कोपेश्वर मंदिर खिद्रापूर संपूर्ण माहिती | Kopeshwar Temple Khidrapur |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ส.ค. 2024
  • कोपेश्वर मंदिर खिद्रापूर संपूर्ण माहिती | Kopeshwar Temple Khidrapur | #marathivlog
    महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असलेले हे गाव प्रसिद्ध आहे स्थापत्यकलेचा हा अप्रतिम नमुना असलेल्या मनमोहक कोपेश्वर मंदिरामुळे. महाराष्ट्रातील या शेवटच्या गावातील या सुंदर मंदिराची रचना - स्वर्गमंडप, सभामंडप, अंतराळ आणि गाभारा अशी आहे. बाराव्या शतकात चालुक्य राजवटीत बांधलेल्या या मंदिराला ४८ नक्षीदार खांबांवर उभा असलेला स्वर्गमंडप इतरांपेक्षा वेगळे बनवतो. स्वर्गमंडपाच्या मधोमध तेरा फुटांचा गवाक्ष आणि खाली जमिनीवर १३ फुटी रंगशीळा आहे. त्रिपुरारी पौर्णिमेला या गवाक्षच्याया बरोबर मध्यभागी चंद्राचे दर्शन होते. त्याचबरोबर चार पाच आणि सहा मे रोजी येथे किरणउत्सव साजरा केला जातो. या उत्सवामध्ये सूर्याचे किरण थेट महादेवाच्या पिंडीवर पडतात. स्वर्गमंडपाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे आठ दिशांचे देवता किंवा अष्टदिक्पाल होय. कार्तिकेय, वरूण, वायू, कुबेर, विष्णू, शिव यांच्या मुख्य मूर्तीच्या मधे लहान लहान मूर्ती देखील पाहायला मिळतात.
    कृष्णा (Krishna) नदीच्या काठी वसलेले अंतर्बाह्य सुंदर, सुघड कलाकृती : कोपेश्वर मंदिर (Kopeshwar temple). जवळपास ९०० वर्ष जुने असलेले हे मंदिर म्हणजे भारतीय संस्कृतीचा एक अद्भुत वारसा आहे.
    कोपेश्वर मंदिरात अतिशय सुरेख सजावट असलेले १०८ खांब आहेत. यातील प्रत्येक खांब म्हणजे तंत्रज्ञानाचा अत्तुच्य अविष्कारच. मुख्य मंडपापासून काहीसा विलग. खुला. या सगळ्यावर कळस म्हणजे इथला स्वर्गमंडप (swargmandap). या मंडपाला छत नाही. अठ्ठेचाळीस खांबांवर तोललेल्या या मंडपाला छताच्या जागी मधोमध वर्तुळाकार मोकळी जागा. या आकाशगवाक्षाच्या नेमकी खाली गुळगुळीत काळ्या दगडाची रंगशिळा आहे. गजवैभव व मंदिरशिल्प ही भारतभऱ जाणवणारी जुळणी आहे. येथील गजथरातील पंच्याण्णव मोठ्या हत्तींवर वेगवेगळ्या देवदेवता आरुढ आहेत. दुसरे एक वैशिष्ट्य असे की येथे इतर मंदिरांप्रमाणे नंदी नाही. कोप्पेश्वर मंदिराच्या प्राकारात सोळा प्रकारची कीर्तीमुखे पाहायला मिळतात. शिवालयांच्या प्रवेशद्वारापाशी राक्षसाच्या मुखासारखे एक शिल्प कोरलेले दिसते, तेच कीर्तीमुख. मंदिराच्या मागे भिंतीवर नंदीवर आरुढ शिव-पार्वती शिल्पित आहेत. या शिल्पाच्या एका बाजूला ब्रह्मा आणि दुसऱ्या बाजूला विष्णूही आहेत. मंदिराच्या भिंतीवर असणारी विषकन्या : जिचे विष मंदिराला लागू नये म्हणून हाय हिल्स सॅन्डल घातलेले. इतर कोठेहि न दिसणारी अर्धनारीनटेश्वर बसलेली मूर्ती. मंदीराच्या भिंतीवर कवटीमध्ये कवटीमध्ये भिक्षा मागणारा महादेव पाहायला मिळतो. दरवाजावरील द्वारपालसंख्या मंदिर किती टप्प्यात आहे ते दाखवते. येथे असणारे ५ द्वारपाल मंदिराचे ५ टप्पे दर्शवतात. डोक्यावर कवट्याची माळ असलेल्या ८. ५ फूटी भव्य द्वारपालच्या गळ्यात साप, रुद्राक्ष पाहायला मिळतात. गजव्याल आणि सिहवाल यांबरोबरच मगर आणि मोर यांची व्याल येथे पाहायला मिळते
    भारत सरकारच्या पुरातत्त्व विभागाने या मंदिराला दिनांक २ जानेवारी १९५४ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे.
    Explore the Ancient Wonders of Kopeshwar Temple, Khidrapur
    Join us on a journey through time as we delve into the heart of Maharashtra's heritage at the Kopeshwar Temple in Khidrapur. This architectural marvel stands as a testament to the grandeur of Ancient Indian Architecture and the rich cultural tapestry of the Shilahara Dynasty. Witness the exquisite stone carvings and sculptures that adorn the temple walls, each telling a story from centuries past.
    Nestled on the banks of the Krishna River, the temple is not just a monument but a living narrative of the 12th Century temples dedicated to Lord Vishnu and Shiva. As one of the prominent Hindu Pilgrimage Destinations, it attracts devotees and history enthusiasts alike to Khidrapur Village in Kolhapur, where spirituality meets the splendor of the past. In this video we check the history of Kopeshwar mandir Khidrapur.
    Discover the sacred site where every stone has a legend, and every corner speaks of the devotion and artistry that has transcended generations. Don't forget to like, share, and subscribe for more videos on Kopeshwar mandir Khidrapur.
    Timeslots:
    00:00 - Intro
    00:23 - First View of Kopeshwar
    01:13 - Magnificent view of Swarg mandap
    04:45 - अष्टदिग्पाल
    06:45 - Pillars of Swarg mandap
    08:27 - Inside Sabhamandap
    09:00 - Shiva's gatekeeper
    10:43 - Kirtimukh
    15:22 - Lord Kopeshwar Shiva and Dhopeshwar Vishnu
    17:54 - 95 Elephents
    20:00 - Shiva Parvati Marriage ceremony
    37:49 - Harihar - Lord Shiva and Lord Vishnu
    #KopeshwarTemple
    #Khidrapur
    #MaharashtraHeritage
    #AncientIndianTemples
    #ShilaharaDynasty
    #HinduPilgrimage
    #IndianArchitecture
    #TempleSculptures
    #ChalukyanDesign

ความคิดเห็น • 5

  • @kedarseeker8907
    @kedarseeker8907 5 หลายเดือนก่อน +1

    हर हर महादेव
    🙏🚩🙏

  • @kedarseeker8907
    @kedarseeker8907 5 หลายเดือนก่อน +1

    उत्तम चलचित्र
    👌👍👌👍🙏
    आमचा प्रयत्न पण पहा सर
    🙏🙏🙏

    • @MarathiMatter24
      @MarathiMatter24  5 หลายเดือนก่อน

      हो आमच्या सासवडच्या संगमेश्वर मंदिराचा व्हिडिओ चांगला बनला आहे😊

  • @5D_is_Reality
    @5D_is_Reality 4 หลายเดือนก่อน +1

    3D printing Aani AI technology ne murtya punha banavu shakato.

    • @MarathiMatter24
      @MarathiMatter24  4 หลายเดือนก่อน

      Do you really think we are that far developed in AI?
      Yes today we see AI everywhere but it is still in the developing phase I suppose.