Majhyashi Nit Bolaycha ft. Alok Rajwade & Sujay Jibberish | Music Video | Prod.by Anirudh |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
- Every character should have a theme song, especially our beloved Ani! So here's a song for all the lazy people out there. Don't be lazy for once and do share it within the community to spread the laziness.
Join this channel to get access to perks:
/ @bhadipa
Subscribe to BhaDiPa to get alerts on our new videos! शास्त्र असते ते !
NEW MERCH!! BhaDiPa Stickers, Mugs, T-Shirts: bhadipa.themer...
All under one roof! bhadipa.com/ for more videos and events!
/ bhadipa
/ bhadipa
/ bhadipa
*अनी, उठ रे बाबा...
मी उठून या जगात काय फरक पडणारे?
किती वाजलेत पाहिलंस का?
काय फरक पडतो? वाजले असतील काहीतरी 9, 10, 31, 91....*
अतिशय युनिक, अतिशय वेगळा असा
आळस मला आलेलाय, त्यामुळे खरच मला पडूदे,
जे काई बाहेर घडतंय ते घडू दे,
डावेउजवे भिडतायत तर भिडू देत,
आवाज त्यांचे चढतायत तर चढू देत,
रडू देत रडणारे ओक्साबोक्शी उडणारे पक्षीबिक्षी उडूदेत,
विमानांना नडु देत...
इतका आळशीपणा बरा नव्हे!
आता जरा घसा माझा सुकलेलाय,
आई, पाण्याचा गडू दे!
*अनी पुढच्या वेळेस असा फालतू आळस केलास ना, तर बबडूला तुझा लहानपणीचा साडीतला फोटो पाठवीन!
काय?
प्लाष्टीक बॅन आहे महाराष्ट्रात!*
आई या जगाला माझी गरज लागेल,
असं मला काही वाटत नाहीए
कुणाचं काई माझ्यावाचून अडत नाहीए,
मलासुद्धा फरक पडत नाहीए काई म्हणून आई
सरळसरळ पडलेलोय मी बंद, हा बंब
थंडच ठेवण्याचा मी जोपासणाराय छंद अनंतापर्यंत
कंटाळ्याचा बघणाराय मी अंत
राहणाराय मी गप्प आता होणाराय मी पर्मनंट ठप्प
अतिशय युनिक आयडिया आहे ही...ही इतकी युनिक आयडिया आहे, भन्नाट आहे ही आयडिया...की या आयडियाला मी स्वतःच सपोर्ट करतो
मला कुणीही उठवायला येऊ नका, लोळताना पाहू नका,
माझ्या खोलीत बसून कुणी यःकश्चित चर्चाबिर्चा करू नका, खुर्च्याबिरचा हलवू नका, करू नका भंग कुणी शांतता,
लावू नका कुणी दिवा पांढरा, उजेड नको अंधार आहे चांगला,
मोजू नका कुणी माझ्या जांभया,
जांभळ्या बेडशीटवर डाग पडलाय, असं मला बघू नका
*रोज काय रूम साफ करायचीए?
रोज नाही, मागच्या शनिवारी केली होती.
माझा जन्म काय हनुमान जयंतीला झाला होता का?
का?
मग शनिवारचं काये?*
प्लिज ट्राय टू अंडरस्टँड,
माझं काम क्लिष्टय, मी म्हणून थोडा शिष्टय,
हे एकच एक काम आहे जे भन्नाटए, युनिकए,
बाकी सगळं उष्टंय-- याच्यानंतर यमक काही सुचतंय?
नाही? ठिकेय, आहे तेवढं इष्टय!
असा हा मी सृष्टीच्या शेवटापर्यंत लोळणारे,
बोलणारे बोलूदेत काहीही होईल त्यांची काहिली,
एक गोष्ट सांगायची राहिली-
आई हा विद्रोहाचा विचार कसा मॉडर्नए, नवीनए,
तुला जरा तो कळणं म्हणजे कठीणए
*तुम्हाला कळतं आणि मला नाही कळायचं?
तुमची ढुंगणं धुतलीयत लहानपणी.
आता या डिस्कशनमध्ये जर का तू माझं लहानपणीचं ढुंगण काढणार असशील तर मी काय बोलावं?*
माझं वागणं असंय की
एकतर ते पटेल, किंवा ते पटणार नाही
एकतर ते रुचेल, किंवा ते रुचणार नाही
जे काई असेल, जे काई तुमचं म्हणणं असेल,
कागद घ्यायचा, त्यावर लिहायचं,
नंतर त्याचं विमान करून उडवायचं
मला नाही ते कळवायचं..
हा, आणि जाता जाता एक सांगतो,
जगात काही घडलं तरी हे ध्यानात ठेवायचं-
माझ्याशी नीट बोलायचं
*फोनवरून, व्हिडीओवरून किंवा प्रत्यक्षात,
जवळून किंवा लांबून
स्वर्गातून किंवा नरकातून
नीटच बोलायचं!
थोबाड फोडीन हं!
माझ्याशी नीट बोलायचं बोललेलोचए, आता ऍड करतो, माझ्याशी नीट वागायचंसुद्धा!*
हॅलो, इज धिस एलॉन???
Music Credits:
Rap Performed by Sujay Jibberish
Lyrics and Dialogue Compilation- Sujay Jibberish
Music Producer - Anirudh
Additional Music Producer - Mixedbyknob
Mix and Master - Ankit aka Mixedbyknob
Sound Studio - Cali Recording Studios, Worli
Video Credits:
Cast:
Alok Rajwade
Sujay Jibberish
Director: Nikhil Talegaonkar
Assistant Director: Prachi Hankare, Anay Bhide
Creative Producer: Omkar Jadhav, Paula McGlynn
Cinematographer: Ajinkya Khadpekar
Production Team: Kedar Naidu, Rohan Khare, Saurav Deshmukh
Equipments: Red Eye Equipment
Editor: Vinay Darekar
Social Media Team: Pooja Parab,Tanvi Kulkarni, Shreyas Keskar
Creatives: Prajakta Newalkar
Location Courtesy and Special Thanks: Creative Minds, Pune
...
Hooked to this. Sooo groovyyyyy
🤟❤️❤️❤️
Came from your insta story ....this is legendary 🙌 🔥❤thank you yashraj for sharing ❤
I came from insta story too
Bhannat!!!
Heylo Yashraj !!!
Big fan bro...
😁❤️
बघणारे इतके आळशी आहेत की दोन वर्षांनी बघत आहेत हे song,😅 अतिशय युनिक
😂 😂
Ho na bc..mla vatl recently released asel😅
😂😂😂😊
Ho😂
😂
बापरे 2 वर्षा आधी रिलिज झाला मला वाटल 2024 चा आहे great
Ho mala suddha
😂😂😂
मला पण वाटलं की आत्ताचा व्हिडिओ आहे
True malahi
Same
हाच तो जग प्रसिद्ध मराठी आळशी पणा..दोन वर्षांनी व्हिडिओ बघणारा..
अगदी बरोबर
@@kp-fh1pvहो खरचं आहे 😂😂😂😂
Thanks
धन्यवाद, चैतन्य! असाच सपोर्ट सुरु ठेवा... भाडिपाकडून तुम्हाला ढीग प्रेम ❤❤❤
अतिशय उच्च अस्खलित मराठी.. आणि Lyrics तर बाप.... 😎👌
'माझ्याशी नीट बोलयचं' is an emotion!❤
बाकी ही रॅपची idea अतिशय unique आणि भन्नाट!✌✌🔥
असा आळस २ वर्षांनी बाहेर आला.. पण हे विमान आता लय उडणार... आणि तुझ्याशी नीटच बोलणार....
क्या गाना थारे बाबा😂😂❤❤
Brobar
आम्ही परत परत बघतो हा व्हिडीओ. दरवेळी नव्याने आवडतो ❤ भन्नाट युनिक
1st time : ok good
2nd time : great rap
3rd time : I want to hear it one more time..
4th and onwards its an addiction.. 😍😍😍
Kudos to #bhadipa..
🙌❤️
हे गाणं आता viral झालं २ वर्षांनी....मराठी content कुठे कमी नही आहे हे या गाण्यामुळे सिध्द होते....
❤🔥🚩
Sure 🤞🏼
❤
हे rap आम्हाला जगात भारी वाटल .खरच सुंदर होत , अजुनही तुम्ही पुणेकर किती सुंदर मराठी बोलता आणि लिहीता ,अरे पोरांनो तुम्ही मराठी भाषेवर प्रेम करता आहात त्याचा सार्थ अभिमान वाटला ,तुझ हे गीत सगळ्या जगात गाजेल.
laziness is the mother of all bad habits ,but it is still a mother so i respect it and so should everyone
It is also the mother of easy solutions of problems.
Wow Nobel Price For Novel Thought 🤔🤔🤔
Shikamaru Nara
Wahhh..😂😂🫡
Lord Shikamaru 🙌
हे गाणं extend करणार असाल कधी पुढे तर, तुमचं काम शब्दांसाठी अडू नये, म्हणून खास झोपेतून उठून लिहिलंय 😊
बघा आवडलं तर... (Contine in same tune)
----------------
बघणारेही अनी सारखे आळशी आहेत.
दोन वर्षांपासून हेच गाणं ते बघत आहेत.
शेअर बिअर न करता ते ऐकत आहेत.
स्वतःच्याच आळसात ते पेंगत आहेत
पेंगणारे पेंगु देत,
ऐकणारे ऐकू देत,
ओरडणारे थकतील,
कर्माने आपल्या मरतील.
जीभ बाहेर काढून, उन्हात वणवण करून
सगळं जग जिंकणारा, स्वप्नांपाठी धावणारा
असला काही मी नाहीये..नाहीये
माझा तो पंखा, आणि माझा हा एसी,
माझी ती चादर, आणि ही उशी...
हेच माझं जग आहे...जग आहे
आपण अंथरूण ओढूया,
हातपाय त्यात पसरुया,
पंखा फुल करून,
ढेरीवर हात फिरवून,
पंख्याच्या त्या कडरकट्ट
आवाजात होऊन निगरगट्ट
आपण फक्त घोरुया..घोरुया...घोरुया...घोरुया....
(माझ्याशी नीट बोलायचं, पण ते ही मी झोपून उठल्यावर. आत्ता नको... कारण...)
आत्ता मला आवाज नको,
कुठलाही प्रकाश नको,
कंप्लेंट तर नकोच नको,
पडदे ते सरकवा,
पंखा हा वाढवा,
एसी जरा करा तो ....... फाश्ट फाश्ट फाश्ट
वैतागून गेलात तर ... बेश्ट बेश्ट बेश्ट
इथं कोणाला काही सांगायचं नाही,
कारण कोणाला तुमचं ऐकायचं नाही,
तुमच्याकडेच ठेवा.
तुमचा तो सल्ला..
तुमच्या त्या सूचना..
आणि तुमची ती मोलाची गोष्ट गोष्ट गोष्ट.
माझ्या गाढ झोपेसाठी, हेच आहे इष्ट इष्ट इष्ट.
(म्हणून माझ्याशी नीट बोलायचं, पण ते ही मी झोपून उठल्यावर, आत्ता नको. 😃
संपलं गाणं. चला या आता, आणि जाताना दार ओढून घ्या.) 😀😀😀
Superb
❤❤❤ खरच भारी केलंय हे
जमलय 🎉
@@truptishetye4144
Thanks🙏🏽
@@ambarmali
धन्यवाद 🙏🏽
अरे थू माझ्या जिंदगी वर...मी हा व्हिडिओ २०२४ मध्ये बघतेय आणि ऐकतेय.....येवढ्या मागे आहे मी😂 आळस खरा यालाच म्हणतात... माझ्या वर सुट होतय गाणं. अजून बनवा ना राव.... जगात भारी आमची भा डी पा...❤❤❤❤
Same here😅
😂😂
Me too 😅
Tuch ek nhis aalshi amhihi ahot sobtila
Me toooo yaarrrrr
खूपच बढिया.... आता बघणारे आळशी की बनवणारे आळशी.... आम्हाला आत्ता कळलं... आता या गाण्या ला न्याय मिळत आहे ... अशीच कामगिरी चालू ठेवा .... All the best
इंस्टाग्राम ट्रेंडिंग मुळे कुठलं गाणं कधी हिट होईल काही सांगता येत नाही.. ये पब्लिक है
He song bhari aahe hit zalach pahije
Kharch
जगात भारी...अभिमान वाटतो आपल्या मातृभाषेत इतका मस्त कंटेंट निर्माण करताय तुम्ही. विशेष म्हणजे कोणत्या ही कंटेंट मधे फातलू पणा नाही हिंदी च्या तथा कथित फालतू रैप सारखा किंवा मॉडर्न कंटेंट सारखा..! मस्तच..
जगात भारी
नाही रे बबु ...
ब्रह्मांडातील भारी
आपलीच जिगरी यारी
अन्या आणि त्याची कलाकारी..
एकदम झकास feeling आलय भारी..
Love you guys ❤😘😘
ऐश्वर्या नारकर यांच्या रील मुळे पोचलं आत्ता........ जबरदस्त........ ♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
Ha barobar
Amruta khanvilkar cha reel pahila
ईनस्टा वरुन कोन कोन आल आहे❤❤❤
Me😂😂
Me😂😂😂😂
Me😂
Aalo bhg mi ❤
Me😂😂
2 वर्षांनंतर ट्रेण्ड वर आलंय... इंस्टा वरून थेट यूट्यूब वर पाहायला आलो. भन्नाट रॅप...thanks Instagram❤
Jagat bharii!!!!!!!!!!😆🥰😇😂
''mazhyashi neet bolych'' iconic dialogue of BhaDiPa..
5 june Edit- OMG never got over 100 likes 😳tysm!
Divine: 'Chhote acche se baat kar'
Ani: 'Majhyashi neat bolaaycha'
same energy
हे रॅप जगात भारी वाटतंय मला... कारण फायनली कोणीतरी माझा प्रजातीला होणारा त्रास इतक्या अचूकपणे व्यक्त करताहेत 🤣🤣🤣❤️❤️❤️ #मझी_आई_अतातरि_नीट_बोलेल_अशी_आशा
😅
खूप मस्त रॅप, भाडीपा प्रत्येक मराठी कलाकारांना चांगलं प्लॅटफॉर्म देत आहे. बबूची अंघोळ आणि आईच शास्त्र यावरच रॅप देखील बघायला आवडेल
आता आई मी च्या videos मध्ये dialogues च्या जागी rap battle करू! कशी वाटली ही unique आणि भन्नाट idea? 🤣
@@BhaDiPa एकदम युनिक idea, भन्नाट idea, जगात भारी idea, अशी कुणाला आज पर्यंत सुचलीच नाही अनी ला सोडून, मस्त idea
सर्वात आधी तुम्ही मराठी राप केला हे भरी आहे. मराठी भाषा जशी वळू तशी वळते हे दादा कोंडके यांनी सिद्ध केलं होतं आणि आता तुम्ही जसे मराठी बोल आहे तसेच ठेवले म्हणून चांगले वाटले. खूप छान
जय शिवराय 🙏भाऊ आज मी पहिल्यांदा पूर्ण रॅप ऐकलाय आजकाल रॅप मध्ये खूप शिव्या देतात पण तू त्यांना हे दाखऊन दिलस कि शिव्या न देताही रॅप होतो असेच छान रॅप बनवत जा आजून पुढे जाशील
🙏बाप्पांचा आशीर्वाद तुज्या सोबत आहे.
जगात भारी नाही । विश्वात भारी
व्हिडिओ ने पण Trending व्हायला आळस केलाय 😂😂
😂
superb....trending lazily but definitely bhannat
3 महिने झाले राव... दुसरा रॅप गाणं कधी येणार... Casting couch var song houn Jaude...
आळसपणाची भावना किती स्वर्गीय असते हे कामसू लोकांना कळणे कठीण
Fb वर शेअर केलय..काल पासून चौथ्यांदा ऐकतेय😍😀 stress buster.... What a relief to मेंदू 😀
जगात भारी असा unique rap. Genius!! कमालच 👌🏻😂
अनि सारखं त्याच6 गाणं पण unique आणि भन्नाट 🤟❤️
हे गाणं, गाण्याच संगीत आणि गाणं गाणारा हे सर्व या जगातच नाही तर या आकाशगंगेत भारी आहेत.. भन्नाट आहेत.. युनिक आहेत.. अरे कशी काय सुचतात इतकी भारी भन्नाट युनिक गाणी... ❤❤❤❤👌🏼👌🏼👌🏼👌🏼
भा डि पा पेक्षा जास्त आळशी ह्या जगात कुणीही नाही... बघा ना किती दिवस झाले अजूनही काहीच नवं केलं नाही राव
Insta वर trending ला जायच्या आधी पासून हे महितीय इसी बात का घमंड हे 😀
अतिशय युनिक असा आळस मला आलेला आहे त्यामुळे कमेंट मला करायला उशिराच जरा झालेला आहे, पण हे गाणं मला अतिशय आवडलेले आहे, अतिशय युनिक सगळीकडे आ से गाणे हिट होऊ दे, म्हातारी असो तरुण असो सर्वांना ही रील बनू दे, अतिशय युनिक हे गाणे हिट होऊ दे😂😂
तुमच्या तोंडात साखर पडो! 😂😂😂😂
@@BhaDiPa 🍫🍫
Jamlay jamlay 😅
अतिशय युनिक असा आळस मला आलेला आहे .. त्यामूळे कमेंट करायला जास्तच उशीर झालेला आहे .. 😂 हे गाणं मला प्रचंड आवडलेल आहे ...😍 अतिशय युनिक असे हे गाणं सुपर हिट होऊदेत ..😂❤️❤️👌
@@BhaDiPa माझ्या आठ वर्षांच्या मुलीला या गाण्याचं वेड लागलंय.
दिवसभर हेच सुरू असतं 😂.
आणि सारखं येऊन ,आई माझ्याशी नीट बोलायचं 😅
हा music vdo म्हणजे कहर.. जगातच नाही, ह्या आकाशगंगेत भारी आहे.. ❤️❤️❤️ भाडीपा आणि त्याचा भन्नाट आगळा वेगळा युनिकनेस असलाच पाहिजे. शास्त्र असतं ते 👌👌👌
🎉🎉🎉suoerb bhadipa...awesome sujay
बापरे...ताकदित माहौल!! देर आये दुरुस्त आये!!!
भारतीय ङिजिटल पार्टिचा विजय असो!!🦾✌💯🚩❤👏
जगात भारी , unique , भन्नाट rap ahe.... outstanding rao 🔥🔥🔥
🤩🤩🤩🤩 atishay unique Ani atishay vegle rap ani bhannat pan 🤘😍😍😍😍 mazyashi nit bolaiche 😍😍😍😍❤️❤️❤️❤️ aplyala avadlay Ani
च्यायला रील मुळे इथे दोन वर्षा पूर्वीचं गाणं बघायला आलो यार.....🫡
बाबू दाजी ना पहिल्यांदा अंघोळ करताना पाहून डोळ्यांचे पारणे फिटले!!😂
But the song is completely awesome!!❤🎉
एकदम भन्नाट आणि unique अस गाणं आहे 🤩🤩
क्या बात है भाडीपा😎🤣👌दिल जीत लिया❤️ पाण्याचा गडू दे🤣🤣🤣🤣🤣🙏 आळस is स्मार्ट guy😬😬😬😬
3-1 वर्ष लागली या गाण्याला viral व्हायला
😂 yes boss💯
Zalay tr houdena aata kashyala tyanchi gand jalavtoy aata tuu
Great things take time
Lavdya 2022 to 2024 3 वर्ष होतात का नीट मोज किती होतात
@@virajasdawane6931 घरचे संस्कार youtub वर नका ओकू महाशय!!!
ए खरंच.... जगात भारी होत राव.......❤
Ani tujha swag unmatched ahe🔥tu majha sarvat favourite character ahes🔥🔥🔥tujhi idea mala khup awadte🤣bokya satbande pasun tuch apla favourite actor ahes🤩
आईला 😂 मला वाटलं 2024 चा आहे व्हिडिओ ❤
मला पण
I will watch this 100 times...I love this song ...rap... whatever but I love it
काय भारी झालाय व्हिडिओ.. कमाल एकदम. भाडिपा कलाकारांना एकत्र बघून धम्माल आली. जियो जियो.
Masterpiece! Congratulations 👏 to the entire team. This Rap making me fall in love with Marathi language. Thank you
इंस्टाग्राम रिल्स बघून कोण आलंय इकडे... हजेरी लावा ❤❤ 2024
Me😂😂
Me 😂
Mi
रिल्स बघून कोण कोण आलंय? 😂😂
Me 😂
Me
Me pan
Me pan
To mich
*अनी, उठ रे बाबा...
मी उठून या जगात काय फरक पडणारे?
किती वाजलेत पाहिलंस का?
काय फरक पडतो? वाजले असतील काहीतरी 9, 10, 31, 91....*
अतिशय युनिक, अतिशय वेगळा असा
आळस मला आलेलाय, त्यामुळे खरच मला पडूदे,
जे काई बाहेर घडतंय ते घडू दे,
डावेउजवे भिडतायत तर भिडू देत,
आवाज त्यांचे चढतायत तर चढू देत,
रडू देत रडणारे ओक्साबोक्शी उडणारे पक्षीबिक्षी उडूदेत,
विमानांना नडु देत...
इतका आळशीपणा बरा नव्हे!
आता जरा घसा माझा सुकलेलाय,
आई, पाण्याचा गडू दे!
*अनी पुढच्या वेळेस असा फालतू आळस केलास ना, तर बबडूला तुझा लहानपणीचा साडीतला फोटो पाठवीन!
काय?
प्लाष्टीक बॅन आहे महाराष्ट्रात!*
आई या जगाला माझी गरज लागेल,
असं मला काही वाटत नाहीए
कुणाचं काई माझ्यावाचून अडत नाहीए,
मलासुद्धा फरक पडत नाहीए काई म्हणून आई
सरळसरळ पडलेलोय मी बंद, हा बंब
थंडच ठेवण्याचा मी जोपासणाराय छंद अनंतापर्यंत
कंटाळ्याचा बघणाराय मी अंत
राहणाराय मी गप्प आता होणाराय मी पर्मनंट ठप्प
अतिशय युनिक आयडिया आहे ही...ही इतकी युनिक आयडिया आहे, भन्नाट आहे ही आयडिया...की या आयडियाला मी स्वतःच सपोर्ट करतो
मला कुणीही उठवायला येऊ नका, लोळताना पाहू नका,
माझ्या खोलीत बसून कुणी यःकश्चित चर्चाबिर्चा करू नका, खुर्च्याबिरचा हलवू नका, करू नका भंग कुणी शांतता,
लावू नका कुणी दिवा पांढरा, उजेड नको अंधार आहे चांगला,
मोजू नका कुणी माझ्या जांभया,
जांभळ्या बेडशीटवर डाग पडलाय, असं मला बघू नका
*रोज काय रूम साफ करायचीए?
रोज नाही, मागच्या शनिवारी केली होती.
माझा जन्म काय हनुमान जयंतीला झाला होता का?
का?
मग शनिवारचं काये?*
प्लिज ट्राय टू अंडरस्टँड,
माझं काम क्लिष्टय, मी म्हणून थोडा शिष्टय,
हे एकच एक काम आहे जे भन्नाटए, युनिकए,
बाकी सगळं उष्टंय-- याच्यानंतर यमक काही सुचतंय?
नाही? ठिकेय, आहे तेवढं इष्टय!
असा हा मी सृष्टीच्या शेवटापर्यंत लोळणारे,
बोलणारे बोलूदेत काहीही होईल त्यांची काहिली,
एक गोष्ट सांगायची राहिली-
आई हा विद्रोहाचा विचार कसा मॉडर्नए, नवीनए,
तुला जरा तो कळणं म्हणजे कठीणए
*तुम्हाला कळतं आणि मला नाही कळायचं?
तुमची ढुंगणं धुतलीयत लहानपणी.
आता या डिस्कशनमध्ये जर का तू माझं लहानपणीचं ढुंगण काढणार असशील तर मी काय बोलावं?*
माझं वागणं असंय की
एकतर ते पटेल, किंवा ते पटणार नाही
एकतर ते रुचेल, किंवा ते रुचणार नाही
जे काई असेल, जे काई तुमचं म्हणणं असेल,
कागद घ्यायचा, त्यावर लिहायचं,
नंतर त्याचं विमान करून उडवायचं
मला नाही ते कळवायचं..
हा, आणि जाता जाता एक सांगतो,
जगात काही घडलं तरी हे ध्यानात ठेवायचं-
माझ्याशी नीट बोलायचं
*फोनवरून, व्हिडीओवरून किंवा प्रत्यक्षात,
जवळून किंवा लांबून
स्वर्गातून किंवा नरकातून
नीटच बोलायचं!
थोबाड फोडीन हं!
माझ्याशी नीट बोलायचं बोललेलोचए, आता ऍड करतो, माझ्याशी नीट वागायचंसुद्धा!*
हॅलो, इज धिस एलॉन???
Alok you are the best ...
अतिशय वेगळा आणि भन्नाट असा हा रॅप खूप आवडला......
Bhadipa rocks🙌🤘🤙
So disappointing and disheartening that we can like this just once...!!! Truly amazing, marvelous. एकदम युनिक, भन्नाट आणि वेगळी आयडिया. Enjoyed it from the heart. Hope to see such content in the future as well.
10000, infinite likes
Reels बघण्यात काय मज्जा nahi... म्हणून इथे टपकले 😄😄😄
तुमचा आवाज आणि गाणं दोन्ही ही खूप सुंदर भन्नाट आणि छान आहे,खूप आवडलं,सद्या चे सुट्टीतील आणि उन्हाळ्यातील situation ल सुट होतय, 🙏 thanks
Hooked to this song , listening to this everyday since launch ...loved it ..awesome
धन्यवाद विशाल! Max प्रेम 🤟❤️
@@BhaDiPa this song is trending now....world is behind 2 years, you guys created songs that is ahead of its time 🙂 Keep Rocking, Lots of Love
Absolutely Brilliant! Bhannaaat!!!! 👍👍👍
The feminine urge to set this as my Caller tune 🤌🤌...Ani Op 🔥🔥
Hahaha हा एक unisex urge आहे 🤣
🤯🤩 just needed that
Wow.. great lyrics..great beat..असच चालू राहु दे बायो!❤
Seriously!!!!!! Yet Amazing👍😍
#माझ्याशी_नीट_बोलायचं 🔥🔥♥️♥️♥️
Rap ha vishay tasa navadta, pn THIS IS LIT!🔥🔥🔥🔥🔥😘
हे मला , फारच , आवडलेलयं 😛👌🏼
This song is 2 years old ?? How the hell !! What an absolute banger ❤❤❤❤
Ekdam unique rap Sujay...👌👌 Khup mast👍
@BhaDiPa जशी आज केलेली मेहनत आपल्याला ९ महिन्यानंतर फळ देते , तसच या गाण्याला २ वर्षानंतर viral होऊन फळ मिळालं आहे.
जगात भारी रॅप 👍सुजय जीब्रिश, तुला खूप शुभेच्छा. असे रॅप ऐकायला आवडतील. आलोक पण मस्त.
खूप धन्यवाद!
खूप छान आहे,मला खूप आवडला,आणि सगळ्यात भारी तुमचा आवाज,rap ची रचना तुम्ही सगळे खूप भारी आहेत
My every weekend plan😂😂❤.Now I got a tune for it thank u @bhadipa
Hahaha weekday असो, weekend असो, माझ्याशी नीट बोलायचं 😝
जगात भारी....... भाडीपाची दुनियादारी .....❤waa
खूप च भारी आणि भन्नाट आहे song 😉😉
Layeeee bhari !! Ase gaane hone nahi!!!!, ase rap hone nahi!!!!!!!
I am a Bengali and don’t understand a word of this but listens to this everyday like a habit…sooooo addictive🔥🔥🔥🔥🔥
Wow!! Thanks a lot :)
@@sujayjibberish aeyyyyy you replied....thank youuuu sooo much having my fan moment (playing the song again) ❤❤❤
म्हणजे गाण्यात प्रॉब्लेम नव्हता लोकांची चव तयार व्हायला 3 वर्ष लागले!❤
खूप छान!मराठीत सुद्धा इतके सुंदर रॅप होऊ शकते खरंच कौतुकास्पद आहे!💐💐💐
shambho ekat nahi vatat 🤣
आज पूर्ण विडिओ पाहिला 😂😅
आळस हा माझा मित्र आहे !!❤
विडिओ पाहून मला माझीच आठवण आली 😅
जाम भारी बाळा,आवरला मना गाणं ह्यो,एक्दम युनिक आहे... 😍❤️❤️
जगातभारी jamlay 🤘🤘@ Sujay Jibberish tuzya hya भन्नाट आणि युनिक रॅप la full support....big shout out to you 💜✨✨
Woohoooo.....need more of such raps in Marathi ....this was superb....keep growing you guys....💓💓
Thank you so much Kaumudi! Stay tuned for more भन्नाट content 🤟❤️
Instra वरून थेट you tube वर ,,किती हा आळशीपणा ,,शी !!! ,,भन्नाट आणि आणि वेगळं असं छान जमलेलं असं हे एक unique गाणं आहे , खूप झालं आता मी जरा लोळते ,,अच्छा 🙏
Really addictive....
Vibing all day
Sujay bestest kaam! You are pure talent! You have uplifted the video with the rap...its the rap and hence the video😎
Asach pratyek character sketch sobat rap banvun collaboration vhava ashi iccha ahe!...it will take bhadipa and yourself to the next level . Trust me! 😊
What a content this time...truly uniquely bhannat! 😂😀
♥️
Kadak na dada 👌👌🥰🙏
Jay Maharashtra 🚩🚩🙏
लयच भारी आहे.
माझी मराठी वळवावी तशी वळते ,आणि गावी तशी गाता येते
अगदी रॅपने सुध्दा
माझी मराठी अमृताची पैजा जिंकणारी आहे.
This is such a Vibe. . . ♥️
I loved this . . and Alok is such a mood. . ❤️
And Sujay too
भन्नाट ani Unique माणूस आहे. . ❤️
Keep this going guys. . . We need one for aai also 😅
Thank you so much Ankita! Stay tuned for more भन्नाट content 🤟❤️
@@BhaDiPa
Staying tune pan आईचा rap song anach. .
Ani yacha audio dya ho. . Ringtone ठेवते जास्तच relatable ahe . . 😅
मनातल्या भावना ओळखल्या तुम्ही. .
OMG this is sooo cool!!!! Loved it !!!
Thank you so much Swuarra! खुप प्रेम 🤟❤️
I love this rap..❤️even my 16thmonth son likes too... खूप relatable आहे...माझा नवरा बोलतोय तुझी callertune ठेव..😜
आळस is genetic? 😂
@@BhaDiPa maybe😂
काय गजब यमक जुळलंय! अतिशय युनिक आस रॅप गाणं व्हायरल होत सुटलय !!!
कंमेंट टाकण्या साठी स्पेसिअल्ली मराठी कीबोर्ड डाउनलोड केलय !!!
खरं ये !!!
मग कसं काय... बरंय ??😅
एकच नंबर 👍 20 वेळा ऐकलं तरी मण भरत नाही brooo keep it up 👍😁🤗
My favv line आई पाण्याचा घडू दे 😅
घडू नाही रे गडू.....
तुझ्या मुळे हे गाणं धन्य झालं...
This is such a great wrap on Anni. He's a great character.
दोन वर्ष झाली गाण्याला अजून व्हायरल आहे, भावा खरच युनिक गाणं केलं
जगात भारी... 😂मज्जा आली...
Kadak rap❤️🔥🔥🔥
Yo Yo Ani 🤘🤘
धन्यवाद मित्रा! खूप प्रेम 🤟❤️
Unique rap like badipa ❤️😊
खूपचं छान जय महाराष्ट्र जय मायबोली
मी दिवसामध्ये दोन तीन वेळा पाहत असतो
खूप खूप शुभेच्छा आशीर्वाद आणखीन अशच काहीं मजेदर घेऊन या💐💐