शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन अभियान२०२४-२५ श्री शि.म.हा.व क.म.वि.पुणे-२
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 24 ธ.ค. 2024
- श्री शिवाजी मराठा हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय पुणे-२
१९/१२/२०२४
पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ पुणे अंतर्गत गुणवत्ता संवर्धन अभियान तर्फे खालील टीम परीक्षण करण्यासाठी प्रशालेत आली होती.
1.मा. सौ छाया महिंद्रकर मॅडम -उपशिक्षणाधिकारी, माध्यमिक विभाग ,पुणे जिल्हा परिषद
2.मा. सौ प्रणिता कुमावत मॅडम -उपशिक्षणाधिकारी, माध्यमिक विभाग ,पुणे जिल्हा परिषद
3. मा.श्री गायकवाड नंदकुमार माजी मुख्याध्यापक व मुख्याध्यापक संघ सदस्य
4.श्री किशोर बोरसे सर -सचिव ,पुणे शहर, मुख्याध्यापक संघ
5.श्री. शिवाजी कामथे सर -कार्याध्यक्ष, पुणे शहर, मुख्याध्यापक संघ
6.श्री सतीश वाघमारे सर - पुना नाईट स्कूल सुंदराबाई राठी
गुरुवार दिनांक 19 डिसेंबर रोजी श्री शिवाजी मराठा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय शुक्रवार पेठ पुणे 2 या प्रशालेचे शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन अभियान अंतर्गत शाळा तपासणी झाली.
शाळेय परिपाठा पासून शाळा तपासणीची सुरुवात झाली. शाळेच्या आवारात रायगडावरील मेघडबरीची प्रतिकृती आणि शिवप्रतिमा आहे .अतिशय भरलेल्या सकाळच्या वातावरणात परिपाठ झाला.
शिव विचाराने प्रेरित असलेल्या शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे लाठीकाठी विद्यार्थ्यांनी केलेले विज्ञान प्रकल्प ,जुडो कराटे सादरीकरण, विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले संस्कृत,भूगोल गणित, क्रीडा विषयातली शैक्षणिक साधने ,संविधान उपक्रम, पॉपअप कलाकृती चित्रकला कृती असे विविध प्रकारचे सर्व नाविन्यपूर्ण उपक्रम आज शाळा तपासणी दरम्यान बघता आले.
तसेच
भाषा विषय कक्ष
इतिहास भूगोल कक्ष
गणित विज्ञान कक्ष
चित्रकला कक्ष
संगीत कक्ष
स्काऊट रूम
स्पोर्ट्स रूम असे सर्व तऱ्हेचे अद्यावत सोई नी युक्त असे कक्ष पाहण्या मध्ये आले.
प्रशालेने शैक्षणिक वर्षात आयोजित केलेल्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची पीपीटी माध्यमाद्वारे उपक्रमांची झलक बघता आली.
1. विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे विषय निहाय प्रकल्प
2. कोडिंग अणि कॉम्प्युटर प्रोग्रामिंग प्रोजेक्ट
3. वज्रसिद्ध लाठीकाठी उपक्रम
4. सायन्स प्रोजेक्ट
5. विद्यार्थी कलाकृती
वरील नाविन्यपूर्ण उपक्रम नवीन शैक्षणिक धोरणास अनुसरून होते.
मा.सौ महिंद्रकर मॅडम, मा. सौ कुमावत मॅडम,मा. श्री बोरसे सर ,मा.श्री कामथे सर यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले.तसेच सौ शिरोळे मॅडम आणि इंस्पेक्शन कमिटीतील शिक्षक आणि अध्यापिका यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले, प्राचार्य श्री काकडे सर यांनी मान्यवरांचा सत्कार आणि परिचय करून दिला तर सौ मोडक मॅडम यांनी आभार प्रदर्शन करून या उपक्रमाची सांगता केली.
प्राचार्य
श्री काकडे दिलीप कृष्णा
श्री शिवाजी मराठा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय
425 शुक्रवार पेठ
पुणे 2