअम सल्फेट, ०.५ % मॅगेनीज सल्फेट ०.५ % आणि फेरस सल्फेट व कॉपर सल्फेट या सूक्ष्म अन्नद्राव्यांची एकत्रीत फवारणी करावी.
    पाणी व्यवस्थापन
    ठिबक सिंचन किंवा पाट पाणी या द्वारे पाणी व्यवस्थापन जमिनीच्या मगदुराप्रमाणे करावे
    आंतरपीक
    सुरुवातीच्या ४-५ वर्षापर्यत पट्टा पध्दतीने मूग, चवळी, भुईमूग, उडीद, श्रावण घेवडा, कांदा, लसूण, कोबी, हरभरा, मेथी दोन ओळीतील मोकळ्या जागेत आंतरपिक म्हणून घ्यावे.
    बहार व्यवस्थापन
    कागदी लिंबूच्या हस्त बहारातील अधिक उत्पादनासाठी जून महिन्यात जिब्रेलिक ॲसीड (जी.अे.३) १० पी.पी.एम.सप्टेंबरमध्ये सायकोलीन १००० पी.पी.एम. संजिवकाची व ऑक्टोबर महिन्यात १ टक्का पोटॅशिअम नायट्रेट द्रावणाची फवारणी करावी.
    तण व्यवस्थापन
    ग्लायफोसेट १००-१२० मि.लि + १००-१२० ग्रॅम युरिया १५ लिटर पाण्यात मिसळून तणांचा प्रादुर्भाव दिसून आल्यावर फवारणी करावी, त्यानंतरच्या दोन फवारणी तणांची पुर्नउगवण ३० % आढळून आल्यानंतर कराव्यात.
    कीड व रोग नियंत्रण
    पाने पोखरणारी अळी - अबामेफ्टीन ४ मि.ली किंवा नोहॅलूरॉन ५ मि.ली किंवा इमीडॅक्लोप्रीड २.५ मि.लि. किंवा थायडीकार्ब १० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
    पाने खाणारी अळी - क्किनॉलफॉस २० मि.लि. १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
    काळी माशी - ॲसेफेट १५ ग्रॅम किंवा ट्रायझोफॉस २० मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
    सिल्ला, मावा - अबामेक्टीन ४ मि.ली किंवा पोरपगाईट १० मि.ली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
    पिठ्या ढेकूण - क्लोरपायरीफॉस २५ मि.लि किंवा डायमिथोएट १५ मि.लि १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
    लाल कोळी - अबामेक्टीन ४ मि.लि किंवा पोपरगाईट १०.मि.लि १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
    कॅकर/खै-या - रोगग्रस्त फांद्यांची छाटणी करावी, छाटलेल्या ठिकाणी बोर्डो पेस्ट लावावे, पावसाळ्यातील महिन्यात स्ट्रेप्टोसायक्लीन १ ग्रॅम + कॉपर ऑक्सीक्लोराईड ३० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून ३-४ फवारणी कराव्यात. किंवा जून महिन्यातील छाटणीनंतर कॉपर ऑक्सीक्लोराईड ( ३० ग्रॅम १० लि.पाणी) ची एक फवारणी नंतर ३० दिवसाच्या अंतराने बोर्डो मिश्रण ( १ कि.मोरचूद + १ कि. चुना + १०० लि.पाणी) च्या दोन फवारण्या व नंतर निंबोळी अर्क च्या दोन फवारण्या ( ५०० ग्रॅम १० लि.पाणी) कराव्यात.
    ट्रिस्टेझा - मावा या रोगवाहक किडींचे आंबा बहार, मृग बहार व हस्त बहारातील नवीन पालवीचे आंतरप्रवाही किटकनाशक वापरून रोगाचा प्रसार नियंत्रित ठेवावे.
    पायकूज व डिंक्या - पावसाळ्यापुर्वी फोसेटाईल अल (३० ग्रॅम १० लि.पाणी) ची फवारणी करावी आणि झाडाच्या खोडास ६०-९० सें.मी. उंचीपर्यत पावसाळ्यानंतर बोर्डो पेस्ट लावावे. किंवा मेटॅलॅक्झिल अधिक मॅकोझेब हे संयुक्त बुरशीनाशक २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून खोडाशेजारील मातीत एक महिन्याच्या अंतराने दोनदा ओलेचिंब किंवा ड्रेंचिग करावी.
    शेंडे मर - पावसाळ्यापूर्वी व नंतर रोगग्रस्त फांद्या छाटून त्या ठिकाणी बोर्डो पेस्ट लावावे. कार्बनडेझिम १० ग्रॅम किंवा मॅन्कोझेब २० ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सीक्लोराईड ३० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून वर्षातून ३-४ फवारण्या कराव्यात.
    आम्ही शुटिंग साठी वापरत असलेली उपकरणे खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा:👇
    Camera: amzn.to/3wjKja5
    Mobile : amzn.to/2TrAJEV
    Gimbal : amzn.to/3xjjcxh
    Drone : amzn.to/3jGfKZo
    Mics : amzn.to/3dJJhh6
    Mobile Lens: amzn.to/3hCqSUJ
    Camera Tripod: amzn.to/3yuMGsi
    Light Setup : amzn.to/3jUYEXM
    Photo light Reflectors : amzn.to/3hxLWvi
    Green screen support assembly : amzn.to/3hIpzU4
    Green screen : amzn.to/2TEOxfa
    🎥आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसाय यांचे दर्जेदार व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच बळीराजा स्पेशल यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा
    #बळीराजास्पेशल #Balirajaspecial #शेती #शेतकरी
    यूट्यूब
    / balirajaspecial
    फेसबुक
    / balirajaspecial
    इंस्टाग्राम
    www.instagram....
    ट्विटर
    Di...

ความคิดเห็น • 282