Pune Pranav Karad Missing: पुण्यातील प्रणव नोकरीसाठी अमेरिकेत गेला, पण जहाजावरुन बेपत्ता, काय घडलं?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 เม.ย. 2024
  • #Pune #PranavKarad #IndianDeckCadet #MaharashtraTimes
    पुण्यातील प्रणव कराड हा तरुण अमेरिकेतून बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
    हा तरुण अमेरिकेत एका जहाजावर कॅडेट म्हणून कार्यरत होता.
    शुक्रवारी अचानकपणे त्याचा त्याच्या कुटुंबाशी संपर्क तुटला आणि तो बेपत्ता झाला.
    या घटनेने कराड कुटुंबीय चिंतेत असून त्यांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे.
    प्रणव हा विल्समन शिप मॅनेजमेंट प्रायवेट लिमिटेड या कंपनीत काम करत होता.
    काही दिवसांपूर्वीच तो अमेरिकेत गेला होता.
    गेल्या तीन दिवसांपासून प्रणव बेपत्ता असल्याचं त्याच्या वडिलांनी सांगितलं आहे.
    कंपनीने काहीच माहिती दिली नाही शिवाय सहकाही आणि मित्रांचे मोबाईल नंबरदेखील दिले नाहीत.
    त्यामुळे पालक अजून चिंतेत आले आणि त्यांनी परराष्ट्र मंत्रालय, जहाजबांधनी मंत्रालयाशी संपर्क करा
    आणि आमच्या मुलाचा शोध घ्या, अशी मागणी यावेळी त्याच्या कुटुंबियांनी केली आहे.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.com/publications/...
    Website : maharashtratimes.com/
    marathi.timesxp.com/
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

ความคิดเห็น • 792

  • @sejalpatade1056
    @sejalpatade1056 หลายเดือนก่อน +136

    आज स्वामींचा प्रकट दिन आहे स्वामिनी निश्चितच तुम्हाला मदत करतील. प्रणव जिथे कुठे असेल सुखरूप असेल आणि लवकरात लवकर भेटेल ही स्वामी चरणी प्रार्थना.
    || श्री स्वामी समर्थ ||

  • @pavansonawane1078
    @pavansonawane1078 หลายเดือนก่อน +204

    अशक्य ही शक्य करतील स्वामी तुमचा मुलगा सुखरुप घरी येवो ही स्वामींना प्रार्थना🙏

    • @supriyaamarkumbhar8079
      @supriyaamarkumbhar8079 หลายเดือนก่อน

      श्री स्वामी समर्थ

    • @sawantvilas5277
      @sawantvilas5277 หลายเดือนก่อน

      श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @sawantvilas5277
      @sawantvilas5277 หลายเดือนก่อน

      सर्व स्वामी सेवेकर् यांनी स्वामींची प्रार्थना करावी. श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @leenavinherkar6845
      @leenavinherkar6845 หลายเดือนก่อน

      खरंच, स्वामींचरणी प्रार्थना...
      तो मिळणार, येणार तो 🙏

  • @arunpandit1968
    @arunpandit1968 หลายเดือนก่อน +139

    तुमचा मुलगा लवकर घरी परत येवो हि गजानन माऊलींच्या चरणी प्रार्थना 🙏🙏

    • @asavarisuryavanshi2200
      @asavarisuryavanshi2200 หลายเดือนก่อน +4

      प्रणव सुखरुप घरी येवो

  • @vishalbaviskar3395
    @vishalbaviskar3395 หลายเดือนก่อน +363

    आपला मुलगा सुखरूप घरी येवो हिच ईश्वचरणी प्रार्थना.

  • @economicswithdrrbgaikwad1285
    @economicswithdrrbgaikwad1285 หลายเดือนก่อน +189

    प्रणव लवकर सुखरूप घरी यावा हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना

    • @sawantvilas5277
      @sawantvilas5277 หลายเดือนก่อน

      कुलस्वामिनी भवानी माता की जय 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @archanawalke8777
    @archanawalke8777 หลายเดือนก่อน +68

    सर्व ऐकून खुप वाईट वाटलं. अगदी काळजात तुटलं. कंपनी विरुद्ध केस दाखल नक्की करा.

  • @santoshraut4587
    @santoshraut4587 หลายเดือนก่อน +161

    कका, ताई तुमचा बाळ परत मिळावी हिच प्रार्थना.

    • @aarzooaarzoo6993
      @aarzooaarzoo6993 หลายเดือนก่อน +4

      Inshallah Allah un ka bacha aajaye

  • @sharadshinde4652
    @sharadshinde4652 หลายเดือนก่อน +168

    आपला मुलगा सुखरूप घरी येऊ हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना

  • @pbk9950
    @pbk9950 หลายเดือนก่อน +93

    लेकरू लवकर घरी येईल ही ईश्वरचरणी प्रार्थना🙏🙏🌹 धीर धरा, पोलिसांची मदत घ्या

  • @madhavipatil7566
    @madhavipatil7566 หลายเดือนก่อน +51

    प्रणव लवकर सुखरूप मिळूदे हिच सद्गुरू चरणी प्रार्थना 🙏🙏

  • @Aapli_manas
    @Aapli_manas หลายเดือนก่อน +23

    श्री "गुरुगुरुदेव दत्त"नावांचा फक्त ३ घंटे केवळ जप, घरांतील एका व्यक्तीने देव्हार्यांचे समोर बसून दिवा लावून जप करा नक्की चांगली बातमी तुम्हाला येईल यात मला तरी शंका नाही,, धन्यवाद!!!

  • @gulabraojadhav1031
    @gulabraojadhav1031 หลายเดือนก่อน +22

    आपला मुलगा परत सुख रूप परत येवो हीच गुरूमाऊली चरणी प्रार्थना करतो.🙏

  • @manishagade1911
    @manishagade1911 หลายเดือนก่อน +43

    सुखरुप असावा व स्वामींच्या आर्शिवादाने लवकरच तुम्हाला मिळावा🙏

  • @meghnakulkarni7295
    @meghnakulkarni7295 หลายเดือนก่อน +81

    प्रणव वापस येईल , ही प्रार्थना करतो जगदंबा आई त्याचे रक्षण करेल .

  • @madhukarkarad2482
    @madhukarkarad2482 หลายเดือนก่อน +179

    ताई तुम्ही कंपनी विरुद्ध पोलीस स्टेशनला जाऊन केस दाखल करा . गुन्हा दाखल झाल्या शिवाय गप्प बसू नका .

    • @jivandhuru1243
      @jivandhuru1243 หลายเดือนก่อน +6

      Very unfortunate. Perhaps Nitin Gadkari saheb can help you, please approach him.

    • @manishadighe4558
      @manishadighe4558 หลายเดือนก่อน

      हो ताई

    • @sudhaganpule8122
      @sudhaganpule8122 หลายเดือนก่อน

    • @jayeshsonar5697
      @jayeshsonar5697 หลายเดือนก่อน

      कुठल्या

    • @user-jb4tv1wm5s
      @user-jb4tv1wm5s หลายเดือนก่อน

      ​@@jivandhuru1243ho..mlahi tasach vatat..

  • @sharadshinde4652
    @sharadshinde4652 หลายเดือนก่อน +66

    आपला मुलगा सुखरूप घरी पोहोचतो साई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना घरी आल्यावर फोन करा ही विनंती

  • @shyampandit5478
    @shyampandit5478 หลายเดือนก่อน +79

    कॉलेज चा नाद सोडा. पोलीस केसच करावी लागेल. त्याशिवाय कम्पनी ताळ्यावर येणार नाही.

  • @NamdevShinde-qi8lu
    @NamdevShinde-qi8lu หลายเดือนก่อน +42

    तात्काळ कारवाई करणे गरजेचे आहे. आदरणीय गृहमंत्री अमित शहा साहेबांना पत्र पाठवा. व आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांना विनंती करा

  • @sanjaycharhate4729
    @sanjaycharhate4729 หลายเดือนก่อน +21

    आपला मुलगा लवकरात लवकर घरी येवो.हिच स्वामी चरणी प्रार्थना.

  • @emptyness1318
    @emptyness1318 หลายเดือนก่อน +65

    तेथे पण असो सुखरूप आणि सुरक्षित असू दे.स्वामी त्यांचे रक्षण करतील आणि घराचा मार्ग दाखवतील.. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.

  • @tygfsjdhfg
    @tygfsjdhfg หลายเดือนก่อน +71

    भेटेल विश्वास ठेवा.. परमेश्वर पांडुरंग तुमच्या सोबत आहे. मुंबई या महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे

  • @sandippatil5523
    @sandippatil5523 หลายเดือนก่อน +346

    तुम्ही पोलिस नोंद करा.तो सुखरूप परत घरी यावा ही प्रार्थना.

    • @aarzooaarzoo6993
      @aarzooaarzoo6993 หลายเดือนก่อน +8

      Yes ryt dada

    • @KrishnaPandagale
      @KrishnaPandagale หลายเดือนก่อน +9

      Home minister phadvnis sahebla bheta

    • @user-vt9ji1or3z
      @user-vt9ji1or3z หลายเดือนก่อน +1

      Uj

    • @user-vt9ji1or3z
      @user-vt9ji1or3z หลายเดือนก่อน +3

      Maharaj aaplya pathishi nehmi astil vto sukhrupasel

    • @atharvaaher9084
      @atharvaaher9084 หลายเดือนก่อน

      😅A\\aaaaaaa\

  • @sangitachorghe9683
    @sangitachorghe9683 หลายเดือนก่อน +19

    जय सदगुरू आपला मुलगा भेटेल शांत रहा देवाची मदत घ्या ताई

  • @jyotisatpute408
    @jyotisatpute408 หลายเดือนก่อน +43

    ताई प्रणवला प्रणवला शोधण्यासाठी तर सगळे आहेतच पण तुम्ही पण स्वामी स्वामी समर्थांना पण सांगा आणि दिंडोरी प्रणित या मार्गातले गुरु माऊलींना यांना पण प्रत्यक्ष जाऊन बेटा मार्ग आपोआप सापडेल ही विनंती ताई

    • @leenavinherkar6845
      @leenavinherkar6845 หลายเดือนก่อน

      खरंय, करा इथे कॉन्टॅक्ट 😊🙏

  • @vaishalidawkhar3860
    @vaishalidawkhar3860 หลายเดือนก่อน +25

    स्वामी समर्थ लेकराला लवकरच घरी आणतील.विश्वास ठेवा स्वामी भक्तिवर.दादा घरी आल्यावर अक्कलकोट ला सहकुटुंब दर्शनासाठी जा.

  • @sangitakulkarni3425
    @sangitakulkarni3425 หลายเดือนก่อน +7

    महादेव तुमच्या मुलावर सुखरूप घरी आणतील ही त्यांच्या चरणी माझी प्रार्थना आहे 🙏

  • @chhaya_Harne786
    @chhaya_Harne786 หลายเดือนก่อน +15

    तुमचा मुलगा लवकर परत येईल. श्री स्वामी समर्थ 🌼🙏

  • @user-yf4it5ii8k
    @user-yf4it5ii8k หลายเดือนก่อน +16

    ताई तुम्ही देवा वर विश्वास ठेवा तुमच्या प्रणव लवकर परत येईल.हिच माहादेव चर्यनी प्रार्थना.

  • @swapnilpatil4545
    @swapnilpatil4545 หลายเดือนก่อน +28

    या साठी लोकांनी घरात बसून राहू नये, कोणावर अन्याय झाला तर लगेच त्याला आणि परिवाराला साथ द्या. मीडिया चे आभार

  • @shailadeshmukh6620
    @shailadeshmukh6620 หลายเดือนก่อน +22

    त्यांना सुखरूप येईल ताई खरंच पंकजाताईंनी याच्याकडे लक्ष द्या द्यावे

  • @balasahebmunde7045
    @balasahebmunde7045 หลายเดือนก่อน +25

    सुखरूप परत येवो ही प्रार्थना 💐💐

  • @ushadeshpande277
    @ushadeshpande277 หลายเดือนก่อน +38

    कॉलेज cha नाद सोडा company वर केस करा केंद्राच्या मंत्र्यांशी संपर्क करा

  • @ShivaMH-
    @ShivaMH- หลายเดือนก่อน +16

    तुमच्या न्यूज चॅनलचे आम्ही आभार मानतो
    तुम्ही ही बातमी लोकान पर्यंत पोचली
    तुम्ही दखल घेतली 🙏
    ताई तुमचा मुलगा सुख रूप तुमला मिळेल महादेवा चरणी प्रार्थना करतो 🙏
    🙏हर हर महादेव 🚩

  • @sanjanadeshmukh7333
    @sanjanadeshmukh7333 หลายเดือนก่อน +59

    ओम साई येईल काळजी करू नका जय स्वामी समर्थ

  • @rustumkarad4424
    @rustumkarad4424 หลายเดือนก่อน +29

    प्रणव सुखरुप घरी यावा हिच प्रभू वैद्यनाथ च्या चरणी प्रार्थणा 🙏

  • @santosh9280
    @santosh9280 หลายเดือนก่อน +25

    Reporter साहेब तुम्ही मार्ग दर्शन करुन आधार द्या,
    सरकार कडून त्वरित सह कार्य घ्या

  • @shankarraoasane3185
    @shankarraoasane3185 หลายเดือนก่อน +47

    कंपनीवर पोलीस केस करा. कारण बरेच असे उदाहरणे आहे की, कुणी हुशार व डोईजड होण्यासारखे असेल तर अशांचा कार्यक्रम केला जातो.

  • @Indian_mom_in_india
    @Indian_mom_in_india หลายเดือนก่อน +21

    काय चाललंय सध्या 🙄अमेरिकेत नका जाऊ रे

  • @pratibhaotari2897
    @pratibhaotari2897 หลายเดือนก่อน +11

    प्रणव सुखरूप पणे रहावा आणि परत घरी यावा हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

  • @subhashchandrapawar9519
    @subhashchandrapawar9519 หลายเดือนก่อน +6

    खरोखरंच वाईट वाटतंय, दुःख होतंय... पण श्री सद्गुरू कृपेने सर्व सुरळीत होईल, काहीतरी मार्ग निघेल आणि मुलगा सुखरूप घरी येईल हीच भावना...

  • @PramodVisapurkar
    @PramodVisapurkar หลายเดือนก่อน +6

    आपण आपल्या बेपत्ता मुलाचा विषय मा राजसाहेब ठाकरे यांचेकडे नेणेविषयी विनंती आहे.

  • @111nand
    @111nand หลายเดือนก่อน +6

    तो नीट घरी परत येऊदे. मुलगा महत्त्वाचा. पैसा येईल.
    सगळ्यांच्या प्रार्थना कामी येतील. 🙏🙏

  • @user-kc3gy5qh3w
    @user-kc3gy5qh3w หลายเดือนก่อน +14

    श्री स्वामी समर्थ जप करा
    दिंडोरी प्रणित सेवा घ्या.त्या आईच्या पोटातील पीळ बघुन अश्रु थांबत नाहीत.

    • @ashachile1305
      @ashachile1305 หลายเดือนก่อน +1

      श्री स्वामी समर्थ नित्य सेवा ग्रंथ मध्ये हरवलेल्या व्यक्ती साठी सेवा आहे ती करा

  • @pandurangshinde4444
    @pandurangshinde4444 หลายเดือนก่อน +20

    उद्या स्वामी जयंती आहे मी प्रार्थना करतो स्वामी ना की प्रणव लवकर घरी यावा

  • @shamitamehta444
    @shamitamehta444 หลายเดือนก่อน +6

    तुमचा मुलगा सुखरूप परत घरी येवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @dwarkadumbre1797
    @dwarkadumbre1797 หลายเดือนก่อน +22

    आपलाच गाव बरा!

  • @user-dw2vd6to1m
    @user-dw2vd6to1m หลายเดือนก่อน +12

    आपला मुलगा सुखरूप घराकडे सुखरूप यावा वाशी तुळजाभवानी प्रार्थना आहे

  • @shardatemgire2311
    @shardatemgire2311 หลายเดือนก่อน +3

    दादा ताई आपला मुलगा लवकरात लवकर सापडला पाहिजे हिच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @ranendrabhaip9660
    @ranendrabhaip9660 หลายเดือนก่อน +19

    ताई तात्या मोरे साहेब यांना भेटा तुमचा मुलगा कोठेही असला कसाही असला तर तो भेटेल ही माझी गॅरंटी आहे. मोदी काहीही करू शकत नाही. फक्त तात्या साहेब च हे काम करु शकतात

  • @hamidsaudagar4266
    @hamidsaudagar4266 หลายเดือนก่อน +56

    या आल्हा बच्चे को सही सलामत लोटा दे आमिन 😢😢

    • @ajitmohite2762
      @ajitmohite2762 หลายเดือนก่อน +2

      नेक दिलं से कि हुई दुवा भगवान स्विकारता है.😊

  • @santrammangaonkarofficial
    @santrammangaonkarofficial หลายเดือนก่อน +27

    पाहिल्यादा पोलीस केस करा

  • @bapusahebsasane5265
    @bapusahebsasane5265 หลายเดือนก่อน +17

    मॅडम या बाबतीत कॉलेज काय करणार ? त्या कंपनी विरोधात केस करा,तुम्ही व तुमचे असतील ते सर्व नातेवाईक कंपनीच्या दारात जाऊन बसा ! एक मिनिटात कंपनी ताळ्यावर येईल.

    • @sandhyasawant1729
      @sandhyasawant1729 หลายเดือนก่อน

      Ho na,sarvani ja company office var,hadarvun soda sarvana tarach talyavar yetil,gappa Basu naka

  • @varshajoshi651
    @varshajoshi651 หลายเดือนก่อน +19

    तुमचा मुलगा सुख्ररूप परत येवो स्वामींना प्रार्थना 🙏🙏

  • @user-qb7dd5ge3x
    @user-qb7dd5ge3x หลายเดือนก่อน +7

    आपला मुलगा सुखरूप घरी येऊदे.........हि ईश्वर चरणी प्रार्थना........

  • @deepapatil6510
    @deepapatil6510 หลายเดือนก่อน +17

    पोलीस कंम्पलेंट करा. कंपनी विरूद्ध गुन्हा करा.

  • @varshadeshpande2006
    @varshadeshpande2006 หลายเดือนก่อน +2

    आपली पुत्रभेट लवकरच व्हावी., हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
    🙏🙏🙏

  • @sunitajondhale1810
    @sunitajondhale1810 หลายเดือนก่อน +3

    आपला मूलगा सुखरूप परत घरी परत यावं हिच. ईश्वर ‌चरणी प्रार्थना

  • @santoshkolge1646
    @santoshkolge1646 หลายเดือนก่อน +13

    प्रणव सुखरूप घरी हवा ही ईश्वरचरणी प्रार्थना

  • @manishapadule2542
    @manishapadule2542 หลายเดือนก่อน +4

    प्रणव नक्की परत येईल. स्वामीवर विश्वास ठेवा. स्वामी समर्थ तुम्ही कृपा करा. बाळाला आईकडे लवकर पाठवा. ताई येईल तो. श्री. स्वामी समर्थ🙏🙏🙏

  • @Vaishali7589
    @Vaishali7589 หลายเดือนก่อน +5

    श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना तुमच्या मुलाला स्वामी सुखरूप घरी घेऊन येतील

  • @manishashinde1229
    @manishashinde1229 หลายเดือนก่อน +3

    ताई तुमचा प्रणव सुखरूप घरी परत येईल आम्ही सर्वजण त्याच्यासाठी मनापासून प्रार्थना करू

  • @swapnilpatil4545
    @swapnilpatil4545 หลายเดือนก่อน +21

    रोज डेटा द्यावा लागतो कॅप्टन ला.. मिस्सिंग कुठून झाला ते विचारलं पाहिजे.. बोटी वरून कि बोट थांबते तिकडे.. बोटी वरून झाला असेल तर फार अवघड आहे आणि बोट थांबते तिकडून झाला असेल तर नक्कीच परत येईल.. शक्यता अशी आहे कि काही अकॅसिडेन्ट झाला आहे आणि मुलगा समुद्रात पडला असेल.. भरपूर असे अकॅसिडेन्ट होतात..

  • @jayshrishinde7661
    @jayshrishinde7661 หลายเดือนก่อน +2

    ही बातम्या ऐकून स्वतःच मी अस्वस्थ झाले ते आई-वडिलांचे काय झालं असेल परमेश्वरा जवळ एकच प्रार्थना यांचा मुलगा यांना परत मिळाला पाहिजे.

  • @sandhyadhopte6408
    @sandhyadhopte6408 หลายเดือนก่อน +5

    तुम्ही पोलीसा कडे नोंद करा. अल्हा ताला, ताज बाबा आप के बच्चे को सही सलामत भेजे आमीन.

  • @nihalamurade2971
    @nihalamurade2971 หลายเดือนก่อน +2

    आत्ता तर दोन तीन हप्ते झाले तेव्हां पासुन तुम्हीं कुठलीच कारवाई केली नाही

  • @rahulnavale9862
    @rahulnavale9862 หลายเดือนก่อน +14

    कंपनीच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा नोदवा

  • @lalitakhobragade7902
    @lalitakhobragade7902 หลายเดือนก่อน +2

    ताई तुमचा मुलगा सुखरूप घरी परत येवोत हिच बुद्धाच्या चरणी प्रार्थना

  • @Rdc.1360
    @Rdc.1360 หลายเดือนก่อน +6

    सर्व मीडिया वाल्यांनी हा विषय उचलून धरायाला पाहिजे😢

  • @artikulkarni3004
    @artikulkarni3004 หลายเดือนก่อน

    आपला मुलगा जेथे आहे तेथे सुखरूप व सुरक्षित आहे.
    God bless him.

  • @suvarnatukral2507
    @suvarnatukral2507 15 วันที่ผ่านมา

    तुमचा मुलगा सुखरूप असुदे हि ईश्वर चरणी प्रार्थना

  • @meghalaad6053
    @meghalaad6053 หลายเดือนก่อน +6

    लोकांनी अमेरिकेत जाणं थांबवलं पाहिजे.

  • @meerakarale7160
    @meerakarale7160 หลายเดือนก่อน +2

    तुमचा मुलगा सुखरुप परत येवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करुयात. आई माँसाहेब
    सर्व व्यवस्थित करेल लवकरात लवकर चांगली बातमी मिळेल.

  • @shubhampate4287
    @shubhampate4287 หลายเดือนก่อน +3

    कमाल आहे, मूल शिकली देशाची प्रगती झाली, पण अशा घटनांना राज्य शासन आणि केंद्र शासन यानी कंपनी वर गुन्हा दाखल करून सगली माहिती काढली पाहिजे, जर का अशा मुलांना मारल जात असल तर कंपनी आणि म्यानेजमेंट यांवर् गंभीर गुन्हे दाखल करा. अशा घटना घडने नाही.

  • @rekhaghevare5545
    @rekhaghevare5545 หลายเดือนก่อน +3

    मुलगा सुखरूप येऊ दे हीच प्रार्थना

  • @crazyexperiment7712
    @crazyexperiment7712 หลายเดือนก่อน +3

    श्री स्वामी समर्थ 🙏 तुमचा मुलगा सुखरूप घरी यावा हि स्वामी चरणी प्रार्थना

  • @dadasopatil6659
    @dadasopatil6659 หลายเดือนก่อน +1

    आपला मुलगा सुखरूप परत येऊ ही ईश्वरचरणी प्रार्थना

  • @shakuntalamanur2116
    @shakuntalamanur2116 หลายเดือนก่อน +3

    प्रणव घरी लवकर येवो, ही स्वामी चरणी प्रार्थना

  • @SUSHMAHOSHING-wp5mz
    @SUSHMAHOSHING-wp5mz หลายเดือนก่อน +3

    परमेश्वरा प्रणव सुखरुप घरी यावा ही तुझे चरणी प्रार्थना🙏🙏

  • @poojamhalaskar4366
    @poojamhalaskar4366 หลายเดือนก่อน +1

    आपला मुलगा प्रणव सुखरुप घरी येवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना.

  • @ashwinideshpande3878
    @ashwinideshpande3878 หลายเดือนก่อน +4

    प्रणव परत येईल ही pratharna, पण तुम्ही पोलीस complaint करा. व हिंमत धरा. Cc tv चेक करा अशी मागणी करा. कंपनी च्या विरोधात case दाखल करा. आमच्या कडून पण आम्ही प्रयत्न करू.

  • @sangeetakarney9474
    @sangeetakarney9474 หลายเดือนก่อน +2

    खरंच तुमचं कुटुंब कशातून जात असेल याची कल्पनाही करू शकत नाही.. शेवटी तो तुमचा मुलगा आहे. आशा सोडू नका. मी स्वामींना प्रार्थना करेन की ते सुरक्षित असावेत.

  • @kausalyapatil1614
    @kausalyapatil1614 หลายเดือนก่อน +3

    तुमचा मुलगा सुखरूप घरीयावा हिच निसर्गाचरणी प्रार्थना..🤲🤲🤲🤲🤲🤲🤲🤲🤲🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @user-ht6qp9ul9c
    @user-ht6qp9ul9c หลายเดือนก่อน +6

    प्रणव चा तपास चालू करा मीडिया याने हा मुद्दा लावून धरा

  • @taramarathe1635
    @taramarathe1635 หลายเดือนก่อน +3

    प्लीज आपण कायद्याची मदत त्वरित घ्या, आणि लवकर शोध घ्या सरकारचा कडे ही घटना त्वरित मांडा व शासनाने प्रशासन त्वरित दखल घेऊन प्रनव ला लवकर शोधावे व जीव धोक्यात येणार नाही ही काळजी त्वरित घ्यावी प्रणव जिथं असेल तिथे सुखी रहावा हीच आराधना....

  • @mandadhongade3185
    @mandadhongade3185 หลายเดือนก่อน +20

    श्री स्वामी समर्थ महाराजाचे आर्शिवाद आहे

  • @drnitinmagar8004
    @drnitinmagar8004 หลายเดือนก่อน +5

    ताई तुमचा मुलगा सुखरूप लवकरात लवकरात घरी पोहोचो हीच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @pratibhachapke138
    @pratibhachapke138 หลายเดือนก่อน +3

    प्रणव सुखरूप पण रहावा हिच ईश्वर चरणी .

  • @shiluapte2285
    @shiluapte2285 หลายเดือนก่อน +3

    ब्रम्हांडीय शक्ती ही मुलाला घरी सुखरूप आणतील असा विश्वास ठेवा. बापू नक्कीच त्याच्या सोबत आहेत. काळजी करु नका. पॉझिटिव्ह रहा.

  • @jayshrimadure9841
    @jayshrimadure9841 หลายเดือนก่อน +3

    तुमचा मुलगा सुखरुप घरी परत येवो हिच परमेश्वर चरणी प्रार्थना

  • @nirmalamarathe9901
    @nirmalamarathe9901 หลายเดือนก่อน +1

    आपला मुलगा सुखरूप परत येवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @shilwantgaikwad5200
    @shilwantgaikwad5200 หลายเดือนก่อน +3

    आई वडील आजी यांची तळमळ पाहून जीवाची घालमेल झाली. आम्ही अंतर्मनातून अपेक्षा करतो जिथं असेल तिथं सुखरूप असेल. लवकर सुखरूप तुमच्या पर्यंत येवो.

  • @balasaheb4873
    @balasaheb4873 หลายเดือนก่อน +3

    ईश्वर चरणी प्रार्थना, परत यावा मुलगा🙏🙏🌸🌺

  • @Vaishali-ch5hq
    @Vaishali-ch5hq หลายเดือนก่อน +1

    सरकारने लक्ष घालावे आपल्या लेकराप्रमाणे शोधावे आणि या माउलीला आणून द्यावा तिचे आशीर्वाद मिळतील

  • @SagardeviTarwadiya-lr9iq
    @SagardeviTarwadiya-lr9iq 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुमचा मुलगा सुखरूप घरी येओ ही स्वामी चरणी प्रार्थना

  • @sattupamungurkar4491
    @sattupamungurkar4491 หลายเดือนก่อน +1

    अतिशय वाईट घटना , सुखरूप परत येवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना .😢

  • @Vishakha-vd8gy
    @Vishakha-vd8gy หลายเดือนก่อน +2

    तूमच बाळ लवकर घरी येईल ही समर्थ चरणी प्रार्थना

  • @user-fg7ou4dz6f
    @user-fg7ou4dz6f หลายเดือนก่อน +1

    शासन जिवंत नाही त्यामुळे अवघड आहे

  • @vandanasalunke279
    @vandanasalunke279 หลายเดือนก่อน +3

    श्री स्वामी समर्थ ...लवकर भेटावं त्या माऊलीचा मुलगा

  • @sanjaykhalkar8520
    @sanjaykhalkar8520 หลายเดือนก่อน +3

    एकुलता एक मुलगा प्रणव सुख - रूप घरी येवो ही परमेश्वर चरणी प्रार्थना.

  • @rajendrapatil3535
    @rajendrapatil3535 หลายเดือนก่อน +14

    इतक्या दूर पाठविण्यापूर्वी पालकांनी विचार करायला हवा. नाहीतर मन कठोर ठेवायची तयारी असावी.