धक्कादायक लोणावळा भुशी डॅम येथे संपूर्ण कुटूंब गेले वाहून, चार जणांचा मृत्यू .

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 มิ.ย. 2024
  • भुशी डॅम येथे संपूर्ण कुटूंब गेले वाहून
    लोणावळा दिनांक ३० जुन रोजी दुपारी ०३.०० वा. लोणावळा भुशी डॅम येथे संपूर्ण कुटूंब वाहून गेले असून अश्या ठिकाणी जाताना सावधगीरी बाळगावी आणि शक्यतो जाणे टाळावे अश्या सूचना प्रशासनाकडून वारंवार देण्यात येत असून ही लोक त्याकडे दुर्लक्ष करित असताना समोर येत आहे.
    असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे.
    सहलीचे ठिकाणी किंवा धबधब्याचे ठिकाणी जाताना जरा सांभाळून कारण लोणावळा भुशी धरणाच्या ठिकाणी एकाच कुटुंबातील पाच जणांना आपला जीव गमावा लागला भुशी धरणाच्या प्रवाहात पाच जण वाहून गेल्याची घटना दुपारच्या वेळेला घडली.
    धरणाच्या आजूबाजूला पाऊस झाल्यामुळे धरणात येत असलेल्या धबधब्याच्या ओव्हरफ्लोमुळे ही दुर्घटना घडली हे कुटुंब पुणे येथील सय्यद नगरचे असल्याचे अंदाज आहे. घटनेची माहिती मिळतात लोणावळ्याचे पोलीस निरीक्षक व त्यांचे सहकारी सह व शिव दुर्गपथक हे घटनास्थळी पोहोचून शोधकार्य सुरू केले.
    शोध मोहिमेत चार जणांचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे तरी एकाच शोध सुरू आहे
    मिळालेल्या माहितीनुसार यात तीन मुली ,एक मुलगा व एक महिला असल्याचे सांगण्यात येते.
    दक्षवेध न्यूज मराठी पुणे प्रतिनिधी प्रशांत काजळे.

ความคิดเห็น •